गुरुवार, 16 फ़रवरी 2017

योगसूत्र भूमिका

         योगसूत्र
    भूमिका
Author Dr Balram Sadashiv Agnihotri
typed by Ashwini or Prachi -- To proof read
    भारतीय तत्वज्ञानांमधील षड्दर्शनांपैकी योग हे एक महत्वाचे दर्शन होय. पतज्जलीमुनी रचित पातज्जल योगसूत्र हा  ग्रंथ म्हणजे योगसूत्र हा ग्रंथ म्हणजे योगशास्त्रावरील सर्व ग्रंथ म्हणजे योगशास्त्रावरील सर्व ग्रंथांचा मुकुटमणी. बुद्धिच्या योगाने कैवल्य मिळविण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न कसे करावेत याचे विवेचन या ग्रंथात आहे.
    मोक्ष शास्त्राचे उदगमस्थान दुःखत्रय आहे, असे कपिलमुनिंचे सांख्याशास्त्र सांगते. दुःखत्रयाभिघातात्तदाभिघातके हेतौ जिज्ञासा। आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशी तीन प्रकारची दुःखे मनुष्यांना सतावतात. या दुःखांपासून सूटका मिळावी यासाठी कपिलमुनींनी शास्त्र सांगितले व कपिलमुनींचा आधार घेऊन पतज्जली मुनींनी मोक्षासाठी योगशास्त्राची उभारणी केली. या मोक्षप्राप्तीस त्यांनी कैवल्यप्राप्ती नाव दिले. पुरूषार्थशुन्यांना गुणांना  प्रतिप्रसवः कैवल्यम्। भोग देणारे 
????????
भूमिका
 भोग देणारे असे जे तीन गुण सत्तव, रज व तम यांचा प्रकृतिमध्ये लय होऊन पुरूषाला स्वरूपाचे ज्ञान होणे (आपण प्रकृतिहून पूर्ण भिन्न आहोत हा विवेक येणे ) याला कैवल्य- प्राप्ती संज्ञा आहे. सांख्यांच्या मते या स्वरूप- प्रतिष्ठेसाठी  ईश्वर या शब्दाने संबोधिला जाणारा जो पुरूष, त्याची गरज नाही.  म्हणून सांख्या निरीश्वर वादी तर पतज्जली मुनींच्या मते अशा ईश्वराची नितान्त आवश्यकता असून ईश्वरप्रणिधानाद्वा सूत्र सांगून  क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्टस्येश्वरस्य कैवल्यप्रात्यर्थं योगदानं वर्तते। या विवेचनाचे ईश्वरास प्राधान्य दिले आहे. कपिल व पतज्जली मुनी हे दोघेही प्रकृती व पुरूष यांची भिन्नता मानणारे अर्थात् व्दैतवादी आहेत. ईश्वराचे अस्तित्व मान्य करणे हा एक फरक सोडल्यास पातज्जल योगसूत्राला सर्वत्र सांख्य  दर्शनाला आधार घेतला आहे. बुद्धिच्या योगाने प्रकृती- पुरूष भिन्नत्व ओळखुन कैवल्यप्राप्ती हे दोघांचे उद्दिष्ट. ते साध्य करण्यासाठी मन, बुद्धी, अहंकार, इंद्रिय यांच्या नियंत्रणाची पद्धत पतज्जली मुनींनी विवेचनाव्दारे स्पष्ट केली आहे. शंकराचार्यांच्या मताने जग्त आभास असून त्यालाच अध्यास म्हणतात. सर्व अनर्थ उत्पन्न करणा-याला अध्यासाचा नाश करण्यासाठी वेदान्त शास्त्रे प्रवृत्त झाली आहेत. त्यातही अव्दैत वेदान्तशास्त्र प्रमुख असून त्यात सांगितलेल्या ज्ञानाचा साक्षात्काराने मनुष्यास मोक्ष मिळतो. महाभारतात भीष्म पितामह युधिष्ठिरास सांगतात. -
          एवं व्यवसिते लोके बहुदोषे युधिष्ठिर।
          आत्ममोक्षनिमित्तं वै यतेत मतिमान्नरः ।।
  बहुविधदोषरूपी संसारापासून मुक्त होण्यासाठी बुद्धिमान पुरूषाने प्रयत्नशील असावे. अविद्यानाशश्चाव्दियात्मज्ञानेन ततश्चात्यन्तदुःखनिवृत्तिरूप  पुरूषार्थो मोक्ष उपनिषज्ज्ञानैक साध्य इति वेदान्तविज्ञानविदो वदन्ति।
     पतज्जली मुनींच्या मताने परिणामतापसंस्कारदुःखैगुर्णवृत्तिविरोधाच्च दुःखमेवसर्वम् .,तस्यहेतुरविद्या। या अविद्येचा नाश म्हणजेच दृशिरूप जीवाचे कैवल्य. जीव मुळांतच आत्मा अत एव शुद्धज्ञानस्वरूप आहे. ज्ञान म्हणजे काय १ ज्ञानमित्युत्पत्तिविनाशरहितं चैतन्यम्। हे चैतन्य स्वरूप जाणणे हाच मोक्ष. पतज्जली मिनींच्या मताने मोक्ष हाच कैवल्य. यात मुक्त पुरूषाच्या गुणांचा प्रतिप्रसव (विलय) मूळ प्रकृतीत होतो व पुरूष चिति स्वरूपात प्रतिष्ठित असतो. वेदान्त मतानुसार-
        प्रकाशाभिन्नमेवैतद् विश्वं सर्व हि भासते।
        लहरिबुदबुदादींना सलिलान्न पृथकस्थितिः ।।
  शंकराचार्य़ म्हणतात-
  सत्यपिभेदापगमे नाथ तवांह न मामकिमस्वत्वम्।
  सामुद्रो हि तरङः क्वच न समुद्रो न तारङः ।।
      अभेद ज्ञान झाल्यावर जीव परत्मात्मस्वरूप होतो. परमात्मा जीव स्वरूप होत नाही. तरंग हे समुद्रच असतात. समुद्र कधी तरंगस्वरूप नसतो. उपनिषदांत मन्त्र आहेः
      यस्मिन्सर्वाणि भूतान्यात्मैवाभूव्दिजानतः ।
     तत्र को मोहः कः शोक एकत्वमनुपश्यतः  ।
 सर्व शास्त्रांचे ध्येय कथं मोक्षः१ असून त्यांचे साधन शोधणारे प्रथम मुनि पतज्जली -यांनी सोगसूत्र लिहिली आहेत व या योगशास्त्राचा आधार कपिलमिनींचे सांख्यदर्शन आहे. सांख्यकारिकेत म्हटले आहेः
              एवं तत्त्वाभ्यासान्नास्मिन मे नाहमित्यपरिशेष्म।
              अविपर्ययाव्दिशुद्धं केवलमुत्पद्यते ज्ञानम् ।।
    तत्त्वाच्या अभ्यासाने मी जीवस्वरूप नसून विशुद्ध चैतन्य आहे. हे ज्ञान व या ज्ञानाच्या योगाने प्रकृतिं पश्यति पुरूषः प्रेक्षकवदवस्थितः स्वच्छः। विशुद्ध पुरूष निर्विकार भावाने जेव्हा प्रकृतिस पाहतो, तेव्हा प्रकृती उपेक्षित राहिल्याने व पुरूष तव्दश  नसल्याने मुक्त पुरूषाच्या दृष्टिने प्रकृती स्वयं सर्व व्यापारशून्य होते. हेच कैवल्य.
     पतज्जली मुनींनी योगशास्त्राचे चार भाग केले आहेतः १) समाधिपाद, २) साधनपाद, ३) विभूतिपाद . ही सूत्ररचना विवेकपूर्ण आहे. साध्या तिचे स्वरूप प्रथम पादांत आहे. सांख्य व योग हे दोघे बहुपुरूष मानणारे असल्याने ब्रह्य, परमात्मा हे शब्द  त्यांना वर्ज्य आहेत. योगसूत्रात द्रष्टा हा शब्द प्राचुर्याने असून त्याच अर्थाने पुरूष , चितिशक्ति हे शब्द आहेत. आत्मा हा शब्द  एकाच सूत्रांत आहे- तदर्थ एव दृश्यस्यात्मा। पण यातदेखील दृश्याचे स्वरूप द्रष्ट्यासाठी आहे, या स्वरूप अर्थाने आत्मा शब्द योजलेला असून वेदान्तात आत्मा नाम ब्रह्य, चिन्मात्र स्वरूपो-न्तर्यामि साक्षी  हे जे आत्म्याचे वर्णन केले आहे त्याचा स्पर्शदेखील योगसूत्रांत नाही. उलट द्रष्टा या पुरूषअर्थी  शब्दावरच सर्व सूत्रांचा  भर आहे. वेदान्तात मोक्षाचे स्वरूप असेः   नित्यानित्यविचारादनित्यसंसारसुख दुःखविषय  समस्तक्षेत्रममताबन्ध- क्षयोमोक्षः।  प्रकृतिचा बन्ध ही सर्वसामान्य कल्पना. पण समस्त क्षेत्रममतारूप बन्धाचा क्षय ही कल्पना पातज्जल योगसूत्रांत  नसून सर्वबीजनिरोध   अर्थात् सर्व वृत्तिंचा निरोध झाल्याने जी समाधी सिद्ध होते त्यांत प्रकृति -पुरूष- भिन्नता पुरूषाला अपरिमणित्व येते असा सिद्धांत मांडला आहे. प्रकृतिचे सत्त्वरजमात्मक गुण कारमांत लीन पावतात. ते गुण पुनः पुरूषास बंधनात आणू शकत नाहीत. हे जे प्रकृतिचे पुरूषाशी सम्बन्धराहित्य हीच स्वरूपप्रतिष्ठा व हाच मोक्ष. मोक्षाची वेदान्ताची कल्पना व पतज्जली मुनींची मोक्षकल्पना अत्यंत भिन्न आहेत. श्रीमदभगवतगीतेत सांगितले आहेः
         यतेन्द्रिय मनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः ।
         विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मक्त एव सः ।।
     अन्यत्र मोक्षासंबंधी म्हटले आहे- संकल्पादिकंमनो बन्धहेतूः । तव्दियुक्तं मनो हि मोक्षाय भवति।
   मोक्षाचे जे विविध स्वरूप आहे हे अनुभवजन्य असल्यामुळे भगवव्दितेत  म्हटले आहे -
                  योग युज्जीत सततमात्मानं रहिस स्थितः ।
                  एकाकी यताचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ।।६-१० ।।
  योग्याने एकान्तात बसून आत्म्याचे ध्यान करावे, याचा परिणाम सांगतात-
                 युज्जन्नेवसदात्मानं योगी विगतकल्षः ।
                 सुखेन ब्रह्यसंस्पर्शमन्त्यन्तं सुखमश्नुते ।। ६. २८ ।।
 पापरहित योगी सहजपणे परब्रह्यप्राप्तिरूप अपार सुखाचा अनुभव घेतो.
               यत्समाधौ परं ज्योतिरनन्तं विश्वतो मुखम् ।
               तस्मिन्दृष्टे क्रियाकर्म यातायात न विद्यते ।।
 आत्मानुभाव घेतलेला मनुष्य क्रियाकर्म रहित होऊन जन्ममृत्युच्या फे-यांत येत नाही.
        पतज्जली मुनींच्या मते , सत्वपुरूषय़ोः शुद्धिसाम्ये कैवल्यम्। ,सत्त्वशुद्धी म्हणजे कर्तृत्वाभिमानाची निवृत्ति. पुरूषशुद्धी म्हणजे भोगापासून निवृत्ती. अशा निवृत्तिच्या काळात पुरूष स्वतःच्या रूपाने स्थित असतो, तो दृशिस्वरूप असतो. दृशि हा द्रष्टा असतो. जागृतीत तो डोळ्यांनी पाहातो म्हणून त्याला  उपद्रष्टा म्हटले आहे. स्वप्नांत, सुषुप्तीत व मोक्षदशेत तोच द्रष्टा असतो. म्हणूनच पुरूषः पृक्रितिं पश्यति अशी सांख्याकारिका आहे. गुणांनी बद्ध असा जीव मुक्त झाल्यावर (सत्तव, रज, तम) आपल्या कारणांत ( मूळ प्रकृतीत) विलय पावतात. ते मुक्त पुरूषास पुनः बांधू शकत नाहीत. समाधिपाद, साधनपाद, विभूतिपाद येथ पर्यंत सूत्रांची पूर्ण सुसंबंद्धता आहे. कैवल्यपादांत द्रष्टा या पदाला बिन्दु धरून कैवल्याचे स्वरूपवर्णन आहे. हा द्रष्टा जेव्हा जीवावस्थेत जागृत  स्थितीत असतो तेव्हा त्याला उपद्रष्टा म्हटले आहे. भगवदगीता सांगते, पुरूशदशेत असताना मुळात महेश्वरस्वरूप असूनही, तो उपद्रष्टा , अनुमत्ता, भर्ता, भोक्ता आहे. ध्यानाने जेव्हा हा उपद्रष्टा आपणा स्वतःला पाहातो, त्यावेळी त्या मुक्ताला सर्व बाह्य असून नसल्यासारखे असते. प्रकृतिने सर्व चराचर क्रिया होतात, पुरूष स्वतः अकर्ता असतो, ही क्षेत्र-क्षेत्रज्ञ- भिन्नता कळून आल्यावर उपद्रष्टा हा विकारापासून सुटतो व तत्त्वतः आपले अविनाशी स्वरूप जाणून परब्रह्यस्वरूप (दृशिस्वरूप) होतो.
         साधनपादांत क्रियायोगाचे वर्णन आहे. याच्या अभ्यासाने समाधी अनायास साधली जाते. अविद्या , अस्मिता, इच्छा , व्देष व अभिनिवेश या क्लेशापासून पुरूष सहजच दूर जातो. जे दुःख अनागत असते (प्राप्त झालेले नसते) अशा दुःखांचा सहज नाश होतो. या पादांत कैवल्यप्राप्तिची इच्छा असणा-याने ईश्वराचे सहाय्य प्राप्त होते. असे सांगितले आहे. ईश्वरप्राप्ति  संबंधात कालिदास म्हणतो- तपः किलेदं तदवाप्तिसाधनं, मनोरथानामनगतिर्न विद्यते । तप तीन प्रकारचे असते- शरीरतप , वाकतप आणि मानसतप. देव, व्दिज , आचार्य गुरू, ज्ञानवृद्ध यांची सेवा हे शरीर तप. उव्देग न आणणारे बोल बोलणे ,सत्य व प्रिय बोलणे, मोक्षशास्त्राचे अध्यन करणे हे वाकतप. शांत स्वभाव, मौन, मनाचा निग्रह, अन्तःकरणाची पवित्रता, अहंकार नसणे हे मानसतप आहे.
     अहंकारभिमानेन जीवः स्याद्धि सदाशिवः ।
     स (जीवः) चाविवेकप्रकृतिङःत्या तत्र मुह्यते ।।
    नानायोगनिशतंगत्वा शेते-सौ वासवशात् ।
    विमोक्षात्सांचरत्येव मत्स्यः कूलव्दयं यथा ।।           
    ततः कालवशादेव ह्यात्मज्ञानविवेकातः ।
????????
भारतीय दर्शनशास्त्राची सहा दर्शने न्याय, वैशेषिक, मीमांसा, सांख्य, योग व वेदान्त अशी आहेत. कसे जगावे, कसे आचरण करावे याचा विचार योगदर्शनामध्ये केलेला आहे. 'पातज्जल योगसूत्र' हा योगदर्शनावरील ग्रंथांचा मुकुटमणी. समाधी, साधन, विभूति व कैवल्य अशा चार टप्प्यांमध्ये अपरिमित ज्ञान आणि कैवल्यता प्राप्त करण्याचा क्रियायोग मुनींनी सांगितला. त्यावर भोजदेव, मणिप्रभा, चंद्रिका, योगसुधाकर असे टीकाग्रंथही संस्कृतमध्ये आहेत. त्यांचा संदर्भ घेत मराठी विवेचन या पुस्तकात केले आहे. त्याने साक्षेपी विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.
     योगव्श्रितवृत्तिनिरोधः असे योगाचे स्वरुप किंवा उद्दिष्ट आहे. प्रमाण, विपर्यय, विकल्प स्मृति व निद्रा या चित्तवृत्तिचा निरोध ब्रह्मचर्य, तत्त्वज्ञान, विद्या व श्रध्दा यांचा दीर्घ अभ्यासाने तसेच वैराग्याच्या आचरणाने होतो. यामध्ये ईश्र्वर सहाय्यक होतो. कारण तो प्रणववाचक ईश्र्वर गुरुंचा गुरु आहे. ध्यानाने चित्ताची एकाग्रता होऊन अध्यात्मप्रसाद मिळतो, प्रज्ञा ऋतंभरा होते व सबीज अथवा निर्बीज समाधिचा लाभ होतो. यासाठी अविद्या, अस्मिता, राग, व्देष व अभिनिवेश या क्लेशांचा तसेच त्यामुळे निर्माण होणा-या कर्माच्या साठ्याचा त्याग करावा. क्लेश व कर्मामुळेच मानवाचे ज्ञान, आयुष्य व भोग ठरतात. विवेकामुळे हे सर्व कर्मबंध थोपवून पुरूष स्वतःला प्रकृतिपासून वेगळा पाहु शकतो. हे पुरूषाचे द्रष्टपण अष्टांगयोगाचा विवेकपूर्ण वापर केल्याने प्राप्त होते.

     यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार ही योगातील पाच बहिरंगे सिद्ध झाल्यावर योगी जेव्हा धारणा, ध्यान व समाधी यांकडे वळतो, तेव्हा त्यास कित्येक सिद्द, दिव्य रुप व दिव्य प्रतिभा वश होतात. त्यावेळी क्षण या विषयावर संयम केल्याने सर्वज्ञता व चित्तशुध्दी येते. अशावेळी वृत्तिचा निरोध झालेले चित्त विवेकाने नम्र झालेले व कैवल्याच्या योगाने भारलेले असते. त्याच्या क्लेश कर्मांची निवृत्ती होते. अशा पुरुषासाठी काळाचे क्रमण होत नाही. त्यास स्वरुप प्राप्ती होते. हेच कैवल्य
??????????????????????
उत्तराभिमुखोभूत्वा स्थानात्स्थानांतरक्रमात्
मूध्न्याध्यायात्मनःप्राणान्योगाभ्यासं स्थितकश्र्चरन्
योगात्संजायते ज्ञानं ज्ञानाद्योगः प्रवर्तते
योगज्ञानपरोनित्यं स योगी न प्रणश्यति (योगोपनिषद्)
साधनपादांत प्रत्याहार,धारणा,ध्यान,समाधी यांचे वर्णन आहे,ज्याचा प्रत्येकाने नित्य अभ्यास करावा.
जगत्सर्वमिदं मिथ्याप्रतीतिः प्राणसंयमः
चित्तस्यान्तर्मुखीभावः प्रत्याहारस्तु सत्तम
चित्तस्य निश्र्चलीभावो धारणा धारणं विदुः
सोहंहं चिन्मात्रमेवेति चिन्तनं ध्यानमुच्यते
ध्यानस्य विस्मृतिःसम्यक् समाधिरभिधीयते
समाधिःस तु विज्ञेयः सर्ववृत्तिविवर्जितः
ब्रह्म सम्पद्यते योगी न भूयः संसृतिं व्रजेत् (योगोपनिषद्)
विभूतिपादांत धारणा,ध्यान,समाधी यांचे वर्णन आहे.यांच्या एकीकरणापासून संयम उत्पन्न होतो.या संयमामुळे पुष्कळ सिध्दी प्राप्त होतात.योगी या सिध्दिमध्ये फसतो.यांच्यात राहून योग्याला कैवल्यप्राप्ती होत नाही. या सिध्दिच्या संबंधात गौडपादाचार्य सांगतात-
लये संबोधयेच्चितं विक्षिप्तं शमयेत् पुनः
सकषांय विजानीयात् शमप्राप्तं न चालयेत्
नास्वादयेसं तत्र निःसडं प्रज्ञया भवेत्
निश्र्चलं निश्र्चरच्चित्तमेकीकुर्यात् प्रयत्नतः
समाधी साधताना झोप आली तर चित्ताला जागे करावे.जर चित्तात क्षोभ उत्पन्न झाला तर त्याला शांत करावे.चित्तात भिन्न प्रवाह आले तर ते जाणून चित्त शांत होईल असे ध्यानस्थ बसावे.रसास्वादांत गुंतू नये.रसास्वाद म्हणजे भिन्न प्रकारच्या सिध्दी.जसे देवांनी जरी जेवण्यासाठी आग्रह केला तरी ते आमंत्रण स्वीकारु नये.प्रज्ञेने निःसड रहावे.ही रसास्वादाची अवस्था कळणे आणि ती ओलांडणे हे अत्यंत कठीण असते व त्यामुळेच योगी जन्ममरणाच्या फे-यांत राहातो म्हणून प्रयत्नाने चित्त निश्र्चल ठेवावे.
कैवल्यपादांत मुक्त पुरुषाच्या अवस्थेचे वर्णन आहेः
 तदा विवेकनिम्नं कैवल्यप्राग्भारं चित्तम्
पुरुषाला प्रकृतिभिन्नत्वाचा बोध होताक्षणीच त्याचे चित्त कैवल्याच्या ओघाने भरुन जाते किंवा भारले जाते.संसारात गुंतलेल्यांना आत्मदर्शनच नसते,त्यामुळे चित्तांत विवेकामुळे उत्पन्न होणारी निवृत्तिच नसते.त्यावेळी चित्ताचा प्रवाह कैवल्याच्या विरुध्द दिशेने असतो.कैवल्याचा बोध होतो,त्या आधीची अवस्था म्हणजे पुरुष-प्रकृति-भिन्नत्व या भाराने चित्त व्यापृत असणे.ही योगाची शेवटची अवस्था.यांत क्लेश कर्माची निवृत्ति होते.या स्थितीत ज्ञानावर असलेले सर्व आवरण दूर होते व अनन्त जे ज्ञान ते प्राप्त झाल्याने ज्ञेय (आणखी काही जाणून घ्यावयाचे आहे) हे राहतच नाही.या संबंधात कैवल्योपनिषद् सांगते-
न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैकेमृतत्वमानशुः
परेण नाकं निहितं गुहायां विभाजते यद्यतयो विशन्ति
अपाणिपादोहमचिन्त्यशक्तिः पश्याम्यचक्षु स शृणोम्य कर्णः
अहं विजानामि विविक्तरुपो न चास्ति वेत्तामम चित्सदाहम्
सांख्य मतांचे खण्डन म्हणून अजातिवाद पुढे आला.नंतर मायावाद,विवर्तवाद व शेवटी अव्दैत सिध्दांत येऊन त्यांत सर्व वादांची परिणति झाली.अजातिवादाचा सिध्दांत असा-
न कश्र्चिज्जायते जीवः सम्भवोस्य न विद्यते
एतत्तूत्तमं सत्यं यत्र किंचिन्न जायते
कोणीही जीव जन्माला येत नाही.मग सर्व संसार जो चालतो तो कसा
यावर गौडपादाचार्य सांगतात-
यथा मायामयी जीवो जायते म्रियतेपि च
तथा जीवा अमी सर्वे भवन्ति न भवन्ति च
मनोद्श्यमिदं सर्वं यत् कित्र्चित् सचराचरम्
मनसोह्यमनीभावे व्दैतं नैवोपपद्यते
शंकराचार्यांचा सिध्दांत स्वीकारुन जगत् हे माया अत एव मिथ्या असे म्हटले आहे.
???????????
योगसूत्र
  भूमिका
   कार्यमाकाशादिकं बहुप्रपच्चं जग्त, कारंण परंब्रह्य, तस्मात्कारणात् परमार्थतोनन्यत्वम् व्यतिरेकेणाभावः कार्यस्यावगम्येते। (शांकरभाष्य २.१. १४.).हा मायावाद दृढ करण्यासाठी विवर्तवादाची स्थापना झाली . विवर्तो नाम उपादानविषमसत्ताककार्यापत्तिः ।मायेसंबंधी म्हटले आहे-
                      नासद्रुपानसद्रुपा माया नैवोभयात्मका।
                      सदसभ्द्यामनिर्वाच्या मिथ्याभूता सनातनी ।।
                      एक एव परमेश्वरः कूटस्थ नित्यो विज्ञानधारतुविद्या मायया
                     मायाविवदनेकधा विभात्ये, नान्यो विज्ञानधातुरस्ति।
                                                                  शां.भा . १.३.१९
   
      या विवेचन करून सांख्यांचा तसेच पतज्जली मुनींचा व्दैतवाद शंकराचार्यांनी फोल ठरविला आहे.
     बौद्धांचे चार मतप्रवाह आहेतः एक जग सत्य मानतात. ह्यांना बाह्यार्थवादी म्हणतात. वैभाषिक ही त्यांची शास्त्रीय संज्ञा आहे. दुसरे बाह्यार्थानुमेयत्ववादी आहेत यांना सौत्रान्तिक म्हणतात. तिसरे बाह्यार्थशून्यत्ववादी आहेत, यांना योगाचार ही संज्ञा आहे. चौथे सर्वशून्यत्तववादीआहेत, यांना माध्यमिक बौद्ध मतानुवादी म्हणतात. यांत सर्वशून्यत्तववादी मतांचा प्रथम विचार असा -दृष्टार्थ व्यव्हापश्च स्वप्नव्यव्हारवत्संवृत्या (अविद्या) संगच्छन्ते। जे बाह्य पदार्थ आहेत ते स्वप्नव्यव्हाराप्रमाणे अविद्येने भासतात. निष्कर्ष असा- स्वव्यत्तिरिक्त ग्राह्यविरहात्तदात्मिका बुद्धिः स्वयेम स्वात्मरूपप्रकाशिका प्रकाशवदिति सिद्धम्। अस्तित्वच  नाही. स्वप्नांमध्ये बाह्य विषयाशिवाय ज्ञान होते तसेच ज्ञान जागृतावस्थेत होते. व्यब्हारात जे ज्ञानवैचित्र्य आहे, ते वासनावैचित्र्यामुळे होते. त्याला विषयवैचित्र्याची जरूरी नाही. बुद्धेः सकाशादन्ययोर्ग्राह्यग्राहकयोरभावात्सैव (बुद्धिरेव) स्वयं प्रकाशते। यावर अत्तर असे की अर्थपलब्धिनिमित्ता ही प्रत्यर्थं नानारूपा वासना भवन्ति। अनुपलभ्यमानेषु त्वर्थेषु किं निमित्ता विचित्रा वासना भवयुः। बाह्य पदार्थाचे अस्तित्व आहे म्हणूनच निरनिराळ्या वासना उत्नन्न होऊ शकतात. बाह्य पदार्थाअभावी वासनाच उत्पन्न होणार नाहीत. कारण वासना नाम संस्कार विशेषः। संस्कारश्च नाश्रयामन्तरेणावकल्पन्ते। एवं लोके दृष्टात्वात्। जे बौद्ध बाह्य पदार्थांचे अस्तित्व नाकबूल करतात त्यांना वैधर्म्याच्च या बादरायण सूत्राने उत्तर दिले जाते. स्वप्नांत उपलब्ध झालेल्या वस्तूंचा जागृतिमध्ये उपलब्ध झालेल्या स्तम्भादिकांचा कोणत्याही अवस्थेत बाधा होत नाही. जर स्वप्न -निद्रा या अवस्थेत बाह्या वस्तूंचा बाधा होतो असे म्हणाल तर त्यावर उत्तर असे की, जो स्वप्नांत अगर निद्रेत असेल त्याला बाह्य वस्तू शून्य असल्या तरी त्याच्या जवळपास जागी असणारी  माणसे आहेत. त्यांना या दृश्य वस्तूंचा बाधा झालेला नसतो व निद्रिस्थ जागा झाल्यावर पुनः त्याच वस्तू पाहातो. शिवाय स्वप्न दर्शन ही स्मृती आहे. जागृतिमधील दर्शन हा अनुभव आहे. संस्कारमात्रजं हिविज्ञानं स्मृतिः। प्रत्युत्पन्नेन्द्रियसंप्रयोगलिङ्ग.-शब्दसारूप्यान्यथानुपपद्यमान योग्यप्रमाणातनुत्पत्तिलक्षणसामग्रीप्रभवं तु  ज्ञानमुलब्धिः। इन्द्रियांच्या संयोगामुळे व शब्द सारूप्यामुळे केव्हाही उत्पन्न झालेले जे प्रमाणसिद्ध ज्ञान त्याला अनूभूति म्हणतात. म्हणजेच जागृतिमधील पदार्थ वस्तुनिष्ठ आहेत.. त्यांचे ज्ञान आणि स्वप्नभास ही दोन्ही भिन्न आहेत. स्वप्नपदार्थ आभास आहेत. संसारातील वस्तू वास्तविक आहे म्हणून सांख्य मतानुसार पुरूष सत्य आहे, सतेच त्यापासून भिन्न अशी जी प्रकृती तीपण सत्य आहे, कारण पुरूष प्रकृतिभिन्नत्वाने स्वतःला व प्रकृतिला पाहतो.
               क्षणभङ्गवादी बौद्धांचा सिद्धांत असा-
   उत्तरस्मिन् क्षण उत्पद्यमाने पूर्वक्षणो निरूध्यत इति।  प्रत्येक क्षणी सर्व पदार्थांचा नाश  होतो. पूर्व क्षणांत नाश होताच उत्तर क्षणांत त्या वस्तू उत्पन्न होतात. तोच तो पुनः पूर्व क्षण होऊन सर्व वस्तू नाश पावतात व उत्पन्न होतात.  असा क्षणभङ्गवादाचा सिद्धांन्त आहे.
   याचे खंडन करताना शंकराचार्य तर्क देतातः असा जर पूर्व व उत्तर क्षणांमध्ये कारणकार्य सिद्धान्त मानला तर कारण कार्यभाव सिद्ध होत नाही. पूर्व नष्ट झाल्यामुळे (त्याचा अभाव असल्यामुळे ) अभावापासून भावरूप अशा उत्तर क्षणाची उत्पत्तिच होऊ शकत नाही.
       अथ भावभूतः परिनिष्पन्नावस्थः पूर्वक्षण उत्तरक्षणस्य हेतुरित्यभिप्रायस्तथापि नोपद्यते। भावभूतस्य  पुनर्व्यापारकल्पनायां
क्षणान्तरसम्बन्धप्रसङ्गत्।
            भावावस्थेत असलेला (नाश होण्याच्या पूर्वीच्या स्थितीत असलेला) आणि पूर्व स्थितीला पोहचलेला जो पूर्व क्षण तोच उत्तर क्षणाचे कारण असेल तर त्याचा दुस-या क्षणाची सन्बन्ध आहे असे मानावे लागले . त्यापक्षी क्षणभङ्गवादच नष्ट होतो. स्वभावोपरागाभ्युपगमे च हेतुस्वभावस्य  फलकालवस्थायित्वे सति क्षणभङ्गभ्युपगमत्यागप्रसङः। कारणाचा स्वभाव कार्यामध्ये उतरतो तर स्वभाव कार्याच्या काली रहातो पण त्यापक्षी क्षणभङ्गवादाचा त्याग होतो. कारणाने स्वरूप कार्यात उतरले नाही तर कार्यच उत्पन्न होणार नाही. कारणाचा स्वभाव कार्यामध्ये उतरतो तर कारणाचे स्वरूप कार्याच्या उत्पत्तिकाली राहातेच. पूर्वक्षणाचा पदार्थ नष्ट झाला तरी त्याचा स्वभाव कार्यामध्ये येतो. यावरून ते स्वरूप दोन क्षण राहाते. य़ाचा अर्थ क्षणभङ्गवाद नष्ट होतो.
       या सिद्धांन्तावरून  साख्यांचा प्रकृतिला क्षणभङ्गवाद लागू होत नाही. ती नित्यसत्य आहे. पुरूषाला प्रकृतिपासून भिन्नत्वाचे ज्ञान झाले तरी पुरूष द्रष्टा अतएव नित्य व प्रकृती प्रसवधर्मीय म्हणून नित्य हा सांख्यांचा व्दैतवाद पतज्जली योगमतांत अनुस्यूत आहे. उपनिषदांत आत्मासाक्षात्कारश्च मुक्तिः। असे म्हटले आहे.
     दिवा शब्द उच्चारल्यावर जशी अन्धकाराची निवृत्ती होत नाही, तसेच शब्दाने निव्वळ परोक्ष ज्ञान होते. अनूभूतिनेच प्रत्यक्ष आत्मदर्शन होते म्हणून योगाभ्यासाचे महत्व आहे.
        सांख्य व पतज्जली मुनींचे मोक्ष स्वरूप एकच आहे. प्रकृत्युपरमे पुरूषस्य स्वरूपेणावस्थाने मोक्षः। पुरूषाचे स्वरूपावस्थान हा मोक्ष . जसा हा पुरूषाचा मोक्ष आहे, तसाच सांख्य मतांत प्रकृतिचा पण मोक्ष आहे. कृतकृत्य झाल्यामुळे पुरूषार्थशून्य असे जे सत्तवरजतम यांचा मुळ  प्रकृतिमधे जो अत्यन्त लय त्याला प्रकृतिलय  म्हणतात. हा प्रकृतिलय ज्या पुरूषाला मोक्ष  मिळाला त्या पुरूषाच्या सत्तवरजतमोगुणांच्या प्रकृतिलयापर्यंतच सीमीत आहे. त्यावेळी चितिशक्ति उपाधिरहित स्वरूपांत स्थित असते. चितिशक्तेस्तु निरूपाधिकस्वरूपेणावस्थानं मोक्षः। पतज्जली सेश्चरसांख्यप्रवर्तक आहेत. ईश्वराचे प्रणिधान (भक्तिपूर्वक देवाला आळविणे ) केले असता ईश्वर समाधिप्राप्तीसाठी सहाय्यक होतो. त्या ईश्वराचे ध्यान केले असता समाधी लवकर लागते. हा ईश्वर क्लेश व कर्म यांचा जो पारिपाक व त्यापासून होणारे जे बंधन नाही व पूर्वी होऊन गेलेले जे साक्षात्कारी पुरूष त्या सर्वांचा हा गुरू आहे. कपिलमुनींना अगर त्यांचे सांख्यशास्त्र पुढे चालविणा-या आसुरी , पच्चशिख किंवा विशुद्धबुद्धिसंपन्न ईश्वरकृष्ण मुनी इत्यादी ज्या तत्त्ववेत्यांना पुरूष-प्रकृती भेद कळला त्यांना ईश्वर सहाय्यक होता किंवा नव्हता ही शंकाच आहे, कारण सांख्य हे निरीश्चरवादी आहेत. तथापि ,भगवतगीतेत कृष्ण अर्जुनास सांगतो-
          ईश्वरः सर्वभूतांना हद्देशे-र्जुन तिष्ठति।
          भ्रामयनसर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ।।
          तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत।
          ततप्रसादात्परां शान्तिं स्थांन प्राप्स्यसि शाश्चतम् ।।
   हे जीवा , सर्वप्रकारे श्रद्धा, भक्ति, प्रेमयुक्त अन्तःकरणाने त्याच ईश्वराला शरण जा , फलाकाङ्क्षारहित आपले कर्म कर. तर त्या ईश्वराच्या कृपेने तुला शांती व स्वरूपास्थिती प्राप्त होईल.
        समाधिसंबंधी पतज्जली मुनी म्हणतात-
                  सम्यगाधांन चित्तावस्थानं समाधिः ।
       योग वासिष्ठात म्हटले आहे-
            इमं गुणसमाहारमनात्मत्वेन पश्यतः ।
            अन्तःशीतलता यस्य समाधिरितिकथ्यते ।।
     समाधी दोन प्रकारचीः संप्रज्ञानात.
संशय विपर्ययरहित जे धेय्यस्वरूप जाणले जाते ती संप्रज्ञात समाधी. असम्प्रज्ञात समाधीमध्ये ध्येय व ध्यान यांचा भेदही भासमान नसतो. ध्येयकार वृत्तिचा जेथे लोप होतो. (निरोध होतो) त्याला असंप्रज्ञात समाधी म्हणतात. बाधारहित जे विवेकज्ञान, त्या ज्ञानामुळे कार्यकारणरूप जो सत्तवरजतमभाव यांचा प्रधानमध्ये लय झाल्यानंतर चितिशक्ति (आत्मा) आपल्या मूळ स्वरूपांत रहाते ते पुरूषाचे कैवल्य .
        पातज्जल योगसूत्रांत  चार प्रकारचा व्यूह (संक्षिप्तावयव रचना) आहे. संसार, संसारहेतू, मोक्ष व मोक्षाचा उपाय. दुःखमय संसार हेय  आहे. प्रधान पुरूषाचा संयोग भोगहेतू आहे. हेय (अर्थात भोग) हेतुची आत्यन्तिक निवृत्ती याला हान ही संज्ञा आहे. यासाठी केलेला उपाय पुरूष प्रधानाचे सम्यग्दर्शन हा आहे.
      अविद्यया बुद्धिपुरूषसंयोगव्दारैव संसारहेतुत्वात् प्रकृति पुरूष विवेकसाक्षात्काररूपं यज्ज्ञांन  तद्वसम्यग्दर्शनमिति। पातज्जल योगाचे मोक्षस्वरूप व गौडपादाचार्या यांची मोक्षस्वरूपाविषयची मते भिन्न आहेत. गौडपादाचार्य म्हणतात-
        यदा न लीयते चित्तं न च विक्षिप्यते पुनः।
        अनिङग्मनाभासं निष्पन्नं ब्रह्य तत् तदा।।
 यदानिगृहितचित्तं निद्रावस्थां  न गच्छित न वा विषयेषु रमते तदा-चल मनाभासं ब्रह्य स्वरूपेण निष्पन्नं भवति।
      शंकराचार्य जीवाच्या व्यापक स्वरूपाचे वर्णन करतात व त्याचे मूळ रूप सांगतात-
             अपि व्यापकत्वाद्धित्वप्रयोगात्
             स्वतस्सिद्धभावादनन्याश्रयत्वाते ।
            जगत्तुच्छेमेतत् समस्तं तदन्यत्
            तदेकोवशिष्टः शिवः केवलो-हम् ।।
     सर्व खल्विदं ब्रह्य हा बोध व्यापक शब्दाने होतो.
    ब्रह्य हे परमानन्द स्वरूपाचे आहे, हा बोध हितत्व शब्दाने होतो. आत्मा सर्वव्यापी हा बोध अनन्याश्रयत्व या पदावरून सूचित होतो. जगत्तुच्छमेतत् याने जगताचे मिथ्यात्व सूचित केले आहे.
       या विवेचनावरून जो द्रष्टापुरूष त्याने कैवल्य प्राप्त केल्यानंतर प्रकृति  ही उरतच नाही. म्हणजेच तिचे मुळांतच अस्तित्व नाही असे शंकराचार्य सांगतात. असङगह्ययं पुरूषः इति यथा पुरूषस्य विशुद्धत्वं निर्गुणत्वं (तथैव प्रकृते र्मिथ्यात्वम् तेन ज्ञानसुखात्मक आत्मा सत्यस्तभ्दिन्नंच सर्वं  जगदसत्यमिति। अतोन्यदार्त मितिश्रुतेः साक्षिणो-न्यत्साक्ष्यं सर्वं जगत्तुच्छमितितर्केण प्रकृतिमिथ्यात्वलाभः ।।
   या प्रकारे मोक्षाचे भिन्न भिन्न वर्णन सांख्य, पतज्जली, बौद्ध यांनी केले. त्यानंतर विभिन्न वादांमधून शेवटी शंकराचार्यांचा अव्दैतवाद पूर्णत्वाने आला. या सर्वांमध्ये मोक्ष किंवा कैवल्य हेच अंतिम साध्य राहिले.    
--------------------------------------------------------------------- 

कोई टिप्पणी नहीं: