गुरुवार, 16 फ़रवरी 2017

योगसूत्र भूमिका

         योगसूत्र
    भूमिका
Author Dr Balram Sadashiv Agnihotri
typed by Ashwini or Prachi -- To proof read
    भारतीय तत्वज्ञानांमधील षड्दर्शनांपैकी योग हे एक महत्वाचे दर्शन होय. पतज्जलीमुनी रचित पातज्जल योगसूत्र हा  ग्रंथ म्हणजे योगसूत्र हा ग्रंथ म्हणजे योगशास्त्रावरील सर्व ग्रंथ म्हणजे योगशास्त्रावरील सर्व ग्रंथांचा मुकुटमणी. बुद्धिच्या योगाने कैवल्य मिळविण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न कसे करावेत याचे विवेचन या ग्रंथात आहे.
    मोक्ष शास्त्राचे उदगमस्थान दुःखत्रय आहे, असे कपिलमुनिंचे सांख्याशास्त्र सांगते. दुःखत्रयाभिघातात्तदाभिघातके हेतौ जिज्ञासा। आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशी तीन प्रकारची दुःखे मनुष्यांना सतावतात. या दुःखांपासून सूटका मिळावी यासाठी कपिलमुनींनी शास्त्र सांगितले व कपिलमुनींचा आधार घेऊन पतज्जली मुनींनी मोक्षासाठी योगशास्त्राची उभारणी केली. या मोक्षप्राप्तीस त्यांनी कैवल्यप्राप्ती नाव दिले. पुरूषार्थशुन्यांना गुणांना  प्रतिप्रसवः कैवल्यम्। भोग देणारे 
????????
भूमिका
 भोग देणारे असे जे तीन गुण सत्तव, रज व तम यांचा प्रकृतिमध्ये लय होऊन पुरूषाला स्वरूपाचे ज्ञान होणे (आपण प्रकृतिहून पूर्ण भिन्न आहोत हा विवेक येणे ) याला कैवल्य- प्राप्ती संज्ञा आहे. सांख्यांच्या मते या स्वरूप- प्रतिष्ठेसाठी  ईश्वर या शब्दाने संबोधिला जाणारा जो पुरूष, त्याची गरज नाही.  म्हणून सांख्या निरीश्वर वादी तर पतज्जली मुनींच्या मते अशा ईश्वराची नितान्त आवश्यकता असून ईश्वरप्रणिधानाद्वा सूत्र सांगून  क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्टस्येश्वरस्य कैवल्यप्रात्यर्थं योगदानं वर्तते। या विवेचनाचे ईश्वरास प्राधान्य दिले आहे. कपिल व पतज्जली मुनी हे दोघेही प्रकृती व पुरूष यांची भिन्नता मानणारे अर्थात् व्दैतवादी आहेत. ईश्वराचे अस्तित्व मान्य करणे हा एक फरक सोडल्यास पातज्जल योगसूत्राला सर्वत्र सांख्य  दर्शनाला आधार घेतला आहे. बुद्धिच्या योगाने प्रकृती- पुरूष भिन्नत्व ओळखुन कैवल्यप्राप्ती हे दोघांचे उद्दिष्ट. ते साध्य करण्यासाठी मन, बुद्धी, अहंकार, इंद्रिय यांच्या नियंत्रणाची पद्धत पतज्जली मुनींनी विवेचनाव्दारे स्पष्ट केली आहे. शंकराचार्यांच्या मताने जग्त आभास असून त्यालाच अध्यास म्हणतात. सर्व अनर्थ उत्पन्न करणा-याला अध्यासाचा नाश करण्यासाठी वेदान्त शास्त्रे प्रवृत्त झाली आहेत. त्यातही अव्दैत वेदान्तशास्त्र प्रमुख असून त्यात सांगितलेल्या ज्ञानाचा साक्षात्काराने मनुष्यास मोक्ष मिळतो. महाभारतात भीष्म पितामह युधिष्ठिरास सांगतात. -
          एवं व्यवसिते लोके बहुदोषे युधिष्ठिर।
          आत्ममोक्षनिमित्तं वै यतेत मतिमान्नरः ।।
  बहुविधदोषरूपी संसारापासून मुक्त होण्यासाठी बुद्धिमान पुरूषाने प्रयत्नशील असावे. अविद्यानाशश्चाव्दियात्मज्ञानेन ततश्चात्यन्तदुःखनिवृत्तिरूप  पुरूषार्थो मोक्ष उपनिषज्ज्ञानैक साध्य इति वेदान्तविज्ञानविदो वदन्ति।
     पतज्जली मुनींच्या मताने परिणामतापसंस्कारदुःखैगुर्णवृत्तिविरोधाच्च दुःखमेवसर्वम् .,तस्यहेतुरविद्या। या अविद्येचा नाश म्हणजेच दृशिरूप जीवाचे कैवल्य. जीव मुळांतच आत्मा अत एव शुद्धज्ञानस्वरूप आहे. ज्ञान म्हणजे काय १ ज्ञानमित्युत्पत्तिविनाशरहितं चैतन्यम्। हे चैतन्य स्वरूप जाणणे हाच मोक्ष. पतज्जली मिनींच्या मताने मोक्ष हाच कैवल्य. यात मुक्त पुरूषाच्या गुणांचा प्रतिप्रसव (विलय) मूळ प्रकृतीत होतो व पुरूष चिति स्वरूपात प्रतिष्ठित असतो. वेदान्त मतानुसार-
        प्रकाशाभिन्नमेवैतद् विश्वं सर्व हि भासते।
        लहरिबुदबुदादींना सलिलान्न पृथकस्थितिः ।।
  शंकराचार्य़ म्हणतात-
  सत्यपिभेदापगमे नाथ तवांह न मामकिमस्वत्वम्।
  सामुद्रो हि तरङः क्वच न समुद्रो न तारङः ।।
      अभेद ज्ञान झाल्यावर जीव परत्मात्मस्वरूप होतो. परमात्मा जीव स्वरूप होत नाही. तरंग हे समुद्रच असतात. समुद्र कधी तरंगस्वरूप नसतो. उपनिषदांत मन्त्र आहेः
      यस्मिन्सर्वाणि भूतान्यात्मैवाभूव्दिजानतः ।
     तत्र को मोहः कः शोक एकत्वमनुपश्यतः  ।
 सर्व शास्त्रांचे ध्येय कथं मोक्षः१ असून त्यांचे साधन शोधणारे प्रथम मुनि पतज्जली -यांनी सोगसूत्र लिहिली आहेत व या योगशास्त्राचा आधार कपिलमिनींचे सांख्यदर्शन आहे. सांख्यकारिकेत म्हटले आहेः
              एवं तत्त्वाभ्यासान्नास्मिन मे नाहमित्यपरिशेष्म।
              अविपर्ययाव्दिशुद्धं केवलमुत्पद्यते ज्ञानम् ।।
    तत्त्वाच्या अभ्यासाने मी जीवस्वरूप नसून विशुद्ध चैतन्य आहे. हे ज्ञान व या ज्ञानाच्या योगाने प्रकृतिं पश्यति पुरूषः प्रेक्षकवदवस्थितः स्वच्छः। विशुद्ध पुरूष निर्विकार भावाने जेव्हा प्रकृतिस पाहतो, तेव्हा प्रकृती उपेक्षित राहिल्याने व पुरूष तव्दश  नसल्याने मुक्त पुरूषाच्या दृष्टिने प्रकृती स्वयं सर्व व्यापारशून्य होते. हेच कैवल्य.
     पतज्जली मुनींनी योगशास्त्राचे चार भाग केले आहेतः १) समाधिपाद, २) साधनपाद, ३) विभूतिपाद . ही सूत्ररचना विवेकपूर्ण आहे. साध्या तिचे स्वरूप प्रथम पादांत आहे. सांख्य व योग हे दोघे बहुपुरूष मानणारे असल्याने ब्रह्य, परमात्मा हे शब्द  त्यांना वर्ज्य आहेत. योगसूत्रात द्रष्टा हा शब्द प्राचुर्याने असून त्याच अर्थाने पुरूष , चितिशक्ति हे शब्द आहेत. आत्मा हा शब्द  एकाच सूत्रांत आहे- तदर्थ एव दृश्यस्यात्मा। पण यातदेखील दृश्याचे स्वरूप द्रष्ट्यासाठी आहे, या स्वरूप अर्थाने आत्मा शब्द योजलेला असून वेदान्तात आत्मा नाम ब्रह्य, चिन्मात्र स्वरूपो-न्तर्यामि साक्षी  हे जे आत्म्याचे वर्णन केले आहे त्याचा स्पर्शदेखील योगसूत्रांत नाही. उलट द्रष्टा या पुरूषअर्थी  शब्दावरच सर्व सूत्रांचा  भर आहे. वेदान्तात मोक्षाचे स्वरूप असेः   नित्यानित्यविचारादनित्यसंसारसुख दुःखविषय  समस्तक्षेत्रममताबन्ध- क्षयोमोक्षः।  प्रकृतिचा बन्ध ही सर्वसामान्य कल्पना. पण समस्त क्षेत्रममतारूप बन्धाचा क्षय ही कल्पना पातज्जल योगसूत्रांत  नसून सर्वबीजनिरोध   अर्थात् सर्व वृत्तिंचा निरोध झाल्याने जी समाधी सिद्ध होते त्यांत प्रकृति -पुरूष- भिन्नता पुरूषाला अपरिमणित्व येते असा सिद्धांत मांडला आहे. प्रकृतिचे सत्त्वरजमात्मक गुण कारमांत लीन पावतात. ते गुण पुनः पुरूषास बंधनात आणू शकत नाहीत. हे जे प्रकृतिचे पुरूषाशी सम्बन्धराहित्य हीच स्वरूपप्रतिष्ठा व हाच मोक्ष. मोक्षाची वेदान्ताची कल्पना व पतज्जली मुनींची मोक्षकल्पना अत्यंत भिन्न आहेत. श्रीमदभगवतगीतेत सांगितले आहेः
         यतेन्द्रिय मनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः ।
         विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मक्त एव सः ।।
     अन्यत्र मोक्षासंबंधी म्हटले आहे- संकल्पादिकंमनो बन्धहेतूः । तव्दियुक्तं मनो हि मोक्षाय भवति।
   मोक्षाचे जे विविध स्वरूप आहे हे अनुभवजन्य असल्यामुळे भगवव्दितेत  म्हटले आहे -
                  योग युज्जीत सततमात्मानं रहिस स्थितः ।
                  एकाकी यताचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ।।६-१० ।।
  योग्याने एकान्तात बसून आत्म्याचे ध्यान करावे, याचा परिणाम सांगतात-
                 युज्जन्नेवसदात्मानं योगी विगतकल्षः ।
                 सुखेन ब्रह्यसंस्पर्शमन्त्यन्तं सुखमश्नुते ।। ६. २८ ।।
 पापरहित योगी सहजपणे परब्रह्यप्राप्तिरूप अपार सुखाचा अनुभव घेतो.
               यत्समाधौ परं ज्योतिरनन्तं विश्वतो मुखम् ।
               तस्मिन्दृष्टे क्रियाकर्म यातायात न विद्यते ।।
 आत्मानुभाव घेतलेला मनुष्य क्रियाकर्म रहित होऊन जन्ममृत्युच्या फे-यांत येत नाही.
        पतज्जली मुनींच्या मते , सत्वपुरूषय़ोः शुद्धिसाम्ये कैवल्यम्। ,सत्त्वशुद्धी म्हणजे कर्तृत्वाभिमानाची निवृत्ति. पुरूषशुद्धी म्हणजे भोगापासून निवृत्ती. अशा निवृत्तिच्या काळात पुरूष स्वतःच्या रूपाने स्थित असतो, तो दृशिस्वरूप असतो. दृशि हा द्रष्टा असतो. जागृतीत तो डोळ्यांनी पाहातो म्हणून त्याला  उपद्रष्टा म्हटले आहे. स्वप्नांत, सुषुप्तीत व मोक्षदशेत तोच द्रष्टा असतो. म्हणूनच पुरूषः पृक्रितिं पश्यति अशी सांख्याकारिका आहे. गुणांनी बद्ध असा जीव मुक्त झाल्यावर (सत्तव, रज, तम) आपल्या कारणांत ( मूळ प्रकृतीत) विलय पावतात. ते मुक्त पुरूषास पुनः बांधू शकत नाहीत. समाधिपाद, साधनपाद, विभूतिपाद येथ पर्यंत सूत्रांची पूर्ण सुसंबंद्धता आहे. कैवल्यपादांत द्रष्टा या पदाला बिन्दु धरून कैवल्याचे स्वरूपवर्णन आहे. हा द्रष्टा जेव्हा जीवावस्थेत जागृत  स्थितीत असतो तेव्हा त्याला उपद्रष्टा म्हटले आहे. भगवदगीता सांगते, पुरूशदशेत असताना मुळात महेश्वरस्वरूप असूनही, तो उपद्रष्टा , अनुमत्ता, भर्ता, भोक्ता आहे. ध्यानाने जेव्हा हा उपद्रष्टा आपणा स्वतःला पाहातो, त्यावेळी त्या मुक्ताला सर्व बाह्य असून नसल्यासारखे असते. प्रकृतिने सर्व चराचर क्रिया होतात, पुरूष स्वतः अकर्ता असतो, ही क्षेत्र-क्षेत्रज्ञ- भिन्नता कळून आल्यावर उपद्रष्टा हा विकारापासून सुटतो व तत्त्वतः आपले अविनाशी स्वरूप जाणून परब्रह्यस्वरूप (दृशिस्वरूप) होतो.
         साधनपादांत क्रियायोगाचे वर्णन आहे. याच्या अभ्यासाने समाधी अनायास साधली जाते. अविद्या , अस्मिता, इच्छा , व्देष व अभिनिवेश या क्लेशापासून पुरूष सहजच दूर जातो. जे दुःख अनागत असते (प्राप्त झालेले नसते) अशा दुःखांचा सहज नाश होतो. या पादांत कैवल्यप्राप्तिची इच्छा असणा-याने ईश्वराचे सहाय्य प्राप्त होते. असे सांगितले आहे. ईश्वरप्राप्ति  संबंधात कालिदास म्हणतो- तपः किलेदं तदवाप्तिसाधनं, मनोरथानामनगतिर्न विद्यते । तप तीन प्रकारचे असते- शरीरतप , वाकतप आणि मानसतप. देव, व्दिज , आचार्य गुरू, ज्ञानवृद्ध यांची सेवा हे शरीर तप. उव्देग न आणणारे बोल बोलणे ,सत्य व प्रिय बोलणे, मोक्षशास्त्राचे अध्यन करणे हे वाकतप. शांत स्वभाव, मौन, मनाचा निग्रह, अन्तःकरणाची पवित्रता, अहंकार नसणे हे मानसतप आहे.
     अहंकारभिमानेन जीवः स्याद्धि सदाशिवः ।
     स (जीवः) चाविवेकप्रकृतिङःत्या तत्र मुह्यते ।।
    नानायोगनिशतंगत्वा शेते-सौ वासवशात् ।
    विमोक्षात्सांचरत्येव मत्स्यः कूलव्दयं यथा ।।           
    ततः कालवशादेव ह्यात्मज्ञानविवेकातः ।
????????
भारतीय दर्शनशास्त्राची सहा दर्शने न्याय, वैशेषिक, मीमांसा, सांख्य, योग व वेदान्त अशी आहेत. कसे जगावे, कसे आचरण करावे याचा विचार योगदर्शनामध्ये केलेला आहे. 'पातज्जल योगसूत्र' हा योगदर्शनावरील ग्रंथांचा मुकुटमणी. समाधी, साधन, विभूति व कैवल्य अशा चार टप्प्यांमध्ये अपरिमित ज्ञान आणि कैवल्यता प्राप्त करण्याचा क्रियायोग मुनींनी सांगितला. त्यावर भोजदेव, मणिप्रभा, चंद्रिका, योगसुधाकर असे टीकाग्रंथही संस्कृतमध्ये आहेत. त्यांचा संदर्भ घेत मराठी विवेचन या पुस्तकात केले आहे. त्याने साक्षेपी विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.
     योगव्श्रितवृत्तिनिरोधः असे योगाचे स्वरुप किंवा उद्दिष्ट आहे. प्रमाण, विपर्यय, विकल्प स्मृति व निद्रा या चित्तवृत्तिचा निरोध ब्रह्मचर्य, तत्त्वज्ञान, विद्या व श्रध्दा यांचा दीर्घ अभ्यासाने तसेच वैराग्याच्या आचरणाने होतो. यामध्ये ईश्र्वर सहाय्यक होतो. कारण तो प्रणववाचक ईश्र्वर गुरुंचा गुरु आहे. ध्यानाने चित्ताची एकाग्रता होऊन अध्यात्मप्रसाद मिळतो, प्रज्ञा ऋतंभरा होते व सबीज अथवा निर्बीज समाधिचा लाभ होतो. यासाठी अविद्या, अस्मिता, राग, व्देष व अभिनिवेश या क्लेशांचा तसेच त्यामुळे निर्माण होणा-या कर्माच्या साठ्याचा त्याग करावा. क्लेश व कर्मामुळेच मानवाचे ज्ञान, आयुष्य व भोग ठरतात. विवेकामुळे हे सर्व कर्मबंध थोपवून पुरूष स्वतःला प्रकृतिपासून वेगळा पाहु शकतो. हे पुरूषाचे द्रष्टपण अष्टांगयोगाचा विवेकपूर्ण वापर केल्याने प्राप्त होते.

     यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार ही योगातील पाच बहिरंगे सिद्ध झाल्यावर योगी जेव्हा धारणा, ध्यान व समाधी यांकडे वळतो, तेव्हा त्यास कित्येक सिद्द, दिव्य रुप व दिव्य प्रतिभा वश होतात. त्यावेळी क्षण या विषयावर संयम केल्याने सर्वज्ञता व चित्तशुध्दी येते. अशावेळी वृत्तिचा निरोध झालेले चित्त विवेकाने नम्र झालेले व कैवल्याच्या योगाने भारलेले असते. त्याच्या क्लेश कर्मांची निवृत्ती होते. अशा पुरुषासाठी काळाचे क्रमण होत नाही. त्यास स्वरुप प्राप्ती होते. हेच कैवल्य
??????????????????????
उत्तराभिमुखोभूत्वा स्थानात्स्थानांतरक्रमात्
मूध्न्याध्यायात्मनःप्राणान्योगाभ्यासं स्थितकश्र्चरन्
योगात्संजायते ज्ञानं ज्ञानाद्योगः प्रवर्तते
योगज्ञानपरोनित्यं स योगी न प्रणश्यति (योगोपनिषद्)
साधनपादांत प्रत्याहार,धारणा,ध्यान,समाधी यांचे वर्णन आहे,ज्याचा प्रत्येकाने नित्य अभ्यास करावा.
जगत्सर्वमिदं मिथ्याप्रतीतिः प्राणसंयमः
चित्तस्यान्तर्मुखीभावः प्रत्याहारस्तु सत्तम
चित्तस्य निश्र्चलीभावो धारणा धारणं विदुः
सोहंहं चिन्मात्रमेवेति चिन्तनं ध्यानमुच्यते
ध्यानस्य विस्मृतिःसम्यक् समाधिरभिधीयते
समाधिःस तु विज्ञेयः सर्ववृत्तिविवर्जितः
ब्रह्म सम्पद्यते योगी न भूयः संसृतिं व्रजेत् (योगोपनिषद्)
विभूतिपादांत धारणा,ध्यान,समाधी यांचे वर्णन आहे.यांच्या एकीकरणापासून संयम उत्पन्न होतो.या संयमामुळे पुष्कळ सिध्दी प्राप्त होतात.योगी या सिध्दिमध्ये फसतो.यांच्यात राहून योग्याला कैवल्यप्राप्ती होत नाही. या सिध्दिच्या संबंधात गौडपादाचार्य सांगतात-
लये संबोधयेच्चितं विक्षिप्तं शमयेत् पुनः
सकषांय विजानीयात् शमप्राप्तं न चालयेत्
नास्वादयेसं तत्र निःसडं प्रज्ञया भवेत्
निश्र्चलं निश्र्चरच्चित्तमेकीकुर्यात् प्रयत्नतः
समाधी साधताना झोप आली तर चित्ताला जागे करावे.जर चित्तात क्षोभ उत्पन्न झाला तर त्याला शांत करावे.चित्तात भिन्न प्रवाह आले तर ते जाणून चित्त शांत होईल असे ध्यानस्थ बसावे.रसास्वादांत गुंतू नये.रसास्वाद म्हणजे भिन्न प्रकारच्या सिध्दी.जसे देवांनी जरी जेवण्यासाठी आग्रह केला तरी ते आमंत्रण स्वीकारु नये.प्रज्ञेने निःसड रहावे.ही रसास्वादाची अवस्था कळणे आणि ती ओलांडणे हे अत्यंत कठीण असते व त्यामुळेच योगी जन्ममरणाच्या फे-यांत राहातो म्हणून प्रयत्नाने चित्त निश्र्चल ठेवावे.
कैवल्यपादांत मुक्त पुरुषाच्या अवस्थेचे वर्णन आहेः
 तदा विवेकनिम्नं कैवल्यप्राग्भारं चित्तम्
पुरुषाला प्रकृतिभिन्नत्वाचा बोध होताक्षणीच त्याचे चित्त कैवल्याच्या ओघाने भरुन जाते किंवा भारले जाते.संसारात गुंतलेल्यांना आत्मदर्शनच नसते,त्यामुळे चित्तांत विवेकामुळे उत्पन्न होणारी निवृत्तिच नसते.त्यावेळी चित्ताचा प्रवाह कैवल्याच्या विरुध्द दिशेने असतो.कैवल्याचा बोध होतो,त्या आधीची अवस्था म्हणजे पुरुष-प्रकृति-भिन्नत्व या भाराने चित्त व्यापृत असणे.ही योगाची शेवटची अवस्था.यांत क्लेश कर्माची निवृत्ति होते.या स्थितीत ज्ञानावर असलेले सर्व आवरण दूर होते व अनन्त जे ज्ञान ते प्राप्त झाल्याने ज्ञेय (आणखी काही जाणून घ्यावयाचे आहे) हे राहतच नाही.या संबंधात कैवल्योपनिषद् सांगते-
न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैकेमृतत्वमानशुः
परेण नाकं निहितं गुहायां विभाजते यद्यतयो विशन्ति
अपाणिपादोहमचिन्त्यशक्तिः पश्याम्यचक्षु स शृणोम्य कर्णः
अहं विजानामि विविक्तरुपो न चास्ति वेत्तामम चित्सदाहम्
सांख्य मतांचे खण्डन म्हणून अजातिवाद पुढे आला.नंतर मायावाद,विवर्तवाद व शेवटी अव्दैत सिध्दांत येऊन त्यांत सर्व वादांची परिणति झाली.अजातिवादाचा सिध्दांत असा-
न कश्र्चिज्जायते जीवः सम्भवोस्य न विद्यते
एतत्तूत्तमं सत्यं यत्र किंचिन्न जायते
कोणीही जीव जन्माला येत नाही.मग सर्व संसार जो चालतो तो कसा
यावर गौडपादाचार्य सांगतात-
यथा मायामयी जीवो जायते म्रियतेपि च
तथा जीवा अमी सर्वे भवन्ति न भवन्ति च
मनोद्श्यमिदं सर्वं यत् कित्र्चित् सचराचरम्
मनसोह्यमनीभावे व्दैतं नैवोपपद्यते
शंकराचार्यांचा सिध्दांत स्वीकारुन जगत् हे माया अत एव मिथ्या असे म्हटले आहे.
???????????
योगसूत्र
  भूमिका
   कार्यमाकाशादिकं बहुप्रपच्चं जग्त, कारंण परंब्रह्य, तस्मात्कारणात् परमार्थतोनन्यत्वम् व्यतिरेकेणाभावः कार्यस्यावगम्येते। (शांकरभाष्य २.१. १४.).हा मायावाद दृढ करण्यासाठी विवर्तवादाची स्थापना झाली . विवर्तो नाम उपादानविषमसत्ताककार्यापत्तिः ।मायेसंबंधी म्हटले आहे-
                      नासद्रुपानसद्रुपा माया नैवोभयात्मका।
                      सदसभ्द्यामनिर्वाच्या मिथ्याभूता सनातनी ।।
                      एक एव परमेश्वरः कूटस्थ नित्यो विज्ञानधारतुविद्या मायया
                     मायाविवदनेकधा विभात्ये, नान्यो विज्ञानधातुरस्ति।
                                                                  शां.भा . १.३.१९
   
      या विवेचन करून सांख्यांचा तसेच पतज्जली मुनींचा व्दैतवाद शंकराचार्यांनी फोल ठरविला आहे.
     बौद्धांचे चार मतप्रवाह आहेतः एक जग सत्य मानतात. ह्यांना बाह्यार्थवादी म्हणतात. वैभाषिक ही त्यांची शास्त्रीय संज्ञा आहे. दुसरे बाह्यार्थानुमेयत्ववादी आहेत यांना सौत्रान्तिक म्हणतात. तिसरे बाह्यार्थशून्यत्ववादी आहेत, यांना योगाचार ही संज्ञा आहे. चौथे सर्वशून्यत्तववादीआहेत, यांना माध्यमिक बौद्ध मतानुवादी म्हणतात. यांत सर्वशून्यत्तववादी मतांचा प्रथम विचार असा -दृष्टार्थ व्यव्हापश्च स्वप्नव्यव्हारवत्संवृत्या (अविद्या) संगच्छन्ते। जे बाह्य पदार्थ आहेत ते स्वप्नव्यव्हाराप्रमाणे अविद्येने भासतात. निष्कर्ष असा- स्वव्यत्तिरिक्त ग्राह्यविरहात्तदात्मिका बुद्धिः स्वयेम स्वात्मरूपप्रकाशिका प्रकाशवदिति सिद्धम्। अस्तित्वच  नाही. स्वप्नांमध्ये बाह्य विषयाशिवाय ज्ञान होते तसेच ज्ञान जागृतावस्थेत होते. व्यब्हारात जे ज्ञानवैचित्र्य आहे, ते वासनावैचित्र्यामुळे होते. त्याला विषयवैचित्र्याची जरूरी नाही. बुद्धेः सकाशादन्ययोर्ग्राह्यग्राहकयोरभावात्सैव (बुद्धिरेव) स्वयं प्रकाशते। यावर अत्तर असे की अर्थपलब्धिनिमित्ता ही प्रत्यर्थं नानारूपा वासना भवन्ति। अनुपलभ्यमानेषु त्वर्थेषु किं निमित्ता विचित्रा वासना भवयुः। बाह्य पदार्थाचे अस्तित्व आहे म्हणूनच निरनिराळ्या वासना उत्नन्न होऊ शकतात. बाह्य पदार्थाअभावी वासनाच उत्पन्न होणार नाहीत. कारण वासना नाम संस्कार विशेषः। संस्कारश्च नाश्रयामन्तरेणावकल्पन्ते। एवं लोके दृष्टात्वात्। जे बौद्ध बाह्य पदार्थांचे अस्तित्व नाकबूल करतात त्यांना वैधर्म्याच्च या बादरायण सूत्राने उत्तर दिले जाते. स्वप्नांत उपलब्ध झालेल्या वस्तूंचा जागृतिमध्ये उपलब्ध झालेल्या स्तम्भादिकांचा कोणत्याही अवस्थेत बाधा होत नाही. जर स्वप्न -निद्रा या अवस्थेत बाह्या वस्तूंचा बाधा होतो असे म्हणाल तर त्यावर उत्तर असे की, जो स्वप्नांत अगर निद्रेत असेल त्याला बाह्य वस्तू शून्य असल्या तरी त्याच्या जवळपास जागी असणारी  माणसे आहेत. त्यांना या दृश्य वस्तूंचा बाधा झालेला नसतो व निद्रिस्थ जागा झाल्यावर पुनः त्याच वस्तू पाहातो. शिवाय स्वप्न दर्शन ही स्मृती आहे. जागृतिमधील दर्शन हा अनुभव आहे. संस्कारमात्रजं हिविज्ञानं स्मृतिः। प्रत्युत्पन्नेन्द्रियसंप्रयोगलिङ्ग.-शब्दसारूप्यान्यथानुपपद्यमान योग्यप्रमाणातनुत्पत्तिलक्षणसामग्रीप्रभवं तु  ज्ञानमुलब्धिः। इन्द्रियांच्या संयोगामुळे व शब्द सारूप्यामुळे केव्हाही उत्पन्न झालेले जे प्रमाणसिद्ध ज्ञान त्याला अनूभूति म्हणतात. म्हणजेच जागृतिमधील पदार्थ वस्तुनिष्ठ आहेत.. त्यांचे ज्ञान आणि स्वप्नभास ही दोन्ही भिन्न आहेत. स्वप्नपदार्थ आभास आहेत. संसारातील वस्तू वास्तविक आहे म्हणून सांख्य मतानुसार पुरूष सत्य आहे, सतेच त्यापासून भिन्न अशी जी प्रकृती तीपण सत्य आहे, कारण पुरूष प्रकृतिभिन्नत्वाने स्वतःला व प्रकृतिला पाहतो.
               क्षणभङ्गवादी बौद्धांचा सिद्धांत असा-
   उत्तरस्मिन् क्षण उत्पद्यमाने पूर्वक्षणो निरूध्यत इति।  प्रत्येक क्षणी सर्व पदार्थांचा नाश  होतो. पूर्व क्षणांत नाश होताच उत्तर क्षणांत त्या वस्तू उत्पन्न होतात. तोच तो पुनः पूर्व क्षण होऊन सर्व वस्तू नाश पावतात व उत्पन्न होतात.  असा क्षणभङ्गवादाचा सिद्धांन्त आहे.
   याचे खंडन करताना शंकराचार्य तर्क देतातः असा जर पूर्व व उत्तर क्षणांमध्ये कारणकार्य सिद्धान्त मानला तर कारण कार्यभाव सिद्ध होत नाही. पूर्व नष्ट झाल्यामुळे (त्याचा अभाव असल्यामुळे ) अभावापासून भावरूप अशा उत्तर क्षणाची उत्पत्तिच होऊ शकत नाही.
       अथ भावभूतः परिनिष्पन्नावस्थः पूर्वक्षण उत्तरक्षणस्य हेतुरित्यभिप्रायस्तथापि नोपद्यते। भावभूतस्य  पुनर्व्यापारकल्पनायां
क्षणान्तरसम्बन्धप्रसङ्गत्।
            भावावस्थेत असलेला (नाश होण्याच्या पूर्वीच्या स्थितीत असलेला) आणि पूर्व स्थितीला पोहचलेला जो पूर्व क्षण तोच उत्तर क्षणाचे कारण असेल तर त्याचा दुस-या क्षणाची सन्बन्ध आहे असे मानावे लागले . त्यापक्षी क्षणभङ्गवादच नष्ट होतो. स्वभावोपरागाभ्युपगमे च हेतुस्वभावस्य  फलकालवस्थायित्वे सति क्षणभङ्गभ्युपगमत्यागप्रसङः। कारणाचा स्वभाव कार्यामध्ये उतरतो तर स्वभाव कार्याच्या काली रहातो पण त्यापक्षी क्षणभङ्गवादाचा त्याग होतो. कारणाने स्वरूप कार्यात उतरले नाही तर कार्यच उत्पन्न होणार नाही. कारणाचा स्वभाव कार्यामध्ये उतरतो तर कारणाचे स्वरूप कार्याच्या उत्पत्तिकाली राहातेच. पूर्वक्षणाचा पदार्थ नष्ट झाला तरी त्याचा स्वभाव कार्यामध्ये येतो. यावरून ते स्वरूप दोन क्षण राहाते. य़ाचा अर्थ क्षणभङ्गवाद नष्ट होतो.
       या सिद्धांन्तावरून  साख्यांचा प्रकृतिला क्षणभङ्गवाद लागू होत नाही. ती नित्यसत्य आहे. पुरूषाला प्रकृतिपासून भिन्नत्वाचे ज्ञान झाले तरी पुरूष द्रष्टा अतएव नित्य व प्रकृती प्रसवधर्मीय म्हणून नित्य हा सांख्यांचा व्दैतवाद पतज्जली योगमतांत अनुस्यूत आहे. उपनिषदांत आत्मासाक्षात्कारश्च मुक्तिः। असे म्हटले आहे.
     दिवा शब्द उच्चारल्यावर जशी अन्धकाराची निवृत्ती होत नाही, तसेच शब्दाने निव्वळ परोक्ष ज्ञान होते. अनूभूतिनेच प्रत्यक्ष आत्मदर्शन होते म्हणून योगाभ्यासाचे महत्व आहे.
        सांख्य व पतज्जली मुनींचे मोक्ष स्वरूप एकच आहे. प्रकृत्युपरमे पुरूषस्य स्वरूपेणावस्थाने मोक्षः। पुरूषाचे स्वरूपावस्थान हा मोक्ष . जसा हा पुरूषाचा मोक्ष आहे, तसाच सांख्य मतांत प्रकृतिचा पण मोक्ष आहे. कृतकृत्य झाल्यामुळे पुरूषार्थशून्य असे जे सत्तवरजतम यांचा मुळ  प्रकृतिमधे जो अत्यन्त लय त्याला प्रकृतिलय  म्हणतात. हा प्रकृतिलय ज्या पुरूषाला मोक्ष  मिळाला त्या पुरूषाच्या सत्तवरजतमोगुणांच्या प्रकृतिलयापर्यंतच सीमीत आहे. त्यावेळी चितिशक्ति उपाधिरहित स्वरूपांत स्थित असते. चितिशक्तेस्तु निरूपाधिकस्वरूपेणावस्थानं मोक्षः। पतज्जली सेश्चरसांख्यप्रवर्तक आहेत. ईश्वराचे प्रणिधान (भक्तिपूर्वक देवाला आळविणे ) केले असता ईश्वर समाधिप्राप्तीसाठी सहाय्यक होतो. त्या ईश्वराचे ध्यान केले असता समाधी लवकर लागते. हा ईश्वर क्लेश व कर्म यांचा जो पारिपाक व त्यापासून होणारे जे बंधन नाही व पूर्वी होऊन गेलेले जे साक्षात्कारी पुरूष त्या सर्वांचा हा गुरू आहे. कपिलमुनींना अगर त्यांचे सांख्यशास्त्र पुढे चालविणा-या आसुरी , पच्चशिख किंवा विशुद्धबुद्धिसंपन्न ईश्वरकृष्ण मुनी इत्यादी ज्या तत्त्ववेत्यांना पुरूष-प्रकृती भेद कळला त्यांना ईश्वर सहाय्यक होता किंवा नव्हता ही शंकाच आहे, कारण सांख्य हे निरीश्चरवादी आहेत. तथापि ,भगवतगीतेत कृष्ण अर्जुनास सांगतो-
          ईश्वरः सर्वभूतांना हद्देशे-र्जुन तिष्ठति।
          भ्रामयनसर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ।।
          तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत।
          ततप्रसादात्परां शान्तिं स्थांन प्राप्स्यसि शाश्चतम् ।।
   हे जीवा , सर्वप्रकारे श्रद्धा, भक्ति, प्रेमयुक्त अन्तःकरणाने त्याच ईश्वराला शरण जा , फलाकाङ्क्षारहित आपले कर्म कर. तर त्या ईश्वराच्या कृपेने तुला शांती व स्वरूपास्थिती प्राप्त होईल.
        समाधिसंबंधी पतज्जली मुनी म्हणतात-
                  सम्यगाधांन चित्तावस्थानं समाधिः ।
       योग वासिष्ठात म्हटले आहे-
            इमं गुणसमाहारमनात्मत्वेन पश्यतः ।
            अन्तःशीतलता यस्य समाधिरितिकथ्यते ।।
     समाधी दोन प्रकारचीः संप्रज्ञानात.
संशय विपर्ययरहित जे धेय्यस्वरूप जाणले जाते ती संप्रज्ञात समाधी. असम्प्रज्ञात समाधीमध्ये ध्येय व ध्यान यांचा भेदही भासमान नसतो. ध्येयकार वृत्तिचा जेथे लोप होतो. (निरोध होतो) त्याला असंप्रज्ञात समाधी म्हणतात. बाधारहित जे विवेकज्ञान, त्या ज्ञानामुळे कार्यकारणरूप जो सत्तवरजतमभाव यांचा प्रधानमध्ये लय झाल्यानंतर चितिशक्ति (आत्मा) आपल्या मूळ स्वरूपांत रहाते ते पुरूषाचे कैवल्य .
        पातज्जल योगसूत्रांत  चार प्रकारचा व्यूह (संक्षिप्तावयव रचना) आहे. संसार, संसारहेतू, मोक्ष व मोक्षाचा उपाय. दुःखमय संसार हेय  आहे. प्रधान पुरूषाचा संयोग भोगहेतू आहे. हेय (अर्थात भोग) हेतुची आत्यन्तिक निवृत्ती याला हान ही संज्ञा आहे. यासाठी केलेला उपाय पुरूष प्रधानाचे सम्यग्दर्शन हा आहे.
      अविद्यया बुद्धिपुरूषसंयोगव्दारैव संसारहेतुत्वात् प्रकृति पुरूष विवेकसाक्षात्काररूपं यज्ज्ञांन  तद्वसम्यग्दर्शनमिति। पातज्जल योगाचे मोक्षस्वरूप व गौडपादाचार्या यांची मोक्षस्वरूपाविषयची मते भिन्न आहेत. गौडपादाचार्य म्हणतात-
        यदा न लीयते चित्तं न च विक्षिप्यते पुनः।
        अनिङग्मनाभासं निष्पन्नं ब्रह्य तत् तदा।।
 यदानिगृहितचित्तं निद्रावस्थां  न गच्छित न वा विषयेषु रमते तदा-चल मनाभासं ब्रह्य स्वरूपेण निष्पन्नं भवति।
      शंकराचार्य जीवाच्या व्यापक स्वरूपाचे वर्णन करतात व त्याचे मूळ रूप सांगतात-
             अपि व्यापकत्वाद्धित्वप्रयोगात्
             स्वतस्सिद्धभावादनन्याश्रयत्वाते ।
            जगत्तुच्छेमेतत् समस्तं तदन्यत्
            तदेकोवशिष्टः शिवः केवलो-हम् ।।
     सर्व खल्विदं ब्रह्य हा बोध व्यापक शब्दाने होतो.
    ब्रह्य हे परमानन्द स्वरूपाचे आहे, हा बोध हितत्व शब्दाने होतो. आत्मा सर्वव्यापी हा बोध अनन्याश्रयत्व या पदावरून सूचित होतो. जगत्तुच्छमेतत् याने जगताचे मिथ्यात्व सूचित केले आहे.
       या विवेचनावरून जो द्रष्टापुरूष त्याने कैवल्य प्राप्त केल्यानंतर प्रकृति  ही उरतच नाही. म्हणजेच तिचे मुळांतच अस्तित्व नाही असे शंकराचार्य सांगतात. असङगह्ययं पुरूषः इति यथा पुरूषस्य विशुद्धत्वं निर्गुणत्वं (तथैव प्रकृते र्मिथ्यात्वम् तेन ज्ञानसुखात्मक आत्मा सत्यस्तभ्दिन्नंच सर्वं  जगदसत्यमिति। अतोन्यदार्त मितिश्रुतेः साक्षिणो-न्यत्साक्ष्यं सर्वं जगत्तुच्छमितितर्केण प्रकृतिमिथ्यात्वलाभः ।।
   या प्रकारे मोक्षाचे भिन्न भिन्न वर्णन सांख्य, पतज्जली, बौद्ध यांनी केले. त्यानंतर विभिन्न वादांमधून शेवटी शंकराचार्यांचा अव्दैतवाद पूर्णत्वाने आला. या सर्वांमध्ये मोक्ष किंवा कैवल्य हेच अंतिम साध्य राहिले.    
--------------------------------------------------------------------- 

योगसूत्र Sadhana पाद सूत्र 1-25 and 40-55

योगसूत्र  Sadhana पाद
 Author -- Dr Balram Sadashiv Agnihotri
Typed by Prachi -- To proof read

पात्तञ्जल योगसूत्रः अध्याय२
तपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि क्रियायोगः।।१।।
ज्या योगात कायिक,वाचिक व मानसिक क्रिया केल्या जातात त्यास क्रियायोग अशी संज्ञा आहे या क्रियायोगात ध्यानाचा संबध येत नाही तप करणे स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान (ईश्वराची भक्ति) यांस क्रियायोग म्हणतात.
तप हे तीन प्रकारचे आहे तथापि,तपांत मन व इन्द्रिय यांचे ऐकाग्य्र साधलेच गेले पाहिजे कारण मनसच्श्रन्द्रियाणां च ऐकाग्य्रं तप उच्यते। अशी तपाची व्याख्या अग्निपुराणांत आहे मंत्राने जप करणे तज्जपः तदर्थभावनम् हे वाचिक तप आहे मन हे राग, वासना, तृष्णा रहित करणे हे मानसिक तप आहे व्यासांनी भाष्यांत प्रणवादिपवित्राणां जपः ह्याचा जो अन्तर्भाव स्वाध्यायात केला आहे त्याचादेखील तपात अन्तर्भाव करावयास पाहिजे अर्थात् मोक्षशास्त्राचे अध्ययन हे वाचिक तप आहे स्वाध्याय म्हटल्याबरोबर जशी मोक्ष शास्त्राध्यायनाची कल्पना समोर येते तशी जपाची चर्चा भगवदगीतेत खालीलप्रमाणे आहेः
देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम्।
ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते।।
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाडःमयं तप उच्यते।।
मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते।।
स्वाध्याय म्हणजे मोक्षशास्त्राचे अध्ययन.याच स्वाध्यायांत मोक्षशास्त्राच्या अध्यापनाचाही अन्तर्भाव होतो.ईश्वरप्राणिधान म्हणजे आपल्या सर्व क्रिया ईश्वरार्पण बुद्धिने करणे ईश्वरप्राणिधानं सर्वक्रियाणां परमगुरावर्पणम्, तत्फलं संन्यासो वा।
समाधिभावनार्थः क्लेशतनूकरणार्थश्च।।२।।
प्रथम सूत्रात जो क्रियायोग सांगितला आहेत्याचा उपयोग योग्यास निर्बीज समाधी साधावयाची आहे ही भावना उद्दिपित करण्याकडे होतो व सूत्र तीन मधे जे क्लेशांचे प्रकार दिले आहेत ते कमी होत संपूर्ण नाहिसे करण्याकडेदेखील क्रियायोगाचा उपयोग होतो. एतदुक्तं भवति एते तपःप्रभृतयो भ्यस्यमानाश्चित्तगतान्नविद्यादीन्लेशा़ञ्छिथिलीकुर्वन्तः समाधेरुपकारकतां भजन्ते। तस्मात्प्रथमं क्रियायोगावधानपरेण योगिना भवितव्यमित्युपदिष्टम्।
अविद्यास्मितारागद्वेषाभिनिवेशाः क्लेशाः।।३।।
क्लेश, जे कमी करीत संपूर्ण नाहिसे करावयाचे ते पाच प्रकारचे आहेतः अविद्या, अस्मिता, राग, द्वेष व अभिनिवेश.
अविद्याक्षेत्रमुत्तरेषां प्रसुप्ततनुविच्छिन्नोदाराणाम्।।४।।
उत्तरोत्तर कथन केलेले जे अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश नामक क्लेश हे प्रसुप्त(सुप्तावस्थेत) असोत, तनुविच्छिन्न अथवा उदार अवस्थेत असोत, या सर्वांची प्रसवभूमि (या सर्वांना उत्पन्न करणारी) अविद्या आहे. अविद्येपासून उत्पन्न होणारा अस्मिताक्लेश प्रसुप्त, तनु, विच्छिन्न व उदार या स्वरुपात कसा असतो तर अस्मिता ज्या वेळी बीजभावांत असते त्यावेळी तिला प्रसुप्त म्हणतात.ती त्यावेळी कार्य करीत नसते. केवळ अस्तित्वमात्र असते. या नामार्थक्रियां कार्षुःक्लेशा विदेहप्रकृतिलयानां बीजभावं प्राप्तास्तु ते शाक्तिमात्रेण सन्ति क्षीर इव दधि। तथापि, अस्मितेचे शक्तिमात्राने राहाणे तनु भावास प्राप्त होते त्यावेळी ती वासना रुपाने असते.क्लेश हे प्रतिपक्षभावनेने नेहमी पनु भावास (क्षीणभावास) प्राप्त होतात. या प्रतिपक्ष भावनेचे स्वरुपकथन करणारे सूत्र पुढे आहे. जेव्हा अस्मिता प्रवृत्ती, निवृत्ती भावास प्राप्त होते(जसे हे मी केले ही निवृत्ती,हे करावयाचे आहे ही प्रवृत्ती.) तेव्हा ती विच्छिन्न स्वरुपाची असते.योग्य सहकारी प्राप्त झाल्याबरोबर जेव्हा अस्मिता प्रत्यक्ष कार्याला लागते तेव्हा ती तिची उदारावस्था. जशा अस्मितेच्या चार अवस्थांचे स्वरुप या प्रमाणे आहेः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः। हे अस्मितेचे प्रसुप्तस्वरुप.
आशपाशशतैर्बध्दा व कामोपभोगपरायणा ही अस्मितेची तनु-अवस्था. अनेक चित्तविभ्रान्तत्व व मोहजालसमावृतत्त्व ही अस्मितेची विच्छिन्नावस्था आणि कामभोगप्रसक्तत्व ही उदारावस्था.या अस्मितादिक चारही क्लेशांच्या ज्या अवस्था आहेत ह्यांचे बीज अविद्या आहे.
अनित्याशुचिदुःखानात्मसु
नित्यशुचिसुखात्मख्यातिरविद्या।।५।।
अनित्य,अशुद्ध,दुःखात्मक,अनात्मास्वरुप असे जे दुःखजाल आहे त्या सर्वांबद्दल हे नित्य आहे,शुद्ध आहे,हे सुखाचे साधन आहे, हेच आत्मस्वरुप आहे,असे ज्ञान असणे ही अविद्या होय.'एतद् प्रतिपादनं भवति अनित्येषु घटादिषु नित्यत्वाभिमानोविद्येत्युच्यते। एवमशुचिकायादिषु शुचित्वाभिमानः, दुःखेषुच विषयेषु च सुखत्वाभिमानः,अनात्मने शरीरे आत्मत्वाभिमानः।एतेनापुण्ये पुण्यभ्रमोनर्थेचार्थ भ्रमो व्याख्यातः।' ख्याति याचा अर्थ ज्ञान अध्यासाचे लक्षण शांकरभाष्यांत 'अन्यत्रान्यधर्मः' असे केले आहे व अध्यास आणि अविद्या यांचे समानत्व दाखविले आहे.'तमेतमेवलक्षणमध्यासं पण्डिता अविद्येति मन्यते।'
द्दगदर्शनशक्त्योरेकात्मतेवास्मिता।।६।।
परस्पर अत्यन्त भिन्न स्वरुपाच्या असलेल्या ज्या दोन द्दकदर्शनशक्ति,त्यांच्या एकतेचा जो अभिमान त्याला अस्मिता म्हणतात.अविद्येमुळे उत्पन्न होणा-या अस्मितेचे वर्णन शांकरभाष्यात खुलाशाने दिलेले आहे. 'तद्यथा पुत्रभार्यादिषु विकलेषु सकलेषु वाहमेव विकलः सकलोवेति बाह्मधर्मानात्मन्यध्यस्यति तथा देहधर्मामन् तथेन्द्रियधर्मान् एवमयमनादिरनन्तो नैसर्गिकोध्यासः सर्वलोकप्रत्यक्षः। सत्त्व पुरुषयोरहमस्मीत्येकताभिमानोस्मिता।'
सुखानुशयी रागः।।७।।
पूर्वी अनुभवलेल्या विषयाचे जे सुख त्या सुखानुस्मृतिपूर्वक विषयसुखाबद्दल जी अभिलाषा अगर तृष्णा त्यालाच राग म्हणजे आसक्ति म्हणतात.'सुखे तत्साधने वा तत्त्वेन गृहीते तृष्णारुपःक्लेशो राग इत्यर्थः'
दुःखानुशयी द्वेषः।।८।।
पूर्वी अनुभवलेल्या दुःखाविषयी तदनुस्मृतिपूर्वक व निंदापूर्वक जो क्रोध,त्या क्लेशास द्वेष ही संज्ञा आहे. दुःखे तत्साधने तत्तेन गृहीते यःक्रोधः सद्वेषः।
स्वरसवाही विदुषोपि तथारुढो़भिनिवेशः।।९।।
स्वरसवाही याचा अर्थ स्वभावेन वासनारुपेण वहनशीलो न पुनरागन्तुकः। आत्मा हा त्याच्या चैतन्य अंशाने पण वासनेने बद्ध होऊन प्रवाह रुपाने सारखा जन्मामागून जन्म घेत असतो म्हणून त्यास स्वरसवाही म्हटले आहे.हा आत्मा जेव्हा शरीरधारी असतो तेव्हा आपण कधीही मृत होऊ नये (अर्थात् आपला शरीराशी संबंध सुटू नये)असे त्या आत्म्यास नेहमी वाटते हा त्याचा अभिनिवेश.यासच त्या आत्म्याची तीव्र मनीषा असे म्हणता येईल.ही तीव्र इच्छा (अभिनिवेश,आपण मरु नये ही इच्छा) अगदी सूक्ष्म जतुपासून ते विद्वानापर्यंत असते व हा अभिनिवेश सर्व प्राणीमात्रात अगदी रुढ(रुळलेला-खिळलेला)असतो. हा अभिनिवेशदेखील एक प्रकारचा क्लेशच आहे. पूर्वजन्मानुभूत मरणदुःखानुभव वासना बलाद् भयरुपःसमुपजायमानःशरीरविषयादेमर्म वियोगो मा भूदित्यन्वहमनुबन्धरुपः सर्वस्यैवा कृमेर्ब्रह्मपर्यंतं निमित्तमन्तरेण प्रवर्तमानोभिनिवेशाख्याःक्लेशः। अशी भोजवृत्ति आहे.विद्वानाच्या ठिकाणीदेखील हा अभिनिवेशात्मक क्लेश असतो असे का म्हटले?तर यावर उत्तर असे की विद्वान याचा अर्थ ज्याने संप्रज्ञात,असंप्रज्ञात समाधिचा लाभ घेतला आहे असा योगी हा न घेता ज्याच्या ठिकाणी केवळ श्रुतानुमित विवेकच आहे असा शब्दपण्डित एवढाच अर्थ करावा.अशा शब्दपण्डिताच्या बुद्धीत मी मृत होऊ नये हा अभिनिवेश असतोच.
ते प्रतिप्रसवहेयाःसूक्ष्म।।१०।।
सूक्ष्मक्लेश हे वासनारुपाने नेहमी अवस्थित असतात.जेव्हा वृत्तिरुपाने परिणत होतात त्यावेळी प्रत्यक्ष अर्थात् पुरुषावर आघात करणारे असतात.हे जे सूक्ष्म क्लेश आहेत ते ज्या कारणापासून (अंहकारापासून) उत्पन्न झाले त्या कारणात लय केल्याने त्यांचा त्याग होतो.
प्रतिप्रसव म्हणजे कार्याचा कारंणात लय
प्रतिप्रसवःनामा कार्यस्य चित्तस्यास्मितालक्षकारणभावापत्याक्लेशा हातव्य इति।
ध्यानहेयासदवृत्तयः।।११।।
हे सूक्ष्म क्लेश जेव्हा वृत्तिरुपाने स्थूलभावात प्राप्त होतात त्यावेळी त्यांच्या त्याग ध्यानाने करावा (सूक्ष्माःक्लेश ये वासनारुपेणैवस्थितास्तेषां क्लेशानामारब्धकार्याणां याः सुखदुःखमोहात्मिका वृत्तयस्ताः ध्यानेनैव चित्तैकाग्रतालक्षणेन हेया हातव्या इत्यर्थः)
क्लेशमूलः कर्माशयो द्दष्टाद्दष्टजन्मवेदनीयः।।१२।।
कर्माचा आशय म्हणजे साठा.हा कर्माचा आशय चित्तावर वासना संस्कार रुपाने असतो.ह्या कर्माशयाला मूळ कारण क्लेश आहेत.जे पाच क्लेश सांगितले ते कर्माच्या आशयाला कारण आहेत.असा हा क्लेशमूलक (क्लेशापासून उत्पन्न होणारा)जो कर्माचा साठा आहे  तो द्दष्ट म्हणजे चालू जन्म अथवा अद्दष्ट म्हणजे पुढे येणारा जो जन्म त्या जन्मात अनुभविला जातो. (प्रत्ययास येतो)थोडक्यात, या अगर पुढच्या जन्मी जी सुखदुःखे अनुभवाला येतात अगर येतील त्यांना कारण काहीतरी कर्माचा साठा आहे असे जाणावे.हा कर्माचा साठा नेहमी अविद्या, अस्मिता, रागद्वेषाभिनिवेश या क्लेशांनी तयार होतो.'कर्मणां शुभाशुभानां क्लेशा एव निमित्तम्।'
सति मूले तद्विपाको जात्यायुर्भोगाः।।१३।।
मूल कारण अविद्यादिक पाच क्लेश असतानाच जेव्हा ते विपाक दशेला म्हणजे कर्माची फळे देण्याच्या योग्य स्थितीला पोहोचतात तेव्हा जाती (विशिष्ट योनी अगर कुळात जन्माला येणे)आयुष्य (विशिष्ट काळ जिवंत राहणे) व भोग (विषयसुखांचा अनुभव घेणे) ही उत्पन्न होतात. क्लेशेष्वनभिभूतेषु सत्सु कर्मणां कुशलाकुशलरुपाणां विपाकः फलं जात्यायुर्भोगा भवन्ति। इदमत्र तात्पर्यम् - चित्तभूमावनादिकालसंतचिताः कर्मवासना यथा यथा पाकमुपयान्ति तथा तथा गुणप्रधानभावेन  स्थिता जात्यायुर्भोगलक्षणं स्वकार्यमारभन्ते।
ते ह्लादपरितापफलाःपुण्यापुण्यहेतुत्वात् ।।१४।।
पुण्य म्हणजे कुशलकर्म अपुण्य म्हणजे पाप.पुण्य अर्थात् कुशल कर्म असेल तर त्याचे फल सुखप्राप्तीत होते व पाप असेल तर त्याचे फल दुःखानुभूतीत होते.'पुण्यकर्मारब्धा जात्यायुभोगाह्लादफला अपुण्य कर्मारब्धास्तु परितापफलाः। एतच्च प्राणिमात्रापेक्षया द्वैविध्यम्'
परिणामतापसंस्कारदुःखैगुणवृत्तिविरोधाच्च
दुःखमेव सर्वं विवेकिनः।।१५।।
चौदाव्या सूत्रात पुण्यकर्माशयापासून सुख होते असे जरी सांगितले असले तरी विवेकी पुरुषाला हे सर्व दुःखमय आहे. कारण जरी विषयापासून पुरुषाला सुख होते तरी त्याच्या चित्तावर होणारा परिणाम म्हणजे विषयासंबंधी तृष्णा वाढणे हा आहे व हा परिणाम दुःखद आहे. ह्यास परिणामदुःख म्हणतात. विषयसुखासाठी असणारा जो राग(अभिलाषा) त्याच्याच साहचर्याला द्वेष असतो.अर्थात विषयाभिलाषा पूर्ति झाली नाही की द्वेष, क्रोध, मत्सर हे उत्पन्न होतात.यास तापदुःख म्हणतात. उपभुज्यमानेषु सुखसाधनेषु तत्प्रतिपन्थिं प्रतिद्वेषस्य सर्वदैवावस्थितत्वात्सुखानुभवकाले पि तापदुःखं दुष्परिहरमितितापदुःखता। अशी भोजवृत्ती आहे.
सुखाचा अनुभव घेतल्यापासून सुखसंस्कार व दुःखाचा अनुभव घेतल्यापासून दुःखसंस्कार चित्तावर राहतात व या संस्कारांपासून कर्माशय हा सारखा वाढतच राहतो.म्हणून दोहोतही संस्कारदुःख असतेच, यामु्ळे नेहमी बध्दताच कायम राहते. शिवाय सत्त्व, रज, तम या गुणांचा परस्पर विरोध आहेच व यांच्या सुखदुःख मोहात्मक अशा ज्या वृत्ती आहेत त्या वृत्ती एकमेकांचा सारखा पराभव करुन प्रकट होतच असतात. म्हणून सर्व कर्मविपाक दुःखस्वरुपच आहे. त्याचा त्याग करावा असे म्हटले आहे.
हेयंदुःखमनागतम् ।।१६।।
जे दुःख अद्याप आलेले नाही ते दुःख टाकता येते. जे येऊन गेले ते भोगून संपले, जे दुःख आहे ते त्याक्षणी भोगारुढ असते. ते भोगल्याशिवाय नाहीसे होत नाही.म्हणून जे अनागत आहे तेच हेयास (टाकण्यास) योग्य असते.
द्रष्टदृश्ययोः संयोगो हेयहेतुः।।१७।।
द्रष्टा जो चिद्रूप पुरुष व द्दश्य असे जे बुद्धिसत्त्वावर आरुढ होणार सर्व जडजातधर्म या दोहोंचा(भोक्ता पुरुष व भोग्य जडजात यांचा) अविवेकख्याति-पूर्वक होणारा जो संयोग तो या हेयाचे अर्थात दुःखाचे, (गुणपरिणामस्वरुप संसाराचे) मूळ कारण आहे. अविवेकख्याति म्हणजे अज्ञान.
प्रकाशक्रियास्थितिशीलं भूतेन्द्रियात्मकं भोगापवर्गार्थं द्दश्यम्।।१८।।
जे द्दश्य आहे ते प्रकाश म्हणजे सत्त्वगुणात्मक, क्रिया म्हणजे रजोगुणात्मक व स्थिती म्हणजे तमोगुणात्मक आहेत.शिवाय हे दृश्य भूतेन्द्रियात्मक आहे. भूते ही स्थूल पंचमहाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश व सूक्ष्म म्हणजे तन्मात्रात्मक,अर्थात गन्धतन्मात्र, रसतन्मात्र, रुपतन्मात्र, स्पर्शतन्मात्र व शब्दतन्मात्रात्मक या स्वरुपाची आहेत.इन्द्रिये ही पंचज्ञानेन्द्रिये, पंचकर्मेन्द्रिये व मन अशी आहेत शिवाय दृश्य हे भाग व अपवर्ग देणारे आहेत. दृश्याचे भोगस्वरुप सूत्र २.१३ यात सांगितले आहे अपवर्ग म्हणजे मोक्ष. ज्यावेळी विवेकख्यातिपूर्वक (म्हणजे ज्ञानाने) संसाराची निवृत्ती होईल तेव्हा मोक्ष मिळेल हे दृश्य, भोग व अपवर्ग दोन्हीही साधून देते. अविवेकख्यातिपूर्वक दृश्य भोगास प्रवृत्त करते व विवेकख्यातिपूर्वक दृश्य मोक्षास प्रवृत्त करते
तौभोगापवर्गौ अर्थः प्रयोजनं यस्य तत् तथाविधं दृश्यमित्यर्थः।
 विशेषाविशेषलिङ्गमात्रालिङ्गानि गुणपर्वाणि।।१९।।
सत्त,रज, व तम हे जे तीन गुण आहेत, यांच्या चार अवस्था आहेतः पहिली विशेषावस्था ही अवस्था पंचमहाभूते व एकादश इन्द्रिये (पाच ज्ञानेन्द्रिये पाच कर्मेंन्द्रिये व मन) अशा सोळा विकारांची असते. सांख्यकारिकेत या विशेष अवस्थेसच षोडशकस्तुविकारः असे म्हटले आहे दुसरी अविशेषावस्था म्हणजे पंचतन्मात्र (शब्दतन्मात्र, स्पर्शतन्मात्र, रुपतन्मात्र, रसतन्मात्र व गन्धतन्मात्र) व अहंकार तिसरी लिंगावस्था म्हणजेच बुद्धी यासच महत् असे नाव आहे चवथी अलिंगावस्था आहे यासच मूळ प्रकृती, अव्यक्त, प्रधान ही नावे आहेत विशेषामहाभूतेन्द्रियाणि। अविशेषास्तन्मात्रान्तः करणानिः लिङमात्र बुद्धिः। अलिङम अव्यक्तमित्युक्तम्।
द्रष्टा दृशिमात्रः शुद्धोपि प्रत्ययानुपश्यः।।२०।।
द्रष्टा म्हणजे पुरुष हा दृशि म्हणजे चैतन्यमात्र व शुद्ध असूनसुद्धा विषयाचे जे ज्ञान त्याच्याशी बुद्धिवृत्तिने हा तादात्म्य झालेला दिसतो. एतदुक्तं भवति, जातविषयोपरागायामेव बुद्धौ सन्निधिमात्रेणैव पुरुषस्य द्रष्टृत्वमिति।
तदर्थ एव दृश्यस्यात्मा।।२१।।
दृश्याचे जे पुर्वी संगितलेले स्वरुप केवळ त्याच्याच म्हणजे दृश्यासाठी नसून ते पुरुषाला भोक्तृत्व व अपवर्ग संपादन करुन देण्यासाठी आहे आत्मा म्हणजे स्वरुप दृश्य हे स्वतःच्या प्रयोजनासाठी प्रवृत्त होत नसून पुरुषाच्या भोगासाठी आहे. नहि प्रधानं प्रवर्तमानमात्मनः किंचित् प्रयोजनमपेक्ष्य प्रवर्तते किन्तु पुरुषस्य भोगं भोक्तृत्वंच सम्पादयाति।
कृतार्थं प्रति नष्टमप्यनष्टं तदन्यसाधारणत्वात्।।२२।।
जो पुरुष कृतार्थ आहे म्हणजे ज्याला कैवल्य प्राप्त झाले  त्याच्या दृष्टीने हे सर्व दृश्य, जडजगत् , नाहिसे झाल्यासारखे आहे कारण हे जगत्  नी त्याच्या भोगासाठी ना अपवर्गासाठी तथापि कृतार्थ पुरुषाहून अन्य साधारण पुरुष आहेत त्यांच्यासाठी मात्र हे जग अनष्ट आहे या सूत्रात शंकराचार्यांचा मायावाद कोणत्याही रुपाने प्रतीत होत नसून उलट जगताची सत्सता मात्र प्रत्यास येते यासंबंधी भोजवृत्ती म्हटले आहे कृतार्थपुरुषं प्रति तन्नष्टं तथापि सर्व पुरुषसाधारणत्वादन्यान्प्रत्यनष्टमेवावतिष्ठते। अतः प्रधानस्य सकल भोक्तृसाधारणत्वान्न कदाचिदपि विनाशः। एकस्य मुक्तौ वा न सर्वमुक्ति प्रसंगः। या सूत्रात दाखला म्हणून दारु पिणा-याचे उदाहरण घेऊ. दारु पिणा-याने पूर्णपणे दारु सोडली तर त्याच्या दृष्टीने जरी दारु सर्वस्वी नष्ट झाली असली,(कारण तिचे वर्जन केल्यामुळे तिच्यापासून  सर्वथैव भोगाची अपवृत्ति झाली आहे) तरी त्या पुरुषाहून अन्य असे जे दुसरे दारु पिणारे आहेत त्यांच्या दृष्टीने दारु नष्ट झाली नाही तर तिला वस्तुनिष्ठ सत्यत्व आहे. त्याचप्रमाणे दृश्य जगताला वस्तुनिष्ठ सत्यत्व आहे.
स्वस्वामिशक्तयोः स्वरुपोपलब्धिहेतुः संयोगः।।२३।।
यदेव भोगस्य भोग्यत्वं भोक्तृश्च भोक्तृत्वनादिसिद्धं स एव संयोगः।
स्व म्हणजे दृश्य व स्वामि म्हणजे पुरुष. या द्रष्टृदृश्याचा जो संयोग तो संयोग कशासाठी आहे तर द्रष्टयाला आपल्या स्वरुपाची उपलब्धि म्हणजे जाणीव व्हावी म्हणजेच त्यास मोक्ष म्हणजेच त्यास मोक्ष-अपवर्ग मिळावा व त्याच्याबरोबर दृश्याचेपण योगस्वरुप कळावे यासाठी हा स्व म्हणजे दृश्यशक्तिचा व स्वामी म्हणजे पुरुषाचा संयोग आहे.
तस्य हेतुरविद्या ।।२४।।
मोहरुपाविद्या सा संयोगस्य कारणम्। हा जो संयोग आहे त्याला हेतू (कारण) अविद्या आहे.
तदभावे संयोगाभावो हानं तद् दृशेः कैवल्यम्।।२५।।
अविद्येचा अभाव झाला म्हणजे संयोगाचा अभाव होतो. ह्यालाच दृश्याचे हान (दृश्याला टाकून देणे - दृश्याशी संबंध न ठेवणे) म्हणतात व हेच दृशिस्वरुप जो पुरुष त्याचे कैवल्य म्हणजे त्या पुरुषाची मोक्षावस्था आहे या सूत्रात ज्ञानानेच अविद्येचा नाश होतो व ते यथार्थ ज्ञान होण्यासाठीच अन्य यमनि
  


भोजवृत्ती या सूत्राचे फार उत्तम स्पष्टीकरण आहे ते असे- न केवलं भोगसाधनपरिग्रह एव परिग्रहो यावदात्मनःशरीरपरिग्रहोपि परिग्रहाः।भोगसाधनत्वाच्छरीरस्य!तस्मिन्सति रागानुबन्धाद्बहिर्मुखायामेव प्रवृत्तौ न तात्विक ज्ञानप्रादुर्भावः!
'यदा पुनः शरीरादि परिग्रहनैरपेक्ष्येण माध्यस्थमवलम्बते तदामध्यस्थस्य रागादित्यागात्सम्यग्ज्ञानहेतुर्भवत्येव पूर्वापरजन्मसंबोधः।'
शौचात्स्वाङ्जुगुप्सा परैरसंसर्गः।।४०।।
अन्तर्बाह्य शुद्धी (शूचिर्भूतपणा) पाळल्यामुळे त्या मनुष्यास स्वतःच्या अंगाविषयी एक प्रकारचा तिटकारा उत्पन्न होतो. 'काय हे शरीर घाणीचे आगर आहे!' अशी बुद्धी उत्पन्न होऊन स्वतःच्या शरीराविषयी किळस येते व तो दुस-याला शरीरधारी जनाबरोबर संसर्ग ठेवीत नाही.जुगुप्सा=घृणा
'यःकिल स्वमेव कायं जुगुप्सते तत्तदद्यदर्शनात्, स कथं परकीयैस्तथाभूतैः कायैः संसर्गमनुभवेत!!' 
सत्त्वशुद्धिसौमनस्यैकाग्य्रेन्द्रियजयात्मदर्शनयोग्यत्वानि च।।४१।।
हे सूत्र ४० या सूत्राचाच अवयव असून 'भवन्ति' हे क्रियापद धरुन वाक्यपूर्ती करीवी. शुचिर्भूतपणा अंगी बाळगल्याचा योगाने रज व तमोगुण नाहिसे होऊन चित्तात सत्त्वगुण वाढतो. मन प्रसन्न राहते.चित्ताची एकाग्रता सत्त्वर होते. इन्द्रियांवर अंकुश राहातो व आत्मदर्शनास योग्य असे वातावरण निर्माण होते.
संतोषदनुत्तमः सुखलाभः।।४२।।
संतोषवृत्ती बळावल्यामुळे योगेयास अनुत्तम (अतिशय मोठया) सुखाचा लाभ घडतो.अन्तर्मुख वृत्तिही संतोषामुळे प्राप्त होते. या वृत्तिबरोबरच बाह्य विषयसुखाची अभिलाषा नाहिशी होते व अनुत्तम आन्तर् सुखाचा लाभ योग्यास होतो.'सन्तोष प्रकर्षेणान्तरं सुखमाविर्भवति, यस्य बाह्य सुखं लेशेनापि न समम्।।'
कायेन्द्रियसिद्धिरशुद्धिक्षयात्तपसः।।४३।।
तपामुळे अशुद्धिता क्षय होऊन कायसिद्धि व इन्द्रियसिद्धि प्राप्त होतात. (कायसिद्धि म्हणजे शरीराने लहान, मोठे होणे या प्रकारची सिद्धी व इन्द्रियसिद्धि म्हणजे अगदी दूरचे दिसणे,दूरचे ऐकू येणे या प्रकारची)
स्वाध्यायादिष्ट देवतासंप्रयोगः।।४४।।
अभिप्रेत जपसाधनेमुळे अथवा मोक्षशास्त्राच्या अध्ययनामुळे तत्तद् मन्त्ररुपी ज्या इष्ट देवता आहेत त्या देवतेशी संप्रयोग होतो. त्या देवता प्रत्यक्ष प्रगट होतात अथवा त्यांचा अनुग्रह होतो.'सा देवता प्रत्यक्षाभवति।' संप्रयोग याचा अर्थ संबंध जुळवणी असा आहे.
समाधिसिद्धिरीश्वरप्रणिधानात्।।४५।।
ईश्वरप्रणिधानामुळे (ईश्वराप्रत सर्व कर्म अर्पण केल्यामुळे) समाधिची सिद्धि (समाधिलाभ) लवकर प्राप्त होतो. भोजवृत्तीत या सूत्राचा अर्थ असा 'ईश्वरे यत्प्रणिधानं भक्तिविशेषः (तस्मात्) स भगवानीश्वरः प्रसन्नः सन्नन्तरायरुपान् क्लेशान्परिह्रत्य समाधिं संबोधयाति।'
स्थिरसुखमासनम्।।४६।।
स्थिर याचा अर्थ यत्किंचितही शरीराची हालचाल न होता आणि उद्वेग उत्पन्न न करणारी अशी जी शरीराची बैठक तिला आसन म्हणतात.
'आस्यतेनेनेति आसनम् तद्यदा स्थिरं निष्कम्पं सुखमनुद्वेजनीयं च भवति तदायोगांगतां भजते।'
प्रयत्नशैथिल्यानन्तसमापत्तिभ्याम्।।४७।।
वर सूत्र ४६ मध्ये आसनाचे जे लक्षण सांगितले आहे त्या प्रकारच्या आसनाची सिद्धी होण्यासाठी दोन गोष्टींची जरुरी आहे. एक प्रयत्नाची शिथिलता.प्रयत्न म्हणजे शरीराचे हालचाल करण्याचे यत्न पूर्णतःथांबविणे. दुसरी म्हणजे अनन्ताशी समापत्ती अर्थ एकोपा, जुळणी असा आहे. विराट असे जे ईश्वराचे रुप आहे त्याशी जुळण्याचा प्रयत्न;यामुळे आसन लवकर सिद्ध होते.'प्रयत्नशैथिल्यं बहुलायास निवृत्तिः। अनन्तसमापत्तिश्च भगवति चित्तस्थ धारणम्: ताभ्यामासनं सिध्यतीत्यर्थः।'
ततो द्वन्द्वानभिघातः।।४८।।
आसन जय प्राप्त झाल्यावर शीतोष्णादिक त्रास देणारी जी द्वन्द्वात्मक दुःखे आहेत त्यांचा सहज पराभव होतो.
तस्मिन्सति श्वासप्रश्वासयोर्गतिविच्छेः प्राणायामः।।४९।।
आसन झाल्यानंतर श्वास (बाहेरचा वायू नाकपुडी द्वारे आत घेणे) व प्रश्वास (एकदा आत घेतलेला वायू बाहेर सोडणे) या दोन्ही गतिंचा विच्छेद करणे (म्हणजेच प्राणाचा अंतर व बाह्य कुम्भक करणे) यास प्राणायाम म्हणतात.
बाह्याभ्यन्तरस्तम्भवृत्तिर्देशकालसंख्याभिः परिदृष्टो दीर्घसूक्ष्मः।।५०।।
बाह्यवृत्तिश्वास म्हणजे रेचक; अभ्सन्तरवृत्तिश्वास म्हणजे पूरक ; स्तम्भवृत्तिश्वास म्हणजे कुम्भक.अशा रीतीने प्राणायम तीन प्रकारचा आहे. हा प्राणायम देश , काल व संख्या या मोजणीने दीर्घ वा सूक्ष्म होतो.'देशेन उपलक्षित' प्राणायम म्हणजे बारा अंगुले अथवा एक हात (भर) पर्यंतच जो वेगाने जाईल अशा बेतानेच बाहेर सोडलेला श्वास.'कालोपलक्षित' प्राणायम आहे. 'संख्यालक्षित' म्हणजे प्राणायम इतके वेळा करणे ही जी मर्यादा हिला 'संख्यालक्षित' प्राणायाम म्हणतात. अशा रीतीने प्राणायाम केला म्हणजे दीर्घ (बराच काळ जेथे कुम्भक असतो असा) होतो व प्राण हा अगदी सूक्ष्म गतिमान होतो.
'इयतो वारान्कृत एतावद्धिः श्वासप्रश्वासैः प्रथम उद् घातो भवति। एतज्ज्ञानाय संख्याग्रहणमुपात्तम्। उद्र्घातो नाम नाभिमूलात्पेरितस्य वायोः शिरस्यभिहननम्।'
बाह्याभ्यन्तरविषयाक्षेपी चतुर्थः।।५१।।
बाह्य, आभ्यन्तर, विषय, आक्षेपी अर्थात बाह्य व आतील विषयांना त्यांची आलोचना करुन फेकणारा (आक्षेपी) हा चौथा प्राणायाम. सूत्र ५० मध्ये पूरक,कुम्भक व रेचक अशा तीन वृत्ती प्राणवायूच्या असतात असे सांगितले. या सूत्राने कुम्भकाचे आन्तर कुम्भक व बाह्य कुम्भक असे दोन विभाग केले व प्राणाच्या चार वृत्ती सांगितल्या  त्या चार वृत्ती अशा-पूरक ही प्राणाची पहिली वृत्ती. याने प्राणवायू आत जातो. आन्तर कुम्भक ही प्राणाची दुसरी वृत्ती. दुष्ट विषय वायू बाहेर पडतो यास रेचक म्हणतात, ही प्राणाची तिसरी वृत्ती. या वृत्तिने योगी माणसास राजस व तामस आहार आवडत नाही. एका योगी पुरुषाने सांगितले की दोन केळी व अर्धा लिटर दूध हा योग्याचा एक वेळचा पूर्ण आहार आहे. योगी प्रामुख्याने फलहारी असतो. बाह्य कुम्भक या धारणेच्या अपेक्षेने अपेक्षेने असलेली प्राणाची प्रक्रिया ही प्राणाची चौथी वृत्ती.
ततः क्षीयते प्रकाशावरणम्।।५२।।
ततः म्हणजे प्राणायामाच्या अभ्यासाने प्रकाशावरणम्- अज्ञान, क्षीयते- नष्ट होते. प्राणायामाच्या अभ्यासाने चित्ताचा जो सत्त्वगुणरुपी प्रकाश त्यावरील अविद्य, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या क्लेशमूलक आवरणांचा क्षय होतो.'प्राणायामस्थैर्यात्प्रकाश विवेकज्ञानस्यावारकं कर्मादृष्टरुपं क्षायते।'
धारणासु च योग्यता मनसः।।५३।।
प्राणायामामुळे जेव्हा सर्व दोष क्षीण होतात तेव्हा मनाची 'धारणा' या अंगामध्ये स्थिर होण्याची भूमिक होते. 'क्षीणदोषमनः यत्र यत्र धार्यते तत्र तत्र स्थिरी भवति न विक्षेपं भजते।'
स्वाविषयासम्प्रयोगे चित्तस्य स्वरुपानुकारेवेन्द्रियाणां प्रत्याहार।।५४।।
इन्द्रियांचा त्यांच्या स्वतःच्या विषयाशी जो असंप्रयोग (संबंध नसणे) व त्यामुळे इन्द्रियांनी चित्ताच्या स्वरुपाचा आकार धारण करणे म्हणजे चित्ताचे जे स्वरुप ते स्वरुपच इन्द्रियांच्या धारणेचा विषय होणे यास प्रत्याहार म्हणतात.
ततः परमावश्यतेन्द्रियाणाम्।।५५।।
प्रत्याहाराच्या अभ्यासामुळे इन्द्रिये आत्यान्तिक वश होतात.अभ्यस्यमाने हि प्रत्याहारे तथा वश्यान्यायत्तानीन्द्रियाणि सम्पद्यन्ते यथा बाह्यविषयाभिमुखतां नीयमानान्यपि न यान्तीत्यर्थः।
येथे पातञ्जल योगसूत्राचा द्वितीयोध्याय समाप्त झाला.
---------------------------------------------------------------------------------