मंगलवार, 24 अप्रैल 2018

कृष्णसखा अर्जुन


कृष्णसखा अर्जुन
माघीपंचमी अर्थात् सरस्वती पूजनका दिवस (26-01-2023)
आजके लिये मेरी गीता-प्रस्तुति -- कृष्ण-सखा अर्जुन (मराठी)
महाभारत हा या जगातील सर्वात मोठा व सर्वश्रेष्ठ ग्रंथ, सर्वात मोठे काव्य, सर्वात मोठे तत्वज्ञान आणि सर्वात मोठा इतिहास असे वर्णन करता येईल. यात अनेक नायक आहेत –प्रत्येकाचे नायकत्व निराळे. कित्येक खलनायक आहेत- त्यांचे खलनायकी दुर्गुणही निराळे.
अर्जुन हा असाच एक नायक. महाधनुर्धर, धैर्यवान, इंद्रपुत्र, नर या श्रेष्ठ मुनिंचा अवतार, असे त्याचे विविध तऱ्हेने वर्णन करता येईल. महाभारतातील पात्रांपैकी सर्वाधिक देश हिंडलेला असाही अर्जुन. तरी त्याचे कृष्णसखा हेच वर्णन सर्वोत्तम वाटते. कृष्णाचेही जे काही रुप महाभारतात प्रकट झाले आहे त्या सर्वांमधे अर्जुनसखा हेच वर्णन कृष्णालाही सर्वोत्तम लागू पडते असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
महाभारतातील माझ्या सर्वांत आवडीचे व्यक्तिमत्व म्हणजे अर्जुन. त्याच्यात दुर्गुणांचा लवलेशही नव्हता असे म्हणता येणार नाही. पण त्याचे सद्गुण उच्च कोटीचे होते.
अगोदर आपण अर्जुनाचा जीवनवृत्तांत थोडक्यात पाहू या.
हस्तिनापुरीचा राजा पाण्डु ऋषींच्या शापाने लज्जित आणि निराश होऊन राज्याचा त्याग करुन आपल्या दोन्ही राण्या कुंती आणि माद्री यांच्यासह वनवासात राहू लागतो. मैथुनात असलेल्या हरीणरुपधारी ऋषींना मारल्यामुळे तो ही मैथुनाचा प्रयत्न केल्यास मरण पावेल असा तो शाप असतो. हस्तिनापुरीत त्याचा मोठा अंध भाऊ धृतराष्ट्र राजा होतो. त्याला शंभर मुले होतात - हेच ते दुर्योधनादि कौरव. पाण्डु देखील नियोग पद्धतीने दुसऱ्या योग्य व्यक्तीकडून आपल्या पत्नीस संतती प्राप्त व्हावी असा विचार करतो. तेव्हा त्याला कुंतीला मिळालेल्या अद्भुत वरदानाची हकीकत समजते. तिच्या मंत्रशक्तिने कोणत्याही देवतेस आव्हान केल्यास त्या देवतेपासून संतानप्राप्ति होईल असा तो वर असतो. याचा प्रयोग करून ती अनुक्रमे धर्म, वायु व इंद्र या देवतांना आव्हान करते व तिला युधिष्ठिर, भीम, अर्जुन हे पुत्र प्राप्त होतात. याच मंत्राचा प्रयोग करुन माद्रीला देखील अश्विनकुमारांकडून नकुल व सहदेव असे पुत्र प्राप्त होतात. हे सर्व पाण्डुपुत्र म्हणूनच पाण्डव. त्यांची एकी हेच त्यांचे सामर्थ्य.
पाण्डु व इंद्र दोघेही उत्कृष्ठ धर्नुधर आणि सामर्थ्यवान. ते कौशल्य अर्जुनाला सहजच लाभते. वनवासात पाण्डुने एका तपोनिष्ठ पण धनुर्विद्येत पारंगत अशा राजर्षिकडून पाण्डवांना शस्त्रास्त्र-शिक्षण व मुनींकरवी वेदशास्त्रांचे शिक्षण देवविले असते. त्यांचे चरित्र निर्माण होईल असे प्रयत्न केलेले असतात असे महाभारतकारांनी आवर्जून स्पष्ट केले आहे. असे प्रयत्न धृतराष्ट्रपुत्रांसाठी झालेले नसतात.
पुढे पाण्डु व माद्रीचा मृत्यू होतो आणि कुंती पाचही पुत्रांसह हस्तिनापुरी येते. तेथे पितामह भीष्म सर्व एकशेपाच राजपुत्रांच्या शिक्षणासाठी अगोदर कृपाचार्य व नंतर महाधनुर्विद्यासंपन्न अशा गुरु द्रोणांची नियुक्ति करतात. त्या सर्व कुमारांमधे अर्जुन हाच सर्वांत उठून दिसतो कारण त्याचे हस्तलाघव, लक्ष्यभेदाची एकाग्रता, गुरुभक्ति इत्यादि. अगदी जे ब्रम्हास्त्र फक्त स्वत:चा पुत्र अश्वत्थामा यालाच द्यावे असे वाटत असते तेही अर्जुनाच्या सावधगिरिमुळे त्यालाही शिकविणे द्रोणांना भाग पडते.
कुंतीला ऋषी दुर्वासांच्या वरदानामुळे कुमार वयातच सूर्याकडून कर्ण हा पुत्र मिळालेला असतो. त्याच्याकडे जन्मत:च अक्षय कवच- कुंडले असतात, तसेच तोही उत्तम धनुर्धर होत असतो. मात्र जन्मत:च कुंतीने टाकून दिले असल्याने तो अधिरथ या धृतराष्ट्राच्या सारथ्याकडे वाढलेला असतो. साहाजिकच त्याच्या जीवनाचे एकच उद्दिष्ट ठरून जाते- ते म्हणजे स्वत:ला अर्जुनापेक्षा वरचढ सिद्ध करणे. त्याचे शौर्य, कौशल्य व अर्जुनाविषयीचा मत्सर हे ओळखून दुर्योधन त्याला अंगदेशाचे राजेपद बहाल करुन त्याला आपल्या बाजूने वळवतो. सर्वत्र श्रेष्ठ म्हणून गाजलेला हा धनुर्धर. इतका की त्याच्या पुढे अर्जुनाचा पाडाव लागेल ही खात्री प्रत्यक्ष युधिष्ठिरालादेखील वाटत नसे. तरी प्रत्यक्ष युध्द प्रसंगात मात्र कित्येकदा अर्जुनच वरचढ ठरलेला आपण बघतो त्याचे कारण ही मत्सर भावनाच असावी असे मला वाटते. व म्हणूनच अर्जुन हे पात्र मला अधिक प्रिय वाटते.
द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणा देण्याची वेळ येते. बालमित्र द्रुपदाने अपमान केलेला असतो म्हणून त्याला पकडून, बंदी बनवून आणावे अशी आज्ञा ते करतात. प्रथम कर्णाला घेऊन सर्व कौरव जातात पण द्रुपद सेना त्याचा पराभव करते. त्यानंतर अर्जुनासकट पाचही पाण्डव जातात व द्रुपदाला बंदी करतात. द्रोण त्याचे अर्धे राज्य ठेवून घेतात. या अपमानाने क्षुब्ध होऊन द्रोणाचा वध करेल अशा पुत्राची इच्छा ठेऊन द्रुपद एक महायज्ञ करतो. त्यातील अग्नीवेदीमधून त्याला धृष्टद्युम्न हा पुत्र आणि द्रौपदी ही पुत्री प्राप्त होते. अशी ही अग्निकन्या द्रौपदी.
इकडे हस्तिनापुरीत वेगळेच कपट घडते. युधिष्ठिराच्या एकूण योग्यतेमुळे, तो वयाने मोठा असल्यामुळे, तसेच दुर्योधनाला प्रजेची पसंती मिळणार नाही या जाणिवेमुळे धृतराष्ट्र युधिष्ठिराला युवराज घोषित करतो. त्यानंतर प्रजेमधे युधिष्ठिराची लोकप्रियता वाढतच जाते. दुर्योधन व त्याचबरोबर धृतराष्ट्राचाही मत्सर वाढू लागतो. मग धृतराष्ट्र पाण्डवांना फिरुन या असे सांगत कुंतीसह वारणावत नगरीत पाठवतो. तिथे त्यांच्या स्वागतासाठी आधीच महाल उभारुन ठेवलेला असतो व तो लाख इत्यादी ज्वलनशील पदार्थांनी बनवलेला असतो . हे कपट ओळखून पाण्डव त्यात एक भुयार खणतात व महालाला स्वत:च पेटवून देऊन भुयारी मार्गाने सुखरूप बाहेर निघतात. पाण्डव जळून मेल्याची वार्ता सगळीकडे पोहचते व पाण्डवांनाही प्रकट झाल्यास धोका आहे समजून ते गुप्तरुपानेच वावरतात.
द्रुपदाची इच्छा असते की द्रौपदीचा विवाह अर्जुनाशी व्हावा. म्हणून तो स्वयंवरासाठी अत्यंत कठीण पण जाहीर करतो. एका स्तंभावर गरगर फिरणारा लाकडी मासा व त्याचे खालच्या स्वच्छ पाण्यांत पडणारे प्रतिबिंब. एका अवजड धनुष्याला बाण लावून खालील प्रतिबिंबात बघून त्या लाकडी माश्याच्या डोळ्याचा वेध घ्यायचा हा तो पण. यदाकदाचित अर्जुन जिवंत असेल तर गाजावाजा केलेल्या स्वयंवरासाठी तो येईल व पण जिंकेल असे द्रुपदाचे गणित असते.
आणि तसेच होते. ब्राम्हण वेशात फिरणारे पाण्डव हा पण ऐकतात, व स्वयंवरसभेत येतात. तिथे आलेले सर्व राजे एकापठोपाठ एक अपयशी ठरु लागतात, तर कर्ण हा सूतपुत्र असल्याने मी त्याला वरणार नाही असे द्रौपदी आधीच सांगून टाकते. जमलेल्या राजांमधे कृष्ण मात्र आपला अभिन्न सखा अर्जुनाला ओळखतो व स्वत: पण जिंकण्यासाठी पुढे येत नाही. मग ब्राम्हणवेशातील अर्जुन पण जिंकतो, तेव्हा रागाने सर्व राजे एकत्र येऊन त्याच्यावर चाल करुन जातात. तेव्हाही कृष्ण-बलराम तटस्थच राहतात व भीम आणि अर्जुन सर्व राजांचा पराभव करतात. त्यानंतर अत्यंत नाट्यमय रीतिने द्रौपदीचा विवाह पाच पाण्डवांबरोबर होतो. याला कुंती, कृष्ण व व्यास असे तिघेही कारणीभूत व सल्लागार असतात. त्यामुळे हा विवाह समाजमान्यही होतो.
द्रौपदीमुळे पाण्डवांची एकी भंग पाऊ नये यासाठी नारद त्यांना एक काटेकोर नियम घालून देतात.
अशा प्रकारे पाण्डवांचे सामर्थ्य एकाएकी वाढल्यानंतर मात्र कलह टाळण्याच्या दृष्टीने धृतराष्ट्र त्यांना अर्धे राज्य देऊन इंद्रप्रस्थ म्हणजे सध्याच्या दिल्लीला पाठवतो. हा अविकसित भूप्रदेश असतो, पण प्रत्यक्ष इंद्र येऊन विश्वकर्मा या शिल्पतज्ज्ञाच्या आखण्यानुसार या नगरीची रचना केली म्हणून हिचे नाव इंद्रप्रस्थ. इथे युधिष्ठिर आपल्या प्रशासकीय कौशल्याने व नीतिधर्मामुळे राज्याची अभूतपूर्व भरभराट करतो. मात्र याच काळात नारदाने घालून दिलेला नियम अर्जुनाकडून मोडला गेल्याने त्याला बारा वर्षे देशाटनाला जावे लागते. या काळात अर्जुन उत्तर, पूर्वोत्तरेकडील मणिपूर, अंग, द्रविड, मलय, प्रभास, द्वारका आदि ठिकाणी फिरतो. एका अर्थी संपूर्ण भारतभ्रमणच.
या काळात तो आर्या, उलूपी, चित्रगंदा व सुभद्रा अशा चार राजकन्यांशी विवाह करतो. त्यामधे कृष्णाच्या अनुमतीने त्याची बहीण सुभद्रा सोबत केलेला विवाह देखील आहे.
अर्जुन परत आल्यावर कृष्णार्जुनाच्या साहाय्याने अग्नि खांडव वनाचा स्वाहाकार करतो. या प्रसंगी तिथल्या एका सर्पराज तक्षकाला वाचवण्यासाठी इंद्र स्वत: येऊन अर्जुनासोबत लढाई करतो पण अर्जुनाच्या पराक्रमुळे फिका पडून निघून जातो. मात्र खांडववनातील मय हा दानव अर्जुनालाच शरण आल्यामुळे त्याचे प्राण वाचतात. मय देखील उत्कृष्ठ शिल्पतज्ज्ञ असतो व पाण्डवांना अत्यंत अद्भुत अशी मयसभा बांधून देतो. त्याचवेळी भीमासाठी एक उत्कृष्ठ गदा देतो. अग्निदेखील अर्जुनाला एक दिव्य रथ, गांडीव धनुष्य व अक्षय भाता देतो.
यानंतर राजसूय यज्ञासाठी कृष्णाचा सल्ला घेतात तेव्हा जरासंधाच्या वधासाठी केवळ भीम, अर्जुन व मी स्वत: एवढेच समर्थ आहोत असे कृष्ण सांगतो. त्याप्रमाणे ब्राम्हणवेशात जाऊन जरासंधाला द्वंद्व युद्धाचे आव्हान देतात, व भीम-जरासंधाचे मल्लयुद्ध होऊन त्यात भीम जरासंधाचा वध करतो.
यानंतर राजसूय यज्ञाआधी दिग्विजय आवश्यक म्हणून अर्जुन उत्तर दिशेला निघतो. त्या दिशेने तो कैलास मानसरोवर, गंधर्व प्रदेश, चीन, किरात, काश्मीर व त्यांच्याही कितितरी उत्तरेला जाऊन बाह्लीक व ईशान्य देशातील प्रदेश जिंकतो. याखेरीज तो हरिवर्ष नावाच्या अशाही प्रदेशात जातो जिथे मर्त्य मानवाला प्रवेश नाही. तरी पण तिथले नगररक्षक त्याच्या शौर्य सामर्थ्यामुळे त्याला खंडणी आणून देतात. या युध्दात तो विभिन्न जातींचे, कधी पोपटी तर कधी मोरपंखी रंग असणारे घोडे जिंकतो.
राजसूय यज्ञानंतर धृतराष्ट्राची आज्ञा मोडायची नाही म्हणून निव्वळ क्रीडा व मनोरंजनासाठी मांडलेले द्यूत खेळायचा निर्णय युधिष्ठिर घेतो. पण कपटी शकुनीला तो क्रीडा म्हणून खेळायचा नसून पाण्डवांचे राज्य वैभव जिंकून घेऊन त्यांना अपमानित करायचे होते. म्हणूनच शकुनी आपल्या फाशांची भुरळ युधिष्ठिरावर टाकत गेला आणि युधिष्ठिर लागोपाठ हरत हरत आपल्या चारही बंधुना, स्वत:ला आणि नंतर द्रौपदीलाही पणाला लावून बसला. त्या प्रसंगी युधिष्ठिरावर चिडलेल्या भीमाला अर्जुनानेच शांत केले. दुर्योधनाने चिथावणी देत विचारले की जर हे चार पाण्डव किंवा त्यापैकी कोणीही म्हणत असतील की युधिष्ठिर आम्हांला पणाला लावू शकत नाही, तर मी त्या सर्वाना दास्यत्वातून मुक्त करीन. हे पाण्डवांची एकी भंग करण्याचे कपटच होते व द्रौपदीचा अपमान आणि वस्त्रहरण हेही द्रौपदीसोबत पाण्डवांनाही नामोहरम करण्यासाठी होते. तरीही चारही भावांपैकी कोणीही युधिष्ठिराविरोधात गेले नाहीत. पुढे धृतराष्ट्रच पाण्डवांची आणि द्रौपदीची सुटका करतो पण पुन्हा एकदा वेगळ्या शर्तीवर द्यूत खेळण्यास भाग पाडतो. या वेळी पाण्डवांनी बारा वर्षे वनांत आणि एक वर्ष अज्ञातवासात रहावे असा पण असतो. ही खेळी देखील हरल्यामुळे पाण्डवांना वनवासात जावे लागते.
वनवासात खूपदा चर्चा होते की द्यूतातील पण तोडून तेरा वर्षांआधीच राज्य परत मिळविण्याचे प्रयत्न व्हावेत. परंतु युधिष्ठिराला काळजी असते की संपत्ती व शस्त्रसाठ्याशिवाय युध्द कसे जिंकणार? यावर उपाय म्हणून त्याला गुरु सल्ला देतात की वृत्रसुर-संग्राम प्रसंगी इंद्राकडे जमा झालेला शस्त्रसाठा अर्जुनाने मिळवावा, तसेच दिव्यास्त्रांचे ज्ञान प्राप्त करुन घ्यावे. यासाठी अर्जुनाला “प्रतिस्मृतीविद्या” नामक विशिष्ट विद्या देखील शिकवण्यात आली. अशा प्रकारे पुन दुसऱ्यांदा अर्जुनाचा एकाकी प्रवास सुरु होतो.
या प्रवासात त्याला वारंवार तो नर-नारायण या ऋषीजोडीपैकी नर हा ऋषी होता व आताच्या जन्मात नारायण हा कृष्ण रुपाने वावरत आहे याची जाणीव करून देण्यांत येते. किरातवनातील शंकराबरोबर त्याचे युध्द होऊन शंकर त्याच्या कौशल्यावर खूष होऊन त्याला कित्येक अस्त्रांचे ज्ञान देतो. त्यानंतर इंद्र, यम, वरुण आणि कुबेरही प्रकट होऊन त्याला आपापल्या दिव्यास्त्रांचे ज्ञान देतात. त्याच्यासाठी इंद्राचा खास रथ येऊन त्याला स्वर्गात नेले जाते. तिथे तो शस्त्रसाठा मिळवतो. शिवाय एक वर्षभर गंधर्वाकडून नृत्य आणि संगीताचे शिक्षण घेतो. मग इंद्र त्याला समुद्रीद्वीपात रहाणाऱ्या, मायावी युध्द करणाऱ्या आणि वरदानांमुळे देवांना अजिंक्य असणाऱ्या निवातकवच नावाच्या दैत्यसमूहाशी युध्द करण्यास पाठवतो. निवातकवचांचा निःपात करुन परतीच्या वाटेवर तो कालकेय या अंतरिक्षात वावरणाऱ्या दैत्यसमूहांचाही निःपात करतो. अशा रीतिने पाच वर्षे शस्त्रास्त्रसाधना करुन अधिक प्रभावशाली होऊन तो परत येतो.
यानंतर पाण्डवांचा अज्ञातवास सुरु होतो तेंव्हा विराटराजाच्या दरबारी प्रत्येक जण काही ना काही नोकरी पत्करतात. तेव्हा अर्जुन स्त्रीरुप घेऊन अंत:पुरातील राजकन्यांना नृत्य वादनाचे धडे देऊ लागतो. भीमाकडून विराटाचा शालक जो कीचक, त्याचा वध झाल्यावर दुर्योधनाला संशय येतो की हे भीमाचेच काम असावे, अणि अज्ञातवासातील पाण्डव विराटाच्या राज्यात असावेत. त्याचा मित्र त्रिगर्तराज एका बाजूने विराटावर आक्रमण करतो व सर्व सैन्य तिकडे गेल्याची खात्री पटल्यावर दुसऱ्या बाजुने दुर्योधनाचे आक्रमण होते. त्यावेळी एकटा अर्जुन त्यांच्यासोबत युध्द करुन भीष्म, द्रोण, कर्णासह सर्वांना मोहिनी अस्त्राने मूर्च्छित करुन विराटाचे गोधन वाचवतो.
असा हा कौशल्यसंपन्न, विद्यासंपन्न, कलासंपन्न अर्जुन. पण कौरव पाण्डवांमधील युध्दाचा दिवस उजाडतो आणि दोन्ही सैन्याचे निरीक्षण करण्यासाठी मध्यावर आलेला अर्जुन मात्र गांगरतो. दोन्ही सैन्यात आपलेच नातेवाईक, बंधु-बांधव, सखा-मित्र, पुत्र-पौत्र असलेले पाहून त्याची विवेकबुद्धी भ्रमित होते.यांच्याशी लढून सर्व क्षत्रियांचा नाश करुन राज्य मिळवायचे ते कुणासाठी ! एवढा नरसंहार तोही स्वजनांचा, का करायचा हा त्याला प्रश्न पडतो.
अशा वेळी अर्जुनाचा सखा आणि सारथी असलेला कृष्ण त्याला धर्माचे मर्म समजावून सांगतो. समोर युद्ध ठाकलेले असताना आणि ते अधार्मिक शत्रूच्या आततायीपणामुळे ठाकलेले असतांना ठाम उभे राहून युद्ध करणे हाच धर्म. आप्तसंबंधी असणे एका बाजूला आणि आततायी अधार्मिक असणे दुसऱ्या बाजूला. म्हणूनच कृष्णाचे पहिले शब्द असतात – हे कश्मल तुला का आले? हे क्लैव्य सोड. हे अनार्य आहे, अकीर्तीकर आहे, अस्वर्ग्य आहे.
पण अर्जुन पुन्हा तेच घोळवतो – गुरु आहेत, बांधव आहेत – जे धार्तराष्ट्र आहेत त्यांना आम्ही जिंकू की नाही हेही माहीत नाही, पण त्यांना मारून आम्ही जगू शकत नाही असे मला वाटते.
पण एवढ बोलून अर्जुनाला कृष्णाचे शब्द आठवतात – कश्मल, क्लैव्य------! त्याला आपले वैगुण पटकन लक्षात येते व तो कबूल करुन मोकळा होतो – हा माझा कार्पण्यदोष आहे-दुबळेपणा आहे. मी धर्मसंमूढ झालो आहे – धर्माबाबत मला कळेनासे झाले आहे. मी शिष्यभावनेने शरण आलो आहे – जे निश्चितपणे श्रेयस्कर आहे ते तू मला सांग.
पण कृष्ण लगेच नाही सांगत की ऊठ आणि लढ. स्वजनांना मारल्याने मला शोक होईल तो स्वर्गाच राज्य मिळाल तरी जाणार नाही अस म्हणणाऱ्या अर्जुनाला तो सर्वात आधी आत्म्याच्या अमरत्वाचा दाखला देतो. न हन्यते हन्यमाने शरीरे अस सांगतो. जन्माला येणारा मृत्यु टाळू शकत नाही आणि मरणारा पुनर्जन्म टाळू शकत नाही. या दोन्ही सैन्यांमधे जमलेल्या सर्वांना एक ना एक दिवस मृत्यु येणारच. आणि कपडे बदलावे त्याप्रमाणे त्यांचे आत्मे आताचे शरीर टाकून दुसरे शरीर घेतील. कारण आत्मा अविनाशी आहे आणि देह हा विनाशी. तेव्हा अर्जुना, तू नाशवान देहांसाठी शोकाकुल न होता आत्म्याच अविनाशित्व ध्यानात घे.
पण याचा अर्थ असा होत नाही की आत्मा अमर आहे म्हणून तू युद्ध सोडून द्यावेस. या जन्मीचा तुझा स्वभाव हाच तुझा धर्म आणि तो क्षत्रिय स्वभाव – तो धर्म आहे लढण्याचा. म्हणूनच आता प्राप्त झालेले हे युद्ध न लढशील तर स्वधर्म आणि कीर्ति दोन्हीं घालवून बसशील आणि पापाचा भागी होशील. म्हणून ऊठ आणि युद्धाचा निश्चय करुनच ऊठ. युद्ध जिंकू किंवा न जिंकू हे माहीत नसूनही ऊठ कारण कर्म करणे हा धर्म आहे पण कर्मफल प्राप्त करणे हा धर्माचा नियम नाही. म्हणूनच कर्मफलाकडे स्थितप्रज्ञतेने पहायला शिक, पण कर्म मात्र पूर्ण कौशल्य पणाला लावून कर. कर्मात कुशलता, चित्तात समदर्शिता आणि बुद्धीत स्थितप्रज्ञता हाच योग आहे, आणि अर्जुना, तू ही योगी हो. त्यासाठी कर्मकुशलता दाखव आणि युद्धात उत्तम लढून विजय मिळव. हेच कृष्णाच्या गीतेचे सार.
कुणी कुणी विचारतात – दोन्हीकडील सैन्य युद्धासाठी तयार आणि आतुर असताना कृष्ण एवढी मोठी अठरा अध्यायांची गीता कशी सांगत बसेल? पण मला वाटते की धर्मसंमूढ झालेल्या अर्जुनाला तिथल्या तिथे धर्म काय ते कळायला हवे होते. माझे श्रेय निश्चित कशात आहे हे सांग म्हणणाऱ्या अर्जुनाला निव्वळ ऊठ आणि लढ एवढे पुरले नसते, तर आल्या प्रसंगी युद्ध करणे हा धर्म कसा ठरतो हे पण पटवून देणे आवश्यक होते. गतासून म्हणजे घडून गेलेला आणि अगतासून म्हणजे पुढे कधीतरी घडणारे या दोन्हींबद्दल शोक न करता , प्राप्त परीस्थितीत स्वभावधर्माप्रमाणे वागणे हाच धर्म हे अर्जुनाला पटवून दिले नसते तर तो सर्व कौशल्य पणाला लावू शकला नसता. अगदी कृष्णाचे विश्वरुप पाहून व त्यापाठोपाठ त्याचे चतुर्भुज असे नारायणरुप पाहूनही पुढे अर्जुनाचे प्रश्न लगेच संपलेले नाहीत, हे आपण गीतेत बघतो. अशा अर्जुनाला युद्धासाठी तत्पर करायचे असेल तर कृष्णाचा उपदेश त्याच्या मनावर पूर्णपणे ठसायला हवा. त्याच्या तोंडून उत्स्फूर्त निघाले पाहिजे – नष्टो मोहः स्मृतिर्लब्धः
असे हे एका सख्याने सख्याला सांगितलेले तत्वज्ञान. अनोखा असा जिव्हाळा असल्याखेरीज सांगणारा सांगू शकत नाही. अर्जुनाच्या मनातले संपूर्ण कश्मल, संपूर्ण कार्पण्यता काढून टाकण्यासाठी तो जिव्हाळा, ते सख्यत्व आणि एवढे मोठे विवेचन या तिन्हींची गरज होतीच.
महाभारतातील वर्णनाप्रमाणे कृष्ण आणि अर्जुनाची प्रथम नजर भेट घडते ती द्रौपदी स्वयंवराच्या वेळी. द्रौपदी सारख्या अद्वितीय सुंदरीच्या स्वयंवरात भाग घेण्यासाठी येणाऱ्या कृष्णाने, स्वत: धनुर्विद्येत पटाईत असतांना व लक्षभेदाचे कौशल्य असतानाही त्यासाठी प्रयत्न न करण्याचे कारण काय? तर ब्राम्हणवेशातील अर्जुनाला त्याने ओळखले म्हणून. आधीपासूनच अर्जुनाविषयी सखाभाव असल्याशिवाय या वागण्याला दुसरे कारण दिसत नाही. कुंभाराच्या घरी कुंतीच्या भेटीसाठी कृष्ण – बलराम जातात तेव्हा कृष्ण धर्म व भीमाला नमस्कार करतो, नकुल सहदेवांना आशीर्वाद देतो पण अर्जुनाला मात्र अलिंगन देतो. यावरून त्यांचे आधीपासूनच सख्यत्व असले पाहिजे हे दिसून येते.
विवाहसोहळ्यानंतर पाण्डवांचे सामर्थ्य वाढते. धृतराष्ट्राला त्यांना अर्धे राज्य देणे भाग पडते. खाण्डवप्रस्थाची वनाच्छादित, मनुष्यवस्ती न झालेली जागा पाण्डवांना मिळते. त्यावेळी नवीन नगरी उभारण्यासाठी त्यांना कृष्णाचे सर्वतोपरी सहाय्य मिळते. मग होतो अर्जुनाचा वनप्रवास. त्याही वेळी तो द्वारकेत आल्यावर व सुभद्रेशी विवाह करण्याची इच्छा झाल्यावर कृष्णाच्या मदतीने सुभद्राहरण करतो. त्यानिमित्त कृष्ण पुन्हा काही काळ खाण्डवप्रस्थात वास्तव्य करतो. तेव्हा कृष्णार्जुनाच्या सख्यत्वाला खरी झळाळी चढते. दोघे मिळून खाण्डववनाचा दाह घडवून आणतात. त्यासाठी एकत्रपणे इंद्रालाही अडवतात.
त्यानंतर द्यूतात हरलेल्या व बारा वर्षे वनात राहणाऱ्या पाण्डवांना कृष्ण वेळोवेळी मदत करतो व शेवटी दुर्योधनाच्या आततायीपणामुळे युद्धाला तोंड लागते तेव्हा अर्जुनाचे सारथ्य पत्कारतो. महाभारत युद्धाचे वर्णन वाचताना आपल्याला जाणवते की सुरवातीचे गीतेच्या माध्यमातून केलेल तत्वज्ञान अर्जुनासाठी होतेच पण त्या अठरा दिवसांत क्षणोक्षणी अर्जुनाला योग्य सल्ला, त्याचे रक्षण इत्यादी कृष्ण करीतच होता. अर्जुनाच्या रथावर कोसळणारी विविध अभिमंत्रित अस्त्रे निष्प्रभ नाही केली तरी त्याने ती थोपवून धरली होती व युद्धसमाप्तिनंतरच त्यांच्या प्रभावाने अर्जुनाचा रथ जळून नष्ट झाला. भीम, द्रोण व कर्ण यांच्यावरही निर्णायक वार करण्याच्या प्रसंगी अर्जुनाचा संभ्रम कृष्णामुळेच दूर झाला होता.
महाभारत ग्रंथानुसार कृष्ण व अर्जुन यांच्या जीवनाचा अंत मात्र अगदी भिन्नपणाने होतो. महाभारत युद्धात पृथ्वीतलावर इतर बहुतेक सर्व राजे मारले गेले तरी यदुवंशी राजपुत्र मात्र लढाईत भाग न घेतल्याने वाचलेले असतात. आता ते निर्बंधरहीत होऊन एकामेकांतच लढू लागतात. त्यांना थांबवणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर बलराम तीर्थयात्रेला व कृष्ण शेजारील वनांत निघून जातात. तिथेच एका व्याधाचा विषयुक्त बाण कृष्णाच्या पायाला लागतो. आपला मृत्यु जवळ आलेला पाहून व यदुवंशाचाही नाश झालेला ओळखून कृष्ण आपला पिता वसुदेव याला निरोप देतो की अर्जुनाला बोलवा. माझा नातू अनिरुद्ध याचा मुलगा वज्र हा इंद्रप्रस्थावर राज्य करील व सर्व यदुवंशी स्त्रिया हस्तिनापुरात पाण्डवांच्या आश्रयाने राहतील. एवंच मृत्युसमयी मात्र कृष्णार्जुनाची भेट किंवा संवाद होत नाहीत. कृष्णाला त्याचे स्मरण मात्र असते.
यदुकुल स्त्रियांना घेऊन जातांना अर्जुनावर रस्त्यातील टोळ्यांचा हल्ला होतो तेव्हा एरवी दर युद्धात विजयी होणारा अर्जुन संपूर्णपणे निष्प्रभ झाल्याचे वर्णन आपण ऐकतो. जणू त्याचे स्वत्वच कृष्णासोबत निघून गेल्यासारखे.
पुढे बराच काळ राज्य करुन पाण्डव स्वर्गारोहणासाठी जातात. त्या वाटेवरुन सदेह स्वर्गलोकी तोच जाऊ शकेल ज्याने विशुद्धपणे जीवन व्यतीत केले असेल. त्या वाटेवर अर्जुन कोसळतो व भीम याचे कारण विचारतो तेव्हा धर्म सांगतो की याला धनुर्विद्येचा अहंकार असल्याने हा स्वर्गात जाऊ शकला नाही.
अशी ही अर्जुन कथा. त्याच्या व कृष्णाच्या सख्यातून उद्भवलेली भगवद्गीता समस्त भारतीय ग्रंथशास्त्रांचा प्राण म्हणून ओळखली जाते एवढे त्याचे श्रेष्ठत्व. नर - नारायण यांचा अवतार म्हटले जाणाऱ्या कृष्ण व अर्जुनाची ही कथा आपल्याला त्यांच्या अवतार वृत्तीची जणू प्रचीतीच मिळवून देते. म्हणूनच की काय, आजही बद्रीनारायण येथील नर–नारायणांचा आश्रम हे भारतीयांचे एक श्रद्धास्थान बनून राहिले आहे.

शुक्रवार, 23 मार्च 2018

****** गीता मंथन स्पर्धा

 गीता मंथन स्पर्धा 

अगोदर काही नमूना प्रश्न व नंतर त्याखाली  स्पर्धेची माहिती दिलेली आहे

नमूना प्रश्न -- इथे वाचून पुढे ही दुसरी लिंक पहावी -- तिथे वचन, लिंग,इ. प्रश्न ठेवलेत.
https://bhagvadgeeta-recital.blogspot.com/2018/03/blog-post_39.html















संकल्पना  --
भांडारकर प्राच्य विद्या शोध संस्थेचा १०० वर्षांचा कालावधि लौकरच पूर्ण होत आहे. या काळात निरनिराळे प्रथितयश अभ्यासक व संशोधक संस्थेसोबत जोडले गेले. महाभारत हा संस्थेच्या चिकित्सक अभ्यासाचा महत्वाचा ग्रंथ. त्यातील गीता हा नित्यपाठाचा व नित्य चिंतनाचा विषय. सबब गीता-मंथन-स्पर्धेच्या माध्यमातून लोकांना गीता-चिंतनाकडे वळवावे, ही संकल्पना. 
या उपक्रमासाठी भांडारकर संस्थेच्या सोबत कौशलम् न्यास, भारत विकास परिषद, व संस्कृत भारती या संस्था असतील. 
कौशलम् न्यास संस्कृतच्या प्रसारासाठी कार्यरत असून देशभरातील संस्कृत विद्वानांसोबत व संस्थांसोबत कार्यक्रम घेणे हे न्यासाच्या कार्यप्रणालीचे एक वैशिष्ट्य आहे. या प्रकाराने वर्ष २०१४ मधे  कौशलम् न्यास, संस्कृत भारती गोवा व पणजी दूरदर्शन केंद्राने एकत्रित काम करून १२ भागांची एक मालिका संस्कृत तुमची आमची ही वर्षभर चालवली. त्यातील काही भाग यू-ट्यूबवर याच नावाने पहायला मिळतात. संस्कृत भारतीतर्फे संस्कृत संभाषणासाठी प्रोत्साहन दिले जाते व संभाषण वर्ग घेतले जातात. भाविपमार्फत राष्ट्रीय एकत्मतेसाठी शालेय विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम घेतले जातात. गीता मंथन स्पर्धेसाठी शालेय विद्यांर्थ्यांना भाविपतर्फें प्रोत्साहित केले जाईल. 
अशा प्रकारे उद्दिष्टांचे साम्य असल्याने या संस्था एकत्रपणे गीत-मंथन-स्पर्धेचा उपक्रम राबविणार आहेत. 
-------------------------------------------------------------------
Methodology
Distribution of marks for the Spardha
Registration form 
Sample questions
स्पर्धा
Contact email--  leena.mehendale@gmail.com 9422055740

स्पर्धा सर्वांसाठी खुली

एक तरी अध्याय पाठ यावा व गीतेबद्दल सामान्य ज्ञान तसेच संस्कृतचे थोडे ज्ञान असावे

शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणांत भाग घ्यावा यासाठी मुख्याध्यापकांनी विशेष प्रयत्न करावे.

गीता मंथन प्रतियोगिता या माध्यमातून नवीन पिढीवर योग्य संस्कार घडावेत. मोठ्यांनी भाग घेतला तरी ते लोण पुढील पिढीला जाईल हा आशावाद सोबत आहेच.



प्रश्नांचे स्वरूप व गुणांची विभागणी
स्रपर्धेसाठी वयाची अट किंवा कोणतेही शुल्क नाही. पुण्यातील कोणीही नागरिक भाग घेऊ शकतील. मात्र संस्कृत शिक्षकांना सोपी पातळी निवडता येणार नाही.
उद्देश -- एक तरी अध्याय पाठ यावा  गीतेबद्दल सामान्य ज्ञान असावे.
स्पर्धेतील प्रश्नाचे स्वरूप व गुणांची विभागणी ढोबळमानाने खालीलप्रमाणे --
सोपी स्पर्धा  कठिण स्पर्धा अशा दोन पातळींवर स्पर्धा असेलआपापला अध्याय गटांनी स्वतःच ठरवायचा आहे 
पाठांतरआधारित प्रश्न त्यावर विचारण्यात येतीलइतर प्रश्न संपूर्ण गीतेतून निवडले जातील
सोपी स्पर्धा (एकूण १०० गुण कल्पून त्यांची विभागणी)
गटाने निवडलेल्या अध्यायातील श्लोकांचे पाठांतर -- ३० गुण
गीतेतील विविध शब्दांचे अर्थ -- १५ गुण
शब्दांचे सोपे व्याकरण जसे विभक्तिवचनलिंगसंधीसमास १५
क्रियापदांचे सोपे व्याकरण जसे काळलकारवचन १५
काही खास शब्दांमागील कथानकप्रसंग यावरील प्रश्न २
कठिण पातळी
गटाने निवडलेल्या अध्यायातील श्लोकांचे पाठांतर – २५
गीतेतील विविध शब्दांचे अर्थ – २०
शब्दांचे  सोपे क्रियापदांचे व्याकरण -- विभक्तिवचनलिंगसंधीसमासकाळलकार -- २०
गीतेतील विविध श्लोकांमधील संकल्पनांचा अर्थश्लोकार्थांची तुलनातत्वज्ञान३५

आयोजन -- पहिली फेरी दि ५ जून २०१८ रोजी आहे.
ही प्रतियोगिता भांडारकर संस्थेतील टाटा हॉलमधे भरेलवेळ -- सायंकाळी ३.३० ते ५.३० पैकी प्रत्यक्ष स्पर्धेची वेळ ४ ते ५
यासाठी स्पर्धकांनी  स्वतःच ४-४ चे गट करून फॉर्म भरावेत. विद्यार्थी, वरिष्ठ नागरिक असे कोणीही सहभागी होऊ शकतात.
३) दर पाच फॉर्म गोळा झाल्यावर त्यांच्यासाठी  स्पर्धा अशा प्रकारे  क्रमाक्रमाने स्पर्धेच्या फेऱ्या होतील. 
४) प्रत्येक गटाला सुमारे १२ ते १५ प्रश्न विचारले जातीलजास्त व समर्पक उत्तरे देणारा गट विजयी ठरेलत्यानुरूप बक्षिसे दिली जातील. इतर नियम स्पर्धेवेळी जाहीर होतील.
)प्रत्येक गटाने त्यांच्या तयारीचा किमान एक अध्याय फॉर्ममधे भरावापाठांतराचे प्रश्न त्या अध्यायावरच असतील. गटातील कोणत्याही स्पर्धकाने उत्तर देऊन चालेल. मात्र जेवढे अधिक स्पर्धक उत्तर देऊ शकतील तेवढी अधिक तयारी समजण्यांत येईल व क्रेडिट दिले जाईल.
२ परीक्षकांचे मंडळ असून त्यांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक असेल.
अँकरची प्रश्नमालिका संपल्यावर प्रेक्षकांमधून वेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात व त्यांच्या सुयोग्य उत्तरांना वेगळे क्रेडिट असेल.

गीता मंथन स्पर्धेचा अर्ज नमुना
तुमची सोपी अथवा कठिण पातळी आहे ते ठरवा.
तुमच्या गटाचा अध्याय ठरवा

तुमच्या गटासाठी एक नांव निवडा
२) गटाचे नांव, पातळी व अध्याय ठरवा.
गटातील चारही सदस्यांची नांवे व फोन नंईमेल (असल्यास ते ही द्यावे
४) शाळेमार्फत गटनोंदणी असल्यास शाळेचे नांवमुख्याध्यापकांचे नांवफोन व ईमेल.
५) 
गट प्रमुख-
गट सदस्य-
गट सदस्य-
गट सदस्य-
गटासाठी मार्गदर्शक असल्यास
नांव
फोन
ईमेल
पत्रव्यवहारासाठी-
गट प्रमुखाचा पत्ता
मार्गदर्शकाचा पत्ता
शाळेचा पत्ता
स्पर्धकांची तयारीची योग्यता
सोपी
कठिण

--------------------------------------------------------
या स्पर्धेसाठी सुमारे १०० नमूना प्रश्न निवडले असून त्यांची माहिती सर्व स्पर्धकांना दिली आहे. 











































































शुक्रवार, 16 मार्च 2018

******** गीतामंजूषामंथन -- प्रश्नसंच


गीतामंजूषामंथन -- प्रश्नसंच
नमूना प्रश्न

स्पर्धेत विचारलेले प्रश्न खाली पहाता येतील.


नमुना प्रश्नावली (Text mode)
  1. भीष्म भीम यांचा एकाच श्लोकांत उल्लेख कोठे आहे?
  2. अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांचा रंग कोणता?
  3. कृष्णाच्या शंखाचे नाव काय?
  4. अर्जुनाच्या शंखाचे नाव काय?
  5. अर्जुनाच्या धनुष्याचे नाव काय?
  6. कृष्णाने रथ दोन्ही सैन्यांमध्ये नेल्यावर अर्जुनाला कोण कोण दिसले?
  7. देह नाशवंत आहे हे गीतेत कोठे आहे?
  8. आत्मा अविनाशी आहे हे गीतेत कोठे आहे?
  9. जुने कपडे टाकून नवे घेणे, याचा उल्लेख गीतेत कोठे आहे?
  10. चातुर्वर्ण्याचा कोणता निकष गीतेत सांगितला?
  11. कर्म, विकर्म, अकर्म, म्हणजे काय?
  12. गुडाकेश या शब्दाचे दोन अर्थ कोणते?
  13. कमलाचे पान पाण्यांत असून कोरडे असते, हे गीतेत कोठे आहे?
  14. विद्वान्, गाय, हत्ती, कुत्रा, चांडाल, यात कोणते साम्य गीता पाहते?
  15. ज्ञानयोग कर्मयोग हे वेगवेगळे मार्ग कोठे कोठे पोचतात?
  16. स्वतःच्या उद्धाराची जबाबदारी आपण कोणावर टाकावी?
  17. सर्व व्यवहारात नेमस्तपणा असावा, हे गीतेत कोठे आहे?
  18. योग्याचे चित्त आणि निर्वात स्थळीचा दीप यांत कोणते साम्य आहे?
  19. स्वतःवरुन जग ओळखावे, हे गीतेत कोठे आहे?
  20. परमात्म्याची दोन अंगे कोणती?
  21. भक्तांच चार प्रकार कोणते?
  22. शुल्क गति कृष्ण गति म्हणजे काय?
  23. सत् असत्, दोन्ही परमात्म्याचीच रुपे, हे कोठे आहे?
  24. पुण्य करुन मिळालेला स्वर्ग कायम टिकतो काय?
  25. परमात्म्यास सोडून इतर देवतांना भजणारे कोठे जातात?
  26. अत्यंत भक्तिपूर्ण मनाने देवास काय अर्पण करावे ?
  27. पापी मनुष्यास पश्चाताप करुन सन्मार्ग धरणे शक्य आहे काय?
  28. सर्व प्रकारच्या प्राण्यांत समान "भाव" कुठले? पाच सांगा.
  29. गीतेत महर्षी व्यासांचे नाव कोठे आहे ?
  30. फसविणाऱ्या गोष्टीतही परमात्मा आहे?
  31. ऍटम बॉम्बचा स्फोट पाहिल्यावर ओपेनहीमरला गीतेचा कोणता श्लोक आठवला?
  32. परमेश्वरप्राप्तीचा उत्तम मार्ग कोणता ?
  33. निर्गुण भक्तीपेक्षा सगुण भक्ति सरस का ठरविली?
  34. द्वंद्व समासात विभूति का म्हटले?
  35. क्षेत्र म्हणजे काय ?
  36. क्षेत्रज्ञ म्हणजे काय?
  37. क्षेत्राचे घटक कोणते?
  38. ज्ञान निर्गुण आहे. मग 'अमानित्व' इत्यादि, ज्ञानाचे गुण कसे?
  39. पुरुषाला जाणण्याचे मार्ग कोणते?
  40. मनुष्य ब्रम्हाला प्राप्त झाल्याचे लक्षणे कोणते?
  41. सत्व, सजस्, तमस् यांची लक्षणे कोणती?
  42. खाली विस्तार वर मूळ, असा वृक्ष कोणता?
  43. जीव आणि परमात्मा यांचा संबंध कोणता?
  44. परमात्म्याचे तेज सूर्याच्या तेजापलीकडचे, हे गीतेत कोठे?
  45. क्षर आणि अक्षर म्हणजे काय ?
  46. आसुरी संपत् ची लक्षणे कोणती?
  47. नरकाचे त्रिविध दार कोणते?
  48. काय करावे, काय करु नये, हे ठरविण्यास गीता कोणता उपाय सांगते?
  49. आहाराचे तीन प्रकार कोणते? त्यांची लक्षणे कोणती?
  50. शारीरिक तप कोणते?
  51. वाणीचे तप कोणते?
  52. मानसिक तप कोणते?
  53. सात्विक, राजस, तामस दानाची लक्षणे कोणती?
  54. तत् सत् मधील सत् चे लक्षणे कोणते?
  55. त्याग संन्यास यांत फरक कोणता?
  56. राजस त्याग म्हणजे काय?
  57. राजस त्यागाने त्यागाचे फल का मिळत नाही?
  58. कर्म जर टाकता येत नाही, तर मग नैष्कर्म्य कसे साधणार?
  59. सात्विक ज्ञान कोणते?
  60. सात्विक कर्म कोणते?
  61. सात्विक कर्ता कोणता?
  62. सात्विक बुद्धि कोणती?
  63. सात्विक श्रद्धा कोणती?
  64. सात्विक ज्ञान कोणते?
  65. वैश्याचे कर्म कोणते?
  66. परमात्म्याच्या पूजेचा श्रेष्ठ प्रकार कोणता?
  67. परमात्मा मनुष्याच्या देहात कोठे असतो?
  68. सर्व सांगून झाल्यावर, कृष्णाने अर्जुनास सारभूत उपदेश कोणता केला ?
  69. १८७८ मधील "धनुर्धर" या पदाचे महत्व काय?
  70. कर्माची पाच कारणे कोणती?
  71. ह्ऋषीकेश या शब्दाचे दोन अर्थ कोणते?
  72. श्रीकृष्णाचे कोणते रूप पाहून अर्जुन घाबरला?
  73. प्रसाद या शब्दाच्या विरूद्ध अर्थी शब्द सांगा.
  74. विषयांचे ध्यान केल्याने काय काय होते?
  75. कर्मयोगाची गीतेने सांगितलेली परंपरा कोणती?
  76. कासवाचे कोणते वैशिष्ट्य गीतेने सांगितले आहे?
  77. गीतेच्या दृष्टिने कोणती गोष्ट सर्वात पवित्र आहे?
  78. गीतेत ज्ञान मिळविण्याचे कोणते मार्ग सांगितले आहे?
  79. दिव्य चक्षु कोणी कोणास का दिला?
  80. गीतारहस्य कोणी लिहिले ?
  81. गीतेतील ज्ञान मराठी भाषेत प्रथम कोणी आणले?
  82. कुणाचे सैन्य किती होते?
  83. एक अक्षौहिणी सैन्य म्हणजे किती?
  84. योगः कर्मसु कौशलम् याचा शब्दार्थ काय?
  85. कृष्णाची इतर नावे सांगा.?
  86. हा श्लोक पूर्ण म्हणा - इदं शरीरं कौन्तेय ( या प्रकारे गीतेतील कोणताही श्लोक)
  87. अर्जुनाची इतर नावे सांगा
  88. पांडवांची नावे
  89. दुर्योधन बंधुंपैकी इतर नावे
  90. उवाच या शब्दाचा काळ लकार कोणता?
  91. स्थितप्रज्ञस्य का भाषा या मधील का या शब्दाचे लिंग सांगा.
स्थितप्रज्ञस्य का भाषा या मधील का या शब्दाचे वचन सांगा.
  1. पार्थ हा शब्द कसा तयार झाला?
  2. कुन्तीः - कौन्तेयः प्रकारच्या प्रत्ययांना काय म्हणतात?
  3. गीतेत रामाचा उल्लेख आहे का असल्यास कुठे?
  4. भगवंतांनी सांगितलेल्यांपैकी विभूति सांगा.
  5. ते श्लोक सलग म्हणा.
  6. सुरुवातीस जो शंखनाद झाला त्यातील नरकुलाच्या शंखाचे नाव काय ?
  7. आसुरूसंपत्ति म्हणजे काय?
  8. स्थितप्रज्ञतेची लक्षणे सांगा.
  9. ...... या श्लोकाचा अर्थ सारांशाने सांगा.( असे वेगवेगळे श्लोक)
  10. गीतेत एकूण अध्याय किती ?
  11. पैकी अध्यायांची नावे सांगा.
  12. गीतेतील खालील शब्दांचे अर्थ सांगा.
  • ( सोपे कठीण)

  1. येषामर्थे या शब्दाचा संधिविच्छेद काय?
इमेवस्थिता या शब्दाचा संधिविच्छेद काय?

  1. कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र असे का म्हटले आहे?
  2. नभस्पृशं दीप्तं हे कोणाचे बोधवाक्य आहे?
  3. गीता कृष्णाने सांगितलेली गीता प्रथम कोणी कोणी ऐकली?   
--------------------------------------------                                             
.खालील शब्दांचा अर्थ सांगा ()
    * विमत्सर * गन्तव्यं * विमोक्षसे
    * क्षपितकल्मषः * पर्युपासते * जुह्यति
    * बोध्दव्यं * परित्राणाय * बध्यते
* विन्दति * वृजिनम् * वितता
* निबध्नन्ति * यास्यसि * कुरुसत्तम
* तस्मात्त्वम् * सम्भवामि * तदात्मानं

* बुधाः * अजोपि * भजाम्यहम्
.. खालील शब्दांचा संधि सोडवा ()
* ब्रह्माग्नावपरे * योगमातिष्ठोत्तिष्ठ * कुतोन्यः
* कर्माखिलं * पुनर्मोहमेवं * कर्मण्यकर्म
४४.खालील शब्दांचे वचन सांगा.()
* सन्तरिष्यसि * उपदेक्ष्यन्ति * संकल्पवर्जिताः
४५.खालील शब्दांची विभक्ति काय.()
* मुखे * गतसङ्गस्य * कालेन
४६. खालील शब्दांचा पुरुष सांगा.()
* प्राह * वेत्थ * मोक्ष्यसे
४७. खालील श्लोक पूर्ण करा.() बीजं मां सर्वभूतानां..........
४८. सलग३ श्लोक म्हणा.() एतद्योनीनि भूतानि ….......
४९. खालील श्लोक पूर्ण करा.() यो यो यां यां....
खालील शब्दांचा संधि सोडवा.()
* नाभिजानाति * माययापह्ऋतज्ञानाः * तपश्चास्मि
५४. खालील शब्दांचा अर्थ सांगा. ()
* रसोहमप्सु * सूत्रे मणिगणा इव * सर्ववेदेष
५५. खालील शब्दांचा अर्थ सांगा.()
* प्रपद्यन्ते * विभावसौ * नाभिजानाति
५६. खालील शब्दांचे वचन सांगा.()
    * भरतर्षभ * सर्गो * शशिसूर्ययोः
५७. खालील शब्दांची विभक्ति काय?()
* तेजस्विनाम् * खे * प्रकृतिरष्टधा
५८. खालील शब्दांचा लकार सांगा.()
    * तच्छ्रुणु * विद्धि * धार्यते
५९. खालील श्लोक पूर्ण करा.(१२) क्लेशोऽधिकतरस्तेषाम्............
६०. सलग ३ श्लोक म्हणा. (१२) यो न हृष्यति.............
६३. खालील श्लोक पूर्ण करा.(१२) अथ चित्तं समाधातुं.....
६४. अभ्यासयोग जमत नसेल तर काय केल्याने भगवंत प्राप्त होईल?
६५. खालील शब्दांचा संधि सोडवा.(१२)
* भक्तास्त्वाम् * यस्मान्नोव्दिजते * देहमाश्रितः
६६. खालील शब्दांचा अर्थ सांगा.(१२)
* सिध्दिमवाप्स्यसि * गतिर्दुःखम * निवेशय
६७. खालील शब्दांचा काळ सांगा.(१२)
* अवाप्स्यसि * काङ्क्षति * निवेशय
६८. खालील शब्दांचे वचन सांगा.(१२)
* मानापमानयोः * कर्माणि * क्षमी
६९. खालील शब्दांची विभक्ति काय.(१२)
* मयि * धनञ्जय * संसारसागरात्
७०. खालील शब्दांचे लिंग सांगा.()
* भक्ताः * कर्माणि * प्रिया
७१. खालील श्लोक पूर्ण करा. (१५) श्रोत्रं चक्षुः …......(स्पर्शनं च)
७२. सलग ३ श्लोक पूर्ण करा.(१५) द्वाविमौ पुरुषौ ….........
७३. महाभारत युद्धात कौरव आणि पांडवांकडे किती किती सैन्य होते?
७४. कुन्तीपासून शब्द कौन्तेयः या प्रकारची ३ नावे सांगा.
७५.खालील श्लोक पूर्ण करा(१५) न रुपमस्येह........
७६. स्थितप्रज्ञस्य का भाषा या मधील का शब्दाचे लिंग सांगा.
७७. खालील शब्दांचा संधि सोडवा.(१५)
* गामाविष्य * घ्राणामेव * देहमाश्रितः
७८. खालील शब्दांचा अर्थ सांगा.(१५)
* भासयते * वेदवित् * पावकः
७९.खालील शब्दांचा अर्थ सांगा.(१५)
* चतुर्विधम् * पुष्पाणि * बिभर्ति
८०. खालील शब्दांचे वचन सांगा.(१५)
* निवर्तन्ते * द्वाविमौ * छन्दांसि
८१. खालील शब्दांची विभक्ति काय?(१५)
* मनुष्यलोके * यस्मिन् * दृढेन
८२. खालील शब्दांचा काळ सांगा.(१५)
* निवर्तन्ते * कुरु * उच्यते




नमुना प्रश्नावली (jpg mode)






१ ल्या स्पर्धेत विचारलेले प्रश्न  -- अध्याय -- ४,७,१२,१५    
गटांची नावे --

खालील श्लोक पूर्ण करा


वीतरागभयक्रोधा …..

चातुर्वर्ण्यं मया ….

सलग ३ श्लोक म्हणा ४


न हि ज्ञानेन सदृशं ……

एका वाक्यात उत्तर द्या--
कुरूक्षेत्राला धर्मक्षेत्र असे कां म्हटले ?

नभस्पृशं दीप्तं हे कोणाचे बोधवाक्य आहे ?

गीतेतील ३ अध्यायांची  नांवे सांगा
गीतामंजूषामंथन -

.खालील शब्दांचा अर्थ सांगा.()
  • *विमत्सर *गन्तव्यं *विमोक्षसे * क्षपितकल्मषः * पर्युपासते*
  • **
. खालील शब्दांचा अर्थ सांगा.()*
  • जुह्यति
. खालील शब्दांचा अर्थ सांगा.()
  • बोध्दव्यं
  • परित्राणाय
  • बध्यते
. खालील शब्दांचा अर्थ सांगा.()
  • विन्दति
  • वृजिनम्
  • वितता
. खालील शब्दांचा अर्थ सांगा.()
  • निबध्नन्ति
  • यास्यसि
  • कुरुसत्तम
.खालील शब्दांचा अर्थ सांगा.()
  • तस्मात्त्वम्
  • सम्भवामि
  • तदात्मानं
. अर्जुनाच्या घोड्यांचा रंग कोणता?
. कृष्णाच्या शंखाचे नाव काय?
. अर्जुनाच्या धनुष्याचे नाव काय?
. ह्ऋषीकेश या शब्दाचे दोन अर्थ कोणते?
. गीतेच्या दृष्टीने कोणती गोष्ट सर्वात पवित्र आहे?
१०. गीतेत एकूण अध्याय किती?
११. कुणाचे सैन्य किती होते?
१२. एक अक्षौहिणी सैन्य म्हणजे किती?
१३. स्थितप्रज्ञतेची ३ लक्षणे सांगा.
१४. भीष्म व भीम यांचा एकाच श्लोकांत उल्लेख कोठे आहे?
१५. कृष्णाने रथ दोन्ही सैन्यांमध्ये नेल्यावर अर्जुनाला कोण कोण दिसले?
१६. कृष्णाची इतर ५ नावे सांगा ?
१७. अर्जुनाची इतर पाच नावे सांगा?
१८. पाच पाण्डवांची नावे?
१९. दुर्योधन बंधुंपैकी इतर तीन नावे?
२०. सुरवातीस जो शंखनाद झाला त्यातील नकुलाच्या शंखाचे नाव काय ?
२१. गीतारहस्य कोणी लिहिले?
२२. भीमाचे दुसरे एखादे नाव सांगा.
२३. गीतेत धृष्टद्युम्न नाव कुणाचे आहे?
२४. उत्तरायण म्हणजे काय ?
२५. क्षेत्र व क्षेत्रज्ञ म्हणजे काय?
२६. पहिल्या अध्यायाला अर्जुनविषादयोग हे नाव का पडले?
२७. क्षेत्राचे घटक कोणते?
२८. क्षर आणि अक्षर म्हणजे काय?
२९. नरकाचे दार असे म्हटलेल्या तीन गोष्टी कोणत्या?
३०. शारीरिक तप कोणते?
३१.वाणीचे तप कोणते?
३२. मानसिक तप कोणते?
३३. राजस त्याग म्हणजे काय?
३४. सात्विक ज्ञान कोणते?
३५. खालील श्वोक पूर्ण करा.() वीतरागभयक्रोधा.........
३६. सलग ३ श्लोक म्हणा.() न हि ज्ञानेन सदृशं......
३७.कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र असे का म्हटले?
३८. नभस्पृशं दीप्तं हे कोणाचे बोधवाक्य आहे?
३९. खालील श्लोक पूर्ण करा.() चातुर्वर्ण्यं मया ….......
४०.गीतेतील ३ अध्यायांची नावे सांगा.
४१. खालील शब्दांचा संधि सोडवा.()
  • ब्रह्माग्नावपरे
  • योगमातिष्ठोत्तिष्ठ
  • कुतोन्यः
४२.खालील शब्दांचा संधि सोडवा.()
  • कर्माखिलं
  • पुनर्मोहमेवं
  • कर्मण्यकर्म
४३. खालील शब्दांचा अर्थ सांगा.()
  • बुधाः
  • अजोपि
  • भजाम्यहम्
४४.खालील शब्दांचे वचन सांगा.()
  • सन्तरिष्यसि
  • उपदेक्ष्यन्ति
  • संकल्पवर्जिताः
४५.खालील शब्दांची विभक्ति काय.()
  • मुखे
  • गतसङ्गस्य
  • कालेन
४६. खालील शब्दांचा पुरुष सांगा.()
  • प्राह
  • वेत्थ
  • मोक्ष्यसे
४७. खालील श्लोक पूर्ण करा.() बीजं मां सर्वभूतानां..........
४८. सलग३ श्लोक म्हणा.() एतद्योनीनि भूतानि ….......
४९. खालील श्लोक पूर्ण करा.() यो यो यां यां....
५०. सुरवातीस जो शंखनाद झाला त्यातील अर्जुनाच्या शंखाचे नाव काय?
५१. कृष्णाची इतर ५ नावे सांगा.
५२.योगः कर्मसु कौशलम् याचा शब्दार्थ काय?
५३. खालील शब्दांचा संधि सोडवा.()
  • नाभिजानाति
  • माययापह्ऋतज्ञानाः
  • तपश्चास्मि
५४. खालील शब्दांचा अर्थ सांगा. ()
  • रसोहमप्सु
  • सूत्रे मणिगणा इव
  • सर्ववेदेष
५५. खालील शब्दांचा अर्थ सांगा.()
  • प्रपद्यन्ते
  • विभावसौ
  • नाभिजानाति
५६. खालील शब्दांचे वचन सांगा.()
  • भरतर्षभ
  • सर्गो
  • शशिसूर्ययोः
५७. खालील शब्दांची विभक्ति काय?()
  • तेजस्विनाम्
  • खे
  • प्रकृतिरष्टधा
५८. खालील शब्दांचा लकार सांगा.()
  • तच्छ्रुणु
  • विद्धि
  • धार्यते
५९. खालील श्लोक पूर्ण करा.(१२) क्लेशोऽधिकतरस्तेषाम्............
६०. सलग ३ श्लोक म्हणा. (१२) यो न ह्ऋष्यति.............
६१. महाभारत युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला सांगण्याचे काम कुणावर आले?
६२. प्रिय भक्ताच्या लक्षणांपैकी २ लक्षणे सांगा.
६३. खालील श्लोक पूर्ण करा.(१२) अथ चित्तं समाधातुं.....
६४. अभ्यासयोग जमत नसेल तर काय केल्याने भगवंत प्राप्त होईल?
६५. खालील शब्दांचा संधि सोडवा.(१२)
  • भक्तास्त्वाम्
  • यस्मान्नोव्दिजते
  • देहमाश्रितः
६६. खालील शब्दांचा अर्थ सांगा.(१२)
  • सिध्दिमवाप्स्यसि
  • गतिर्दुःखम
  • निवेशय
६७. खालील शब्दांचा काळ सांगा.(१२)
  • अवाप्स्यसि
  • काङ्क्षति
  • निवेशय
६८. खालील शब्दांचे वचन सांगा.(१२)
  • मानापमानयोः
  • कर्माणि
  • क्षमी
६९. खालील शब्दांची विभक्ति काय.(१२)
  • मयि
  • धनञ्जय
  • संसारसागरात्
७०. खालील शब्दांचे लिंग सांगा.()
  • भक्ताः
  • कर्माणि
  • प्रिया
७१. खालील श्लोक पूर्ण करा. (१५) श्रोत्रं चक्षुः …......(स्पर्शनं च)
७२. सलग ३ श्लोक पूर्ण करा.(१५) द्वाविमौ पुरुषौ ….........
७३. महाभारत युद्धात कौरव आणि पांडवांकडे किती किती सैन्य होते?
७४. कुन्तीपासून शब्द कौन्तेयः या प्रकारची ३ नावे सांगा.
७५.खालील श्लोक पूर्ण करा(१५) न रुपमस्येह........
७६. स्थितप्रज्ञस्य का भाषा या मधील का शब्दाचे लिंग सांगा.
७७. खालील शब्दांचा संधि सोडवा.(१५)
  • गामाविष्य
  • घ्राणामेव
  • देहमाश्रितः
७८. खालील शब्दांचा अर्थ सांगा.(१५)
  • भासयते
  • वेदवित्
  • पावकः
७९.खालील शब्दांचा अर्थ सांगा.(१५)
  • चतुर्विधम्
  • पुष्पाणि
  • बिभर्ति
८०. खालील शब्दांचे वचन सांगा.(१५)
  • निवर्तन्ते
  • द्वाविमौ
  • छन्दांसि
८१. खालील शब्दांची विभक्ति काय?(१५)
  • मनुष्यलोके
  • यस्मिन्
  • दृढेन
८२. खालील शब्दांचा काळ सांगा.(१५)
  • निवर्तन्ते
  • कुरु
  • उच्यते

गीतामंजूषामंथन २

  1. खालील शब्दांचे लिंग/समास.(१२)
  • आत्मवान्
  • दृढनिश्चयः …. ….
  • अद्वेष्टा
  • सङ्गविवर्जितः ...
  • परित्यागी
.खालील शब्दांचे लिंग/समास.()
  • अचलाम्
  • मूढाः
  • चतुर्विधा
  • प्रकृत्या
  • जिज्ञायु -
. खालील शब्दांचा समास सांगा.(सर्वांसाठी)
  • विश्वतोमुखम्
  • कल्पक्षयः
  • षण्मासा
  • सिंहनादम्
  • कर्मफल
. खालील शब्दांचे लिंग/समास.()
  • रात्रिं युगसहत्र्सान्ताम्
  • तध्दाम
  • शुल्ककृष्णे - समास
  • गती
  • कालम्
. खालील शब्दांचे लिंग/समास.()
  • पौत्राः
  • मधुसूदन -
  • सुखानि
  • मही
  • एते
  • त्रैलोक्य स
. खालील शब्दांचे लिंग काय.()
  • भोक्ता
  • तोयम्
  • भक्त्या
  • सर्वम्
  • प्रकृति
. भगवंतांना भजणारे ४ प्रकारचे भक्त कोणते?()
.पांडवाच्या बाजूने असलेल्या ५ वीरांची नावे सांगा.()
. उध्दरेदात्मानात्मानं या उक्तिचा अर्थ काय आहे?()
१०.ज्ञानरुपी अग्नी काय भस्मसात् करतो?()
११. खालील शब्दांची विभक्ति सांगा()
  • शस्त्रसम्पाते
  • विपरितानि
  • श्वशुरान्
  • रणसमुद्यमे
  • रथोत्तमम्
१२. खालील शब्दांची विभक्ति सांगा.()
  • श्रध्दय़ा
  • वर्तमानानि
  • मामेभ्यः
  • गुणमयैः
  • भरतवर्षभ
१३. खालील शब्दांची विभक्ति सांगा.()
  • यस्यान्तस्थानि
  • वेदेषु दानेषु
  • मनसा
  • सर्वस्य
  • अन्तकाले
१४. खालील शब्दांची विभक्ति सांगा ()
  • ज्ञानयज्ञेन
  • तेषु कर्मसु
  • क्षीणे पुण्ये
  • कर्मबंधनैः
  • देवभोगान्
१५. खालील शब्दांची विभक्ति सांगा.(१२)
  • योगेन
  • धनञ्जय
  • संसारसागरात्
  • कर्माणि
  • मयि
१६. खालील शब्दांचा पुरुष/काळ (१२)
  • अवाप्स्यसि - काळ
  • भक्ताः
  • द्विजते
  • शक्नोषि
  • निवेशय
१७. खालील शब्दांचा काळ ओळखा.()
  • प्रोक्तम्
  • उपैति
  • प्रवक्ष्ये
  • विद्यते
  • भूत्वा
१८. खालील शब्दांचा काळ ओळखा()
  • वेद
  • मोदिष्ये
  • ज्ञास्यसि
  • अभजत्
  • विदुः
१९. वासांसि जीर्णानि ही उपमा कोणाला दिली आहे?(१२)
२०. श्रीकृष्णाचे कोणते रुप पाहून अर्जून घाबरला?(१२)
२१. अविनाशी कर्मयोग भगवंताने पूर्वकाळी कोणाला सांगितला होता?()
२२. विभूतियोगात सांगितल्यापैकी ३ विभूति सांगा.()
२३. गीता जयंती कधी साजरी करतात.()
२४. नभस्पृशं दीप्तं प्रमाणेच भांडारकर संस्थेचे बोधवाक्य काय आहे.()
२५. खालील शब्दांची संधि सोडवा.()
  • श्वेतैर्हयैर्युक्ते
  • पापादस्मान्निवर्तितुम्
  • प्रपश्यद्भिर्जनार्दन
२६. खालील शब्दांची संधि सोडवा.()
  • धृष्टकेतुश्चेकितानः
  • शब्दस्तुमुलोऽभवत्
  • भीष्ममेवाभिरक्षन्तु
२७. खालील शब्दांची संधि सोडवा.()
  • एकभक्तिर्विशिष्यते
  • श्रध्दयार्चितुमिच्छति
  • युक्तस्तस्याराधनमीहते
२८. खालील शब्दांची संधि सोडवा.()
  • प्रपद्यन्तेऽन्यदेवताः
  • ममाव्ययमनुत्तमम्
  • वक्ष्याम्यशेषतः
२९. खालील शब्दांची संधि सोडवा.()
  • तत्सर्वमिंद
  • इत्युक्तस्तमाहुः
  • परस्तस्मात्तु
३०. खालील शब्दांची संधि सोडवा.()
  • पुरुषश्चाधिदैवतम्
  • अग्निर्ज्योतिरहः
  • स्थानमुपैति
३१. खालील शब्दांची संधि सोडवा.()
  • मत्स्थानित्युपारय
  • प्रवक्ष्याम्यनसूयवे
  • अहमग्निरहं
३२. खालील शब्दांची संधि सोडवा.()
  • स्वधाहमहमौषधम्
  • पवित्रमिदमुत्तमम्
  • युक्त्वैवमात्मानं
३३. खालील शब्दांची संधि सोडवा.(१२)
  • चाप्यक्षरमव्यक्तं
  • नचिरात्पार्थ
  • मदर्थमपि
३४.खालील शब्दांची संधि सोडवा. (१२)
  • मामिच्छाप्तुम्
  • धर्म्यामृतमिदं
  • भक्तोस्तेऽतीव
३५. खालील शब्दांचे वचन सांगा.(१२)
  • मानापमानयोः
  • यथोक्तम्
  • सर्वभूतानाम्
  • शोचति
  • प्रियाः
३६. खालील शब्दांचे वचन सांगा.()
  • भ्रुवोर्मध्ये
  • वीतरागाः
  • द्वाराणि
  • संज्ञके
  • परमां गतिम्
३७. खालील शब्दांचे वचन सांगा.()
  • ह्रतज्ञानौ
  • गुणमयी
  • नाभिजानाति
  • अयं
  • तरन्ति
३८. खालील शब्दांचे वचन सांगा.()
  • युद्धविशारदाः
  • एतान्
  • मणिपुष्पकौः
  • घ्नतोऽपि
  • हयैः
३९.खालील शब्दांचे वचन सांगा.()
  • दृढव्रताः
  • स्वधाहम्
  • भजते
  • यत्करोषि
  • सोमपाः
४०. खालील शब्दांचा काळ ओळखा.()
  • मामुपासते
  • प्रवक्ष्यामि
  • जुहोसि- पुरुष ओळखा
  • प्रार्थयन्ते- पुरुष ओळखा.
  • उपधारय
४१. खालील शब्दांचा काळ ओळखा.()
  • ब्रवीमि
  • दध्मुः
  • व्यदारयत्
  • करिष्ये
  • भवेत्
४२. खालील शब्दांचा अर्थ सांगा.(१२)
  • पर्युपासते
  • शुचिर्दक्ष
  • विशिष्य़ते
  • ह्रष्यति
  • अमर्ष
४३. खालील शब्दांचा अर्थ सांगा.()
  • शस्त्रसम्पाते
  • सोमदत्ति
  • परिदह्यते
  • हन्युः
  • शस्त्रपाणया
४४. खालील शब्दांचा अर्थ सांगा.()
  • ज्ञेयोऽसि
  • अणोरणीयान्
  • मामुपेत्य
  • संग्रहेण
  • अहरागमे
४५. खालील शब्दांचा अर्थ सांगा.()
  • धार्यते
  • तान्विध्दि
  • जन्मनामन्ते
  • विदधामि
  • ईहते
४६. खालील शब्दांचे अर्थ सांगा()
  • गतिर्भता
  • सर्वत्रगः
  • सूयते
  • अश्रद्दधानाः
  • निगृह्णामि
४७. पुढील श्लोक पूर्ण करा. () अहो बत महत्पापं..........
४८. पुढील श्लोक पूर्ण करा.() सङ्करो नरकायैव.........
४९. पुढील श्लोक पूर्ण करा.() दैवी हयेषा गुणमयी.........
५०. पुढील ३ श्लोक पूर्ण करा.() मनुष्याणां सहस्त्रेषु.............
५१. पुढील श्लोक पूर्ण करा.() य़ेषां त्वन्तगतं.........
५२. पुढील श्लोक पूर्ण करा.() धूमो रात्रिस्तथा ….........
५३. पुढील श्लोक पू्र्ण करा.() सर्वद्वाराणि संयम्य...
५४. पुढील श्लोक पूर्ण करा.() यान्ति देवव्रता..........
५५. पुढील श्लोक पूर्ण करा.() न च मत्स्थानि.........
५६.पुढील श्लोक पूर्ण करा.(१२) सन्तुष्टः सततं........
५७. पुढील श्लोक पूर्ण करा.(१२) अथ चित्तं समाधातुं
५८. संस्कृतमध्ये उत्तर सांगा. प्रथमाध्याये अर्जुनः गाण्डीवस्य वर्णनं कीदृशं अकरोत्।
५९. संस्कृतमध्ये उत्तर सांगा. गीतोपदेशात् अर्जुनस्य मोहः नष्टः जातः वा।
६०.संस्कृतमध्ये उत्तर सांगा. कौरवानाम् सेनाधिपतिः कः अस्ति?
६१. संस्कृतमध्ये उत्तर सांगा. (१२) कीदृशाः भक्ताः अतीव प्रियाः इति भगवान् उक्तवान्
६२. संस्कृतमध्ये उत्तर सांगा. किमस्ति नामं अष्टमाध्यास्य
६३. पुढील तीन श्लोक पूर्ण करा.() मामुपेत्य पुनर्जन्म …......
६४. पुढील ३ श्लोक पूर्ण करा. (१२) सन्नियम्य़ेन्द्रियग्रामं........
६५. पुढील ३ श्लोक पूर्ण करा.() पाञ्चजन्यं ह्ऋषीकेशो …......
६६. पुढील ३ श्लोक पूर्ण करा.() यत्करोषि यदश्नासि......
गीतामंजूषामंथन ३

. पुढील श्लोक पूर्ण करा.(१५) इति गुह्यतमं.........
. पुढील श्लोक पू्र्ण करा.(१५) श्रोत्रं चक्षुः …........
. खालील श्लोक पूर्ण करा.(१५) न रूपमस्येह.........
. पुढील श्लोक पूर्ण करा.( १६) त्रिविध नरकस्येदं …....
. पुढील श्लोक पूर्ण करा.( १६) काममाश्रित्य........
. पुढील श्लोक पूर्ण करा.( १६) अभयं ….......
. पुढील श्लोक पूर्ण करा.() भोक्तारं यज्ञतपसा........
. पुढील श्लोक पूर्ण करा. () कामक्रोधवियुक्तानां …...
. पुढील श्लोक पूर्ण करा.() नादत्ते कस्यचित्पापं.............
१०. पुढील श्लोक पूर्ण करा.() अनन्तविजयं राजा ….....
११. पुढील ३ श्लोक पूर्ण करा.() पाञ्चजन्यं ह्ऋषीकेशो......
१२. पुढील श्लोक पूर्ण करा. () अहो बत महत्पापं.......
१३. पुढील श्लोक पूर्ण करा.(१५) अध श्र्चोर्ध्वं …........
१४. पुढील श्लोक पूर्ण करा.(१५) अहं वैश्वानरो ….......
१५. पुढील श्लोक पूर्ण करा. (१५) ममैवांशो जीवलोके.........
१६. एका वाक्यात उत्तरे सांगा. (१५) तीन लोक कोणते आहेत?
१७. पाच दैवी गुण सांगा.(१६)
१८. पाच आसुरी गुण सांगा.(१६)
१९. जो सगळी कर्म परमेश्वराला अर्पण करतो त्याला कशाची उपमा दिली आहे?()
२०. आपल्या शरीरातील नवद्वारे कोणती?()
२१. कृष्णाच्या धनुष्याचे नाव काय?()
२२. पांडवांपैकी कोणाला कौन्तेय म्हणत असत()
२३. कुन्तीपुत्र जसा कौन्तेय तसा माद्रीपुत्र कोण(१५)
२४. असंग शस्त्रेण कशाचे छेदन करायचे?(१५)
२५. अश्वत्थ वृक्षाची पान म्हणजे काय?(१५)
२६. खालील शब्दांचे अर्थ सांगा.(१५)
  • पावकः
  • रसना
  • श्रोत्रं
२७. खालील शब्दांचा अर्थ सांगा.(१६)
  • लब्धमिमं
  • सिध्दिमवाप्नोति
  • मा शुचः
२८. खालील शब्दांचा अर्थ सांगा.()
  • विजितात्मा
  • पण्डितः समदर्शिनः
  • यः पश्यति स पश्यति
२९. खालील शब्दांचा अर्थ सांगा.()
  • शस्त्रसम्पाते
  • सौमदत्तिः
  • परिदह्यते
३०. खालील शब्दांचे अर्थ सांगा.(१५)
  • शशाङ्क
  • आदित्य
  • अनघ
३१. खालील शब्दांची विभक्ति सांगा.(१६)
  • आसुरम्
  • कार्याकार्यव्यवस्थितौ
  • संसारेषु
  • क्षयाय
  • यज्ञैः
३२. खालील शब्दांची विभक्ति सांगा.()
  • उभौ
  • अम्भसा
  • योगयुक्तो
  • ब्रह्मणि
  • अन्तकाले
३३. खालील शब्दांची विभक्ति सांगा.()
  • शस्त्रसम्पाते
  • विपरितानि
  • श्वशुरान्
  • रणसमुद्यमे
  • रथोत्तमम्
३४. खालील शब्दांची विभक्ति सांगा.(१५)
  • शाखाः
  • जीवलोके
  • माम्
  • शस्त्रेण
  • पार्थ
३५. खालील शब्दांची विभक्ति सांगा.(१५)
  • यस्य
  • सूर्यः
  • प्राणिनां
  • भारत
  • पुरुषौ
३६. संस्कृतमध्ये उत्तर सांगा.(१५) पाठशालायाम् गच्छसि वा …......आम् , गच्छामि...
३७. के माम् प्रद्विषन्तः ?(१६)
३८. मनुष्यः सदा एव कर्मं करोति - यथा पश्यति किम् अन्यं कर्म करोति
३९. प्रथमाध्याये अर्जुनः गाण्डीवस्य वर्णनं कीदृशं अकरोत् ()
४०. किम् तव नाम (१५)
४१. सलग ३ श्लोक म्हणा.(१६) दैवी सम्पद्विमोक्षाय.........
४२. सलग ३ श्लोक म्हणा.() विद्याविनयसम्पन्ने.........
४३. सलग ३ श्लोक म्हणा.() पाञ्चजन्यं ह्ऋषीकेशो …........
४४. पुढील ३ श्लोक पूर्ण करा.(१५) सर्वस्य चाहं.......
४५. सलग ३ श्लोक पूर्ण म्हणा.( १५) द्वाविमौ पुरुषौ...........
४६. अध्यायाचे नाव (१५)
४७. कितवा अध्याय आहे हे संस्कृतमध्ये सांग.(१५)
४८. ऊर्ध्वमूलं अधःशाखं असं कोणत्या वृक्षाला म्हटले आहे?
४९. खालील शब्दांची संधि सोडवा.(१६)
  • शौचमद्रोहो
  • विदुरासुराः
  • एतावदिति
५०. खालील शब्दांचे संधी सांगा.()
  • यच्छ्रेय
  • तन्मे
  • नचिरेणाधिगच्छति
५१. खालील शब्दांची संधि सोडवा.()
  • श्वेतैर्हयैर्युक्ते
  • पापादस्मान्निवर्तितुम्
  • प्रपश्यद्भिर्जनार्दन
५२. वैश्वानर म्हणजे कोणता अग्नी?(१५)
५३. या सृष्टीत कोणते दोन प्रकारचे पुरुष आहेत?(१५)
५४. भारत म्हणजे कोण?(१५)
५५. खालील शब्दांचा काळ ओळखा.(१६)
  • विमोहिताः
  • यक्ष्ये
  • प्रोक्त
५६. खालील शब्दांचे काळ ओळखा.()
  • काङक्षति
  • मन्येत
  • ऋच्छति
५७. खालील शब्दांचे काळ ओळखा.()
  • ब्रवीमि
  • व्यदारयत्
  • करिष्ये

  • गीतामंजूषामंथन -
. खालील शब्दांचे चन काय?(१२ मोठा)
  • योगवित्तमाः
  • असमर्थोसि
  • मानापमानयोः
. खालील श्लोक पूर्ण करा (१२ छोटा)
  • एवं सतत युक्ता ये.........
  • क्लेशोऽधिकतरस्तेषाम्........
.खालील श्लोक पूर्ण करा (१७ छोटा)
  • विधीहीनमसृष्टान्नं
  • यद्भावे साधुभावे च
.खालील श्लोक पूर्ण करा. (१७ मोठा)
  • श्रद्धया परया तप्तं ….....
  • सत्कारमानपूजार्थं
. खालील श्लोक पूर्ण करा. (१२ मोठा)
  • यो तु सर्वाणि कर्माणि....
  • संतुष्टः सततं योगी....
. (१२ छोटा)
  • अर्जुनाचे अजून एक नाव सांगा.
  • अर्जुनाच्या भावांपैकी दोन नावे सांगा.
  • महाभारताची लढाई कुठे झाली.
. (१७ छोटा)
  • अर्जुनाला धनुर्विद्या कोणी शिकवली?
  • अर्जुनाच्या काकाचे नाव काय?
  • तेराव्या अध्यायांचे नाव काय?
. (१७ मोठा)
  • अर्जुनाच्या काकूचे नाव काय?
  • कुरुक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
  • कृष्णाचे विराट रुप पाहिले अशी २ नावे सांगा.
. (१२ मोठा)
  • पांडवांना द्युतात कुणी हरवले
  • कृष्णाची अजून ४ नावे सांगा.
  • अभिमन्यूच्या आईचे नाव सांगा.
१०. खालील शब्दांचे अर्थ सांगा.(१२ छोटा)
  • उवाच
  • ध्रुवम्
  • श्रद्धया
११.खालील शब्दांचे अर्थ सांगा.(१७ छोटा)
  • श्रुणु
  • सप्तदश
  • प्रियहितं
१२. खालील शब्दांचे अर्थ सांगा.(१७ मोठा)
  • अशास्त्रविहितं
  • मनःप्रसादः
  • पुरुषव्याघ्र
१३. खालील शब्दांचे अर्थ सांगा.(१२ मोठा)
  • मृत्युसंसारसागरात्
  • अद्वेष्टः
  • ह्रष्यति
१४. (१२ छोटा) अर्जुनाने पहिल्या श्लोकात श्रीकृष्णाला काय विचारले आहे?
१५. (१७ छोटा) अर्जुनाने पहिल्या श्लोकात श्रीकृष्णाला काय विचारले आहे?
१६. खालील शब्दांची विभक्ति काय?( १७ मोठा)
  • अपात्रैभ्यः
  • दम्भेन
  • अदेशकाले
१७. खालील शब्दांची विभक्ति सांगा(१२ मोठा)
  • श्रद्धया
  • मयि
  • अभ्यासात्
१८. (१२ छोटा)
  • या अध्यायात किती श्लोक आहेत ?
  • या अध्यायात अर्जुनाने किती आणि श्रीकृष्णाने किती श्लोक म्हटले आहेत?
१९. (१७ छोटा)
  • या अध्यायात किती श्लोक आहेत ?
  • या अध्यायात अर्जुनाने किती आणि श्रीकृष्णाने किती श्लोक म्हटले आहेत?
२०. खालील शब्दांचा काळ काय? (१७ मोठा)
  • भविष्यति
  • दीयते
२१. खालील शब्दांचा काळ काय?(१२ मोठा)
  • विशिष्यते
  • प्राप्नुवन्ति
२२. खालील ३ श्लोक पूर्ण करा ( १२ छोटा) श्रेयो हि ज्ञानमभ्यासात्........
२३. खालील ३ श्लोक पूर्ण करा.(१७ छोटा) आहारस्त्वपि सर्वस्य............
२४. खालील ३ श्लोक पूर्ण करा. ( १७ मोठा) देवद्विजगुरुप्राज्ञं........
२५. खालील ३ श्लोक पूर्ण करा. ( १२ मोठा) अनपेक्षः शुचिर्दक्ष …..........
२६. खालील शब्दांचा संधि करा (१२ छोटा)
  • ज्ञानं अभ्यासात्
  • अमृतं इदं
२७. खालील शब्दांचा संधि करा.(१७ छोटा)
  • दम्भ अर्थ
  • भेदं इमं
२८. खालील शब्दांची संधी करा( १७ मोठा)
  • मौनम् आत्मविनिग्रहः
  • यत् दानम्
२९. खालील शब्दांचा संधि करा. (१२ मोठा)
  • तु अक्षरं
  • हर्ष अमर्ष
३०. (१२ छोटा)
११व्या , १२व्या आणि १३व्या अध्यायांचे नाव सांगा.
३१. (१७ छोटा)
१६ ,१७ आणि १८ व्या अध्यायांची नावे सांगा.
३२. खालील शब्दांचे वचन काय? (१७ मोठा)

  • लिप्यते
  • मनीषिणः
  • संन्यासं