बुधवार, 4 अगस्त 2021

श्रीगीतामंजूषामंथन उपक्रम व 1 ते 10 मंथनांचा वृत्तांत

 

श्रीगीतामंजूषामंथन

उपक्रम व 1 ते 10 मंथनांचा वृत्तांत

श्रीगीतामंजूषामंथन – भारतीय संस्कृतिचे सारभूत असा भगवद्गीता ग्रंथ असून देशात सर्वत्र घराघरातून गीतेच्या नित्यपाठाची परंपरा होती. ती खंडित झाल्यासारखे दिसत असले तरी गीतेचे महत्व पुनर्स्थापित होतांनाही आपल्याला दिसून येते. समाजजीवनाला योग्य वळण देणारा तसेच मॅनेजमेंटचा उद्बोधक ग्रंथ असे गीतेचे नवे रूप आधुनिक विद्वद्गण मान्य करतात. एवंच गीतेच्या नित्यपाठाची परंपरा पुनर्स्थापित होण्याने महत् राष्ट्रकार्य घडणार आहे.

श्रीगीतामंजूषामंथन –प्रतिभागिता या माध्यमातून नवीन पिढीवर योग्य संस्कार घडावेत, जनसामान्याला गीतेचा एक तरी अध्याय पाठ व्हावा गीतेबद्दल सामान्य ज्ञान तसेच संस्कृतचे थोडे ज्ञान वाढावे हे उद्दिष्ट समोर ठेवून श्रीगीतामंजूषामंथनाचे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे समाजात गीतेच्या आचरणाचे संस्कार वाढतील अशी अपेक्षा आहे.

आरंभ व सहयोग....

कौशलम् न्यासाच्या वतीने श्रीगीतामंजूषामंथनाचा प्रस्ताव आखण्यात आला होता. भाडारकर संस्था, भारत विकास परिषद व संस्कृत भारती यांनी या प्रस्तावाचे अभिनव रूप ओळखून या आयोजनात सहभागी होण्याची संमति दिली. या अनुषंगाने विविध आरंभिक बैठका व प्रयत्नांनंतर श्रीगीतामंजूषामंथनाच्या पहिल्या पुष्पाचे आयोजन दि. 5 जून 2018 रोजी करण्यात आले.

गीतामंथन या प्रकारे असते....

या मंथनात कोणत्याही एका अध्यायातील श्लोकांचे पाठांतर, काही शब्दार्थ, थोडे व्याकरण, आणि गीतेच्या अनुषंगाने अवांतर प्रश्नोत्तरे असे स्वरूप आहे. जे नवीन प्रतिभागी होण्यास इच्छुक असतील त्यांनी आपला चार जणांचा एक गट तयार करावा. तसेच गीतेतील एक अध्याय निवडून त्याचा अभ्यास करावा. गटाचे नाव व निवडलेला अध्याय आम्हाला कळवावा. आयोजनाच्या वेळांत एका दिवशी पाच गट सहभागी होऊ शकतात तर उर्वरित गटांना पुढच्या पुष्पात संधी मिळते.

संपर्कासाठी मो. नं– १.सौ. सुनिता फडके ८८८८२३४४४४ २. श्री. निलेश घोडके ९८२२६५९२०९ ३. सौ. अनुजा चोपडे ९८५०६४२३५३ ४. श्री. राघवेंद्र देशपांडे ९८५०७७०१४५ ५. कु. अमित मोकर ८३९०३२४८५९ 6. सौ उषा पाठक 9860015853 (नाशिकसाठी)

श्रीगीतामंजूषामंनाच्या गेल्या वर्षभरात झालेल्या दहा पुष्षांना भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. लोकांनी यामध्ये प्रतिभागी, प्रेक्षक व बालप्रतिभागी म्हणून चांगल्या प्रमाणात सहभाग दर्शविला. या मंथनांसाठी तज्ज्ञ या नात्याने उपस्थित राहिलेल्या मान्यवरांनी देखील या आयोजनाबाबत समाधान दर्शविले. अशी शंभर पुष्पे आयोजित करण्याच्या संकल्प भांडारकर संस्थेने बोलून दाखविला व सर्वानी त्यास अनुकूल मत दर्शविले.

हस्तलिखिते

श्रीगीतामंजूषामंन उपक्रमासोबत हस्तलिखिते लिहून देण्याचा देखील उपक्रम घेण्यात येतो. गीतेतील एका किंवा अनेक अध्यायाचे हस्तलिखित करून ते मंथनाच्या वेळी दिली जातात व त्या हस्तलिखितांचा संग्रह भांडारकर संस्थेत करण्यात येतो. आतापर्यंत 20 हस्तलिखितांचा संग्रह करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांना हस्तलिखिते द्यायची आहेत त्यांनी ती लिहून आम्हाला श्रीगीतामंजूषामंनाच्या कार्यक्रमावेळी द्यावी.

यू-ट्यूब

श्रीगीतामंजूषामंनाच्या प्रत्येक पुष्पाचे विडिओ शूटिंग केले जात असते आपल्याला मागील कार्यक्रम पहायचे असल्यास खालील लिंक वर पाहू शकता.

https://www.youtube.com/playlist?list=PL507RMth7dlutPmd8g4j_FwjOZe3sJBcv

पुढील योजनेसाठी आवाहन....

या पुढे हे मंथन असेच चालू राहणार आहे, आपण सर्व यामध्ये सहभागी होऊ शकता. आपण आधीचे प्रतिभागी असाल तर पुढील पुष्पात नवीन अध्याय घेऊन आपण त्यात सहभागी होऊ शकता. आपण यामध्ये प्रतिभागी, प्रेक्षक, व बालप्रतिभागी म्हणून उपस्थित रहावे व आयोजकांचा आणि सहभागींचा उत्साह वाढवावा.

एकूणात....

श्रीगीतामंजूषामंनच्या झालेल्या दहा पुष्पामध्ये एकूण ४२ गट सहभागी झाले होते. या गटांपैकी पाट गट शालेय मुलांचे होते. सरासरीने प्रत्येक पुष्पाला ४०-५० प्रेक्षकांची उपस्थिति लाभून आतापर्यंत सुमारे साडेतीनशे प्रेक्षकांनी उपस्थिती राखली आहे. मंथनात साधारणतः एका गटाला २० ते ३० प्रश्न विचारले जातात. तसेच प्रेक्षकांना देखील प्रश्न विचारण्यात येऊन ज्यांनी अचूक उत्तरे दिल्यास त्यांना लगेचच बक्षिस दिले जाते. उपस्थित मान्यवर व प्रेक्षक देखील प्रतिभागी गटांना प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते व ही खेळीमेळी रंजक ठरते.

मंथनाची सुरवात शंखनादाने केली जाते यासाठी श्री मधुकर शिधये हे प्रत्येक वेळेस आपल्या सहकाऱ्यांसोबत उपस्थित राहत असून त्यांच्या शंखनादाने मंथनाची सुरवात होते. तसेच काही बालसहभागी गटात सहभागी होऊ शकत नाहीत परंतू त्यांना एखाद्या अध्यायातील काही श्लोकपाठाचे सर्वांसमोर आवर्तन करण्याची संधी हवी असते व ती दिली जाते जेणेकरून त्यांना या मंथनातून एक अनुभव व प्रेरणा मिळेल. याप्रमाणे बालप्रेक्षक गीतेतील अध्याय किवा प्रार्थना म्हणतात व प्रश्नोत्तरास सुरवात होते.

आत्तापर्यंत झालेल्या पुष्पामधील सर्व ४२ गटांची नावे व सहभागींची सूची सोबत जोडलेली आहे. तसेच यामध्ये खालील प्रमाणे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष लाभले.

अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून यांनी काम पाहिले…

श्रीमती शैलजा कात्रे , श्री वसंतराव गाडगीळ, श्री दत्ताजी चितळे , श्री अनंत धर्माधिकारी, श्री उमाकांत थिटे, श्री रविंद्र मुळ्ये, श्री संजय चांदेकर, श्री शिरीष भेडसगावकर, श्री प्रणव गोखले, श्रीमती प्रेरणा देशभ्रतार, श्री अशोक कामत, श्रीमती मंगला मिरासदार, श्री श्रीपाद भट, श्रीमती माधवी गोडबोले, सौ. भाग्यश्री भागवत, श्री स्वामी श्रीकांतानन्दजी, श्री प,. जोशी, श्री भुपाल पटवर्धन.

परीक्षक म्हणून यांनी काम पाहिले…

श्री रविंद्र मुळ्ये, श्रीमती वीणा लोंढे, श्री लक्ष्मण मोहरीर, श्री प्रसाद पाठक, श्री श्रीनंद बापट, सौ योगिता जोग, सौ वर्षा गानू, श्रीमती मुक्ता गरसोळे, श्री राघवेंद्र देशपांडे, डॉ मुग्धा गाडगीळ, श्रीमती निधी वडेर, सौ मुक्ता मराठे, सौ. धनश्री शेजवलकर, सौ.उज्वला देशपांडे, श्री रोहन कुलकर्णी.

प्रश्नकर्ते म्हणून लाभले

सौ सुनिता फडके, सौ आरती गोखले, सौ सायली काळे, सौ शितल कावूर व श्री केशव नांदेडकर.

शिवाय एकूण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मंदार जोग, सौ अमृता नातू, सौ सुनिता फडके व श्री राघवेंद्र देशपांडे यांनी केले.

श्रीगीतामंजूषामंथनाच्या कार्यक्रमाला कौशलम् न्यास, भांडारकर संस्था, भारत विकास परिषद व संस्कृत भारती यांचे मुख्य प्रतिनिधीची उपस्थिती कायम असते व यांच्यामार्फत सर्वांचे स्वागत केले जाते.

या झालेल्या पुष्पामध्ये खालील बालप्रेक्षकांनी अध्याय व प्रार्थना म्हंटल्या.

कु शरण्या घुबे, कु उन्मनी भोसले, कु उर्वी मेढेकर, कु अध्वय मराठे, कु आयुष राजाध्यक्ष, कु सौम्या फडके, कु संहिता फडके, कु अनुष्का लक्कड, कु अदित्य भालेराव, कु देवेश गोखले, कु शुक्तिका मल्ल्या, कु ओंकार श्रीरसागर, कु चित्रलेखा गायकवाड, कु राजेश्वरी गायकवाड,

सहाय्य....

श्रीगीतामंजूषामंथन कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन कौशलम् न्यासातर्फे केले जाते. भांडारकर संस्था आयोजनास कायम पाठबळ देत असून शिवाय संस्थेच्या वतीने हॉल, विडिओ रेकॉर्डींग, चहापान, वृत्तपत्रात प्रसिद्धि इत्यादी सहाय्य होत आहे. तसेच किमया ग्रुप कडून 20000 रूपये श्रीगीतमंजूषामंथनाच्या चार आयोजनासाठी मिळाले होते व पुढील आयोजनाची सर्व आर्थिक जबाबदारी कौशलम् न्यासाने स्वीकारली आहे.

भारत विकास परिषद व संस्कृत भारती च्या वतीने मंथनासाठी गटबांधणी व प्रतिभागी संपर्क करण्यात येतो.

विशेष सहाय्य....

आतापर्यंतच्या आयोजनांना भांडारकरचे कर्मचारी श्री राजू गायकवाड व सौ अश्विनी यांचे खूप चांगल्या प्रकारे व सर्वच कामामध्ये सहाय्य श्रीगीतामंजूषामंथनास मिळाले आहे. तसेच भांडारकरच्या वतिने श्री प्रसाद व कु सागर यांनी विडीओ शुटिंग साठी सहाय्य केले. मंथनाच्या प्रसिद्धिसाठी व तसेच त्याची बातमी वृत्तपत्रात देण्यासाठी एकविरा पब्लिकेशन यांचे सहाय्य लाभले व त्यांनी पुढेही मदत करत राहू असे सांगितले. तसेच प्रेक्षकांपैकी कित्येकांनी आयत्यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन लहानमोठे आर्थिक व इतर सहाय्य केले आहे. त्यामध्ये श्री अनिल पारगावकर, श्री केशव नांदेडकर, श्री सुधीर फडके, सौ मीरा मेढेकर, श्री बर्वे व सौ अनुरेखा देशमुख अशा व्यक्तिचे सहाय्य मंथनला लाभले आहे. या सर्वांची या आयोजनात खूप मदत मिळते पुढेही मिळत राहील.

  • श्रीगीतामंजुषामंथन पुष्प ११ दि. ३१ जानेवारी,२०२० रोजी भांडारकर संस्थेच्या टाटा सभागृहात गुंफण्यात आले होते. तसेच श्रीगीतामंजुषामंथन पुष्प १२ हे दि १५ ऑगस्ट, २०२० रोजी प्रथमता ऑनलाईन पद्धतिने गुंफण्यात आले. त्याप्रमाणे श्रीगीतामंजुषामंथन पुष्प १३ हे देखील ऑनलाईन पद्धतीने दि १९ डिसेंबर,२०२० रोजी घेण्यात येणार आहे.

कोरोनाच्या प्रादुभावामुळे हे पुष्प ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत पुढे जो पर्यंत याचा प्रादुभाव कमी होत नाही तो पर्यत पुढील पुष्प देखील ऑनलाईन पद्धतीने घ्येण्यात येतील.

धन्यवाद.



कोई टिप्पणी नहीं: