सोमवार, 22 जुलाई 2019

कठोपनिषद --अभंगवृत्तात अभ्यंकर


 <श्रीदैवज्ञपण्डित सूर्यकवि विरचितं विलोमाक्षररामकृष्णकाव्यं> मधे खालीलप्रमाणे मिळालं.

तं भूसुतामुक्तिमुदारहासं वन्दे यतो भव्यभवं दयाश्रीः । श्रीयादवं भव्यभतोयदेवं संहारदामुक्तिमुतासुभूतम् ॥ १॥

अर्थ पुढीलप्रमाणे मिळाला 
<पहली पंक्ति का अन्वयसहित अर्थ —
तं — उन ( प्रभु राम को )
वन्दे — मैं वन्दना करता हूँ
जो
भू-सुता-मुक्तिं — धरतीपुत्री सीता को छुड़ाने वाले हैं
उदार-हासं — जिनकी हँसी उदार है
( रावण अट्टहास करता था, उसकी हँसी कठोर थी )
यतो भव्यभवं — जिनसे सुन्दर लीलाएँ हुईं
या यह भी अर्थ कर सकते हैं
जिनका अवतार भव्य है
दया-श्री: — लोगों पर दया करना ही जिनका धन है
और अब दूसरी पंक्ति का भी अन्वयसहित अर्थ देखिए । यहाँ
[ वन्दे ] शब्द पहली लाइन से समझना पड़ेगा — मैं वन्दना करता हूँ ।
————————
श्रीयादवं — यदुकुल में उत्पन्न ( प्रभु श्रीकृष्ण ) को
भव्यभ-तोयदेवं — जो भ ( सूर्य ) और तोयदेव ( तोय अर्थात् पानी यानी समुद्र से उत्पन्न देवता यानी चन्द्रमा ) की तरह भव्य हैं 
संहार-दा-मुक्तिम् — संहार करने वाली ( पूतना राक्षसी ) को मुक्त करने वाले हैं
उत — और
असु-भूतम् — [ संसार के ] असु ( प्राण/आत्मा ) हैं ।>

कठोपनिषद

वेदांमध्ये एक / कृष्ण यजुर्वेद / कठोपनिषद / वेदांती ह्या -१-
चला अभ्यासूया / कठोपनिषद / त्याचा शांतिमंत्र / प्रसिद्धचि -२-
आपणा दोघांचे / होऊं दे रक्षण / होऊं दे पोषण / दोघांचेही -३- 
दोघेही मिळून / करूं कार्य थोर / तेजस्वी करूं या / विद्यार्जन -४- 
आपणां दोघांत / वितुष्ट न येवो / सर्वदा असूं दे / मनःशांति -५- 
त्रितापांची शांति / असावी म्हणून / शान्तिः शान्तिः शान्तिः / प्रार्थू सदा -६- 
कठोपनिषदी / दोन्ही अध्यायात / तीन तीन वल्ली / आहेत ना -७- 
वाजश्रवसांनी / सर्वस्वाचा त्याग / करण्यास यज्ञ / मांडलेला -८-  
बालिश वयाचा / नचिकेता नांव / त्यांचा पुत्र पाही / कुतूहलें -९- 
नेल्या जात होत्या / त्यांच्या गायी साऱ्या / त्राण नव्हताच / एकीतही -१०- 
नचिकेता करी / मनांत विचार / ऐशा गायी देणें / योग्य काय -११- 
आणिक विचार / त्याचे मनीं आला / वाजश्रवसांच्या / सर्वस्वाचा -१२- 
मीही एक अंश / असल्याने पिता / माझेही दान कां / करतील -१३- 
बालिश मुलाने / मनांत आलेला / प्रश्न विचारला / वडिलांना -१४- 
माझेही दान कां / आपण कराल / कोणास कराल / माझे दान -१५- 
वडिलांचे नाही / उत्तर म्हणून / पुनःपुन्हा प्रश्न / विचारला -१६- 
यज्ञविधीमध्ये / वांकडा हा प्रश्न / म्हणून प्रथम / दुर्लक्षिला -१७- 
मुलाने लकडा / लावल्याने मात्र / कांही चिडूनच / उत्तरले -१८- 
तुजला देईन / मृत्यूलाच पहा / त्याने नचिकेता / गोंधळला -१९- 
माझे असते ना / बहुतेक काम / प्रथम प्रतीचे / मध्यम वा -२०- 
ऐशा हुशारशा / मुलास घेऊन / यम तो करील / काय बरें -२१- 
संचितानुसार / जन्मतो कीं जीव / प्रारब्धानुसार / पुनःपुन्हा -२२- 
वडील देतील / मजला यमास / माझेच प्रारब्ध / तेंही खरें -२३-
गवताची पात / कितीही छाटली / तृण उगवते / पुनःपुन्हा -२४- 
मनोमनी ऐसा / विचार कांहीसा / करीत निश्चय / करूनिया -२५- 
वडिलांनी दान / करण्याचे आधी / स्वतःच पोचला / यमद्वारी -२६- 
ब्राह्मण अतिथी / द्वारापाशी येतां / त्याचेशी वर्तन / नियमित -२७-
यजमानाने कीं / स्वागत करावे / वैश्वानररूप / मानूनियां -२७- 
वैवस्वता घेई / उदक आणिक / शांतीचा देई गा / आशीर्वाद -२८- 
ऐसा उपचार / करण्यास कोणी / नव्हते किं काय / यमगृही -२९- 
अतिथीचा योग्य / सत्कार न होतां / सर्वनाशभय / यजमानां -३०- 
नचिकेता तरी / होता यमद्वारी / उपाशी तापाशी / तीन रात्री -३१- 
यमराज आले / कोठूनसे जेव्हां / त्यांनाही वाटली / उपरती -३२- 
अपराधाच्या कां / पारिपत्यासाठी / नचिकेतालागी / म्हणालेही -३३- 
मागूनियां घेई / तीन वर बाळा / मनास येईल / तुझ्या जें जें -३४- 
नचिकेता तेव्हां / पहिल्या वराने / मागता जाहला / काय पहा -३५-
गौतम कुळीच्या / माझ्या वडिलांचा / यज्ञाचा संकल्प / सिद्ध होवो -३६- 
माझ्याविषयीचा / राग घालवूनी / त्यांना स्वस्थचित्त / करी देवा -३७- 
उद्दालकपुत्र / वडील आरुणी / यमद्वाराहूनी / परतल्या -३८- 
तुझे करतील / पूर्वीप्रमाणेच / प्रेमाने स्वागत / दिला वर -३९- 
दुसरा वर मी / मागण्याचे पूर्वी / जाणू मी इच्छितो / खरेंच कां -४०- 
ऐकले आहे ना / स्वर्गात नसतें / भय वृद्धत्वाचे / मृत्यूचेही -४१- 
नसतात तिथे / भूक वा तहान / दुःख किंवा शोक / नसतात -४२- 
ज्या कोण्या अग्नीने / भस्मसात होती / ऋणको प्रवृत्ती / साऱ्या साऱ्या -४३- 
अमरत्वयुक्त / निर्मळ आनंद / देणारी चेतना / देई मज -४४- 
यमाने म्हटले / अजाण बालक / दिसतोस जरी / सुजाण तूं -४५- 
अग्नीच चेतना / चेतना अग्नीच / कार्यरत झाली / विश्वारंभी -४६- 
तैशा त्या अग्नीला / तुझ्याच नांवाने / ओळखतील ना / इतःपर -४७- 
तैसी ती चेतना / देतो मी तुजला / आणीकही घेई / सांखळी ही -४८- 
वर्णच्छटा हिच्या / लोभस कितीक / मागितल्यावीण / देतो तुज -४९- 
सांगावे वाटतें / योग्यांना मिळते / निर्मल अवस्था / कैसी पहा -५०- 
त्रिवार करावें / अग्नीचे पूजन / तीन प्रकारची / कर्में हवी -५१- 
त्रिपुटी असती / जगतीं सर्वत्र / अतीत राहणें / तेंच खरें -५२- 
अतीत राहणें / ज्यास साध्य झाले / जन्ममृत्यूतूनी / मुक्ती त्यास -५३- 
प्रथमाध्यायाच्या / प्रथमा वल्लीत  / विशेष दिसतो / तीन अंक -५४-
नचिकेता तरी / यमद्वारी होता / तिष्ठत राहीला / तीन रात्री -५५- 
म्हणून यमाने / वर दिले तीन / येथेही त्रिपुटी / सांगीतल्या -५६- 
दोन्ही अध्यायात / तीन तीन वल्ली / वल्ली म्हंजे काय / प्रश्न आला -५७- 
वल्ली म्हंजे वळी / पदर वा घडी / जीवनाचा डाव / तीन घडी -५८- 
प्रतिदिनी पहा / संधिकाल तीन / सत्त्व राज तम / त्रिगुण ते -५९-
गीतेच्या सतराव्या / अध्यायात पहा / त्रिगुणात्मकसे / विवेचन -६०- 
आहाराचे आणि / यज्ञ तप दान / ह्यांचेही ॐ तत् सत् / ह्यांचे सुद्धा -६१- 
पुढे अठराव्यात / त्यागाचे आणीक / कर्ता कर्म ज्ञान / बुद्धी धृति -६२- 
सुखाचेही केले / तैसे विवेचन / त्रिगुणात्मकचि / साऱ्या गोष्टी -६३- 
विश्वाचा रगाडा / असाच चालतो / जाणीव देऊनी / नचिकेता -६४- 
यमांनी म्हटलें / तिसराही वर / काय मागायचा / माग आता -६५- 
नचिकेता म्हणे / चिकित्सक वृत्ती / मरणोत्तरही / असते कां -६६- 
कांहींचे म्हणणें / असते ती वृत्ती / कांहींचे म्हणणे / नसतेच -६७- 
शंका-निरसन / इतुकें करावें / तिसऱ्या वराने / मागतो मी -६८- 
यमांनी म्हटलें / देवांनीही ऐसे / ज्ञान मिळवाया / यत्न केला -६९- 
त्यांना सुद्धा नाही / उकलले गूढ / भरीस मजला / नको पाडूं -७०- 
दुसरा कोणता / माग ना तूं वर / तुझ्या ह्या वयास / शोभेलसा -७१- 
नचिकेता म्हणे / देवांनाही जर / ह्यात रस होता / नक्कीच हें -७२- 
मिळवण्याजोगे / असले पाहिजे / गुरु तुजवीण / अन्य कोण -७३- 
तिसऱ्या वराने / हेंच ज्ञान मज / मिळावें निश्चय / ठरतो ना -७४- 
असा आग्रह कां / धरतोसी बाळा / शतायुषी होणे / माग ना तें -७५- 
पुत्र पौत्र आणि / गायी हत्ती घोडे / सत्ता असीमित / धन धान्य -७६- 
वैभव अपार / माग इच्छापूर्ती / अलभ्याचा लाभ / तोही माग -७७- 
दुर्गम्य ज्ञानाचा / कशास आग्रह / माझीही परीक्षा / घेतोस ना -७८- 
नचिकेता म्हणे / होणार इंद्रिये / जीर्ण स्वभावतः / ठरलेले -७९- 
जीर्ण इंद्रियांनी / दीर्घायु जगणे / तेंही निरर्थक / नव्हे काय -८०- 
गायी हत्ती घोडे / साऱ्याचे आयुष्य / सदा असणार / मर्यादित -८१- 
अमाप लाभले / धन धान्य जरी / मिरवतात कां / अंगावर -८२- 
इच्छापूर्ती वर / जरी तूं देशील / संपतात काय / इच्छा कधी -८३- 
गुंततच जातो / गुंतून राहतो / व्यवधान सारे / हरपते -८४- 
मी जो मागीतला / तोच वर देई / कृपा असो द्यावी / मजवरी -८५-
इथवर करूं / प्रथमाध्यायाच्या / पहिल्या वल्लीचे / समापन -८६- 
**********************
प्रथमाध्यायाच्या / दुसऱ्या वल्लीचा / करूंया अभ्यास / आतां चला -८७-
लोकांना ज्या गोष्टी / भावतात त्यांत / कांही श्रेयस्कर / प्रियकर -८८-
श्रेयस्कर घ्याव्या / त्यांनी भलें होतें / हानिकारकचि / प्रियकर -८९-
 वेळोवेळी पहा / श्रेयस्कर आणि / प्रियकर ऐसे / पर्याय कीं -९०- 
दिसती समोर / पैकी श्रेयस्कर / निवडती धीर / व्यक्ती पहा -९१- 
मंद लोक तरी / निवडती प्रिय / योगक्षेमासाठी / योग्य नव्हे -९२- 
दिदुलेजा* ऐशा / हिंदी फिल्ममधे / शाहरूखखानही / सांगतो ना -९३- 
(* दिदुलेजा = दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे)
म्हणे त्याची आई / त्याला सांगतसे / दोनसे पर्याय / असतात -९४- 
पर्याय कठीण / जरी वाटणारा / त्यानेच होईल / भलें पहा -९५-
यमांनी म्हटलें / नचिकेता तुवां / प्रियकर गोष्टी / नाकारल्या -९६- 
चमचमणाऱ्या / मण्यांची सांखळी / तीही तुवां ठाम / नाकारली -९७- 
सामान्यतः लोक / भुलतात खास / पाहूनी मोहक / गोष्टी पहा -९८- 
लाकूडतोड्याच्या / गोष्टीत नाही का / मोहक कुऱ्हाडी / देवी देते -९९- 
मात्र सत्यवादी / लाकूडतोड्या तो / नाही ना भुलत / अजिबात -१००- 
मानवी मनाची / खात्री नसते ना / विवेकीं विद्येच्या / अविद्येच्या -१०१- 
विद्याभिलाषीच / वृत्ती असल्याने / मोहांनी नाही तूं / भुललास -१०२- 
स्वतःस पंडित / म्हणवणारेही / असती गर्तेत / अविद्येच्या -१०३- 
दिशाभूल त्यांची / होतच असते / अंधाच्या साथीस / अंध जणूं -१०४-
इहलोकापेक्षा / कोणताही लोक / बालबुद्धीच्यास / भावेचिना -१०५- 
ते तर म्हणती / इहलोकापेक्षा / नसतोच लोक / कोणताही -१०६- 
ऐसे मूढ लोक / अज्ञानाकारणे / पुनःपुन्हा येती / इहलोकी -१०७- 
इहलोकी जे जे / जीव येती पहा / माझीया पाशात / अडकती -१०८- 
परलोकाविषी / क्वचितच कोणी / ऐकले असते / खरे तर -१०९- 
ऐकले तरीही / याचे ठीक ज्ञान / क्वचितच कोणा / असते ना -११०- 
माहितीनंतर / इतरां सांगेल / कौशल्याने काय / आश्चर्य तें -१११- 
ज्ञानलाभ होतां / कौशल्ये करील / आचरण तेंही / आश्चर्यचि -११२- 
गीतेतही आहे  / श्लोक एक ऐसा / आश्चर्यवत् पश्यति / कश्चिदेनम् -११३-
परलोकज्ञान / अध्यात्मज्ञान तें / अयोग्य व्यक्तीस / गमेल ना -११४- 
बहुत अभ्यास / केल्यानंतरचि / समजूं येईल / आत्मा काय -११५- 
अनन्यभावाने / चिंतन करीता / आत्म्याची सत्यता / ठसेल ना -११६- 
तरी अणूपेक्षा / सूक्ष्म असल्याने / अणूनेही कैसे / मोजणार -११७- 
पहा तुका म्हणे  / तिळाइतुकेच / बिंदुले दाटते / त्रिभुवन -११८- 
तिळाइतुक्या त्या / बिन्दूल्याच्या घरी / हरिहर दोघे / खेळतात -११९- 
आत्मज्ञान तरी / दुसऱ्या कोणाच्या / सांगण्याने किंवा / तर्कानेही -१२०- 
समजत नाही / मात्र नचिकेता / आहेस आगळा / प्रश्नकर्ता -१२१- 
धीरवृत्तीचा नि / सत्याचा शोधक / प्रेमच वाटतें / तुजविषी -१२२- 
जाणीव असावी / नित्य गोष्ट किंवा / कायमचा ठेवा / मिळवण्या -१२३- 
अनित्यशा गोष्टी / नाहीच कामाच्या / म्हणून हा अग्नि / नाचिकेत -१२४- 
चेतवूनी त्याने /अनित्य गोष्टींचे / भस्म करूनीया / नित्य झालो -१२५- 
कामनांची पूर्ति / लोकांत प्रतिष्ठा / अनंत वैकल्ये / निर्भयता -१२६- 
सर्वत्र स्तुतीच / पाहूनियां सारे / नाही विचलित / होशील तूं -१२७- 
ध्यास तरी हवा / आत्मज्ञानाचाच / जरी तें गहन / कठीणही -१२८- 
हर्ष आणि शोक / दोन्ही त्यजूनिया / योग नि अध्यात्म / अभ्यासावे -१२९-  
मी जें सांगितलें / श्रुतीवचन तें / सारभूत मनीं / सांठवावें -१३०- 
विस्तृत विचार / स्वतःचा करावा / धर्म तो जाणावा / आचरावा -१३१- 
अधिक सांगावें / नाही ना लागत / समझदारको / इशाराच -१३२- 
यमदेवा जैशा / गुरुचे कडून / मिळवावे ज्ञान / सटीक ना -१३३- 
ऐसाच कांहीसा / विचार करून / नचिकेता पहा / प्रश्न करी -१३४- 
अधर्माचरण / तुज नावडते / धर्माने वागणे / आवडते -१३५- 
कोणी काय केले / जाणतोसी सर्व / टाळाटाळ सुद्धा / जाणतोसी -१३६- 
भूतकाळ सर्व / तूचि जाणतोस / तूचि जाणतोस / भविष्यही -१३७- 
पूर्ण ज्ञानासाठी / माहीत असावे / धर्म नि अधर्म / दोन्ही तरी -१३८- 
पूर्ण ज्ञानासाठी / माहीत असावे / करावे टाळावे / काय काय -१३९- 
वर्तमान ऐशा / गोष्टी क्षणोक्षणी / भूतकाळी लीन / होतात ना -१४०- 
भविष्यकालीन / गोष्टी वर्तमानीं / दाखल होतात / क्षणोक्षणी -१४१- 
काळ आणि कर्म / यांची जी सांगड / तुजला माहीत / सांग मज -१४२- 
सर्व वेद ज्यास / ध्येय मानतात / तापसी करती / तपें सुद्धा -१४३- 
ब्रह्मचारी ज्याचा / अभ्यास करती / तें पद सांगतो / ऐक तरी -१४४- 
पद तें ओंकार / अक्षर तें पद / तेंचि ब्रह्मपद / परम तें -१४५- 
ह्याचे ज्ञान होतां / ज्यास जें जें हवे / त्यास तें तें प्राप्त / होतें पहा -१४६- 
ह्याचाच आश्रय / श्रेष्ठ नि परम / ब्रह्मलोकी सुद्धा / मान ह्याचा -१४७- 
नाही ह्याने होते / हानी कसलीही / ह्याची सुद्धा हानी / होत नाही -१४८- 
देह नष्ट होतां / हेंही नष्ट होतें / ऐसे जे मानती / अज्ञानी ते -१४९- 
हें तो मात्र तत्त्व / पुराण शाश्वत / जन्मते ना कधी / मरतें ना -१५०- 
 मोठ्याहूनी मोठे / सूक्ष्मांहूनि सूक्ष्म / स्थिरबुद्धीनेच / ध्यानीं येतें -१५१- 
जवळीं असतां / दूरसें वाटतें / जागीच तरीही / सर्वत्र हें -१५२- 
सगुण निर्गुण / गुणाचे अगुण / गहन हें ज्ञान / सुलभ ना -१५३- 
देहात विदेही / अवस्थाविहिनी / राहे अवस्थित / आत्मतत्त्व -१५४- 
नाही हें कळत / प्रवचनाद्वारे / पुस्तके वाचून / स्वतर्काने -१५५- 
तत्त्व तें स्वतःच / निवड करीते / कोणास तें व्हावें / अवगत -१५६- 
दुराचार ज्याचा / नाही सुधारत / नाहीच कसलें / समाधान -१५७- 
अशा कोणासही / नाही उमगेल / प्रज्ञा स्थिर होतां / उमगेल -१५८-
ज्याच्या चित्राहुती / ब्राह्मण्य नि क्षात्र / मृत्यु तें उदक / सिंचनास -१५९- 
ऐसी ज्याची वृत्ती / जरी सिद्ध झाली / ऐशा कोणास कां / उमगेल -१६०- 
ऐशा सूचनेने / प्रथमाध्यायाच्या / दुसऱ्या वल्लीचे / समापन -१६१- 

=====================================


कोई टिप्पणी नहीं: