शनिवार, 11 अगस्त 2018

महाभारत आणि भोजन प्रबंध

कर्नाटकात उडुपी जिल्ह्यात असलेल्या श्रीकृष्ण मठात ही कथा नेहमी सांगितली जाते. असं समजलं जातं की या मठाची स्थापना उडुपीच्या सम्राटाद्वारा झाली आणि नंतर मग ‌श्री. माधवाचार्यांनी ती परंपरा पुढे वृद्धींगत केली. 
        
महाभारत हे पहिलं विश्वयुद्ध आणि त्यात पृथ्वीवरच्या सर्व राज्यांनी सहभाग घेतलेला होता...कोणी कौरवांकडून तर कोणी पांडवांकडून...

आपल्याला हे ठाऊक आहेच की केवळ श्रीबलराम आणि रुक्मी या दोघाच नरेशांनी यात भाग घेतला नव्हता. पण सध्या कर्नाटकात असलेल्या 'उडुपीराज्याच्या नरेशानंही या युद्धात भाग घेतला नव्हता. जेंव्हा उडुपी राजा आपल्या सैन्यासह कुरुक्षेत्रावर पोहोचले तेंव्हा कौरव आणि पांडव दोघांनीही त्यांना आपापल्या बाजूला सामिल करण्याचा प्रयत्न केला. 

पण अत्यंत दूरदर्शी उडुपीच्या राजानं श्रीकृष्णांना विचारलं "हे माधवाया दोन्हीही बाजू युद्धासाठी जेंव्हा सज्ज होतील तेंव्हा त्यांच्या या विशाल सेनांच्या भोजनाचा प्रबंध कसा होईलहे वासुदेवाया युद्धात भाग घेण्याची माझी इच्छा नाहीये. पण जर आपण अनुमती दिलीत तर माझ्या संपूर्ण सेनेच्या सहाय्यानं इथे उपस्थित असलेल्या या विशाल सेनांच्या भोजनाचा मी प्रबंध करु शकतो."

त्यावर श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न स्वरात म्हणाले, "सागरासारख्या या विशाल सेनांच्या भोजनाचा प्रबंध करणे जे केवळ तुम्ही आणि भीमसेनच करु शकतात...अन्य कोणीही नाही. पण भीम तर या युद्धातून अंग काढून घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हीच या विशाल सेनांच्या भोजनाचा प्रबंध करावा.

उडुपी नरेशाचा भोजन प्रबंध एवढा कुशल होता की युद्धाच्या प्रारंभापासून अखेरपर्यंत अन्नाचं एक शीतही वाया गेलं नाही. जसं-जसं युद्ध होत गेलं तसं-तसं योद्ध्यांची संख्या कमी कमी होत गेली. सगळ्यांनाच याचं अत्यंत आश्चर्य वाटत होतं की उडुपी नरेश केवळ उपस्थित सेनेपुरतंच अन्न कसं काय बनवून घेऊ शकतात. आज भोजनाला कितीजण उपस्थित असतील हे त्यांना कळतं तरी कसंआजच्या युद्धात किती योद्धे मृत्युमुखी पडणार आहेत हे त्यांना समजतं तरी कसं आणि त्यानुसार भोजनाचा प्रबंध कसा काय करता येतो?  

युद्ध समाप्तीनंतर राज्याभिषेकाच्या दिवशी युधिष्ठिरानं न रहावून त्याबद्दल उडुपी नरेशांना विचारलंच, "हे उडुपी महाराजया युद्धात विजय मिळवल्याबद्दल आमची सर्वत्र प्रशंसा होते आहे. पण आपणही तेवढ्याच प्रशंसेसाठी पात्र आहात. आपण एवढ्या विशाल सेनांच्या भोजनाचा प्रबंध केला परंतु अन्नाचा एक कणही यात व्यर्थ गेला नाही. आपल्या या कुशलतेचं रहस्य मला जाणून घ्यायचंय.

यावर हसतच उडुपी नरेशांनी उत्तर दिलं, "सम्राटया युद्धात आपल्याला मिळालेल्या विजयाचं श्रेय आपण कोणाला द्याल?" 

यावर युधिष्ठिर उत्तरले, "अर्थात्श्रीकृष्ण... त्यांच्या व्यतिरिक्त हे श्रेय अन्य कोणाला कसे द्यावे?ते नसते तर कौरव सेनेला हरवणं असंभवच होतं."

त्यावर उडुपी नरेश म्हणाले, "हे महाराजभोजन प्रबंध आपल्याला माझी कुशलता वाटते आहे,पण खरंतर हा श्रीकृष्णप्रतापच आहे.ते ऐकून सर्वच उपस्थितांना आश्चर्य वाटलं. 

उडुपी नरेशांनी रहस्य उलगडताना सांगितलं, "हे महाराजयुद्धकाळात दर रात्री श्रीकृष्ण भुईमुगाच्या शेंगा खात असत. त्यांच्या शिबिरात मी दररोज भुईमुगाच्या शेंगा मोजून ठेवायचो आणि त्यांनी किती शेंगा खाल्ल्या हेदेखिल मी पुन्हा मोजून ठेवायचो. भुईमुगाच्या जेवढ्या शेंगा ते खायचे त्याच्या १००० पट सैनिक दुस-या दिवशीच्या युद्धात मृत्युमुखी पडत. उदा. जर त्यांनी ५० शेंगा खाल्ल्या तर मला समजायचं की दुस-या दिवशीच्या युद्धात ५०००० योद्धा मारले जाणार आहेत. आणि मग त्यानुसारच मी भोजन कमी अधिक बनवत असे. आणि याच कारणामुळे कधीही भोजन व्यर्थ गेलं नाही.श्रीकृष्णाचा हा चमत्कार ऐकून सर्वजण नतमस्तक झाले.

शुक्रवार, 10 अगस्त 2018

भगवद्गीतेतील धर्माचे स्वरुप – भाग १ वेदान्तश्री साठी लेख


भगवद्गीतेतील धर्माचे स्वरुप – भाग १

भगवद्गीतेतील धर्माचे स्वरुप हा गहन गंभीर असा विषय आहे . विविध लोकांनी विविध अंगांनी गीतेचे अध्ययन केलेल आहे. आदि शंकराचार्यांपासून प्रारंभ करून वर्तमानापर्यंत आलं तर भारतीय संस्कृत ग्रंथांचा असा एकही अभ्यासक नसेल ज्याला भगवद्गीतेबद्दल थोडस तरी मत मांडावस वाटल नाही. त्यामुळे अक्षरक्षः अगणित विद्वानांनी भगवद्गीतेवर काहीना काहीतरी लिहिलेले आहे. त्यातले कित्येक ग्रंथ आपल्याला आजच्या तारखेला भगवद्गीतेइतकेच, किंबहुना भगवद्गीतेपेक्षाही अधिक आपल्या जवळचे आणि नित्यपाठाचे वाटतात. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वरी.

त्यामुळे सगळ्या पूर्वासुरींनी या आधी जे मोठे विवेचन करुन ठेवल आहे त्यापेक्षा गीतेतील जे मला भावलं, जे माझ्या जाणीवेत उतरलं आणि आचरणांतही उतराव अस मला वाटतं, तेवढच मी आपल्यासमोर मी मांडणार आहे.

भगवद्गीतेचा प्रसंग काय होता हा इतिहास सगळ्यांना माहित आहे. कौरवांची आणि पांडवांची सेना युद्धाला सज्ज आहे. दोन्ही सेना एकामेकांसमोर उभ्या ठाकलेल्या आहेत. हस्तिनापुरात राजा धृतराष्ट्र अतिशय काळजीत आहे. हे युद्ध कस होणार, यात कोणाचा जय होणार, अशी चिंता त्याला वाटत असताना व्यास त्याच्या समोर येतात आणि त्याला सांगतात कि तू जरी जन्मांध असलास तरी या प्रसंगापुरती मी तुला दिव्यदृष्टी देऊ शकतो, जेणे करुन इथे बसल्या जागेवरूनही युद्धस्थळावर काय काय चाललेल आहे ते तुला पाहायला मिळेल. तेंव्हा धृतराष्ट्र नको म्हणतो. मला ते दृश्य सहन होणार नाही, त्यामुळे मला दिव्यदृष्टी देता हा जो माझा सारथी सल्लागार संजय आहे त्याला तुम्ही दिव्यदृष्टी द्या. हा देखील विद्वान आहे. याला सर्व ऱ्हेने योग्य, अयोग्य, नीति, अनीति अशा गोष्टी कळतात. इतर सर्व युद्धासाठी गेलेले असताना हा संजय माझ्याजवळ थांबलेला आहे, तेंव्हा त्याने बघून हे वर्णन ला सांगू दे. ते मला सहन होईल. म्हणून व्यास संजयाला दिव्यदृष्टी देऊन जातात.

अशा प्रकारे युद्धभूमिवर घडलेल्या सर्व घटनांचे वर्णन संजय धृतराष्ट्राला सांगतो. त्यामुळे भगवद्गीतेची सुरुवात मुळी धृतराष्ट्र उवाच अशी होते आणि धृतराष्ट्रच्या तोंडून जो पहिला शब्द निघतो तो आहे धर्मक्षेत्र. कारण ज्या कुरुक्षेत्री युद्ध चालणार आहे ते धर्मक्षेत्र आहे. आणि हे काही धृतराष्ट्राला त्याक्षणी सुचलेल वर्णन नाही. कुरुक्षेत्र धर्माचे स्थान आहे असे वर्णन फार पूर्वीच्या काळापासून होते. धृतराष्ट्राच्या पूर्वीच्या ४०-५० पिढ्यांच्या आधी जो कुरुराजा झाला त्याने हे स्थान लोकांना मोक्षप्राप्तीचे साधन व्हाव या उद्देशाने तिथे तपस्या केली. महाभारतातच हा प्रसंग अन्यत्र सांगितला आहे की कुरूनी पुष्कळ तपस्या केली आणि त्याला काय कराव हे सुचल. त्याप्रमाणे वागून त्याने कुरुक्षेत्राची जमीन नांगरायला घेतली. स्वर्गातून इंद्राने बघितल की हा राजा नुसतीच जमीन नांगरतोय. इंद्राने तिथे येऊन विचारले तू ही जमीन का नांगरतोस, तेव्हा कुरुने सांगितल की ह्या जमीनीला नांगरून नांगरून इतक पुण्यवान करीन की इथे जो देह ठेवी त्याला स्वर्ग मिळावा. इंद्र त्याला उपहासानी हसून म्हणाला काय मूर्ख आहेस, हे शक्य आहे का - अस म्हणून इंद्र निघून गेला. कुरूने जमीन नांगरणे चालू ठेवल. इंद्र परत आला आणि परत तोच प्रश्न तेच उत्तर. पुन्हा इंद्र त्याचा उपहास करीत निघून गेला. अस कित्येक वेळेला झाल. इंद्राचा उपहास कधी कमी झाला नाही, तसे कुरूचे मनही ढळले नाही. पण इतर देव मात्र चक्रावले आणि काळजीत पडले. त्यांनी इंद्राला सांगितल की ज्या राजाची इतकी चिकाटी किंवा हट्ट आहे, आणि त्याला जे कर्तव्य वाटते ते सोडता तो नियमित आचरणपूर्वक आपल्या उदिष्टाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आहे, त्याला तू कमी लेखू नकोस. त्याच सत्व तू ओळख आणि कधी काळी तो आपल्याला वरचढ होईल हे भान ठेव. जी काही धारणा मनात ठेवून तो ही जमीन नांगरतो आहे ते जर यशस्वी झाले तर कुणीही उठाव, कुरुक्षेत्रात याव, त्या मातीत प्राणत्याग रीत देह ठेवावा आणि सरळ स्वर्गात याव. जर घडल तर आपल्या सगळ्यांची पंचायत होईल, सबब तू कुरुशी तह कर. इतर देवांनी असा सल्ला दिल्यानंतर मग इंद्र आणि इतर देव कुरुकडे येतात आणि त्याला काम थांबव असे सांगतात. तुझी इच्छा आहे की इथे मरण पावणाऱ्यांनी स्वर्गात जाव, पण आपण अशी तडजोड करुया की जो कुरुक्षेत्रात व्रतस्थ राहून उपवास करील आणि अन्नत्याग ईश्वरचिंतन हे दोन्ही एकत्र करत असताना ज्या व्यक्तीला मरण येईल ती व्यक्ती तरी स्वर्गात जाईल, किंवा ह्या ठिकाणी युद्धात जी व्यक्ती मरण पावेल ती तरी स्वर्गात जाईल. अशा ऱ्हेने कुरुक्षेत्रात येऊन देहत्याग रणारे सरसकट सगळेच स्वर्गात जाता, ठरावीक अटींचे ज्यांनी पालन केलेल आहे ते स्वर्गात येऊ शकतील ही तडजोड तू मान्य करावीस. कुरुनेही ही तडजोड मान्य केली. या कुरुक्षेत्राच्या कथेतच धर्माचे हे मर्म दिसून येते की राजाने लोककल्याणासाठी झटत रहावे.

कुरुक्षेत्राची ही परंपरा किंवा महत्ता कुरूच्या वंशात सर्वांनाच माहित. तशी ती धृतराष्ट्रालाही माहित होती. म्हणून धृतराष्ट्र प्रश्न करतो की हे संजया, या धर्मक्षेत्रात लढाईसाठी माझी मुल आणि पांडव एकमेकांसमोर ठाकलेले असता त्यांनी काय केल ते तू मला सांग. अशी भगवद्गीतेची सुरुवात आपण पहिल्यापासून ऐकतो.

संजय विचार करतो की धृतराष्ट्र हा राजा आहे आणि त्याला सगळ्यात आधी आपला मुलगा दुर्योधन याबद्दल उत्सुकता असेल. तो वर्णनाची सुरुवातच अशी करतो की दोन्ही सैन्य उत्साहाने एकामेकांसमोर असताना दुर्योधन पहिल्यांदा गुरु द्रोणाचार्यांकडे जातो आणि त्यांना दोन्हीं बाजूनी लढणारे मोठे योद्धे कोण आहेत त्यांची ओळख वर्णन सांगतो. पुढे तो विनंती करतो की आपल्याकडील जे मोठे योद्धे आहेत त्या सगळ्यांनी तुमच्या नेतृत्वाखाली भीष्मांचे सर्वतोपरी संरक्षण करावे.

एकीकडे द्रोण आणि दुर्योधन यांचा यंवाद चालू असताना भीष्म युद्धाला सुरुवात करावी असा संकेत देणारा दोन्ही बाजूच्या सैन्यांमधे युद्धाचा उत्साह भरणारा शंखध्वनी करतात. त्याला प्रत्युत्तर म्हणून कृष्ण, अर्जुनासकट पांडवांच्याकडूनही शंखध्वनी केला जातो.

इथपर्यंत अर्जुनाच्या उत्साहात कुठेही कमतरता नाही. तो जणू काही मूर्तिमंत उत्साह. इतर कित्येक लढलेल्या जिंकलेल्या लढायांसारखीच अजून एक लढाई जिंकणार अशा अविर्भावात अर्जुन आहे. तो कृष्णाला सांगते की दोन्ही सैन्यांच्यामधे माझा रथ नेऊन उभा कर कारण खुद्द माझ्याशी लढण्याची हिम्मत दाखवून कोण इथे आलेले आहेत ते मला बघायच आहे. " कैर्मया सह योद्धव्यं अस्मिन् रणसमुद्यमे ". हे सगळे दुर्योधनाचे प्रिय करण्यासाठी आलेले आहेत त्यांना मला बघून ठेवायचे आहे, त्याचबरोबर माझ्या बाजूने कोण लढणार आहे तेही मला बघायचे आहे म्हणून हे कृष्णा, तू दोन्ही सैन्यांच्यामधे माझा रथ घेऊन चल.

मात्र दोन्ही सैन्यांच्यामधे रथ जातो तेंव्हा मात्र अर्जुनाची मनस्थिती क्षणात पालटते. समोर भीष्म पितामह, गुरु द्रोण कृपाचार्य, त्यानंतर कौरव सैन्यातील इतर योद्धे जे सर्वच जवळचे नातेवाईक आहेत. आणि मागे वळून बघितल तर पांडव सैन्यातील योद्धेही नातेवाईक आहेत तेही हत होऊ शकतात. अर्जुनाच्या डोळ्यांसमोर एक प्रश्नचिन्ह, संभ्रम निर्माण होत. तो म्हणतो की या सगळ्यांना ठार मारून किंवा युद्धात यांचा पराभव करुन मला जय हवा आहे का किंवा असा जय मिळवणे योग्य आहे का. तो कृष्णाला सांगतो की आपण जे या युद्धाला उद्युक्त झालो तेच काहीतरी चुकलेल आहे अस मला वाटत. याठिकाणी जमलेले सर्वजण बंधुबांधव आहेत, त्यांची हत्या करुन आम्ही सुखी होणार नाही अस मला निश्चित वाटत. ज्यांच्या प्रेमाखातर किंवा ज्यांच्या सोबतीने राज्याचा किंवा इतर चांगल्या गोष्टींचा उपभोग घ्यावा त्या सगळया लोकांनाच मी इथे बघतो आहे. ते सगळे त्यांच्या प्राणांचा मोहत्याग करुन इथे जमा झालेले आहेत. त्यापैकी कोण जिवंत राहील हे मला माहित नाही. आम्ही जिंकू की नाही हेही कळत नाही. अशा परिस्थितीत जर का आपण लढाई केली तर धर्मक्षय होईल, कुलक्षय होईल, धर्माची हानी होईल आणि वर्णसंकर होईल. कुलस्त्रिया दूषित होतील, पिंडोदक क्रिया संपून जातील. इतके सगळे दुष्परिणाम होतील अस युद्ध कशासाठी करायच.

आपण बघतो की अर्जुन पहिल्या अध्यायात पुष्कळ तत्वज्ञान मांडतो आणि तो स्वतःच उत्तर सांगतो की नाही, मला हे युद्ध करायचे नाही. कौरवांना नाही कळत पण आम्हाला कळत. तरमग कळत असूनही आम्ही हे युद्ध करायचे का. कळत म्हणल्यावर युद्ध टाळायची जबाबदारी आमच्यावर आहे. म्हणून मी अस ठरवतो आहे की मला कोणी स्वर्गाच जरी राज्य दिल तरी मला ते नको. मी या युद्धातून निवृत्त होत आहे. युद्धाचा विचार करुनच मला कसस व्हाय़ला लागलेल आहे, माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिलेले आहेत, माझे हात थरथर कापायला लागलेले आहेत आणि माझ्या हातून गांडीवधनुष्य घसरून पडायला लागले आहे. मला सगळ विपरीत दिसू लागलेल आहे. माझ मन मला खात्रीपूर्वक सांगतय की आम्ही जर हे युद्ध केल तर ते चूक होइल. म्हणून हा मी धनुष्यबाण खाली ठेवतो आहे.

गीतेबद्दल काही संशयात्मा अशी शंका घेतात की धर्म ही काय युद्धभूमीत असतांना शिकवण्याची गोष्ट आहे -- आणि तीही इतक्या विस्ताराने कोण का सांगेल? सबब गीता पटत नाही. ही शंका अगदी चूक आहे, कारण दुर्बुद्ध किंवा अधर्मी लोकांना कधीच युद्ध का करावे हा प्रश्न पडत नाही. विचारशील लोकच नेहमी युद्ध करावे का न करावे -- तडजोड करून का होईना प्राणहानी टाळावी, असा विचार करतात. तो विचार योग्यही असतो व पांडवांनी तो आधी केलेला असतो. तरीही युद्ध अटळ झाल्यावर ते युद्धांत उतरले असल्याने असला प्रश्न विचारण्याचा क्षण कधीच उलटून गेलेला आहे आणि आता कच न खाण्याचा क्षण उद्भवलेला आहे हे विवेकशील भान अर्जुन विसरतो.

म्हणूनच उत्साहात आलेला, भा राहून सैन्याचे निरीक्षण करणारा अर्जुन क्षणात निरूत्साही होतो आणि खाली बसतो. हा त्याचा संभ्रम तातडीने काढला नाही तर काहीतरी विपरीत होऊ शकेल म्हणून कृष्ण ताबडतोब अगदी फटकारत त्याला सांगतो की अर्जुना, तुझ्या मनात जे काही आलेल आहे ते चूक आहे, कश्मल आहे. ते क्लैब्य आहे, अकीर्तिकर, अस्वर्ग्य आणि अनार्यजुष्ट - आर्यांना शोभणार आहे.

तू पहिला ऊठ आणि लढाईला सिद्ध हो. या क्षणी तुझ्या समोर शत्रू आहेत हे तुला आधी समजून घ्यायचे आहे. इथे अनोळखी कोणी नसले तरी आपला पक्ष किंवा शत्रू असे दोन पक्ष मात्र आहेत. जे शत्रू आहेत ते आप्तजन असले तरी याप्रसंगी ते आततायी आहेत हे लक्षात घे. या क्षणी लढाई करणे हाच तुझा धर्म कारण तू क्षत्रिय आहेस.

पण ज्या काही चार ओळी कृष्ण अर्जुनाला सांगतो त्याने अर्जुनाचे समाधान होत नाही. तो म्हणतो की आताच मी तुला विवेचनपूर्वक सांगितल की हा धर्म होऊ शकत नाही, उलट याने धर्माचा क्षय होतो. तर तुला यात धर्म कसा दिसतो?

मग कृष्णाला लक्षात येतं की ह्याला आता काहीतरी वेगळ सांगण्याची गरज आहे. आपणही खूपदा हा अनुभव घेतो की आपण लहान मुलाला काही सांगायला जाव आणि मूल ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. पण आपल्याला त्या मुलाला पुन्हा आपल्या रस्त्यावर घेऊन यायच असते. मग आपण थोड आडमार्गानी किंवा इतर गोष्टी सांगून त्याची समजूत घालतो आणि त्याला इकडे वळवतो. यासाठी जास्तीच्या चार गोष्टी सांगाव्याच लागतात. एखाद्याला एखाद्या कामाकडे वळवण आणि ही माझी आज्ञा आहे अस सांगणे या दोन्हीत खूप फरक असतो. माझी आज्ञा ऐक म्हटल्यावर वादाला किंवा इतर काही गोष्टी बोलायला परवानगी नसते, अत्यल्प वेळात आज्ञापालन होऊ शकते. पण जेंव्हा समजूत घालायची असते तेंव्हा मात्र बरच मोठ वलय निर्माण कराव लाग.

आता कृष्णाला ते वलय निर्माण करायच असत आणि अर्जुनाने केलेले धर्माचे विवेचनही खोडायचे असते. तो म्हणतो की एवढा मोठा ज्ञानी असल्यासारख तू बोलतोयस - "प्रज्ञावादांश्च भाष्यसे"- प्रज्ञावान पंडित असल्यासारख तू धर्माच स्वरूप सांगतोयस पण मी सांगतो की तुला धर्म कळलेलाच नाही. ज्या धर्मसंकल्पना बोलून तू युद्धाला अधर्म म्हण आहेस, युद्धापासून निवृत्त होत हेस ती तुझी धर्मसंकल्पनाच चुकलेली आहे. तुला जे वाटत तस धर्माच स्वरुप नाही, ते अगदी भिन्न आहे. युद्ध करणे किंवा करणे, स्वजनांची हत्या करणे किंवा करणे यात धर्म अडकलेला नाही. धर्म कुठे आहे त्याच स्वरुप काय हे मी तुला सांगतो.

अर्जुना, सर्वप्रथम लक्षात घे की मी त्यांना ठार मारेन किंवा ते मला ठार मारतील ही जी भाषा बोलतो आहेस त्यावरून तू धर्म अधर्म ठरवतो आहेस हेच मुळात चुकत आहे, कारण मारणारा तू कोण? हे जे काही होणार आहे, आघात, प्रत्याघात आणि प्राण निघून जाणे, हे शरीराच्या बाबतीत होणार आहे. पण आत्मा हा अविनाशी आहे.

लक्षात घ्या की धर्म सांगताना सर्वप्रथम त्म्याचे विनाशित्व इथून कृष्ण सुरुवात करतो कारण प्रश्न विचारणाऱ्याची मनस्थिती जशी आहे आणि समोर जी परिस्थिती आहे त्याच्यावरून नेहमी उत्तराच स्वरुप ठरत असत. त्यामुळे धर्माची व्याख्या करताना सर्वप्रथम आत्म्याचे अविनाशित्व सांगणे योग्य आहे का असे विचारणाऱ्यांना माझे उत्त हे की भगवद्गीतेच्या प्रसंगात हेच सर्वप्रथम आहे.

आपण लोकांना मारू किंवा लोक आपल्याला मारतील, एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वजनांचा संहार होईल आणि धर्माचा लोप होईल ही भीती अर्जुनाला असते. तसेच हे माझे पितामह आहेत, हे गुरु आहेत, बांधव आहेत, त्यांना मी सा मारू हा विवेकसंभ्रमही असतो. त्या संभ्रमातून अधर्माचरणाच्या भीतीतून त्याला बाहेर काढायचे आहे तेंव्हा नाशवंत शरीर परंतु अविनाशी आत्मा इथूनच धर्माच्या व्याख्येला सुरुवात होते.

कृष्ण म्हणतो की आत्मा हा अज, अनादी, सनातन, अविनाशी आहे, हे तू ओळखून घे. भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायाचे नाव सांख्ययोग आहे. या योगातील पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आत्म्याच अविनाशित्व. त्यासाठी कृष्णाने शरीर आणि वस्त्र ही उपमा वापरली. "वासांसि जीर्णानि" हा श्लोक खूप लोकांनी लहाऩपणीच पाठही केलेला असतो. माणूस जुनी वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करतो. तसच आत्मा देखील जुने शरीर टाकून नवीन शरीर धारण करतो. शरीर हे जणू काही आत्म्याचे वस्त्र आहे आणि मरण येण ही गोष्ट इतकी सहज आहे की जणू काही आत्म्याने आपल वस्त्र बदलावे.

काही जण मला प्रश्न विचारतात की कृष्ण हा परमेश्वर होता का इतिहास होता ? म्हणजे महाभारत हा इतिहास की काल्पनिक कथानक? आणि त्या कथानकातील कृष्ण इतिहासपुरुष की परमेश्वर?

मी अस मानते की महाभारत हा इतिहास आहे आणि कृष्ण हा पण इतिहासपुरुष होता, पण त्याचबरोबर त्याच स्वतः एक वेगळ व्यक्तिमत्व किंवा स्वरुप होत, जे त्यानेच भगवद्गीतेत वर्णन करुन सांगितलेल आहे दाखवून दिलेले आहे.

कृष्णाच परमेश्वर-रूप वर्णन कस ते आपण बघू. दुसऱ्या अध्यायात कृष्ण सांगतो अर्जुना, असा कोणताही काळ नाही की ज्या काळी तू नव्हतास किंवा मी नव्हतो. भूतकाळात अस कधीही घडलेल नाही किंवा भविष्यातही अस कधी असणार नाही. आणि वर्तमानकाळात तर आपण आहोतच. आत्मा अविनाशी असल्यामुळे मी पूर्वी पण होतो, आता पण आहे आणि नंतर पण असणार आहे.

माझ्याबरोबर तू देखील आणि इथे जमलेली सगळी मंडळी पूर्वी होती, आता आहेत आणि नंतर पण असतील. म्हणून तू त्यांच्यासाठी शोक करु नकोस. पुढे चौथ्या अध्यायात कृष्ण सांगतो की हे जे वारंवार जन्म घेण, आत्म्याने वस्त्र बदलून नवीन वस्त्र धारण करण आहे, त्याबद्दल मी जाणतो आणि तुला विस्मरण आहे. हा माझ्यात आणि तुझ्यात म्हणजे परमेश्वरात आणि सामान्य माणसातला फरक आहे. आत्म्याच अविनाशित्व परमेश्वराच्या कायम जाणिवेत असत परंतु सामान्य माणसाला ही जाणीव नसते.

दुसऱ्या अध्यायातच कृष्णाने थोडक्यात धर्माच सार अशा तीन गोष्टी एकदम सांगून टाकलेल्या आहेत. अर्जुना, तू सुख-दुःख , लाभालाभ, जय-पराजय, याचा विचार करु नको - हे निव्वळ शरीराचे व्यापार आहेत. गीतेत त्याला मात्रास्पर्श शब्द असा वापरलेला आहे. सुखदःखादि मानसिक भावांमुळे आपल्या इंद्रियांमधे होणारे जे विभ्रम आहेत त्यांना मात्रास्पर्श असा शब्द वापरलेला आहे. हे सगळे विभ्रम अनित्य आणि "शीतोष्ण सुखदुःखदः" म्हणजे ते तुला सुख पण देतील, दुःख पण देतील, ते शीत असतील किंवा उष्णही असतील. त्यांच्यामुळे तू आनंदीही होता कामा नये आणि दुःखीही होता कामा नये, ते सगळे अनित्य आहेत, हे जाणून त्यांची तू तितिक्षा कर - सहन कर. त्यांची अनित्यता लक्षात घेऊन सर्व इंद्रियजनित सुखदःखांकडे तू समत्व बुद्धीने पहायला शी. तर तुझी बुद्धी स्थिर राहील.

स्थितप्रज्ञाची व्याख्या काय अस अर्जुन विचारतो. स्थितप्रज्ञ कोण त्याला कस ओळखायच ? कृष्ण उत्तरतो की " अभिनंदति द्वेष्टी" - ज्याला आपल्या शरीराच्या मात्रास्पर्शांबद्दल आनंदही होत नाही आणि द्वेषही वाटत नाही त्याची बुद्धी स्थिर आहे.

"समत्वं योग उच्यते " यातील समत्व आपल्याला व्यक्तिगत होणाऱ्या सुखदुःख वा राग-द्वेषाची भावना या अर्थाने आहे. पुढे पाचव्या अध्यायात "सर्वत्र समदर्शिनः" असा शब्द वापरलेला आहे, तो समदर्शी शब्द इतर सर्वांसाठी आहे. व्यक्तिसाठी समत्व आणि समष्टिसाठी समदर्शिता या दोन्हींना कृष्णाने धर्म अस संबोधलेल आहे.

देहव्यापारांबद्दल समत्वभावना हा योग तसेच "योगः कर्मसु कौशलम्" - कर्मकुशलता हाही योग आहे. एकूण बुद्धिची स्थितप्रज्ञता, कर्मात कुशलता आणि चित्तात समदर्शिता ह्या तिन्हींना कृष्णाने योग म्हटले आहे आणि हे धर्माचे लक्षण सांगितले आहे. हे ज्याला जमल तो योगी आणि ज्याला जमल नाही तो सामान्य माणूस. "तस्मात् योगी भवार्जुन".

आपले कर्म कौशल्याने रा. सगळ कौशल्य पणाला लावून उत्कृष्ट कर्म करा. आपल्याला चांगलच फळ मिळा, उत्तमातल उत्तम फळ मिळा, या उत्कटतेनेच कर्म करा. मात्र जेव्हा प्रत्यक्ष कर्मफळ हातात पडेल तेंव्हा फळाबद्दल निःसंग रहा, अनासक्त रहा. "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन". यासाठी ज्ञान हवे. म्हणून ज्ञानसाधना हाही धर्म.

असा हा मोठा गहन विषय आहे. सगळा जीव ओतून एखाद्या गोष्टीत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्याचे फळ जेंव्हा हातात पडेल तेंव्हा त्याच्याबद्दल अनासक्त हायच. यश वा अपयश दोघांबद्दल अनासक्त रहायच. हा खूप कठिण, जवळ जवळ अशक्य कोटीतला हा ज्ञानवाद आपण म्हणू. पण हे ज्ञान आहे म्हणून इतिहासपुरुष असूनही कृष्ण परमेश्वर ठरतो.

दुसऱ्या अध्याया ज्ञानाची महती सांगितलेली आहे. ही अनासक्ति हाच सांख्ययोग आहे. अध्यायाच्या शेवटी कृष्ण म्हणतो अर्जुना, तुला आत्म्याच अविनाशित्व सांगितल, कौशल्य पणाला लावून लढ हे सांगितल. युद्धात जय कुठे नक्की आहे असा प्रश्न विचारला तेंव्हा कर्माची निष्पत्ती काय होईल याबद्दल अनासक्त राहून युद्ध कर हेही उत्तर सांगितल. आता ऊठ आणि युद्ध कर.

तेंव्हा अर्जुन त्याला म्हणतो की तू ज्ञानाची एवढी मोठी महती सांगितलीस, स्थितप्रज्ञाची व्याख्या करुन सांगितलीस आणि माझी बुद्धी स्थितप्रज्ञ रहावी अशा पद्धतीने तू मला उपदेश करतोस. पण तरीही तू मला युद्ध करायला का सांगतो आहेस - "तत् किम् कर्मणि घोरे माम् नियोजयसि केशव"?

ज्ञान हेच जर श्रेष्ठ आहे आणि त्या ज्ञानाचा मी अभ्यास साधना करायची आहे तर मग युद्ध का कराय युद्ध म्हणजे घोर कर्मात तू मला का ढकलतो आहेस ?

कृष्ण म्हणतो की ज्ञान जरी श्रेष्ठ आणि आवश्यक असल आणि अंतिमतः जरी तेच सत्य असल तरीसुद्धा कर्म हेही तितकच महत्वाच आहे. यासाठी तिसऱ्या अध्यायात कर्माची महता सांगत कृष्ण म्हणतो की अर्जुना, तू ह्या युद्धाला घोर कर्म अस नाव दिले, ठीक आहे. मग आता कर्माच्या बद्दल थोडीशी व्याख्या मी सांगतो. आपण कोणतही काम केल म्हणजे त्याला कर्म म्हणत नाही. पुढे चौथ्या अध्यायात स्पष्ट करुन सांगितले की कर्म काय अकर्म काय आणि विकर्म काय हे तू ओळख. पण त्याच्या अगोदर तिसऱ्या अध्यायात कर्म कशासाठी करायच किंवा कर्माची महती कशी तयार झाली त्याचे सुरुवातीपासूनचे विवेचन कृष्ण सांगतो.

यज्ञ ह्या भावनेतून आपण जे कर्म करणार आहोत तेच खर कर्म. यज्ञभावना मनात ठेवता करू ते योग्य कर्म नाही. यज्ञभावना म्हणजे फार पूर्वीच्या काळी प्रजापती ब्रम्हा ह्यांनी स्वतःच लोकांना उपदेश दिला की तुमच्यासाठी मी हे यज्ञकर्म प्रकट करुन दिले आहे. तुम्ही यज्ञकर्म करत राहिलात तर यज्ञाचे फळ कामधेनूप्रमाणे तुम्हाला हव ते प्राप्त करुन देईल. जे कर्म तुम्ही यज्ञभावनेने करणार नाही ते तुम्हाला योग्य फळ देणार नाही.

इथे कृष्णाने यज्ञाची व कर्माची जी सांगड घातली आहे, ती आपल्या समजुतीपेक्षा खूप वेगळी आहे. यज्ञात आपण जी सर्वश्रेष्ठ नीट वाळवलेली समिधा असेल, आपल्याकडील सर्वश्रेष्ठ अन्न असेल त्याची अग्नीत आहुती घालतो. तुमच्याकडे अति उत्कृष्ट वस्तू आहेत त्या तुम्ही यज्ञामधे वापरायच्या. तसच कर्म करत असताना तुमच्याकडे जे सर्व कौशल्य आहे अति उत्कृष्ट ज्ञान आहे ते तुम्ही वापरायचे. यज्ञाचा प्रसाद सगळ्या लोकांना वाटून झाल्यानंतर त्यातील उर्वरित भाग तुम्ही प्रसाद रुपाने ग्रह करायचा आहे "यज्ञशिष्टाशनः सन्तु" अस गीतेत म्हटलेल आहे. यज्ञात सगळ्यांना वाटून जे उरेल तो प्रसाद तुमच्यासाठी कामधेनुवत फळ देणार आहे. याउलट यज्ञभावनेतून काम करता जे फक्त स्वतःसाठी कुठलही काम करतात आणि स्वतःपुरत त्या फळाची इच्छा करतात अथवा उपभोग घेतात ते चोरी करत आहेत. "स्तेन एव सः"


धर्माच किंवा कर्माच हे किती मोठ विवेचन आहे. कर्म तर सर्व कौशल्य पणाला लावून करायच आहे कारण ती आहुती आहे. कर्मफल हा यज्ञातील प्रसाद आहे, तो सर्व समाजाला वाटून उरेल तेवढाच आपला आहे. अशा प्रकारे संपूर्ण समष्टीचा विचार ह्या कर्मफलामधे केलेला आहे. मी केलेले कर्म केवळ माझ्यासाठी आहे असा विचार केला तर ते कर्मफल चोरी ठरते. समष्टिचा एवढा मोठा विचार जगात कुठेही आढळत नाही.

आज आपण सगळीकडे जे डेव्हलपमेन्ट मॉडेल बघतो, त्यात फक्त स्वतःचा विचार आहे. अचिव्हिंग फॉर सेल्फ इज हाइयेस्ट ड्रायव्हिंग फोर्स फॉर डेव्हलपमेन्ट असे सध्याचे इकॉनॉमिक डेव्हलपमेन्ट मॉडेल सांगते. पण अचिव्हिंग फॉर सेल्फ हे मॉडेल भगवद्गीतेत संपूर्णपणे नाकरलेल आहे आणि ते चोरी करण्यासारख सांगितलेल आहे. त्याच कारणही आहे. तुम्ही जे काही अचिव्ह करता आहात त्यात निसर्गाने तुम्हाला जे भरभरुन दिल, तुमच्या पूर्वजांनी अगोदर एक प्लँटफॉर्म तुमच्यासाठी तयार करुन ठेवला, त्यावर चढून मग तुम्ही काहीतरी अचिव्ह केलेल आहे, हा सर्व कृतज्ञतापूर्वक विचार करता ते सगळ फक्त मी अचिव्ह केलेल आहे अस म्हणण चुकीच आहे. म्हणून तुमच्या कर्मफलाच वाटप सगळ्यांना प्रसाद रुपाने केल गेल पाहिजे तरच ती यज्ञभावना. ती नसेल फक्त स्वतःपुरत कमवायच, स्वतःपुरत उपभोगायच, आणि स्वतःपुरत जगायच ही भावना असेल ती चोरी आहे.

भगवद्गीतेत वर्णन आलेल आहे की "अन्नाद् भवन्ति भूतानि" अन्नामुळे सगळे प्राणीमात्र तयार होतात. ते अन्नच नसत तर अचिव्ह करायला तुम्ही किंवा मी कुठे असतो. "यज्ञात् भवति पर्जन्यः पर्जन्यात् अन्नसंभवः" लोक जे चांगल काम करतात – यज्ञभावनेने काम करतात, त्याच्यामुळे पर्जन्य येतो पर्जन्यामुळे अन्न संभवते.

लोकांच्या सत्कर्माने सुयोग्य अशी पर्जन्यवृष्टि होते ही कल्पना आपल्या भारतीय संस्कृतीत खूप मोठ्या प्रमाणावर, खूप विस्ताराने फक्त भगवद्गीतेत अस नाही तर उपनिषद आणि कित्येक धर्मग्रंथांमधे प्रकर्षाने मांडलेली आहे. लोक पापाचरण करतात तेंव्हा दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्ती येते. राजा व प्रजा पुण्यात्मा असेल तेंव्हा पाऊस वेळेवर पडतो. म्हणजे एखादा देश किंवा राजा पुण्यवान आहे की नाही ते तपासण्याची सगळ्यात पहिली फुटपट्टी ही आहे की समाज पुण्यवान असेल तर पाऊस वेळेवर पडेल.
गीतेतील कर्मयोग अध्यायात सांगितलेला धर्म असा आहे.

यज्ञामुळे पाऊस पडतो, कर्मातून यज्ञाची निर्मिती होते. आपण कर्म टाळू शकत नाही, ते प्रत्येकाला करावच लागत. परंतु कर्म यज्ञभावनेने केले, त्याचे फळ सगळ्यांबरोबर प्रसादभावनेने वाटून उर्वरित भागाचा स्वतःसाठी स्वीकार केला तरच तो यज्ञ सफल होतो व त्या यज्ञातून पर्जन्यवृष्टी योग्य काळी होते, त्यातून अन्न संभवते व त्या अन्नामुळे प्राणीमात्रांचे रक्षण होते. "एवं प्रवर्तितं चक्रं" - अस हे जगरहाटीच चक्र चालू रहात. ते चक्र जो कोण मोडतो, तो कर्मबंधनात सापडतो. जो फक्त स्वतःच्या उपभोगासाठी काम करतो, तो हे चक्र मोडायचा प्रयत्न करत आहे आणि गीतेत त्याला पापात्मा म्हलेल आहे. पण जो हे चक्र मोडता यज्ञभावनेनी कर्म करतो त्याला कर्मबंधन स्पर्श करत नाही, किंवा त्याच्या योगी असण्याला बाधक ठरत नाही.

पुढे पाचव्या अध्यायात कृष्ण सांगतो की माणूस कर्माशिवाय राहूच शकणार नाही. कर्म करणार नाही अस कितीही म्ह तरीसुद्धा माणुस श्वास घेतोच, पाणी पितोच. तो झोपतो, चालतो, बोलतो, हसतो, रडतो. एवंच, कर्म हे माणसाला चुकलेल नाही - त्याला पर्याय नाही, ते करावच लागणार. मात्र ते करण्यामागची भावना काय हे महत्वाचे आहे.

"इंद्रियाणि रान्याहुः इंद्रियेभ्यः रंनः। मनसस्तु पराबुद्धिः यो बुद्धे परसस्तु सः ।।" म्हणजे आपल्या स्थूल शरीरापेक्षा सूक्ष्म रुपात इंद्रिय आहेत, त्यांपेक्षा सूक्ष्म रुपात मन आहे, मनापेक्षा सूक्ष्म रुपात बुद्धी आहे आणि बुद्धीपेक्षाही सूक्ष्म रुपात आत्मा आहे. तो आत्मा आपण बुद्धीने जाणू घ्यायचा आहे. त्यावेळी शरीर, इंद्रिय, मन ह्यांच्यावर संयम ठेवून राहिलो तर आपण आत्मा जाणून घेऊ शकतो आणि तेव्हा आपण सुखदुःखाच्या चक्रातून बाहेर निघतो. "तस्मात् त्वं इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ" अर्जुना, आधी तू इंद्रियांचे नियमन कर.

हे नियमन सोप नसत. मी जर का आज उठले आणि म्हणाले की मी आज पाच किलोमीटर पळून येणार आहे तर ते शक्य नाही. या आधी जर प्रँक्टिस केलेली असेल तर मला आज पाच किलोमीटर पळणे शक्य आहे. म्हणजेच निरंतर अभ्यास हे इंद्रियनियमनाचे साधन आहे. म्हणून नियम आहे आणि नियमांचे पालन आहे. हे जे नियमपालन पातत्र्जल योगसूत्रात सांगितले आहे त्याचीच गरज गीतेतही सांगितली आहे. इंद्रिय, मन यांना नियमन रून बुद्धिच्या सूक्ष्मत्वामुळे तुला आत्मदर्शन होऊ शकेल व तोच धर्म अस कृष्ण सांगतो.

अशाप्रकारे युद्धभूमीवर निर्णायक टप्प्यावर अर्जुन असतांना त्याला जो बुद्धिसंभ्रम होतो, तो घालवण्यासाठी केलेल्या धर्मविवेचनाचा काही भाग मी इथे मांडलेला आहे.

------------------------------------------------------------------------