शुक्रवार, 14 अप्रैल 2017

महाभारत व्याख्यानमाला प्रस्ताव

महाभारत व्याख्यानमाला

भारतीय वाडमयातील प्रमुख ग्रंथांपैकी एक आणि  जगातील  सर्वात विस्तृत  असा, "जय़", "भारत" व "महाभारत"  या नावांनी ओळखला जाणारा ग्रंथ  भारतयांना ललामभूत आहे.  कथा-कथानकाच्या माध्यमातून हा ग्रंथ पुनः पुन्हा सांगितला   गेला आहे. तरी पण अजून पुढे हे कथाकथन  वारंवार होत राहाणारच. दर नवीन पीढीला याचे विस्मरण न व्हावे यासाठी अशा कथाकथनाची वारंवार आवश्यकता भासत राहणार.

महाभारताचे कथन दोन प्रकारांनी करता येते. भक्तिभाव ठेवून आणि समकालिकता व व्यावहारिकता ठेवू.  पण मूळ संहितेचा परिचय  करून  देणे  ही पायाभूत गरज  राहतेच.

आधुनिक काळानुरूप ज्येष्ठ नागरिक, प्रौढ नागरिक, किशोर, तरण आणि शाळकरी असे लोकसंख्येचे वर्गीकरण केले तर या चार पिढ्या होतात असे  आपण  म्हणू शकतो. यापैकी  ज्येष्ठ पिढीतीलही सुमारे ५० टक्के लोकांना महाभारताची कथा समग्रतेने माहीत नसते. त्यापेक्षा पुढील पिढ्यांमधे महाभारत  ऐकले किंवा वाचले असण्याचे प्रमाण उत्तरोत्तर प्रमाण कमी आहे. त्यांना ही ओळख करून देणे अधिकाअधिक महत्त्वाचे  आहे.

या सर्व  विचारांअंती भांडारकर प्राच्य विद्या संशोधक संस्थेच्या वतीने व संस्थेमध्ये नव्या वर्षारंभापासून महाभारताची समग्र ओळख अशी व्याख्यानमाला आयोजित केली आहे. 

सदरचे कथाकथन श्रीमती लीना मेहंदळे करतील. त्या महाभारत व  भगवद्गीतेच्या अभ्यासक आहेत. त्यांनी  वडिलांकडे (डॉ. बलराम. स. आग्निहोत्री)  संस्कृत व तत्वज्ञान या विषयांचा अनौपचारिक अभ्यास केला. त्या महाभारतातील भारतीय तत्वज्ञान या विषयावर भांडारकर संस्थेमार्फत अभ्यासही करीत आहे.

प्रथम पुष्पाचा विषय  भीष्म, व्यास आणि कृष्ण : एक त्रिकोण.

स्थळ: टाटा हॉल, भांडारकर संस्था, पुणे

दिवस व वेळ : दर वुधवारी सायंकाळी ४.३० ते .३०

या व्याख्यानासाठी सर्वांना खुले निमंत्रण आहे.


***
----------------------------------------------------------------------------

कोई टिप्पणी नहीं: