8 The Sample Question Bank Full Dt 20-07-2019
7 The Sample Question Bank Dt 20-07-2019
5 Bhagawadgeeta Pratiyogita Kaushalam To Principals
दि 20 July 2017
भगवद्गीता
प्रतियोगिता
मुख्यतः
शालेय विद्यार्थ्यांसाठी
-- (एक
तरी अध्याय पाठ यावा व गीतेबद्दल
सामान्य ज्ञान असावे.)
सहयोग
-- भारत
विकास परिषद, कौशलम्
न्यास, भांडारकर
संस्था, गीता
धर्म मंडळ -पुणे
प्रस्ताव
-- वरील
सर्व संस्था संस्कृतच्या
प्रसारासाठी कार्यरत असून
या वर्षी पुण्यातील संस्कृत
विद्वानांसोबत व संस्थांसोबत
गीत-मंथन
स्पर्धा हा एकत्रित उपक्रम
घेत आहेत.
उपक्रम
--
शालेय
मुलीमुलांसाठी गीता -
मंथन
- प्रतियोगिता
या माध्यमातून त्यांच्यावर
योग्य संस्कार घडावेत या
हेतूने एक अभिनव व स्पर्धात्मक
प्रस्ताव आपल्यासमोर मांडत
आहे. त्यास
सहयोग देऊन हे कार्य सिद्धीस
न्यावे ही विनंति.
प्रतियोगितेचे
स्वरूप सोबत संलग्न आहे.
भांडारकर
प्राच्य विद्या शोध संस्थेचा
१०० वर्षांचा कालावधि लौकरच
पूर्ण होत आहे. या
काळात निरनिराळे प्रथितयश
अभ्यासक व संशोधक संस्थेसोबत
जोडले गेले. संशोधकांची
भावी पीढी तयार होण्याच्या
उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांसाठी
अशा प्रतियोगितेचे मुख्य
यजमानपद भांडारकर संस्थेने
स्वीकारले आहे.
सर्व
स्पर्धा भांडारकर संस्थेत
होतील.
एकूण
संपूर्ण आयोजनाचा सूत्र-सांभाळ
प्रश्नमंजूषा, व
अँकरची जबाबदारी,
तसेच
पत्रव्यवहार कौशलम् न्यासाद्वारे
केला जाईल.
गीता
धर्म मंडळाने योग्य ते परीक्षक
योजण्याचे मान्य केले आहे.
भारत
विकास परिषदेमार्फत शालेय
विद्यार्थ्यांना संपर्क करून
त्यांचे फॉर्म भरून घेणे,
शिक्षकांमार्फत
तयारी करून घेणे व त्यांना
स्पर्धेत उतरविणे ही सर्वाधिक
महत्वाची जबाबदारी स्वीकारली
आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------
भगवद्गीता
मंथन प्रतियोगिता सोपी व कठिण
या दोन पातळींवर घेतली जाईल.
स्पर्धेचे
फॉर्म व प्रश्नांचे स्वरूप
वेगळे पहावे. आयोजन
असे असेल --
१)
ही
प्रतियोगिता भांडारककर
संस्थेतील टाटा हॉलमधे भरेल.
वेळ
-- सायंकाळी
३.३०
ते ५.३०
पैकी प्रत्यक्ष स्पर्धेची
वेळ ४ ते ५. स्पर्धेचा
दिवस लौकरच ठरेल.
अधिक
फॉर्म आल्यास क्रमाक्रमाने
स्पर्धा होतील
२)
यासाठी
शाळांनी त्यांच्या मुलीमुलांना
४ -४
च्या गटाने पाठवायचे आहे.
एक
शाळा अनेक गट पाठवू शकतात.
त्यासाठी
प्रत्येक गटाने नमुना फॉर्म
वेगवेगळा भरून द्यावा.
३)
शालेय
मुलीमुलांनी स्वतःच ४-४
चा गट करून स्पर्धेचा फॉर्म
भरून दिल्यास त्यांना परवानगी
असेल.
४)
स्पर्धेच्या
एका भागात एका वेळी ३ गट उतरतील.
त्यांना
२०-४०
प्रश्न विचारले जातील.
जास्त
व समर्पक उत्तरे देणारा गट
विजयी ठरेल. इतर
नियम स्पर्धेवेळी जाहीर होतील.
५)
प्रश्नकर्ता
अँकर व ३ सदस्यांचे सल्लागार
मंडळ यांचा निर्णय अंतिम व
सर्वांना बंधनकारक असेल.
६)
विचारलेल्या
प्रश्नांपैकी जेवढी सलग उत्तरे
बरोबर असतील त्यानुरूप बक्षिसे
दिली जातील
७)
अँकरची
प्रश्नमालिका संपल्यावर
प्रेक्षकांमधून वेगळे प्रश्न
विचारले जाऊ शकतात व त्यांच्या
सुयोग्य उत्तरांना वेगळे
बक्षिस असेल.
८)
ही
स्पर्धा वरिष्ठ विद्यार्थी
अथवा नागरिकांना देखील खुली
असेल . याकरिता
वरील प्रमाणेच ४ -४
च्या गटाने नावनोंदणी स्वीकारली
जाईल.
९)
प्रत्येक
गटाने त्यांच्या तयारीचा
किमान एक अध्याय फॉर्ममधे
भरावा. पाठांतराचे
प्रश्न त्या अध्यायावरच असतील
6.स्पर्धेतील
प्रश्नाचे
स्वरूप
- - Dt 20-07-2019
गुणांची
विभागणी
ढोबळमानाने
खालीलप्रमाणे
सोपी
व
कठिण
अशा
दोन
पातळींवर
स्पर्धा
असेल.
आपापला
अध्याय
गटांनी
स्वतःच
ठरवायचा
आहे
पाठांतर
आधारित
प्रश्न
त्यावर
विचारण्यात
येतील.
इतर
प्रश्न
संपूर्ण
गीतेतून
निवडले
जातील
सोपी
स्पर्धा
गटाने
निवडलेल्या
अध्यायातील
श्लोकांचे
पाठांतर
-- ३०
गीतेतील
विविध
शब्दांचे
अर्थ
-- ३०
शब्दांचे
सोपे
व्याकरण
जसे
विभक्ति, वचन,
लिंग,
संधी,
समास
१०
क्रियापदांचे
सोपे
व्याकरण
जसे
काळ,
लकार,
वचन
१०
काही
खास
शब्दांमागील
कथानक, प्रसंग
यावरील
प्रश्न
२०
कठिण
पातळी
गटाने
निवडलेल्या
अध्यायातील
श्लोकांचे
पाठांतर
– २५
गीतेतील
विविध
शब्दांचे
अर्थ
–
२५
शब्दांचे
व
सोपे
क्रियापदांचे
व्याकरण
-- विभक्ति,
वचन, लिंग,
संधी,
समास,
काळ,
लकार
-- २०
गीतेतील
विविध
श्लोकांमधील
संकल्पनांचा
अर्थ,
श्लोकार्थांची
तुलना,
तत्वज्ञान-
३०
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
4. Geeta to Schools
दि 14 April 2017
Same on Letterhead on 21 April 2017 and 04 May 2017
भगवद्गीता प्रतियोगिता
मुख्यतः शालेय विद्यार्थ्यांसाठी
प्रस्तावक -- कौशलम् न्यास
सहयोग विनंति –भांडारकर संस्था,
भारत विकास परिषद,
गीता धर्म मंडळ -
पुणे
प्रस्ताव --
कौशलम् न्यास संस्कृतच्या प्रसारासाठी कार्यरत असून देशभरातील संस्कृत विद्वानांसोबत व संस्थांसोबत कार्यक्रम घेणे हे न्यासाच्या कार्यप्रणालीचे एक वैशिष्ट्य आहे. या प्रकाराने वर्ष २०१४ मधे कौशलम् न्यास, संस्कृत भारती -गोवा व पणजी दूरदर्शन केंद्राने एकत्रित काम करून १२ भागांची एक मालिका संस्कृत तुमची आमची ही वर्षभर चालवली. त्यातील काही भाग यू-ट्यूबवर याच नावाने पहायला मिळतात.
शालेय मुलीमुलांसाठी गीता - प्रतियोगिता या माध्यमातून त्यांच्यावर योग्य संस्कार घडावेत या हेतूने एक अभिनव व स्पर्धात्मक प्रस्ताव आपल्यासमोर मांडत आहे. त्यास सहयोग देऊन हे कार्य सिद्धीस न्यावे ही विनंति. प्रतियोगितेचे स्वरूप सोबत संलग्न आहे.
भांडारकर प्राच्य विद्या शोध संस्थेचा १०० वर्षांचा कालावधि लौकरच पूर्ण होत आहे. या काळात निरनिराळे प्रथितयश अभ्यासक व संशोधक संस्थेसोबत जोडले गेले. संशोधकांची भावी पीढी तयार होण्याच्या उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांसाठी अशा प्रतियोगितेचे मुख्य यजमानपद भांडारकर संस्थेने स्वीकारावे ही खास विनंति.
(
लीना मेहेंदळे,
प्रमुख संरक्षक)
----------------------------------
एकूण संपूर्ण आयोजनाचा सूत्र-सांभाळ कौशलम् न्यासाद्वारे केला जाईल.
प्रश्नमंजूषा, व अँकरची जबाबदारी कौशलम् ची असेल.
कौशलम् न्यासातर्फे काही संस्थांना स्पॉन्सरशिपसाठी सहकार्याचे आवाहन केले जाईल. तसेच अन्य सहयोगी संस्थाही असे आवाहन करू शकतील.
भांडारकर संस्थेने यजमानपदाचे दायित्व तसेच स्पर्धेवेळी आगत-स्वागतासाठी होणाऱ्या खर्चाची जबाबदारी तत्वतः स्वीकरली आहे.
गीता धर्म मंडळाने योग्य ते परीक्षक योजण्याचे तत्वतः मान्य केले आहे.
भारत विकास परिषदेमार्फत शालेय विद्यार्थ्यांना संपर्क करून त्यांचे फॉर्म भरून घेणे, शिक्षकांमार्फत तयारी करून घेणे व त्यांना स्पर्धेत उतरविणे ही जबाबदारी स्वीकारली आहे.
भगवद्गीता प्रतियोगिता चे स्वरूप असे असेल --
१) ही प्रतियोगिता १५ दिवसातून एकदा व एका तासाची असेल.
२) यासाठी शाळांनी त्यांच्या मुलीमुलांना ४ -४ च्या गटाने पाठवावे. एक शाळा अनेक गट पाठवू शकतात.
३) शालेय मुलीमुलांनी स्वतःच ४-४ चा गट करून स्पर्धेचे पत्रक भरून दिल्यास त्यांना परवानगी असेल. हे पत्रक व विस्तृत अटी वेगळ्या पहाव्या.
४) स्पर्धेच्या एका भागात एका गटाला २० प्रश्न विचारले जातील. मात्र त्याचवेळी पुढील दोन गटही हजर असतील. पहिल्या गटाने उत्तर चुकवल्यास त्यांना संधी व गुण दिले जातील.
५) प्रश्नकर्ता अँकर व ३ सदस्यांचे सल्लागार मंडळ यांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक असेल.
६) विचारलेल्या प्रश्नांपैकी जेवढी सलग उत्तरे बरोबर असतील त्यानुरूप बक्षिसे दिली जातील
७) प्रश्नांचे स्वरूप साधारणपणे कसे असेल ते वेगळे पहावे.
८) अँकरची प्रश्नमालिका खुंटल्यावर प्रेक्षकांमधून ३ प्रश्न विचारले जाऊ शकतात व त्यांच्या सुयोग्य उत्तरांना वेगळे बक्षिस असेल.
९) दर पांचवा एपिसोड हा वरिष्ठ विद्यार्थी अथवा नागरिकांसाठी असेल. त्यातील प्रश्न अधिक तात्विक व वरच्या पातळीवर असतील याकरिता वरील प्रमाणेच ४ -४ च्या गटाने नावनोंदणी स्वीकारली जाईल.
१०)
प्रतियोगेचे स्थळ,
वेळ व दिनांक -
भांडारककर संस्थेतील टाटा हॉल,
पहिला व तिसरा गुरूवार,
सायंकाळी ३.
३० ते ५.
३० पैकी प्रत्यक्ष स्पर्धेची वेळ ४ ते ५
नाव
नोंदणीची
प्रणाली
व अटी
वेगळ्या
पाहा
प्रश्नांचे
स्वरूप- वेगळे
पहा.
---------- - ---------
गीता
धर्म
मंडळाने
योग्य
ते
परीक्षक
योजण्याचे
तत्वतः
मान्य
केले
आहे. तसेच
भांडारकर
संस्थेने
यजमानपदाचे
दायित्व
स्वीकरले
आहे.
प्रश्नमंजूषा
व
अँकरची
जबाबदारी
कौशलम्
ची
असेल.
कौशलम्
न्यासातर्फे
काही
संस्थांना
स्पॉन्सरशिपसाठी
सहकार्याचे
आवाहन
केले
जाईल.
तसेच
अन्य
सहयोगी
संस्थाही
असे
आवाहन
करू
शकतील.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
नाव नोंदणीचा फॉर्म (Refer 2. Geeta Manthan Form-1 दि 03 April 2017 )
---------------------------------------------------------------------
(निव्वळ आर्काइव्हिंग पुरते ) -- भांडारकरकडे प्रथम दिलेला प्रस्ताव इ.
1. Geeta Bhandarkar.rtf
दि 16 March 2017
भगवद्गीता-
प्रतियोगिता
भांडारकर
प्राच्य विद्या संशोधन
संस्थेच्या १०० वर्षांच्या
कालखण्ड लौकरच पूर्ण होत
आहे या काळांत निरनिराळे
प्रथितयश अभ्यासिक व संशोधक
संस्थेबरोबर जोडले गेले.
संशोधकांनी
पुढील भावी पिढी तयार
होण्याच्या उद्देशाने शालेय
विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव
आणि स्पर्धात्मक असा कार्यक्रम
संस्थेने घेणे उचित वाटते.
या
प्रतियोगीसाठी भगवद्गीता हा विषय सुयोग्य आहे.
स्पर्धेचे
स्वरूप असे राहू शकते.
१)
हा
कार्यक्रम १५ दिवसातून एकदा
व एकातासाकरिता असेल.
२)
या
साठी शाळांनी त्यांच्याकडील
७वी ते १२ वी या वर्गातील
मुली-मुलांना
चार-चार
च्या गटाने पाठवावे .
एक शाळा अनेक गट पाठवू शकते.
शाळकरी
मुली-मुलांनी
स्वतःच ४-४
चा गट करून संस्थेचा फॉर्म
भरून दिल्यास त्यांना परवानगी
असेल.
*नोंदणीसाठी
फॉर्म व विस्तृत अटी वेगळ्या
पहाव्या.
३)
एका
वेळी एका गटालां एकूण २०
प्रश्न विचारले जातील.मात्र
त्याच वेळी पुढील दुसरा गटही
हजर असतील व पहिल्या गटाने
उत्तर चुकविल्यास त्यांना
संधी दिली जाईल.
४)
प्रश्न
कर्ता अँकर व त्याचे ३ सदस्यांचे
सल्लागार मंडळ यांचा निर्णय
अंतिम व सर्वांना बंधनकारक
असेल.
५)
विचारलेल्या
प्रश्नांपैकी जेवढी सलग उत्तरे
बरोबर असतील त्यानुरूप बक्षिसे
दिली जातील
६)
प्रश्नांचे
स्वरूप साधारणपणे कसे असेल
. .
ते
वेगळे पहावे.
.
अँकरची
प्रश्नमालिका खुंटल्यावर
प्रेक्षकांमधून ३ प्रश्न
विचारले जाऊ शकतात व त्यांच्या
सुयोग्य उत्तरांना वेगळे
बक्षिस असेल.
७)
दर
पांचवा एपिसोड हा वरिष्ठ
विद्यार्थी अथवा नागरिकांसाठी
असेल.
त्यातील
प्रश्न अधिक तात्विक व वरच्या
पातळीवर असतील या साठीही चार
-
चारांच्या
गटाने नावनोंदणी स्वीकारली
जाईल.
८)
प्रतियोगेचे
स्थळ,
वेळ
व दिनांक -
भांडारककर
संस्थेतील टाटा,
हॉल,
पहिला
व तिसरा गुरूवार,
सायंकाळी
३.३०
ते ५.३०
पैकी प्रत्यक्ष स्पर्धेची
वेळ ४ते ५
-----
- ---------
नाव
नोंदणीची प्रणाली व अटी वेगळ्या
पाहा प्रश्नांचे स्वरूप-
वेगळे
पहा.
--------------
संस्थेने
योग्य ते अँकर व परीक्षक योजावे
लागतील.
इतर
संस्थांना सहकार्याचे आवाहन
करता येईल.
** गीता मंथन स्पर्धा अर्जाचा फॉर्म
** गीता मंथन स्पर्धा नमुना प्रश्नावली-
2. Geeta Manthan Form-1
दि 03 April 2017
गीता मंथन
स्पर्धेचा अर्ज नमुना
१)
तुमच्या
गटासाठी एक नांव निवडा
गटाचे
नांव-
२)
गटातील
चारही सदस्यांची नांवे व फोन
नं ईमेल (असल्यास)
*
गट
प्रमुख-
*
गट
सदस्य-
*
गट
सदस्य-
*
गट
सदस्य-
३)
शाळेमार्फत
असल्यास शाळेचे नांव
मुख्याध्यापकांचे नांव,
फोन
व ईमेल शाळेमार्फत नसल्यास
विद्यार्थ्यांनी आपापल्या
शाळांची नांवे लिहावीत.
४)
गटासाठी
मार्गदर्शक
नांव
फोन
ईमेल
५)
पत्रव्यवहारासाठी-
*
गट
प्रमुखाचा पत्ता
*
मार्गदर्शकाचा
पत्ता
*
शाळेचा
पत्ता
६)
स्पर्धकांची
तयारीची योग्यता
*
सोपी
*
कठिण
--------------
3. Geeta Manthan Spardha Prashna 1
दि 12 April 2017
गीता
मंथन स्पर्धा नमुना
प्रश्नावली-
१)
महाभारत
युध्दाचा प्रसंग काय होता?
कोण
विरूध्द कोण ?
२)
कुणाचे
सैन्य किती होते?
३)
१
अक्षौहिणी सैन्य म्हणजे किती
?
४)
योगः
कर्मसु कौशलम् याचा शब्दार्थ
कांय ?
५)
कृष्णाची
इतर ५ नांवे सांगा
६)
हा
श्लोक पूर्ण म्हणा-
इदं
शरीरं कौन्तेय (
या
प्रकारे गीतेतील कोणताही
श्लोक)
७)
अर्जुनाची
इतर ५ नांवे सांगा.
८)
पाच
पाण्डवांची नांवे
९)
दुर्योधन
बंधुंपैकी इतर चार नावे.
१०)
उवाच
या शब्दाचा काळ व लकार कोणता
?
११)
स्थितप्रज्ञस्य
का भाषा या मधील का या शब्दाचे
लिंग आणि वचन सांगा ?
१२)
पार्थ
हा शब्द कसा झाला?
१३)
कुन्ती-
कौन्तेयः
या प्रकारच्या प्रत्ययांना
कांय म्हणतात ?
१४)
गीतेत
रामाचा उल्लेख आहे का असल्यास
कुठे?
१५)
भगवंतांनी
सांगितलेल्यांपैकी ५ विभूति
सांगा.
१६)
३/५
श्लोक सलग म्हणा
१७)
सुरवातीस
जो शंखनाद झाला त्यातील
नकुलाच्या शंखाचे नांव कांय
?
१८)
आसुदीसंपत्ति
म्हणजे कांय -
कांय
१९)
स्थितप्रज्ञतेची
३ लक्षणे सांगा
२०)
--------या
श्लोकाचा अर्थ सारांशाने
सांगा.
२१)
गीतेत
एकूण अध्य़ाय किती?
२२)
पैकी
४ अध्यायांची नांवे सांगा
२३)
गीतेतील
खालील शब्दांचे अर्थ सांगा-
--------
---------
---------
(सोपे
व कठिण शब्द)
२४)
येषामर्थे
या शब्दाचा संधिविच्छेद कांय
?
इमेवास्थिता
--------
(इत्यादि)
२५)
कुरूक्षेत्राला
धर्मक्षेत्र असे कां म्हटले
?
२६)
नभस्पृशं
दीप्तं हे कोणाचे बोधवाक्य
आहे ?
----------------------------------
पत्र-१ गीता धर्म मंडळासाठी
महोदय/
महोदया,
कौशलम्
न्यास,
भांडारकर
संस्था,
भारत
विकास परिषद व गीताधर्म मंडळ
स्पर्धा घेत आहोत त्याची
रुपरेखा संलग्न टिप्पणीत
पहावी.
या
स्पर्धा जुलै मधे योग्य दिवस
निवडून सुरु करण्याचे ठरले
आहे.
तरी या स्पर्धेसाठी
आमचे रिसोर्स पर्सन या नात्याने
आपण सहभाग द्यावा ही विनंती.
रिसोर्स
पर्सन्स ने आम्हाला प्रश्न
काढण्यात अँकर ची भूमिका
निभावण्यात तसेच तज्ज्ञ
परीक्षक म्हणून सहभाग द्यावा
अशी आपेक्षा आहे.
या बाबत आपली
संमती सत्वर कळवावी जेणेकरुन
कामाची सुरुवात करता येईल.
कळावे हि
नम्र विनंती
आपली
विश्वासू
लीना
मेहेंदळे
---------------------------------------------------------------------
पत्र
क्र.२ भारत विकास परिषदेसाठी
महोदय/
महोदया,
कौशलम्
न्यास,
भांडारकर
संस्था,
भारत
विकास परिषद व गीताधर्म मंडळ
स्पर्धा घेत आहोत त्याची
रुपरेखा संलग्न टिप्पणीत
पहावी.
या
स्पर्धा जुलै मधे योग्य दिवस
निवडून सुरु करण्याचे ठरले
आहे.
तरी या स्पर्धेची
स्पॉन्सरशिप स्वीकारुन गीता
व संस्कृतच्या प्रचारास हातभार
लावावा स्पॉन्सर म्हणून आपण
देऊ केलेली रक्कम बक्षिसे व
आयोजनासाठी करावे लागणारे
शूटिंग यासाठी केला जाईल.
स्पॉन्सरशिपची
देणगी रक्कम कौशलम् न्यासासाठी
देय असेल.
संस्थेकडे
80G
सर्टिफिकिट
असल्याने त्याचा लाभ मिळू
शकेल.
या
बाबत आपली संमति सत्वर कळवावी
जेणेकरुन कामाची सुरुवात
करता येईल.
कळावे हि
विनंती!
आपली
विश्वासू
श्रीमति
वृंदा गुप्ते
(मुख्य
ट्रस्टी)
--------------------------------------------------------------------