योगसूत्र विभूतिपाद
(पातज्जल योगसूत्र ः अध्याय ३)
Author -- Dr Balram Sadashiv Agnihotri
Typed by Ashwini -- To proof read
देशबन्धश्चित्तस्य धारणा ।।१।।
चित्तास एका
देशामध्ये, एकाच वृत्तित बांधून ठेवणे याला धारणा म्हणतात. देश अनेक आहेत.
नाभिचक्र, ह्दय, जिह्याग्र, नासिकाग्र यापैकी कोणत्यातरी एका देशावर चित्तवृत्ती
स्थिर करायची यास 'धारणा' म्हणतात. ह्या देशाव्यतिरिक्त अन्य विषयांवर जरी चित्त
बांधून ठेवले तरी ती धारणा होते. 'बाह्ये वा विषये चित्तस्य वृत्तिमात्रेण बन्ध इति धारणा।'
तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम् ।।२।।
जे ध्येय
चित्ताच्या एकतानतेला आलम्बन म्हणून घेतले आहे त्या ध्येयाशी चित्त एकतानतेला
पावणे अथवा ध्येयसदृश प्रवाहच चित्तवृत्तिमध्ये येणे; अन्य प्रत्ययामुळे चित्ताचा
सदृश प्रवाह खण्डित न होणे याला ध्यान म्हणतात.
तदेवार्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यमिव समाधिः ।।३।।
ज्यावेळी ते
ध्यान केवळ अर्थमात्रानेच (ज्याचे ध्यान करतो त्या विषयानेच) प्रकाशित राहिल व
ध्याता आपले स्वतःचे स्वरूप जणू विसरून जाईल त्यावेळी त्या अवस्थेस समाधी म्हणावे.
'सम्यगाधियत एकाग्रीक्रियते विक्षेपान्पिरिह्त्य मनो यत्र स समाधिः।'
त्रयमेकत्रसंयमः ।।४।।
एकाच विषयाकडे
धारणा,ध्यान आणि समाधी या तिहींचा ओघ धावू लागला म्हणजे त्यास संयम अशी संज्ञा
आहे. 'तदेतद्धारणा ध्यान समाधि त्रयमेकत्र संयमः। तदस्य त्रयस्य तान्त्रिकी
परिभाषा संयम इति।'
तज्जयात्प्रज्ञालोकः ।।५।।
संयमाचा
जय झाला म्हणजे , जेव्हा संयम एका कोणत्यातरी ज्ञेयावर पूर्ण स्थिर होतो, त्यावेळी
प्रज्ञेत आलोक उत्पन्न होतो. अर्थात् ज्ञेय प्रज्ञेत चांगल्या रीतीने प्रकाशित
होते. 'तस्य संयमस्य जयात्प्रज्ञा ज्ञेयं सम्यगवभासतीत्यर्थः।'
तस्य भूमिषु विनियोगः ।।६।।
पाचव्या
सूत्रात संयमाचे फल कथन केले आहे. या सहाव्या सूत्राने संयमाचा उपयोग सांगतात.
एकदा
संयम हा स्थुल आलम्बनावर स्थिर झाला म्हणजे स्थुलाहून सूक्ष्माकडे जाण्याचा
प्रयत्न करावा सूक्ष्म आलम्बनावर संयम केल्याने थेट मूळ प्रकृतिवर संयम करता येतो.
'तस्य संयमस्य भूमिषु स्थुलसूक्ष्मालम्बन भेदेन स्थितासु चित्तवृत्तिषु विनियोगः
कर्तव्यः न ह्यानात्मी कृता=धरभूमिरूत्तारस्यां भूमौ संयमं कुर्वाणः फलभाग् भवति।'
त्रयमन्तरग्ङं पूर्वेभ्यः ।।७।।
यम, नियम,
आसन, प्राणायाम, प्रत्याहार ही संप्रज्ञात समाधिची पाच बहिरंग साधने आहेत. यांच्या
तुलनेत धारणा, ध्यान, समाधी ही अंतरंग साधने आहेत. 'पूर्वेभ्यो यमादिभ्यो
योगाङ्गेभ्यः पारम्पर्येण समाधेरूपकारकेभ्यो धारणादि योगाग्ङ्त्रयं संप्रज्ञातस्य
समाधेरन्तरग्ङम् समाधिस्वरूपनिष्पादनात्।'
तदपि बहिरग्ङं निर्बीजस्य ।।८।।
तथापि
निर्बीज समाधिच्या दृष्टिने धारणा , ध्यान, समाधी ही देखील बाह्यांगच आहेत.
व्युत्थाननिरोधसंस्कारयोरभिभवप्रादुर्भावौ
निरोधक्षणचित्तान्वयो निरोधपरिणामः
।।९।।
व्युत्थान
संस्कार पराभूत होणे (नाहिसे होणे) व निरोध संस्काराचा प्रादुर्भाव होणे असे झाले
असता निरोधक्षण स्थितीत जी चित्ताची स्थिर अवस्था असते त्याला निरोध परिणाम
म्हणतात. व्युत्थानसंस्कार चित्ताला क्षिप्त , मुढ व विक्षिप्त या अवस्थेला नेतात.
१. 'तत्र
क्षिप्तं रजस उद्रेकादस्थिरम् । तच्च चित्तं सदैव दैत्यदानवादीनाम्।'
२. मूढं तमस
उद्रेकात्क्रोधादिभिः विरूद्धकृत्येष्वेव नियतम्। तच्च सदैव रक्षः पिशाचादीनाम् ।
३. विक्षिप्तं
तु सत्तवोद्रेकाव्दैशिष्टय्ने परिह्त्य दुःख साधनं सुखसाधनेष्वेव शब्दादिषु
प्रवृत्तम्।
म्हणून या
संस्काराचा नाश व्हावयास पहिजे . निरोध संस्कार हे चित्ताला स्थिरता आणतात. यांचा
प्रादुर्भाव व्हावयास पाहिजे. अशा योगाने सत्तव, रज व तम गुणांनी नेहमी चलन
पावणारे चित्त स्थिर भावास प्राप्त होते. हाच चित्ताचा निरोधपरिणाम.
तस्य प्रशान्तवाहिता संस्कारात् ।।१०।।
निरोध
संस्कारामुळे चित्तात एकच सदृश प्रवाह वाहत राहातो. 'परिह्तविक्षेपतया
सदृषप्रवाहपरिणामिचित्तं भवतीत्यर्थः।'
सर्वार्थतैकाग्रतयोः क्षयोदयौ चित्तस्य समाधिपरिणामः ।।११।।
चित्ताची सर्वार्थता म्हणजे अस्थिरतेमुळे चित्त नानाविषयाकार होणे.
'सर्वार्थता नाम चलत्वान्नानाविधाग्रहणं चित्तस्य विक्षेपो धर्मः।'
एकाग्रता म्हणजे चित्त एकाच आलम्बनाच्या ठिकाणी स्थिर असणे . 'एकाग्रता नाम
एकस्मिन्नेवा=लम्बने चित्तस्य सदृशपरिणामिता।' या दोहोंत सर्वांर्थतेचा क्षय होणे
व एकाग्रतेचा उदय होणे यासच चित्ताचा समाधी परिणाम म्हणतात.
चित्ताचे
निरोध परिणाम व एकाग्रता परिणाम असे दोन परिणाम सांगितले. निरोधावस्थेत निरोध
संस्कार प्रकट राहुन व्युत्थान संस्कार
नाश करतात; व चित्त स्थिर राहाते. पण समाधी परिणामांत चित्तात सदृश प्रवाह
वाहत राहातो; असा या दोहोंत भेद आहे.
शान्तोदितौ तुल्यप्रत्ययौ चित्तस्यैकाग्रतापरिणामः ।।१२।।
ज्यावेळी चित्त शान्त व स्पष्ट (ठळक) अशा एकाच ध्येयाकार वृत्तीत असते त्यावेळी तो चित्ताचा एकाग्रता
परिणाम म्हणावा. चित्त शान्त असणे व एकरूपालम्बनात्मक असणे ही दोन्ही जेव्हा
तुल्यबलाने चित्तात असतील त्यावेळी चित्ताची एकाग्रता झाली असे जाणावे .
योगसूत्र विभूतिपाद
एतेन
भूतेन्द्रियेषु धर्मलक्षावस्थापरिणामा व्याख्याताः ।।१३।।
सूत्र ९,११,
१२ यात चित्ताचे तीन परिणाम सांगितलेः पहिला निरोध परिणाम हा धर्म परिणाम, दुसरा
समाधी परिणाम व तिसरा निरोध परिणाम हा अवस्था परिणाम. तसेच कर्मेन्द्रिये व
ज्ञानेन्द्रिये यांचे सूद्धा तीन परिणाम धर्म, लक्षण व अवस्था या भेदाने होतात असे
जाणावे .
इन्द्रिये
जेव्हा विषयप्रवृत्तिने बहिर्मुख होत
नाहीत व विविध विषय सोडून देऊन चित्ताबरोबर एकाच
विषयावर धारणारूपाने असतात तेव्हा त्यांची ती अवस्था धर्मपरिणाम लक्षणपरिणाम ह्या स्वरूपाची जाणीव. जेव्हा चित्ताचा
एकाग्रता परिणाम होतो तेव्हा इन्द्रियांचीसूद्धा एकाग्रता होते. हा इन्द्रियांचा अवस्था परिणाम आहे. वास्तविक चित्ताचा व इन्द्रियांचा एकच परिणाम आहे व तो एकाग्रता परिणाम. पण धर्मी जे धर्मी जे चित्त व इन्द्रिये यांमध्ये जी विक्रिया होते तिचे कथन धर्माव्दारे केले जाते.येथे, लक्षण व अवस्था या तीन परिणामांचे कथन करू. मृत्तिका जेव्हा पिण्डरूप धर्म टाकून घटरूप धर्माचा स्वीकार करते तेव्हा त्यास धर्मपरिणाम म्हणतात. जेव्हा घट त्याचे भावीरूप टाकून वर्तमान क्षणी असलेल्या रूपाने संबोधिला जातो तेव्हा तो लक्षणपरिणाम व प्रत्येक क्षणी घटाची अवस्था बदलत असताना त्या अवस्थेने जेव्हा त्याची संबोधना होते तेव्हा त्यास घटाचा अवस्थापरिणाम म्हणतात.
एकाग्रता परिणाम होतो तेव्हा इन्द्रियांचीसूद्धा एकाग्रता होते. हा इन्द्रियांचा अवस्था परिणाम आहे. वास्तविक चित्ताचा व इन्द्रियांचा एकच परिणाम आहे व तो एकाग्रता परिणाम. पण धर्मी जे धर्मी जे चित्त व इन्द्रिये यांमध्ये जी विक्रिया होते तिचे कथन धर्माव्दारे केले जाते.येथे, लक्षण व अवस्था या तीन परिणामांचे कथन करू. मृत्तिका जेव्हा पिण्डरूप धर्म टाकून घटरूप धर्माचा स्वीकार करते तेव्हा त्यास धर्मपरिणाम म्हणतात. जेव्हा घट त्याचे भावीरूप टाकून वर्तमान क्षणी असलेल्या रूपाने संबोधिला जातो तेव्हा तो लक्षणपरिणाम व प्रत्येक क्षणी घटाची अवस्था बदलत असताना त्या अवस्थेने जेव्हा त्याची संबोधना होते तेव्हा त्यास घटाचा अवस्थापरिणाम म्हणतात.
शान्तोदिताव्यपदेश्यधर्मानुपाती धर्मी ।।१४।।
धर्मी जे
चित्त त्यामध्ये धर्म तीन प्रकारची राहतात. धर्म म्हणजे 'योग्यतावच्छिन्ना धर्मिणः
शक्तिः।' धर्म ही धर्मीच्या ठिकाणी असलेली
योग्य स्वरूपाची एक शक्ति आहे. ते धर्म शान्त , उदित व अव्यपदेश या स्वरूपाचे असतात. जे धर्म आपले व्यापार करून उपरम पावले ते शान्त
धर्म. जे धर्म धर्मीला विशिष्ट
कार्यात अगर भोगांत प्रवृत्त
करतात ते उदित धर्म व जे
धर्म अद्याप प्रकट
झाले नाहीत पण वासना रूपाने आहेत ते अव्यपदेश्य धर्म. 'शान्ता ये कृत
स्वस्वव्यापाराः। उदिता ये वर्तमाने=ध्वनि स्वव्यापारं कुर्वन्ति। अव्यपदेश्या ये
शक्तिरूपेण स्थिताः। तं त्रिविधमपि धर्मं यो=न्वयित्वेन स्वीकारोति स शान्तोदिता=व्यपदेश्य धर्मानुपाती धर्मीत्युच्यते। '
क्रमान्यत्वं परिणामान्यत्वे
हेतुः ।।१५।।
दुसरा
परिणाम उत्पन्न होण्याला दुसरा क्रम असणे हा हेतू आहे. ज्याप्रमाणे माती, मृत्पिण्ड, मृत्तिकाघट , मृत्कपाल (घटाचे
फुटल्यानंतर होणारे तुकडे) व मृत्कण हा क्रम
मातीत परिणाम घडवून आणतो,
त्याचप्रमाणे चित्तात व्यापार
उत्पन्न होतात. ते शान्त होतात व नवीन उदित होतात; ते शान्त
होतात तोच अव्यपदेश्य (सुप्त वासना) उदित स्वरूपास येतात. असा क्रम व त्यामुळे परिणाम पावणारे
चित्त यांचा प्रवाह कायम आहे. तसेच चित्तात धारणा उदित होते. चित्त ध्यानस्थ झाले की धारणा शान्त होते. यावेळी
चित्ताची निरोध परिणामावस्था असते. चित्ताचे विविध परिणाम जाऊन एकाग्रता उदित
झाली की तो समाधिपरिणाम व हाच शान्त
आणि ठळक स्वरुपाचा झाला की तोच एकाग्रतापरिणाम . हे सर्व परिणाम
क्रमाने होत असतात. एक क्रम सुटून दुसरा क्रम आला की परिणामभिन्नता होते.
परिणामत्रयसंयमादतीतानागतज्ञानम् ।।१६।।
निरोधपरिणाम, समाधिपरिणाम व एकाग्रतापरिणाम ह्या तिघांच्या संयमापासून (हे
तिन्ही एकदम उदित झाल्यावर) योग्यास
मागील होऊन गेलेल्या व पुढे
होणा-या सर्वांचे ज्ञान होते. कारण
एकाग्रता परिणामामुळे चित्ताचा सर्व मळ नाहिसा होऊन ते शान्त व
आरशाप्रमाणे स्वच्छ होते व त्यावर मागे होऊन गेलेल्या प पुढे
होणा-या सर्व गोष्टिंचे बरोबर प्रतिबिम्ब पडते व योग्यास
अतीत व अनागत असे सर्व ज्ञान होते.
शब्दार्थप्रत्ययानमितरेतराध्यासात्
संकरस्तत्प्रविभागसंयमात् सर्वभूतरूतज्ञानम् ।।१७।।
सर्वभूतरूतज्ञानम् = सर्व प्राण्यांच्या
शब्दांचे ज्ञान. गौः हा शब्द , त्यापासून
कळणारा 'सास्नादिमान् पदार्थ हा
अर्थ व त्यांचे होणारे ज्ञान
याचा अध्यास होतो व ते तीन एकत्र येतात त्यास संकर म्हणतात. बोधक शब्द , बोध्य पदार्थ व बोध
ज्ञान यांचा संकर होऊन एकदम ज्ञान होतो .ज्यावेळी त्यास सर्व
प्राणिमात्रांच्या आवाजारूपी
शब्दांचे ज्ञान होऊ लागते.
संस्कारसाक्षात्करणात्पूर्वजातिज्ञानम् ।।१८।।
चित्तावर वासनारूप दोन प्रकारचे संस्कार होतात;
एक संस्कार स्मृती होताक्षणीच फल उत्पन्न करतो तर, काही संस्कार विपाकावस्थेला पोहोचल्यावर फल देतात. या
संस्कारांचा जर साक्षात्कार करून घेतला अर्थात् जो अनुभवलेला विषय असेल त्याचेच जर
अनुसंधान करीत राहिले तर योग्यास पूर्व जन्माच्या जातीचे ज्ञान होते.
प्रत्यस्य परिचित्तज्ञानम् ।।१९।।
प्रत्यय
म्हणजे दुस-या चित्ताच्या मुखावर उमटलेला अविर्भाव. हा जो प्रत्यय यासय लिग्ङ
(हेतू) समजून त्या प्रत्ययावर संयम केला असता त्याच्या चित्ताचे ज्ञान होते.
'प्रत्ययस्य परिचित्तस्य केनचिन्मुखरागादिनालिग्ङेन गृहीतस्य यदा संयमं करोति
तदा परकीय चित्तस्य ज्ञानमुत्पद्यते ;
परिचित्तगतानपि धर्माञ्ञानातीत्यर्थः।' भोजवृत्ती.
न
तत्सालम्बनं तस्याविषयीभूत्वात् ।।२०।।
सूत्र १९
वर अशी शंका आहे की, 'परिचित्ताचे ज्ञान होण्यासाठी चेह-यावरील प्रत्ययावर जर संयम
करावयास सांगतात तर प्रत्यक्ष पर चित्तावरच संयम करावा असे का सांगत नाही? याला
उत्तर असे की पर चित्त संयमाला (धारणा, ध्यान, समाधी तिन्ही एकत्र करणे याला संयम
म्हणतात) आलम्बन म्हणून घेता येत नाही. परिचित्त आलम्हनाचा विषय होऊ शकत नाही
म्हणून प्रत्ययावर संयम करावयास सांगितले. त्यामुळे परुचित्त ज्ञात होते. 'तस्य
परस्य यच्चित्तं तत्सालम्बनं
स्वकीयेना=लम्बनेन सहितं न शक्यते ज्ञातुमालम्बनस्य केनचिल्लि़ङ्गेनाविषयीकृत्वात्
। चित्तधर्माः पुनर्गृह्यन्त एव। यदा तु किमनेना== लम्बितमिति प्रणिधानं करोति
तदातत्संयमात्तव्दिषयमपि ज्ञानमुत्पद्यत एव ।'
कायरूपसंयमात्तग्दाह्यशक्तिस्तम्भेचक्षुष्प्रकाशा-
संयोगे=न्तर्धानम् ।।२१।।
काय
म्हणजे शरीर. याचे रूप हा चक्षु या इन्द्रियाचा विषय आहे. ह्या रूपावर संयम केला
असता त्या शरीराची जी ग्राह्य शक्ती आहे म्हणजे शरीर हे नेत्रांनी ग्रहण केले
जाण्याचा जो विषय आहे, ती (शक्ती) स्तम्भित होते. त्यामुळे नेत्रवृत्ती त्या रूपाकार होत नाही. चक्षुष्प्रकाशाचा त्या
रूपाशी जेव्हा असंप्रय़ोग होतो तेव्हा योगी अन्तर्धान पावतो.
सोपक्रमं निरूपक्रमं च कर्म
तत्संयमादपरान्त-
ज्ञानमरिष्ट्येभ्यो वा ।।२२।।
कर्म हे
दोन प्रकारचे आहे. एक सत्तवर फलद्रुप होणारे व एक ब-याच काळाने पल देणारे. पहिले
सोपक्रम (तीव्र वेगवाले ) तर दुसरे निरूपक्रम (मन्द वेगवाले) कर्म आहे. याकर्मावर
संयम केला असता मृत्युचे ज्ञान (अपरान्तज्ञानम्) होते किंवा अरिष्टापासूनदेखील
मृत्युचे ज्ञान होते. अरिष्टे तीन प्रकारची
आहेतः आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक. ज्यावेळी स्वतःचे कान दाबल्यावर
आतील आवाज ऐकू येत नाही किंवा डोळे मिटले असता ज्योती (प्रकाश) दिसत नाही ते
आध्यात्मिक अरिष्ट समजावे . जेव्हा एकाएकी यमपुरूषांचे अथवा मेलेल्या पितरांचे
दर्शन होते तेव्हा ते आधिभौतिक अरिष्ट. अकस्मात स्वर्ग दिसणे किंवा सिद्धांचे
दर्शन होणे हे आधिदैविक अरिष्ट. या अरिष्टांवरून मृत्युचे ज्ञान होते. मृत्यु समीप
आला असे यावरून समजावे.
मैत्र्यादिषु बलानि ।।२३।।
मैत्री ,करूणा,
मुदिता, अशा तीन प्रकारच्या भावना आहेत.जे सुखी प्राणी आहेत त्यांच्या ठिकाणी
मित्रत्वाची भावना करून तिच्यावर संयम केला असता मैत्रीबलाचा लाभ होतो. जे प्राणी
दुःखी आहेत त्यांच्या ठिकाणी करूणा भावना ठेऊन ,संयम केला असता करूणा बलाचा लाभ
होतो. जे पुण्यशील प्राणी आहेत त्यांच्या ठिकाणी मुदित भावना(प्रसन्न वृत्ती)
करावी . या मुदित भावनेवर ,संयम केला असता मुदित बलाचा वापर होतो. यावर शंका अशी
की जे पापी आहेत त्यांच्यावर उपेक्षा भावना का न करावी? त्या संयमामुळे उपेक्षा बल
प्राप्त होईल. यावर उत्तर असे की, उपेक्षा ही भावना होऊ शकत नाही. 'पापशीलेषु
उपेक्षा। न सा भावना। ततश्च सत्यां नास्ति समाधिरित्यो न बलमुपेक्षा ततस्तत्र
संयमाभावादिति।'
बलेषु
हस्तिबलादीनि ।।२४।।
हत्तिच्या बळावर संयम केला असता योग्याच्या अंगी हत्तीचे सामर्थ्य येते.
'यास्मिन्हहस्तिबले वायुवेगे, सिंहवीर्ये वा तन्यीभावेनायं संयमं करोति
तत्तत्सामर्थ्ययुक्तं सत्त्वमस्य प्रादुर्भवतीत्यर्थः।'
प्रवृत्तयालोकन्यासात्सूक्ष्मव्यवहितविप्रकृष्टज्ञानम् ।।२५।।
समाधिपादांत सूत्र ३६ मध्ये शोकरहित अशी सात्त्विक ज्योती उत्पन्न झाली
असता ती चित्तस्थैर्य उत्पन्न करते असे सांगितले आहे. ही जी प्रवृत्तिला विषय होणारी ज्योत तिचा जो सात्त्विक प्रकाश
त्या प्रकाशावर संयम करून त्याचा (त्या
प्रकाशाचा) न्यास (फेकणे) केला असता ज्या वस्तू दिसण्यास अडथळा आहे अशा
अत्यंत सूक्ष्म वस्तुंचे आणि ज्या वस्तू
अतिशय लांब (विप्रकृष्ट) आहेत अशा वस्तूंचे ज्ञान योग्यास होते.
योगसूत्र विभूतिपाद
भुवनज्ञानं सुर्यसंयमात् ।।२६।।
प्रकाशमय
सूर्यावर संयम केला असता सर्व भुवनांचे ज्ञान होते. सूत्र ३.२४ मध्ये सात्त्विक
प्रकाश हा संयमाचे आलम्बन होता. सूत्र ३.२६ मध्ये भौतिक प्रकाश आलम्बन म्हणून आहे.
चन्द्रे ताराव्यूहज्ञानम् ।।२७।।
चन्द्रावर
संयम केला असता ताराकापुजांचे ज्ञान होते. वास्तविक सूर्यावर संयम केला म्हणजेच
तारकापुजांचे ज्ञान व्हावयास पाहिजे पण भोजवृत्तिकार म्हणतात, 'सूर्यप्रकाशेन
हततेजस्कत्वात्ताराणां सूर्यसंयमात्तज्ज्ञानं न शक्तिनोति भवितुमिति
पृथगुपायो=भिहितः ।'
ध्रुवे
तग्दति ज्ञानम् ।।२८।।
ध्रुवावर संयम
केला असता तारकांच्या गतिचे ज्ञान होते.
नाभिचक्रे
कायव्युहज्ञानम् ।।२९।।
शरीराच्या
मध्यावर नाभिसंज्ञक सोळा आरांचे एक चक्र आहे. त्यावर संयम केला असता शरीराच्या
सर्व भागांचे ज्ञान होते. नाभिचक्र सोळा आरांचे आहे हे मत भोजवृत्तिकाराचे आहे.
काहींच्या मते याला बारा आरा आहेत. 'तन्नाभिमण्डले चक्रं प्रोच्यते मणिपूरकम्। व्दादशारे महाचक्रे पुण्यपाप विवर्जिते।'
(योगचूडामणि१३.) काहींच्या मते याला दहा
आरा आहेत. आरांचा विवाद्य विषय सोडून सूत्राचा अर्थ स्पष्ट आहे. या नाभिचक्रावर
संयम केला असता शरीरचनेचे स्पष्ट ज्ञान होते.
कण्ठकूपे
क्षुतपिपासानिवृत्तिः ।।३०।।
गळ्यांमध्ये
एक गर्ताकार प्रदेश (विहिरीसारखा खळगा असलेला ) जिभेच्या मूळभागी आहे. त्यास
कण्ठकूप म्हणतात. या कण्ठकूपावर संयम केला असता भूक, तृष्णा यांची निवृत्ती होते.
कूर्मनाड्यां स्थैर्यम् ।।३१।।
कण्ठकूपाच्या
कूर्मनाडी आहे. त्या नाडीवर , संयम केला असता अन्तःकरणास व त्याचबरोबर शरीरास
स्थैर्य प्राप्त होते.
मूर्धज्योतिषि
सिव्द्धदर्शनम् ।।३२।।
शिर व कपाळ यांच्यामध्ये एक छिद्र असून
सुषुम्नानाडीचा त्याछिकाणी संयोग होत
असल्याने हे छिद्र अति तेजयुक्त आहे. त्या तेजावर संयम केला असता द्यावा पृथिवी
यांच्या अंतराळवर्ति असणा-या सिद्धांचे दर्शन होते.
प्रतिभाव्दा सर्वम् ।।३३।।
प्रतिभेचे
वर्णन असे- 'निमित्तानपेक्षं मनोमात्रजन्यमविसंवादकं द्रागुत्पद्यमानं ज्ञानं प्रतिभा' कोणत्याही 'निमित्ताची अपेक्षा न
करता केवळ मनाच्याच प्रेरणेमुळे जे
अविसंवादी (निश्चितरूपाचे ) व त्वरित ज्ञान होते त्याला प्रतिभा म्हणतात.'
प्रतिभेची दुसरी व्याख्या 'नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा ' अशी आहे. प्रतिभेमुळेच पुरूषाला प्रकृतिपासूनचे भिन्नत्व कळते. त्या
प्रतिभेवर संयम केला असता शेवटची विवेकख्याति उत्पन्न होण्याच्या आधी प्रतिभा नामक
तारकेचे ज्ञान उत्पन्न होते. ह्यामुळे योग्यास सर्व विषयांचे ज्ञान आपोआप होते.
ह्दये
चित्तसंवित्।।३४।।
ह्दयावर संयम
असता स्वतःच्या व दुस-याच्या चित्ताचे ज्ञान होते. 'स्व चि्तगताः सर्वा वासनाः
परिचित्तगतांश्च रागादीन् जानातीत्यर्थः।'
सत्त्वपुरूषयोरत्यन्तासंकीर्णयोः प्रत्ययाविशेषो भोगः
परार्थात् स्वार्थसंयमात्पुरूषज्ञानम् ।।३५।।
सत्तवपुरूष
प्रधानाचा (प्रकृतिचा) परिणामविशेष व पुरूष हे वास्तविक अगदी भिन्न असताना
त्यांच्या भिन्नत्वाचे भान न होता ते एकच आहे हा जो भास (प्रत्ययाविशेष ) हाच भोग
. हे सत्तव जेव्हा पुरूष प्रधानाचे अविशेषाने भासणारे प्रत्ययरूपी दृश्य टाकते
तेव्हा पुरूष हा वुद्धिसत्त्वाने आपल्याकडेन पाहता केवळ चैतन्य शक्ति हेच आलम्बन
घेऊन पाहातो व या चैतन्य शक्तिरुपी
आलम्बन संयम केला म्हणजे पुरूषज्ञान होते.
आलम्बन संयम केला म्हणजे पुरूषज्ञान होते.
ततः
प्रातिभश्रावणवेदनादर्शास्वादवार्ता जायन्ते ।।३६।।
चैतन्यस्वरूप जो पुरूष त्यावर केला जाणा-या संयमाचा जो अभ्यास त्यापासून जे
ज्ञान उत्पन्न होते त्या ज्ञानाबरोबर
प्रतिभा स्फुरण पावतो व त्यायोगे दिव्य शब्दांचे
श्रवण होते, दिव्य स्पर्शांचे ज्ञान होते, दिव्य रूप दिसतात, दिव्य रूचि
उत्पन्न होतात व दिव्य गंधाचा आस्वाद मिळतो. 'वार्ता' याचा अर्थ 'गन्धसंवित्'
(सुवासाचे ज्ञान) असा आहे.
ते
समाधावुपसर्गाव्युत्थाने सिद्धयः ।।३७।।
आतापर्यंत
संयमामुळे उत्पन्न होणारे जे फल सांगितले
ते चित्ताच्या व्युत्थान स्थितीत सिद्धी
म्हणून जरी प्रसिद्ध प्र
असले तरी त्याच्या वापरामुळे समाधित मात्र उपसर्ग (अडथळे)
निर्माण होतात. यामुळे समाधिसिद्धि शिथील होते. म्हणून योग्याने या सिद्धिच्या
भरीस पडू नये.
बन्धकारणशैथिल्यात्प्रचारसंवेदनाच्च
चित्तस्य परशरीरावेशः ।।३८।।
ह्या सूत्रात
चित्ताचा दुस-याच्या शरीरात केव्हा प्रवेश होऊ शकतो हे सांगितले आहे. जेव्हा
बन्धाला कारणीभूत असलेला कर्माशय (कर्माचे ओझे) शिथिल होईल व ह्दय प्रदेशापासून
निघणारी जी चित्तवहानाडी त्या नाडीमधून
स्वतःच्या सर्व शरीरात जेव्हा ते चित्ताचा पूर्ण प्रचार होऊ लागल्याचे कळले तेव्हा
ते चित्त दुस-या मृत अगर जिवंत शरीरात
प्रवेश करू शकेल. 'चित्तस्य यो=सौप्रचारो ह्दयप्रदेशादिन्द्रिय व्दारेण
विषयाभिमुख्ययेन प्रसरः तस्य संवेदनं ज्ञानमियं चित्तवहानाडी अनया चित्तं वहित स्व
पर शरीरयोर्यदा संचारं जानाति तदा परकीयं शरीरं मृतं जीवच्छरीरं वा चित्त
संचारव्दारेण प्रविशति।'
उदानजयाज्जलपक्ङकण्टकादिष्वसग्ङ उत्क्रान्तिश्च।।३९।।
उदान वायूचा
जय झाला (उदान वायुवर ताबा आला ) म्हणजे पाणी, रूपादयस्तेषामनभिघातो नाशो न
कुतश्चिभ्दवति। नास्यरूपमग्निर्दहति व वायुः शोषयतीत्यादि।'
अणिमा महिमा
लघिमा गरिमा प्राप्तिरेव च।
प्राकाम्यमीशित्वं च वशित्वमष्टसिद्धयः ।।
परमाणुरूपतापत्तिरणिमासिद्धिरूच्यते।
महत्तवं
महिमाज्ञेया येनाल्पो=पि महान्भवेत्।।
लघिमा
तूलवल्लघुता गरिमा गूरूभावना ।
अङ्गुल्यग्रेण
चन्द्रादिस्पर्शनं प्राप्ति कामना।।
इच्छानामनभिघातः
प्राकाम्यासिद्धि योगिनाम्।
ईशित्वं सर्व
भूतानां शासनेन समाप्यते।।
उपसर्गारिवज्ञायन्त एताः प्रायेण योगिभिः।।
या आठ
सिद्धींचे वर्णन थोडक्यात असेः अणुभावाला
प्राप्त होण्याचे सामर्थ्य येणे ही अणिमासिद्धी . पर्वत किंवा हत्तिप्रमाणे
मह्दभाव प्राप्त होण्याची शक्ति येणे ही महिमासिद्धी. कापसाप्रमाणे हलके होणे ही
लघिमासिद्धी. सुवर्णाप्रमाणे जड होणे ही गरिमासिद्धी. अंगुलीच्या अग्राने
चन्द्राला स्पर्श करण्याचे सामर्थ्य येणे ही प्रप्तिसिद्धी. या ठिकाणी
''कामना" हा शव्द 'सिद्धी" या अर्थाने आला आहे. इच्छेरूप प्राप्ती होणे
ही प्राकाम्यासिद्धी . शरीर, अन्तःकरण , सर्व प्राणिजात यावर सत्ता चालविता येणे ही ईशित्वसिद्धी व सर्व जग वश करता येणे
ही वशित्वसिद्धी.
रूपलावण्यबलवज्रसंहननत्वानि कायसंपत्।।४६।।
भूतजयाने
कायसंपत् प्राप्त होते हे सूत्र ४५ मध्ये सांगितले. कायसंपतचा अर्थ सूत्र ४६ ने
कथन केला आहे. सुन्दर रूप, उत्तम लावण्य, अतिशय बल व वज्रासारखा कठिणपणा शरीरात
असणे यास कायसंपत् म्हणतात. 'वज्रसंहननत्वंनाम वज्रवत्कठिनासंहतिरस्य शरीरे
भवतीत्यर्थः ।।'
ग्रहणस्वरूपास्समितान्वयार्थवत्तवसंयमादिन्द्रियजयः ।।४७।।
ग्रहण म्हणजे
इन्द्रियांची विषयाभिमुखीवृत्ती. ज्यावेळी विषयाकार वृत्ती नसते त्यावेळी
इन्द्रिये आपल्या जागी सामान्य प्रकाश स्वरूपाने असतात. हे त्यांचे मूळ स्परूप.
चित्तांत अहंकाराचा जो एक एकसारखा अनुराग ही अस्मिता. या अस्मितेत सत्तव, रज व तम
या गुणांचा प्रकाश , प्रवृत्ती, स्थिती ह्यायोगे संबंध असणे हा अन्वय व ह्या
सर्वांचे पुरूषाला भोगापवर्म मिळवून देणे
हे अर्थवत्व. अनुक्रमाने या सर्वावर संयम
केला असता 'इन्द्रिजय ' सिद्धी प्राप्त होते.
ततो
मनोजवित्वं विकरणभावःप्रधानजयश्च ।।४८।।
इन्द्रियजय
प्राप्त झाला असता शरीरास अतिशय उत्तम गतिलाभ होतो. ते मनोगतिने वाटेल तिकडे जाऊ
शकते. देहनिरपेक्ष अशा रितीने इन्द्रियांना इच्छित कालातील विषयांचा उपभोग घेण्यास
सर्व वृत्तिंचा लाभ होतो. सर्वसामान्य माणसास एखाद्या विशिष्ट देशातील अगर कळातील
विषयांचा उपभोग घ्यावयाचा असला तर
त्यांना देहाने त्या देशापर्यन्तं जावे लागते किंवा त्या काळाची वाट पाहावी लागते
व नंतर देहाश्रित इन्द्रिये त्या विषयाचा भोग घेतात. परंतू ज्यास इन्द्रियजय
प्राप्त झाला आहे त्यास विशेष इन्द्रिय साधनांचा लाभ झालेला असतो. त्यायोगे
इन्द्रियाची वृत्ती देहनिरपेक्ष राहून इच्छित देशातील अगर काळातील सर्वसूक्ष्म अशा
विषयांचादेखील भोग घेऊ शकते. इन्द्रियजय ज्यास प्राप्त झाला आहे त्यास प्रधान जय
प्राप्त होतो. 'सर्वशित्वं प्रधानजयः' म्हणजे सर्व वस्तू त्याला वश असतात, सहंज मिळण्यासारख्या असतात. 'सर्व
प्रकृतिविकारवशित्वं प्रधानजयः। इति भाष्यम्।
योगसूत्र
विभूतिपाद
सत्त्वपुरूषान्यताख्यातिमात्रस्य सर्वभावाधिष्ठातृत्वं सर्वज्ञातृत्वं च
।।४९।।
सत्त्व
म्हणजे ज्या बुद्धीतून रज व तम यांच्या मलाचे आवरण पूर्ण धुतले गेले ते
बुद्धिसत्तव आणि पुरूष म्हणजे द्रष्टा हे दोन अत्यन्त भिन्न आहेत असे ज्ञान होणे
ही अन्यताख्याति. ख्याति म्हणजे ज्ञान. असे ज्ञान ज्या योग्यास प्राप्त झाले आहे त्या योग्याकडे सर्व भावांचे
अधिष्ठातृत्व येते. तो सर्व गुणपरिणामी भावांवर सत्ता चालवू शकतो व त्यास सर्व
वस्तुंचे यथावत् विवेकज्ञान होते व हेच त्याच्या
ठिकाणचे सर्वज्ञातृत्व.
तव्दैराग्यादिप दोषबीजक्षये कैवल्यम्।।५०।।
सर्व भावांचे
अधिष्ठातृत्व व सर्वज्ञातृत्व ह्या ज्या दोन सिद्धी योग्यास प्राप्त झालेल्या
असतात, ह्याबद्दलही जेव्हा त्याच्यात विरक्ती उत्पन्न होईल त्यावेळी सर्व दोषांचे
बीजभूत असलेली जी अविद्या तिचा नाश होऊन योग्यास कैवल्याची प्राप्ती होते. म्हणजे आत्यन्तिक
दुःखनिवृत्तिचा अनुभव त्यास येतो.
स्थान्युपनिमन्त्रणे सग्ङस्मयाकरणं पुनरनिष्टप्रसग्ङात्।।५१।।
स्थानिन्
म्हणजे देव 'स्थानानि येषां सन्ति ते स्थानिनो महेन्द्रादयो देवाः ।' या देवांनी
जरी भोग भोगण्यासाठी आमंत्रण दिले तरी त्या भोगाचा संग करू नये. त्या भोगाविषयी
आसक्ती ठेवू नये व देवादिकांनीसुद्धा आपणास भोग भोगण्यासाठी बोलावले
असे जाणून आश्चर्य वाटून घेऊ नये.
'स्मयमपि न कुर्यादेवमहं देवानामपि प्रार्थनीय इति।' कारण अशा प्रकारच्या सग्ङ व
स्मयाने (आश्चर्याने) देखील चित्तव्युत्थानाला अवसर मिळून विक्षेप उत्पन्न होतो. व
पुनः वासनेच्या जाळ्यात सापडण्याचा अनिष्ट प्रसंग ओढवतो.
क्षणतत्क्रमयोः संयमाव्दिवेकजं ज्ञानम् ।।५२।।
क्षण= कालाचा
अत्यन्त सूक्ष्म भाग आणि त्याचा क्रम म्हणजे पूर्वी गेलेला , आता असलेला व पुढे येणारा क्षण व त्यांचा क्रम
यावर संयम केला असता विवेकज ( विवेकापासून उत्पन्न होणारे) ज्ञान उत्पन्न होते.
क्षणः
सर्वान्त्यः कालानयवो यस्य कलाः प्रभिवितुं न शक्यन्ते । क्षण हा कालाचा सर्वांत
शेवटचा अवयव की ज्याचा पुढे विभाग करता येत नाही. 'परमाकर्षपर्यन्तः कालः क्षणः।
तत् प्रवाहाविच्छेदस्तु क्रमः। '
क्रमः =पौर्वापर्येण परिणामः। पूर्वक्षण, वर्तमानक्षण,
उत्तरक्षण हा कालाचा क्रम आहे.
जातिलक्षणदेशैन्यतानवच्छेदात्तुल्ययोस्ततः प्रतिपत्तिः ।।५३।।
दोन वस्तुंचा
भेद, (अन्यता = दोन वस्तुचा वेगळेपणा) जाती, लक्षण व देश यांवरून प्रतीत होतो.
गायीची जात म्हशीहून भिन्न आहे. ही जाती-अन्यता. काळी गाय, पांढरी गाय ही
लक्षणअन्यता. मद्रदेशाची गाय व काश्मीर देशाची गाय ही देशअन्यता. या तीनही प्रत्ययांवरून
वस्तुंचा वेगळेपणा लक्षात न येता त्या
दोन वस्तू सारख्याच आहेत अशी
जर प्रचिती आली तर जाती, लक्षण व देश
यांवर संयम केला असता भेदज्ञान होते.
प्रतिपत्तिः म्हणजे भेदाने दोन वस्तु निराळ्या आहेत हे कळणे. सूत्राचा अर्थ
'यत्रकेनचिदुपायेन भेदो नावधारयितुं शक्यस्तत्र संयमाभ्दवत्येव भेद प्रतिपत्तिः ।'
तारकं सर्वविषयं सर्वथाविषयमक्रमं
चेति विवेकजं ज्ञानंम्।।५४।।
विवेकज म्हणजे
विवेकापासून उत्पन्न होणारे ज्ञान, ते चार प्रकारचे आहे: तारक, सर्वविषय, सर्वथा
विषय व अक्रम.
तारक ज्ञान
हे स्वतःच्या प्रतिभेपासून स्फुरण पावते.
'तारकमिति स्व प्रतिभोत्थामनौपदेशिकं ज्ञानम्। ' सर्वविषयं =सर्वाणि महादादीनि
तत्त्वानि विषयो यस्येति ज्ञानम्। सर्व विषयांचे ज्ञान असणे हा विवेकज ज्ञानाचा
दुसरा प्रकार . सर्वथा विषयज्ञानम्हणजे
मागे होऊन गेलेले व पुढे होणारे सर्वज्ञान
होणे. 'अतीतानागतप्रत्युत्पन्नं सर्वं सर्वथा जानाति। सर्वोण
प्रकारेणावस्थितानि तत्त्वानि विषयो यस्येति सर्वथा विषय ज्ञानम् ।'
अक्रम ज्ञान
म्हणजे कोणत्याही क्रमाने ज्ञान न होता ज्यावेळी ज्या ज्ञानाची इच्छा होईल त्यावेळी ते ज्ञान होणे.
'अक्रममित्येक क्षणोपारूढं सर्वं सर्वथा गृह्णाति। सर्वं
करतलामलकवद्युगपत्पश्यति।'
सत्त्वपुरूषयोः शुद्धिसाम्ये कैवल्यम् ।।५५।।
सर्वकर्तृत्वाभिमानाची निवृत्ती झाली असता सत्त्वशुद्धी होते. पुरूषाला
मिळणा-या भोगाचा अभाव झाला की पुरूषाची शुद्धी होते. 'सत्त्वस्य
सर्वकर्तृत्वाभिमाननिवृत्या स्वकारणे=नुप्रवेशः पुरूषस्य कैवल्यमुत्पचारित भोगाभाव
इति व्दयोः समानायां शुद्धौ पुरूषस्य कैवल्यमुत्पद्यते। मौक्षोभवतीत्यर्थः।'
सत्त्व व पुरूष या दोहोंतही जेव्हा
शुद्धी साम्य होईल तेव्हा ती पुरूषाची मोक्ष स्थिती.
येथे पातञ्ञल
योगसूत्राचा तृतीयोध्यास समाप्त झाला.
-------------------------------------------------------------------------
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें