गुरुवार, 28 दिसंबर 2017
बुधवार, 27 दिसंबर 2017
बुधवार, 20 दिसंबर 2017
सोमवार, 11 दिसंबर 2017
रविवार, 3 दिसंबर 2017
सोमवार, 27 नवंबर 2017
शनिवार, 25 नवंबर 2017
गुरुवार, 23 नवंबर 2017
मंगलवार, 21 नवंबर 2017
सोमवार, 20 नवंबर 2017
मंत्र-पठण-वर्ग
Rig Veda Mandala IV Sukta I Vamadeva Gautam
अमेरिकेत आमच्या न्यू जर्सी राज्यात ब्रिजवॉटर शहरात भव्य हिदू मन्दिर आहे. अनेक वर्षांपूर्वी त्या देवळात आम्ही काही सहकारी Hinduism Study Group चालवायचो. तेव्हा मंत्र-पठण-वर्ग सुद्धा घ्यायचो. म्हणून सांगतो की ---
(१) अनुदात्त उच्चार पोटातल्या बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे. (जोराने नव्हे, पण सहजपणे). आणि तो करताना छातीतल्या फुफ्फुसातली (सर्वच नव्हे पण बरीचशी) हवा बाहेर पडायला हवी.
(२) उदात्त उच्चार करताना तो डोक्यावरच्या टाळू पाशी जाऊन भिडायला हवा.
(३) स्वरित उच्चार Electronics Lab. मधल्या Oscilloscope वर Sine-wave waveform जशी दिसते, तसा व्हायला हवा.
रविवार, 19 नवंबर 2017
शनिवार, 18 नवंबर 2017
संत ज्ञानेश्वरांचे समाधी अभंग -- नामदेव विरचित
received from Shreepad Deshpande
sudesh.chogle @gmail.com ---
shreeshruti62 @gmail.com
सप्रेम नमस्कार, आज कार्तिक क्रुष्ण १३, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजिवन समाधीच्या पर्वदिनाच्या निमित्ताने त्यांच्या चरणी शि.सा.नमस्कार.
सप्रेम नमस्कार, आज कार्तिक क्रुष्ण १३, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजिवन समाधीच्या पर्वदिनाच्या निमित्ताने त्यांच्या चरणी शि.सा.नमस्कार.
श्री नामदेवरायांच्या अभंगांनी त्यांच्या चरणी ही भावांजुली
संत ज्ञानेश्वरांचे समाधी अभंग
पुसताती संत सांगा देवा मातं । पूर्वी येथे होते कोण क्षेत्र ॥१॥
देव म्हणे स्थळ सिध्द हे अनादी । येथेच समाधी ज्ञानदेवा ॥२॥
अष्टोत्तरशे वेळां साधिली समाधी । ऐसे हे अनादि ठाव असे ॥३॥
नामा म्हणे देवा सांगितले उत्तम । ज्ञानांजन सुगम देखो डोळा ॥४॥
मंगलमूर्ति सुखधामा । भक्ताचिया कल्पद्रुमा ।
निवृत्तीया पुरुषोत्तमा । नमो तुज ॥१॥
विद्यासागरा वैरागरा । संकटी माऊली ज्ञानेश्वरा ।
भरीत दाटले अंबरा । तो तू योगेश्वरा मोक्षदायी ॥२॥
मति चालविली रसाळ । संत श्रोतयां केला सुकाळ ।
दिधले पुरुषार्थाचे बळ । ते तूं केवळ संजीवन ॥३॥
अमृतानुभव आनंदलहरी । ग्रंथ सिध्द केला ज्ञानेश्वरी ।
संस्कृत प्राकृत वैखरी । वदविली माझी ॥४॥
आता मोक्षाचिया वाटा । पाहिला षडचक्र चोहटा ।
आज्ञा द्यावी वैकुंठा । ज्ञानदेव म्हणे ॥५॥
पुढे वाचा अष्टोत्तरशे वेळ समाधी निश्चळ । पूर्वी तुझो स्थळ वहनाखाली ॥१॥
उठविला नंदी शिवाचा ढवळा । उघडिली शिळा विवराची ॥२॥
आसन आणि धुनी मृगछालावर । पाहती ऋषीश्वर वोसंडोनी ॥३॥
बा माझया समाधी पाहिली जुनाट । केवळ वैकुंठ गहयगौप्य ॥४॥
नामा म्हणे देवा पुरातन स्थान । ऐसे नारायणे दावियेले ॥५॥
हस्त ठेविला माथया । ज्ञानदेव लागे पायां ।
विठोजी म्हणे लवलाहया । समाधीस बैसले ॥१॥
इंद्र चंद्र देव येती । ब्रह्मदिक गीते गाती ।
यम वरुण बृहस्पती । विमाने दाटती अंतरिक्षी ॥२॥
तंव पातले गरुडदेव । रुक्मिणी सत्यभामा भाव (माय) ।
राही माता गोपी सर्व । समाधि ज्ञानदेव पहावया ॥३॥
ब्रह्मा इंद्र प्रजापति । सर्व अंतरिक्षी पहाती ।
अलंकापुरी येत श्रीपती । हरुष चित्ती ज्ञानदेवा ॥४॥
ऋषिमुनी गणगंधर्व । पिशाच्च गहयक सर्व ।
ध्रुव अंबऋषि माधव । चित्तीं भाव पहावया ॥५॥
ऐसी दाटली विमाने । संत जाणताती ज्ञाने ।
ज्ञानदेव ब्रह्म होणे । हे विंदान विठ्ठलाचें ॥६॥
जय जय शब्दे ध्वनि गर्जे । तेणे स्वर्ग मृत्यु पाताळ गाजे ।
पाताळी शेष म्हणे भुंजे । प्रेमे फुंजे न समाये ॥७॥
नामा म्हणे शिवादिकां । सिध्देश्वरी मिळाले सकळिकां ।
पाहती विठ्ठल कौतुका । ज्ञानदेव समाधीचें ॥८॥
तव तेथे लवल वर्तले । आकाश असे विमानी दाटली ।
म्हणती मुळपीठ वैकुंठ देखील ॥ पुंडलिका सकट ॥१॥
पंढरीहूनी आले कैसे । पुंडलिक देव सरसे ।
ज्ञानदेवा सवे नामा असे । आणि विष्णुभक्त अपार ॥२॥
राही रखुमाई सत्यभामा । गाई गोपाळ मेघ:शामा ।
म्हणती पहा हो महिमा । या विष्णुभक्ताचा ॥३॥
सवे ध्रुवप्रल्हाद अंबऋषी । रुक्मांगद सुर्यवंशी ।
आणि ऋषीमुणी तापसी । ऐसे सहित वनमाळी ॥४॥
बळी भीष्म नारद । उध्दव अक्रुर विदगद ।
आणि बिभीषण सुबुध्द । हनुमंतादि करुनी ॥५॥
हाहा हूहू गंधर्व गाती । रुणु झुणु रुणु झुण विणे वाजती ।
देवांगना आरती ओवाळती । देवभक्तांसहित ॥६॥
ऐसा शुभ काळ समयो । झाला भाग्याचा उदयो ।
ज्ञानदेव नामदेव पहावो । धन्य धन्य धरातळीं ॥७॥
नामा नुघडी दृष्टीसी । ह्र्दय ध्यातसे ऋषीकेशी ।
ज्ञानदेवो निजमानसी । विष्णुमूर्तीशी लीन झाला ॥८॥
महाउस्त्सव त्रयोदशीं । केला त्या ज्ञानदेवासी ।
मग नामा म्हणे विठोबासी । चरण धरुनियां ॥१॥
समाधिसुख दिधले देवा । ज्ञानांजन अलंकापुरी ठेवा ।
अजानवृक्षी बीज वोल्हावा । या भक्तजनांसी ॥२॥
कृपा आली विठठलासी । म्हणे ज्ञानदेव परियेसी ।
तीर्थ भागीरथी अहर्निशी । तुज नित्य स्नानासी दिधली ॥३॥
इंद्रायणी दक्षिण वाहिनी । भागिरथी मणिकर्णिका दोन्ही ।
इया मिळालिया त्रिसंगमीं । पूण्यभूमी तुझिये ॥४॥
येथे जरी नित्य स्थान घडे । तरी नित्य वैकुंठवास जोडे ।
तुज नाही कुवाडे । मी कोडे उभा असे ॥५॥
जेथे हरिकथा नाम वाचे । जो उच्चरील विठठलाचे ।
तयांसी पेणे वैकुंठीचें । दिधले साचे अक्षयी ॥६॥
आणिक ऐके रे ज्ञानराजा । जो या सिध्देश्वरी करी पूजा ।
तो अंतरंग भक्त पै माझा । मुक्ती सहजा जाहली त्यासी ॥७॥
नामा म्हणे ऐसे अंतरंग । कैसा ओळला पांडुरंग ।
ज्ञानदेवी समाधि सांग । हरे पांग कीर्तने ॥८॥
गगनपंथे शुभ्र विमानें । देव लक्षिती अधोवदनें ।
तंव अलंकमापुरी कीर्तने । टाळ मृदुंग झणत्कार ॥१॥
जयजयकार क्षिती होत । महादोषा संहार घात ।
नामा असे नाचत । पांडुरंगे म्हणितलें ॥३॥
ज्ञानदेव बैसले समाधी । पुढे अजानवृक्ष निधी ।
वामभागीं पिंपळ क्षिती सुवर्णाचा शोभत ॥४॥
निवृत्ती सोपान खेचर । ज्ञानदेव मुक्ताई निरंतर ।
करुनि अंत:करणा स्थिर । उत्तरद्वारी बैसले ॥५॥
देव म्हणे ज्ञानेश्वरा । चंद्रसूर्य जंव दिनकरा ।
तंव तुझा समाधि स्थिर । राहो रे निरंतर ॥६॥
जंववरी हे क्षिति मंडळ । जंववरी हे समुद्रजळ ।
मग कल्पक्षयीं यथाकाळ । माझ्या हृदयी ठसावे ॥७॥
आणिक एक सोपारें । ज्ञानदेव ही चारी अक्षरें ।
जो जप करील निर्धारे । त्यासी ज्ञान होईल ॥८॥
ऐसा दिधला आशीर्वादा । संतासी बोले गोविंद ।
ज्ञानदेवा ऐसा उदबोध । दुजा न । देखो दृष्टीसी ॥९॥
नामा म्हणे स्वामी माझा । अगीकार केला वोजा ।
पावला भक्ताचिया काजा । गरुडारुढ होऊनी ॥१०॥
ब्रह्मादिक तेथे करिताती पूजा । घालिताती सेजा समाधीसी ॥१॥
चिद्रत्न आसन उन्मनीची धुनी । समाधि सज्जनी पाहियेली ॥२॥
धुवट वस्त्राची घडी ते अमोल । तुळशी आणि बेल आंथरिले ॥३।१
दुर्वा दर्भ वरी टाकिले मोकळे । पुष्पे तरु सकळ समर्पिली ॥४॥
नामा म्हणे छाया निरंतर । सुखी ज्ञानेश्वर सुखावला ॥५॥
लावियेला दीप निरंजन ज्योती । प्रकाशल्या दीप्ती तन्मयाच्या ॥१॥
पजुनी समाधि निघाले बाहेर । प्रेमे ज्ञानेश्वर डुल्लतसे ॥२॥
अनुमानिले स्थळ सभोवती सारें । धन्य ज्ञानेश्वर कृपा केली ॥३॥
देव आणि नामा रुक्माई । राही स्फुंदती ठायी ठायी संतजन ॥४॥
वोसंडोनि निवृत्ति आलिंगो लागली । आणिकांच्या डोळां अश्रु येती ॥१॥
अमर्यादा कधी केली नाही येणे । शिष्य गुरुपण सिध्दि नेलें ॥२॥
गीतार्थाचा अवघा घेतला सोहळा । गुह्य गौप्यमाळा लेवविल्या ॥३॥
फेडिली डोळ्यांची अत्यंत पारणी । आतां ऐसे कोणी सखे नाही ॥४॥
काढोनियां गुह्य देवे केले फोल । आठवती बोल मनामाजी ॥५॥
नामा म्हणे संत कासावीस सारे । लाविती पदर डोळियांसीं ॥६॥
पुढे ज्ञानेश्वर जोडोनियां कर । बोलतो उत्तर स्वामीसंगे ॥१॥
पाळीले पोसिले चालविला लळा । बा माझ्या कृपाळा निवृत्तिराजा ॥२॥
स्वामीचियां योगे झालो स्वरुपाकार । उतरलो पार मायानदी ॥३॥
निवृत्तीने हात उतरिला वदना । त्यागिले निधाना आम्हांलागीं ॥४॥
नामा म्हणे देवा देखवेना मज । ब्रह्मी ज्ञानराज मिळविला ॥५॥
निवृत्तिदेव म्हणे करितां समाधान । कांही केल्या मन राहात नाही ॥१॥
बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट । ओघ बारा वाटा मुरडताती ॥२॥
बांधल्या पेंढीचा सुटलासे आळा । तृण रानोमाळा पांगलेसे ॥३॥
हरिणीविण खोपी पडियेली वोस । दशदिशा पांडस भ्रमताती ॥४॥
मायबापे आम्हां त्यागियेले जेव्हां । ऐसे संकट तेव्हां झाले नाही ॥५॥
नामा म्हणे देवा पेटला हुताशन । करा समाधान निवृत्तीचे ॥६॥
सर्व स्वस्तिक्षेम वैष्णव मंडळी । बैसलेती पाळी समाधीच्या ॥१॥
पताकांची छाया दुणावली फार । सिध्द ज्ञानेश्वर तेंव्हा झाले ॥२॥
अजानवृक्ष दंड आरोग्य अपार । समाधीसमोर स्थापियेला ॥३॥
कोरडया काष्ठा फुटियेला पाला । तेव्हां अवंघियाला नमस्कारी ॥४॥
नामा म्हणे देवा घार गेली उडोन । बाळे दानादान पडियेली ॥५॥
साडेतीन पाउले टाकिली निश्चळ । नेमियले स्थळ उत्तरायणीं ॥१॥
देव म्हणे ज्ञाना होई सावधान । माग वरदान मज कांही ॥२॥
ज्ञानदेव म्हणे शुध्द कार्तिक मासीं । व्रत एकादशी स्वामीकडे ॥३॥
कृष्णपक्षी व्रत हरिदिन परिपूर्ण । मागितला मान ज्ञानदेवें ॥४॥
नामा म्हणे देवा आवडीने देता । जोडले हे संता पीयूष जैसें ॥५॥
देव निवृत्ति यांनी धरिले दोन्ही कर । जातो ज्ञानेश्वर बैसावया ॥१॥
नदीचिया माशा घातले माजवण । तैसे जनवन कालवले ॥२॥
दाही दिशा धुंद उदयास्तावीण । तैसेचि गगन कालवले ॥३॥
जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी । पुढे ज्ञानेश्वरी ठेवियेली ॥४॥
ज्ञानदेव म्हणे सुखी केलें देवा । पादपदमी ठेवा निरंतर ॥५॥
तीनवेळा तेव्हा जेव्हा जोडिले करकमळ । झांकियले डोळे ज्ञानदेवे ॥६॥
भीममुद्रा डोळां निरंजन मैदान । झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥७॥
नामा म्हणे आतां लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ॥८॥
निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळा । घातियेली शिळा समाधीसी ॥१॥
सोपान मुक्ताई सांदिली शरीरा । म्हणती धरा धरा निवृत्तीसी ॥२॥
आणिकांची तेथे उद्विग्न ती मनें । घालिताती सुमने समाधीसी ॥३॥
नामदेवे भावे केली असे पूजा । बापा ज्ञानराजा पुण्यापुरुषा ॥४॥
देव म्हणे रुक्मणी । हा ऐकची योगी देखिला नयनीं ।
हेचि ज्ञान संजीवनी । जाण त्रैलो क्यासी ॥१॥
धन्य धन्य धरातळी । जो याते दृष्टी न्याहाळी ।
तो वहात येईल टाळी । वैकुंठ भुवनासी ॥२॥
जो करील याची यात्रा । तो तारील सकळ गोत्रा ।
सकळही कुळें पवित्रा । याचेनि दर्शने होती ॥३॥
अलंकापुरी हे शिवपीठ । पूर्वी येथे होते नीलकंठ ।
ब्रह्मादिकी तप वरिष्ठ । येथेचि पैं केलेंडर ॥४॥
इंद्र येऊनियां भूमीसी । याग संपादिले अहनीशी ।
इंद्रायणी इंदोरिसी । पंचक्रोशी यापासुनीं ॥५॥
येथे त्रीवेणी गुप्त असें । भैरवापासुनी भागीरथीं वसे ।
पूर्व वटी जे माया दिसे । ते प्रत्यक्ष जाण पार्वती ॥६॥
भोवती वन वल्ली वृक्षी । येथे देव येऊनी होती पक्षी ।
हे असे नित्य साक्षी । अस्थी नासती उदकी ॥७॥
पंढरीहूनि हे सोपे । जनांची हरावया पापे ।
कळिकाळ कोपलिया कांपे । न चले चि अलंकापुरासी ॥८॥
ऐसे सांगतां हरीसी । प्रेम आसेंडले रुक्मीणीसी ।
म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी । ज्ञानदेव जन्मलें ॥९॥
नामा म्हणे माझा स्वामीं । वसे संत समागमी ।
ऐसे संगीतले ग्रामी । अलंकापुरासी ॥१०॥
समाधि परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर । उठविले भार वैष्णवांचे ॥१॥
अलंकापुरी सव्य घेतली ते संती । दिली भागीरथी ज्ञानालागी ॥२॥
भैरवापासूनि उगम निरंतर । रानोमाळ झरे तीर्थ गंगा ॥३॥
सैंध इंद्रायणी वाहती मिळोनी । अखंड ते क्षणीं ओघ जाती ॥४॥
चालिले विमान गंधर्व सुरगण । यात्रा परिपूर्ण झाली म्हणती ॥५॥
तीर्थ महोत्सह झाला म्हणती सारासार । देव ऋषीश्वर परतले ॥६॥
वैष्णवांचे भार निघाले बाहेरी । केला जयजयकार सर्वत्रांनी ॥७॥
पंढरीचा पोहा निघाला बाहेर । गरुडावरी स्वार देव झाले ॥८॥
नामा म्हणे ऐसा सुखी ज्ञानेश्वर । झाला असे स्थिर ब्रह्मबोधें ॥९॥
ऐसियांचे जो चरित्र आवडी ऐके । तो या भक्तांबरोबरी तुके ।
भोगी वैकुंठ निजसुखे । देव स्वयंमुखे बोलिलें ॥१॥
धन्य धन्य तो पुंडलिक भक्त । जया कारणे हरि तिष्ठत ।
ऐसे पोवाडे गर्जतात । जग तारीत नामे करुनि ॥२॥
जन्मोजन्मी सभाग्य होती । तयांलागी निजपद प्राप्ति ।
करा काळी पुनरावृत्ति । न येती मागुती संसारी ॥३॥
नामा म्हणे नामस्करणे । तुटती प्रपंचधरण बंधनें ।
ते सुख पावती निधान । समचरण देखलियां ॥४॥
ज्ञानदेवांच्या विरहाचे दु:ख त्यांच्या भावंडांखालोखाल नामदेवांस झाले असणार कारण ज्ञानदेवांसोबत केलेली उत्तर भारतातील तीर्थयात्रा व त्यावेळेस मिळालेला दीर्घ सहवास.
देवाचा लाडका असल्याने समाधीपश्चात ज्ञानदेवांच्या सगुण दर्शनाचा हट्ट देवांनी पुरविल्याचा उल्लेख नामदेवांच्या अभंगात आढळतो.
मग प्रश्न आदरिला । नामा फुंदों जो लागला ।
कां गा ज्ञानदेवो गेला । मज सांडुनियां ॥१॥
कैसा होय तुझा दास । कैसी पाहों तुझी वास ।
ज्ञानाकारणें कासाविस । जीव माझा होतसे ॥२॥
देव म्हणे नामयासी । तूं झणीं कासाविस होसी ।
तूं रे तयातें नेणसी । तें कैसें आईक पां ॥३॥
ज्ञानदेव ज्ञानसागरु । ज्ञानदेव ज्ञानागरु ।
ज्ञानदेव भवसिंधुतारुं । प्रत्यक्ष रुपें पैं असे ॥४॥
ज्ञानदेवीं ज्ञानगम्य । ज्ञानदेवीं ज्ञानधर्म्य ।
ज्ञानदेवीं ज्ञानने । सर्वथैव पैं असे ॥५॥
ज्ञानदेव हाचि देव । ज्ञानदेवीं धरलिया भाव ।
ज्ञान होईल जीवां सर्व । यासी होय समाधान ।
जीव शिवीं परिपूर्ण । एके रात्रीं कीर्तन केलिया ॥७॥
झणें तूं व्याकुळ होसी चित्तें । मनीं आठवी गा माते ।
नामस्मरणें एका चित्तें । रामकृष्ण गोविंद ॥८।
नामा म्हणे तूं समर्थ होसी । अर्जुनीं प्रीति करिसी ।
हें सांगितलें व्यासीं । एकादशाध्यायीं ॥९॥
तैसा पावे तूं विश्वा । विश्वरुपा जगन्निवासा ।
मी होतसे कासाविसा । ज्ञानदेवाकारणे ॥१०॥
तरी तूं गा युगानयुगी । असशी भक्तांचिया संगीं ।
आम्ही विनटलों पांडुरंगीं । रंगारंगीं विठठलीं ॥११॥
एक वेळ माझा शोक । दुरी जाय हरे विख ।
तें करी निर्विशषे । नामा येतसे काकुळती ॥१२॥
तंव नावेक श्रीहरी । तटस्थ घटिका चार्ही ।
ध्यान धरुनी अंतरीं । निश्चळ राहिला ॥१॥
जयजय शब्द नामा बोभाये । केशवा त्राहे त्राहे ।
मी व्याकुळ होत आहें । ज्ञानदेवाकारणें ॥२॥
नारायण त्राहे त्राहे । कृपादृष्टी तूं रे पाहे ।
मी व्याकुळ होत आहें । ज्ञानदेवाकारणें ॥३॥
तुझेनि दर्शनें । ज्ञानाचेनि अवलोकनें ।
मज पंढरीस असणें । तुझे चरणी गा विठठला ॥४॥
आतां मज तूं सांभाळी । ज्ञानदेवेंवीण सदाकाळीं ।
मज न कंठे भूमंडळी । भानुसहित वर्ततां ॥५॥
तूं माझी जनक जननी । परि ज्ञानदेवेंविण मेदिनी ।
शून्य वाटे हे धरणी । जैसे मत्स्य जीवनेंविण ॥६॥
तूं रक्षिता सर्व जीवांसी । तरी कां दुःख दिधलें आम्हांसी ।
तूं जवळी असतां ह्रषिकेशी । ऐसी दशा हे प्राप्त ॥७॥
नामा खेदें क्षीण जाला जीवें । तंव नेत्र उघडिले देवें ।
आलिंगला केशवें । चार्ही भुजा पसरुनी ॥८॥
नामा न राहे खेद करुं । केशव ठेवी अभय करु ।
म्हणे तूं दुःखिया होसी थोरु । ज्ञानदेवाकारणें ॥१॥
धन्य धन्य तुम्ही भक्त । नित्य विष्णुचरणीं रत ।
पुण्यशील भागवत । ज्ञानदेव नामया ॥२॥
तुमचेनि जग हें कृतार्थ । कवित्वें तरेल हें सत्य ।
मायामोहो निरसे समस्त । नामस्मरणें तुमचेनी ॥३॥
धन्य ज्ञानादेव ज्ञानशीळ । ज्ञानदेवा ऐसा सुढाळ ।
मी न देखें भूमंडळ । सकळही पाहतां ॥४॥
तूं करिसी खेद त्याचा । तरी तो आत्मा माझा साचा ।
भाव सांडी सांडी द्वैताचा । निखळ स्वरुप पाहे पां ॥५॥
तुम्ही भक्त अवघे आवडते । तुमचेनि साजिरे पूर्णचित्तें ।
मज पंढरिये येणें आवडतें । नाम गाताती ये प्रीतीं ॥६॥
पुंडलिक माझा भक्त सखा । परी प्रेमळ तुम्ही विशेषा ।
तुमचेनि सर्व दुःखा । हरणें मी हें जाणावें ॥७॥
नामा म्हणे ज्ञानदेवाचें । मज दरुषण होईल साचें ।
तरीच रंगणी मी नाचें । हरिकीर्तनीं पंढरीये ॥८॥
ऐसें परियेसिलें विठठलें । तंव रुक्मिणीनें विनविलें ।
याचें करिजो जी म्हणितलें । हाकारिजो पुंडलिका ॥१॥
धन्य धन्य धरातळीं । वोळले वोळले वनमाळी ।
वैष्णवी पिटली टाळी । जयजय शब्दें करुनियां ॥२॥
गरुडासी सांगे केशव । कैसा भेटे यासी ज्ञानदेव ।
पुंडलिकासी जाऊनी सर्व । वृत्तांत सांगे येथींचा ॥३॥
तेणें नमस्कारुनि हरी । निघाला पक्षाच्या फडात्कारीं ।
भेटला पुंडलिका झडकरी । यथाविधि सांगितलें ॥४॥
पुंडलिकें विस्मित चित्तीं । म्हणे धन्य धन्य ज्ञानमूर्ती ।
ज्या कारणें वैकुंठपती । आळंकापुरीसी गेले ॥५॥
धन्य धन्य विठोबाचे चरण । धन्य धन्य माझे नयन ।
धन्य नामा रुपीं संपन्न । विष्णु भक्त सखा माझा ॥६॥
मग गरुडासि पूजिलें । ज्ञानदेवा हाकारिलें ।
दिव्य विमानीं बैसविलें । चला म्हणितलें आळंकापुरीसी ॥७॥
नामा असे खेद करीत । केशव तयासी संबोखित ।
तुम्हा दोघांचा येकांत । माझेनि संगें पुरेल ॥८॥
पुढें चालिला गरुड । आक्रमित अवघें ब्रह्मांड ।
विमान शुभ्र चंड । पुंडलिक आणितसे ॥१॥
धन्य हरिभक्तांचा मेळ । धन्य धन्य तो गोपाळ ।
धन्य धन्य आळंकापुरी सुढाळ । ज्ञानदेव येतसे ॥२॥
दुरोनी लक्षित रुक्मिणी । हरुषें सांगे चक्रपाणि ।
पैल विमान येतसे गगनीं । दाखविजे नामया ॥३॥
मग नामयासी सावध । करुनियां तो गोविंद ।
म्हणे तुझा पुरविला रे छंद । पैल ज्ञानदेव येताहे ॥४॥
नेत्र विकसित पाहे । तंव गगनी विमान दिसताहे ।
पुंडलिक गरुड आहे । दिव्य देहीं दिव्य विमानीं ॥५॥
ऐसा जंव तटस्थ घटिका । तंव उतरलें निमिष्य एका ।
नामा पावला संतोषा । ज्ञानदेवा देखोनी ॥६॥
विमानघंटी गर्जत । नामा पुढारा चालत ।
जी जी रुक्मिणी म्हणत । वेगु कीजे ज्ञानदेवा ॥७॥
नामा ज्ञानदेव भेटले । पुंडलिकें विष्णु नमस्कारिले ।
भक्तीं जयजय शब्द केले । देवी पुष्पवृष्टि केलिया ॥८॥
आलिंगन पडिलें दृढ । मिठी पडिली न सुटे गूढ ।
पुंडलिक म्हणे मज चाड । या विठठल चरणाची ॥१॥
तुझे दरुषण माझा लाभ । जैसा ज्ञानदेवावरी लोभ ।
नामयावरी स्वयंभ । तैसाचि करी विठठला ॥२॥
नामदेवे आळंगुनी प्रीती । शिर चरणावरी अवचितीं ।
ज्ञानदेवाच्या ठेवी पुढतीं । म्हणे धन्य क्षितीं मी एक ॥३॥
पुंडलिक म्हणे नामया । धन्यधन्य तुझा थाया ।
क्षिती आणिलें वैकुंठराया । ज्ञानदेवाचेनि स्मरणें ॥४॥
धन्य युगानयुगीं तुम्ही । धन्य देखिलें तीं आम्ही ।
धन्य आळंकापुर जन्मीं । उपजोनी जो देखेल ॥५॥
पंढरीहुनी हें मूळपीठ । जुनाट पैं वैकुंठ ।
पूर्वीं येथे होते नीळकंठ । ब्रह्मविष्णुरुद्रइंद्र ॥६॥
तें हें शिवक्षेत्र प्रत्यक्ष । पूर्वे मातुलिंग साक्ष ।
तेथेंही केशव प्रत्यक्ष । चतुर्भुजरुपें असे ॥७॥
दक्षिण पुण्येश्वर देवो । पुण्यस्थळ महादेवो ।
मूळपीठीं नागेंद्रीं पाहा हो । त्रिवेणीरुपीं वाहातसे ॥८॥
पश्चिमे इंदोरिये देवो । ब्रह्मेश्वर उत्तम ठावो ।
उत्तरे सिद्धेश्वर देवो । खेटकग्रामी भागीरथी ॥९॥
मध्यस्थळीं हे इंद्रायणी । सरसी भागीरथी वाहिनी ।
सिद्धेश्वर शोभे स्थानीं । ज्ञानेदेवो सहित ॥१०॥
ऐसिये दक्षिण वाहिनीसी । स्नान घडता अहर्निशीं ।
कोटि तीर्थें प्रयाग काशी । प्रसन्न होती हरिहर ॥११॥
ऐसिये तीर्थीं देवा । समाधि दिधली ज्ञानदेवा ।
पुंडलिक विनवितसे केशवा । धन्य भाग्य नामयाचें ॥१२॥
स्वर्ग मृत्यु पाताळ तिन्हीं ताळे उदर । विराटले थोर विश्वरुप ॥१॥
समाधिसंजीवन निवृत्ती फावले । तें निधान देखिलें आम्ही तुम्ही ॥२॥
निवृत्ति सोपान ज्ञानदेव निधी । मुक्ताई सिद्धि आळंकापुरीं ॥३॥
पंढरी प्रत्यक्ष केली ज्ञानदेवें । उभारुनि बाहे सांगे आम्हां ॥४॥
कळिकाळासीं त्रास विठठल उच्चारीं । हरी चराचरी भरला असे ॥५॥
सर्वत्र सबाह्य अंतरंग रुपडें । तें रुप फाडोवाडें पारखिलें ॥६॥
चिंतामणीचें सार कल्पतरु उघड । दावुनियां मूढ तारियेले ॥७॥
सुवर्णाचा पिंपळ तिहीं केला ठाऊका । त्या समीप देखा कल्पतरु ॥८॥
सिद्धेश्वरलिंग सिद्धिबुद्धि दाता । जड जीवा मुक्तता देतु हरी ॥९॥
ऐसिये स्थानकीं ज्ञानदेव राहिले । राहुनी तारिले मूढजन ॥१०॥
नामा म्हणे ज्ञानदेव हा दातार । जडजीवा उद्धार विठठल हरी ॥११॥
ही कथा काही शे- वर्षांपूर्वीची. पण असे सगुण दर्शन आजही घडते हे विशेष. अलीकडच्या काळात विमलाजी ठकार यांना जपानच्या अतामी समुद्रकिनारी झालेले ज्ञानदेवांचे सगुण दर्शनाचा त्यांचे चरित्रात उल्लेख आहे तो वाचण्याजोगा आहे.
मध्यंतरी “ज्ञानगंज” वर चर्चा झाली होती. ज्ञानदेवांसारखे संतश्रेष्ठ अशाच ठिकाणाहून येतात व शेकडो वर्षांचे मार्गदर्शन करणारा ठेवा ठेवून जातात.
ज्ञानदेवी वाचून एक तरी ओवी अनुभवावी असे नामदेव म्हणतात पण भावार्थदीपिका वाचावयास लागल्यावर ते आपसूकच घडते हे सांगणे नलगे!!
धन्यवाद,
सुदेश
-----------------------------------------------------------------------------
लेलेकाका नमस्कार,
हे कुणी कुणास लिहिले आहे?
बनारसचे पं गोपिनाथ कविराज यांचे गुरु विशुद्धानंद परमहंस यांनी त्यांना अनेक अद्भुत चमत्कार दाखविले होते व “ग्यानगंज”बद्दल सुद्धा बरीच माहिती दिली होती, तेथून काही वस्तू येत असत व इथून तेथे पाठविल्या जात असत. काही पत्रंसुद्धा येत असत. कदाचित कविराजांचा तेथे संपर्क सुद्धा झाला असेल.
विशुद्धानंद सांगत कि योगी सर्वज्ञ व सर्वशक्तिमान असतो व त्यास असंभव असे काही नसते. ईश्वरत्व वा ऐश्वर्य यांच्या विकासाशिवाय मनुष्य कधीही योगी पदप्राप्त मानला जात नाही. त्याकारणे ईश्वरच योगी वा योगी ईश्वर आहे असे ते सांगत.
विशुद्धानंदांनी वाराणसीत नवमुंडी आसनाची स्थापना केली आहे. विशुद्धानंद कानन असे त्या स्थानाचे नाव आहे. त्यामागे त्यांचा/ग्यानगंज चा काही भावी उद्देश असेल.
ग्यानगंज एक सिद्ध स्थान आहे जेथे देहत्यागानंतरही ज्यांचे प्रारब्ध शेष आहे असे अपूर्ण योगी काही काल वास्तव्य करतात.
या स्थूल दृश्य भूलोकात आपण कुठं जावं, कुठं रहावं, किती काळ राहावं हे सुद्धा आपल्या हातात नाही तर मग सूक्ष्म जगताची काय बात!!
असो, अध्यात्मातील अदृश्य वा सूक्ष्म जगत व त्यातील सिद्धमंडल नित्य कार्यरत असते. साधकांवर त्यांची नित्य कृपादृष्टी असते व त्यांना वेळोवेळी सहाय केले जाते इतके लक्षात ठेवले तरी तूर्तास पुरे!
धन्यवाद,
सुदेश
-----------------------------------------------------------------------------------------
एकनाथ स्वतः देवगिरीच्या किल्ल्यावर ध्यानस्थ बसत असत व एक नाग फणा काढून त्यांचेवर छाया धरीत असे असा उल्लेख कुठंतरी वाचला आहे.
नाथांना झालेला ज्ञानदेवांचा दृष्टांत तर सर्वांना माहीतच आहे.
श्रीज्ञानदेवें येउनी स्वप्नांत । सांगितली मात मजलागीं ॥१॥
दिव्य तेज:पुंज मदनाचा पुतळा । परब्रह्म केवळ बोलतसे ॥२॥
अजानवृक्षाची मुळी कंठास लागली । येऊनि आनंद स्थळीं काढ वेगीं ॥३॥
ऐसें स्वप्न होतां आलों अलंकापुरीं । तंव नदीमाझारी देखिलें द्वार ॥४॥
एका जनार्दनीं पूर्वपुण्य फळलें । श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर ॥५॥
प्रश्न असा होता की निर्जीव भिंत चालविली त्यांना अजानवृक्षाची मुळी हलविणे अशक्य होते कां? वा नाथांद्वारे ज्ञानेश्वरी शुद्ध करावयाची होती तर माउलीने पैठणासच येऊन सांगितले कां नाही. आळंदीस कां बोलाविले? वगैरे वगैरे
अनुहत टिपरी घाई खेळ जाणें तो भाई रे । खोटा खेळ खेळोनि काय स्वतः अनुभव घेई रे ॥ धृ॥
मत्स्येद्रं कुळीं एक गोरख जाला । तो बहुत खेळ खेळला रे । पवन साधुनि अष्टांग योगे तेणेंचि बळें मातला रे ।
खेचरीं भूचरीं चाचरी धरुनीं अगोचरी मिळाली रे । गोल्हाट योग साधुनि तेणें काळ तो जिंकुनि गेला रे ॥१॥
निवृत्तिचा पोर एक ज्ञाना जाण तो खेळियामाजी शहाणा रे । कवित्व केला प्रकाश मातला प्रवृत्ति गाळिलें घाणा रे ।
असोनि भेला नसोनि गेला काळ केला आंकणा रे । भले भले गडी मिळाविले तेणें अकाय सांगु कवणा रे ॥२॥
जनार्दनाची सात पाँच पोरें त्यामाजी लाडका येका रे । एकही साधन न करी परी तो बळेचि मातला फुका रे ।
आपपर देही कांहींच नेणें रायासी म्हणे तो रंका रे । भलेंभले गडी मेळवोनि तेनें खेळ दाविला असका रे ॥३॥
तिघा जिणांचें खेळणें जालें चवर्थे एक उठविलें रे । अनन्यभावें सदगुरुचरणीं गुरुसी शरण गेलें रे ।
भवासी न भ्यालं कळलें म्हणोनि तिघांचि समान जालें रे । आपण जैसें पूर्ण तैसें एका जनार्दनी केलें रे ॥४॥
नाभिस्थानीं ठेवा हृदयकमळीं पहावा । द्विदळीं अनुभवा एकभवा ॥१॥
अर्धमात्रा बिंदु पाहतां प्रकार । होऊनी साचार सुखी राहे ॥२॥
प्रणव ओंकारू विचार करितां । बिंदुची तत्त्वतां सर्वगत ॥३॥
कुंडलिनी गति सहजचि राहे । सहस्त्रदळीं पाहे आत्मरूप ॥४॥
भिन्नभिन्न नाहीं अवघेंचि स्वरुप । पाहतां निजरुप रुप होय ॥५॥
तेथें कैंचा विचारू कैंचा पा अनाचारू । एका जनार्दनीं साचारू सर्वा घटीं ॥६॥
रात्रंदिवस जप होती साठ घटिका । संख्या त्याची ऐका निरनिराळी ॥१॥
दीड घटिका पळें दहा निमिष दोन । प्रथम तें स्थान आधारचक्र ॥२॥
साडेसोळा घटिका दहा पळें लेखा । निमिषें तीन देखा स्वाधिष्ठानी ॥३॥
दहा पळें देखा घटिका साडेसोळा असती । मणिपूर गणती निमिष चार ॥४॥
आणिक घटी पळें तितुकींची पाही । अनुहत ठायीं निमिष पांच ॥५॥
पावणेतीन घटिका दहा पळें जाणा । विशुद्धींची गणना निमिष एक ॥६॥
अग्निचक्रावरी पावणेतीन घटिका । दीड पळ देखा निमिष एक ॥७॥
पळ आठ घटिका अडिचाची गणती । निमिष चवदा असती सहस्त्रदळीं ॥८॥
साहाशें ते सहस्त्र एकवीस होती । जनार्दनप्राप्ति एका उपायें ॥९॥
शुक्रवार, 17 नवंबर 2017
गुरुवार, 9 नवंबर 2017
सोमवार, 6 नवंबर 2017
श्रीगुरु गोरक्षनाथप्रणित ‘नाथपंथाचे’ तत्त्वज्ञान
"Shreepad Deshpande" <shreeshruti62@gmail.com> wrote:
कार्तिक शुद्ध१३, विश्वगुरु श्री गोरक्षनाथ प्रकटदिनाच्या निमित्ताने
कार्तिक शुद्ध१३, विश्वगुरु श्री गोरक्षनाथ प्रकटदिनाच्या निमित्ताने
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज श्रीगुरू गोरक्षनाथांची महती सांगतात
तेणें योगाब्जिनीसरोवरु । विषयविध्वंसैकवीरु । तिये पदीं कां सर्वेश्वरु । अभिषेकिला ॥१७५६॥/१८.
त्यांच्याच चरणी ही सेवा समर्पित करतांना अतिव आनंद अनुभवतोय.
श्रीगुरु गोरक्षनाथप्रणित ‘नाथपंथाचे’ तत्त्वज्ञान :
‘नाथसंप्रदाय’शब्दाची प्राचीनता : परब्रह्माची, परमत्त्वाची उपासना करणारा हा पंथ सिध्दपंथ, योगमार्ग, गोरखपंथ, कानफाटा संप्रदाय, इ.नावांनी ओळखला जातो. महाराष्ट्रात १३व्या शतकापासून महानुभावीय व भागवतसांप्रदायिक ‘नाथपंथ’असा उल्लेख केला आहे. संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज एका अभंगात म्हणतात ‘जगामाजी श्रेष्ठ संप्रदाय नाना, कीर्ती त्रिभुवनामाजी फार | आम्ही एक दीन जाणा नाथपंथी | नीचाहुनी आथी अतिनीच |’
संतश्रेष्ठ श्रीज्ञानदेवांनी आपली दिव्य गुरुपरंपरा ज्या अभंगातून सांगितली, तो अभंग असा :-
‘‘आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा | मच्छिंद‘ तयांचा मुख्य शिष्य ॥
मच्छिद्राने बोध गोरक्षासी केला | गोरक्ष वोळला गहिनी प्रति ॥
गहिनीप्रसादें निवृत्तिदातार | ज्ञानदेवा सार चोजविलें ॥
सरलार्थ : सर्व सिद्धांचे गुरू आदिनाथ आहेत. त्यांचे मुख्य शिष्य आहेत मच्छिंद्रनाथ.-१. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना आत्मज्ञानाचा उपदेश / बोध केला व गोरक्षनाथांनी गहिनीनाथांवर कृपावर्षाव केला.-२. गहिनीनाथांच्या कृपाप्रसादाने श्रीनिवृत्तिनाथ उदार दाते / दातार होऊन त्यांनी ज्ञानदेवांना बोध रूपी अमृतातील सार ममतेने भरविले / चोजविले;
रहस्य / मर्म सांगितले.
श्रीगुरू जीवाच्या ठिकाणचे अज्ञान, अविद्या नष्ट करतात. ‘गुरू’ शब्दाची व्याख्या ‘ग इति अंध:कार: | र इति नाशयति | अंध:कारं नाशयति स गुरु: |’ अशी केली जाते. विद्यागुरू, शास्त्रगुरू, मंत्रगुरू, गोत्रगुरू इ.प्रकार परिचित आहेत. एकनाथी भागवतात गुरूंचे २७प्रकार सांगितले आहत. सदगुरू आत्म-बोध देतात. जीवाला गुरू अनेक, मात्र सद्गुरूच जीवाला मुक्त करू शकतात.
शिष्याने श्रीगुरूंना समर्पित होऊन सेवा करायची असते. तो आज्ञाधारक, कृतज्ञ, पराकोटीचा विनम्र असावा लागतो. तेच त्याच्यालेखी सर्वस्व असतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याने ज्ञानसाधना करायची असते. विद्या प्राप्त झाल्यानंतर शिष्याने त्यांना दक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त व्हायचे असते.
‘आदिनाथ-मच्छिंद‘नाथ’ : आदिनाथ हे श्रीशंकरांना परंपरेत प्राप्त झालेले नाव आहे. श्रीभागवतातील ‘सती-आख्यान’ श्रीशंकर विरागी-आत्मज्ञानी असल्याचे सांगते. त्यांना श्रीविष्णूंकडून आत्मज्ञान मिळाले. ‘पिंडें पिंडाचा ग्रासु | तो हा नाथसंकेतींचा दंशु | परि दाऊनि गेला उद्देशु | महाविष्णु ॥ पंचमहाभूतांचा लय करावयाचा, हे नाथपंथीयांचे मर्म, श्रीमहाविष्णूंनी श्रीशंकरांना सांगितले. श्रीमहाविष्णू हेच आदिनाथ ठरतात. मात्र येथे श्रीशंकरांनाच ‘आदिनाथ’ म्हटले आहे.
श्रीशंकर समस्त नाथसिद्धांचे गुरू आहेत. त्यांच्यातील मत्स्येंद्रनाथ मुख्यशिष्य आहेत.
निरनिराळ्या नाथपरंपरा देशात रूढ अहेत; तरी ‘आदिनाथ-मत्स्येंद्रनाथ’ सर्वत्र अग्रस्थानी आहेत. याबाबत एकवाक्यता आहे. श्री ज्ञाननाथ अभंगात म्हणतात, ‘आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा | मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य ॥
दुसर्या चरणातील संज्ञा ‘गोरक्षनाथ-गहिनीनाथ’ ‘आत्मज्ञान’ ‘वोळला’. नाशिवंताकडून अविनाशी तत्त्वाकडे, अनात्म्याकडून आत्मतत्त्वाकडे व आकाराकडून निराकाराकडे जाणे; जाता जाता, तेच होऊन जाणे / राहणे, हाच आत्मसाक्षात्कार होय. ‘देव पाहावया गेलो, तेथे देवचि होवोनिया ठेलो’. अशी या नाथपंथाची प्राचीनता व महत्ता श्रीज्ञानेश्वर महाराज सांगतात.
‘श्रीगोरक्षनाथ’ नाथांमधील सर्वाधिक प्रभावी, शक्तिशाली, तप:पूत, ज्ञानी योगाचार्य. विशुद्ध अध्यात्मसाधनेचे खंदे पुरस्कर्ते. गुरुमार्गाचे प्रवर्तक. शुद्ध अध्यात्मसाधनेचा प्रचार-प्रसार केला.
गोरक्षनाथांची ग्रंथसंपदा प्रचंड असून, त्यांनी श्रीचौरंगीनाथांना ‘ नमन’ केले आहे. अन्य सांप्रदायिकांवरही त्यांच्या कार्याचा ठसा उमटलेला दिसतो. आज अन्य ग्रंथांतून गोरक्षनाथांच्या कार्याविषयी अधिकची माहिती प्राप्त करून सर्वत्र ती गर्जून सांगण्याची आवश्यकता आहे.
श्रीगुरु गोरक्षनाथप्रणित ‘नाथपंथाचे’ तत्त्वज्ञान :
भारतातील श्रीगोरक्षपूर्व साधनाविश्व पारंपारिक पौराणिकहिंदू धारणा, योगपध्दती,तांत्रिकवामाचार, कर्मठ आचारनिष्ठ व्रतवैकल्ये, शाक्तांचा पंचमकार, जारणˆमारण उच्चाटना सारखे विधी व सिध्दी इत्यादींनी झाकाळून गेले होते. यज्ञयागांदि कर्मकाण्ड व तंत्रमंत्रात्मक लिंगˆयोनी यांची पुजा व त्याला अनुसरुन विकृत आचरण यांनाच मह्त्व प्राप्त झाले होते.
भक्तिविचार सुध्दा संप्रदायांच्या चौकटीत निर्जीव, नि:सत्व बनला होता. वैष्णवांचा विशुध्द प्रेमाचा धर्ममार्ग भौतिक व ऐहिक शरीरनिष्ठ सुखाचा मार्ग बनला. अशाप्रकारे विकृत साधनामार्गांनी सबंध साधनाविश्व ढवळून निघाले होते. अशा या विकृत साधनाविश्वाचे शुध्दिकरण विश्वगुरु श्रीगोरक्षनाथांनी केले.
श्रीगुरु गोरक्षनाथांच्या तत्त्वज्ञानाचा उगम ‘सांख्यमत’ असून शैव सिध्दांताच्या ३६ तत्वांचा समावेश त्यात आहे. पिंड व
ब्रह्मांड यांत समतत्वता, समपदार्थता आहे या सिध्दांतावर हे तत्त्वज्ञान आधारीत असून हे तत्व अनुभवास येणे हे
नाथतत्त्वज्ञानाचे परम ध्येय आहे.
परमात्मतत्त्वाच्या अवस्थेत शिवच सर्व विश्वाची उत्पत्ती, त्याचे पालन व त्याचे रक्षण ‘कुडंलिनी’ शक्तिद्वारा करतो. शिवाची शक्तिˆकुंडलिनी हा विचार नाथपंथाच्या तत्त्वज्ञानात आहे. ही शिवशक्ति चितशक्ति, चिदरुपिणी, कुंडलिनी जगदंबा इ . नावांनी ओळखली जाते. हीच शक्ति चराचराला व्यापून आहे. गुणपूर्णता, प्रतिबिंबता, प्रबलता, प्रोज्वलता व प्रत्यङमुखता हे तिचे पाच गुण आहेत. नाथतत्त्वात जगत हे चिदशक्तिच्या विकासाचे, विलासाचे परिणामरुप आहे तर, शिव हा अनादि, अनन्त, स्वयंसिध्द, स्वप्रकाशी, नित्यतत्व आहे.
शिवस्याभ्यन्तरे शक्ति: शक्तेरभ्यन्तरे शिव:|
अन्तरं नैव पश्यामि चन्द्रचन्द्रिकयोरिव॥
शिव व शक्ति ही दोन दिसली तरी ती एकच आहेत. एकच अद्वितीय असे परमतत्त्व शिव व शक्ति या दोन अवस्थांतून प्रकटते.शिवच शक्ति बनून सर्व दृष्ट सृष्टीमध्ये प्रकटतो, प्रस्फुरीत होतो. चंद्र व त्याचा प्रकाश जसा एकरुप तसेच शिव व शक्तिचे स्वरुप आहे. सर्व सृष्टीची निर्मिति प्रकि‘या हा शिवशक्तिचा विलास आहे.
प्रसरं भासतं शक्ति: सकोचं भासते शिव:|
तयो: संयोगकर्ता य: स भवेद्योगयोगराट् ॥
असा प्रसर व संकोच यांचे आदि व अंत्यस्थान म्हणजेच ‘साम्यावस्था’; हे साम्य भंगले की शक्तिचे स्फुरण होते, या स्फुरणातून जगाची निर्मिती होते. शक्तिचा तिरोभाव म्हणजेच ‘लय’. शक्तिचे हे सामर्थ्य व तिची शिवाशी असलेली अभिन्नता ध्यानात घेऊनच नाथयोगी शक्तिची उपासना करतात.
या उपासनेत देहाची साधना महत्वाची आहे, कारण याच देहाने परमपदाची प्राप्ती होणार असल्याने त्याची निगा राखणे महत्वाचे आहे .याची देही याची डोळा ! आत्मसाक्षात्कार प्राप्ती हे नाथपंथाचे ध्येय असल्याने इंद्रिय संयमन व मनोनिग्रहाला आत्यंतिक महत्व आहे. श्रीगुरु गोरक्षनाथांनी हठयोगाचा समावेश आपल्या योगपद्धतीत समाविष्ट केला आहे. हठयोगाचा अभ्यास वाढवून शरीरातील योगनाडया जागवून व त्या अमृतवाहिन्या बनवून साधकास ‘याची देही याची डोळा !’ मुक्तिचा सोहळा अनुभवता यावा हे श्रीगुरुगोरक्षनाथ प्रणित योगसाधनेचे प्रधान वैशिष्ठ आहे.
श्रीगुरु गोरक्षनाथ आपल्या‘सिद्धसिद्धांत पद्धति’या योगविषयक ग‘ंथात आपल्या साधनामार्गाचे वैशिष्ठ सांगतातˆ
‘पिंडमध्य चराचरौ यो जानाति | स योगी पिंड संवित्तिर्भवति ॥
ब्रह्माण्डवर्ति यत् किंचित् तत् पिण्डेऽप्यसि सर्वथा ॥
जे ब्रह्माण्डात आहे तेच पिण्डात ! हा महत्वाचा सिध्दान्त श्रीगोरक्षनाथ सांगतात. पिण्डात व ब्रह्माण्डात जे तत्त्व व्यापुन आहे त्याची एकदा अनुभूती आल्यानंतर सगुणनिर्गुण, साकारनिराकार, द्वैतअव्दैत यांच्या पलिकडचे ‘नाथब्रह्म’च उरते. कुंडलिनी जागृतीने ‘पिंण्डे पिण्डाचा ग्रासू’ हया जीवशिवसामरस्याच्या अनुभूतीचा साधनामार्ग श्रीगुरु गोरक्षनाथांनी उपदेशिला आहे आणि ह्यासाठी श्रीगुरुकृपेशिवाय तरणोपाय नाही !
वर सांगितलेल्या पिंडब्रह्मांण्डाच्या ऐक्याच्या ज्ञानासाठी, सामरस्याच्या अनुभूतीसाठी श्रीगुरु गोरक्षनाथांनी हठयोगाची साधना प्रवर्तित केली. या हठयोगास कर्म, ज्ञान, भक्ति यांची जोड दिली. तांत्रिक, शाक्त, कापालिक, अघोर, व इतर वामाचारी व विकृत साधनांच्या कचाट्यातून भारतीय धर्मसाधनेची सुटका करुन गुरुमार्गाधिष्ठीत साधनामार्ग सुप्रतिष्ठित केला.
॥ ‘ ग’ कारो गुणसंयुक्तो ‘ र ’ कारो रूपलक्षण:
‘क्ष’ कारणात् क्षयं ब‘ह्म श्रीगोरक्ष नमोऽस्तुते ॥
नारीत्व दर्शन ८ व १० -- ब्रह्मकुमारी संस्था का सीरीयल
मेरा मानना है कि पारिवारिक समायोजन के साथ साथ नारीको अपने व्यक्तिमत्व की समृद्धिपर भी ध्यान देना चाहिये क्योंकि इसका असर परिवारकी भावभावनाओंपर पडता है।
ब्रह्मकुमारी संस्था के कार्यक्रम नारीत्व दर्शन की प्रतिभागिता का चलचित्र
EP#08: PARIVARIK SAMAYOJAN
परिवारकी समस्याएँ सुलझ सकती हैं यदि परिवारमें संवादकी परंपरा पहलेसे बनाई गई हो। ब्रह्मकुमारी संस्थाके नारीत्व दर्शन कार्यक्रममें मेरी सहभागिता।
EP#10: SAHANSHEELTA AUR DHAIRYA
शनिवार, 4 नवंबर 2017
बुधवार, 18 अक्टूबर 2017
इन्द्रकृतं महालक्ष्म्यष्टकं
नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते। शङ्खचक्रगदाहस्ते महालक्षि्म नमोऽस्तु ते ।।१।।
नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करि । सर्वपापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥२॥
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि । सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥३॥
सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि । मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥४॥
आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि । योगजे योगसम्भूते महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥५॥
स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्ति महोदरे । महापापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥६॥
पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि । परमेशि जगन्माता महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥७॥
श्वेतांबरधरे देवि नानालंकार भूषिते । जगस्थिते जगन्मातः महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥८।।
। फलश्रुति ।
महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेद्भक्तिमान्नरः । सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥
एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम् । द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः ॥
त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम् । महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्न वरदा शुभा ॥
॥ इतीन्द्रकृतं महालक्ष्म्यष्टकं सम्पूर्णम् ॥
नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करि । सर्वपापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥२॥
सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि । सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥३॥
सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि । मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥४॥
आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि । योगजे योगसम्भूते महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥५॥
स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्ति महोदरे । महापापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥६॥
पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि । परमेशि जगन्माता महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥७॥
श्वेतांबरधरे देवि नानालंकार भूषिते । जगस्थिते जगन्मातः महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥८।।
। फलश्रुति ।
महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेद्भक्तिमान्नरः । सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥
एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम् । द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः ॥
त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम् । महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्न वरदा शुभा ॥
॥ इतीन्द्रकृतं महालक्ष्म्यष्टकं सम्पूर्णम् ॥
मंगलवार, 17 अक्टूबर 2017
सोमवार, 16 अक्टूबर 2017
शुक्रवार, 13 अक्टूबर 2017
बुधवार, 11 अक्टूबर 2017
गुरुवार, 5 अक्टूबर 2017
बुधवार, 4 अक्टूबर 2017
मंगलवार, 3 अक्टूबर 2017
शनिवार, 30 सितंबर 2017
शुक्रवार, 29 सितंबर 2017
बुधवार, 27 सितंबर 2017
मंगलवार, 26 सितंबर 2017
सोमवार, 25 सितंबर 2017
रविवार, 24 सितंबर 2017
शुक्रवार, 22 सितंबर 2017
गुरुवार, 21 सितंबर 2017
बुधवार, 20 सितंबर 2017
बुधवार, 6 सितंबर 2017
शुक्रवार, 1 सितंबर 2017
मंगलवार, 23 मई 2017
रविवार, 7 मई 2017
शुक्रवार, 14 अप्रैल 2017
महाभारत व्याख्यानमाला प्रस्ताव
महाभारत व्याख्यानमाला
भारतीय वाडमयातील प्रमुख ग्रंथांपैकी एक आणि जगातील सर्वात विस्तृत असा, "जय़", "भारत" व "महाभारत" या नावांनी ओळखला जाणारा ग्रंथ भारतीयांना ललामभूत आहे. कथा-कथानकांच्या माध्यमातून हा ग्रंथ पुनः पुन्हा सांगितला गेला आहे. तरी पण अजून पुढे हे कथाकथन वारंवार होत राहाणारच. दर नवीन पीढीला याचे विस्मरण न व्हावे यासाठी अशा कथाकथनाची वारंवार आवश्यकता भासत राहणार.
महाभारताचे कथन दोन प्रकारांनी करता येते. भक्तिभाव ठेवून आणि समकालिकता व व्यावहारिकता ठेवून. पण मूळ संहितेचा परिचय करून देणे ही पायाभूत गरज राहतेच.
आधुनिक काळानुरूप ज्येष्ठ नागरिक, प्रौढ नागरिक, किशोर, तरुण आणि शाळकरी असे लोकसंख्येचे वर्गीकरण केले तर या चार पिढ्या होतात असे आपण म्हणू शकतो. यापैकी ज्येष्ठ पिढीतीलही सुमारे ५० टक्के लोकांना महाभारताची कथा समग्रतेने माहीत नसते. त्यापेक्षा पुढील पिढ्यांमधे महाभारत ऐकले किंवा वाचले असण्याचे प्रमाण उत्तरोत्तर प्रमाण कमी आहे. त्यांना ही ओळख करून देणे अधिकाअधिक महत्त्वाचे आहे.
या सर्व विचारांअंती भांडारकर प्राच्य विद्या संशोधक संस्थेच्या वतीने व संस्थेमध्ये नव्या वर्षारंभापासून “महाभारताची समग्र ओळख” अशी व्याख्यानमाला आयोजित केली आहे.
सदरचे कथाकथन श्रीमती लीना मेहंदळे करतील. त्या महाभारत व भगवद्गीतेच्या अभ्यासक आहेत. त्यांनी वडिलांकडे (डॉ. बलराम. स. आग्निहोत्री) संस्कृत व तत्वज्ञान या विषयांचा अनौपचारिक अभ्यास केला. त्या महाभारतातील भारतीय तत्वज्ञान या विषयावर भांडारकर संस्थेमार्फत अभ्यासही करीत आहेत.
प्रथम पुष्पाचा विषय : भीष्म, व्यास आणि कृष्ण : एक त्रिकोण.
स्थळ: टाटा हॉल, भांडारकर संस्था, पुणे
दिवस व वेळ : दर वुधवारी सायंकाळी ४.३० ते ५.३०
या व्याख्यानासाठी सर्वांना खुले निमंत्रण आहे.
***
----------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------
सदस्यता लें
संदेश (Atom)