गुरुवार, 26 जनवरी 2023

कुठला राग केंव्हा ऐकायचा ??



कुठला राग केंव्हा ऐकायचा ?? हा प्रश्न पडत असेल तर हा तक्ता उपयोगी पडू शकेल. या मधे काही मह्त्त्वाचे राग वेळेनुसार दिलेले आहेत.

सकाळी    २ ते ४  :- सोहिनी, पारज

सकाळी    ४ ते ६  :- ललित, भटीयार,भनकर

सकाळी ६ ते ८  :- जोगीया, रामकली, भैरव, कलींगा,  विभास, गुनकली

सकाळी ८ ते १० :- तोडी, कोमल रिषभ आसावरी, बिलासखानी तोडी, अहिरभैरव, नटभैरव, हिंदोल

दुपारी १० ते १२:- जौनपुरी, अलाहिया बिलावल, देसकर, भैरव, देसी,असावरी,

दुपारी १२ ते २ :- गौड सारंग, शुद्ध सारंग, वृंदावनी सारंग

दुपारी २ ते ४  :- भिमपलासी ,मुलतानी

दुपारी ४ ते ६  :- पटदीप, श्री, पूर्वी, धानी,्बरवा

सायंकाळी ६ ते ८  :- शुद्ध कल्याण, यमन, पुरीया, मेघ, गौरी, हंसध्वनी, पूरियाधनाश्री, लक्ष्मी कल्याण, यमन कल्याण, कलावती, हमीर

रात्री ८ ते १० :-  देश , दुर्गा, केदार, जयजयवंती, मीयामल्हार, सुरदासी मल्हार, काफी, रामदासी मल्हार, बहार, जोग, दुर्गा, हेमकल्याण, नटभैरव, भूपाली, गारा , कामोद, तिलंग, शाम कल्याण, नंद, जोग, केदार, चांदनी केदार , देश, गौड मल्हार, तिलक कामोद, खमाज, कलावती

रात्री १० ते १२ :- चंद्रकंस, शंकरा, बागेश्री, बिहाग, अभोगी, नायकी कन्नडा, कौशिक अवनी, बिहागडा, सरस्वती,

रात्री १२ ते २  :-अडाणा, शहाणा, दरबारी कानडा, आणि मालकंस

शास्त्रीय संगीतातील विविध राग आणि ते ऐकल्याने मिळणारे फायदे -

1 राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा.

2 राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा.

3 राग देसकार – उत्थान व संतुलन साधणारा.

4 राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा.

5 राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणिव करून देणारा राग.

6 राग शाम कल्याण – मुलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा.

7 राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि उर्जा निर्माण करणारा.

8 राग केदार – स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारून भरपूर उर्जा निर्माण करणारा तसेच मुलाधार उत्तेजित करणारा.

9 राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा.

10 राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा.

11 राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा भावनाप्रधान राग सर्व सदिच्छा पूर्णकरून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग.

12 राग मालकंस – अतिशय शांत - मधुर राग प्रेमभाव निर्माण करणारा व संसारिक सुख वृध्दिंगत करणारा.

13 राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जाग्रुत करणारा असा आहे.

14 राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यश दायक आहे. विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो.

15 राग भिम पलासी – संसार सुख व प्रेम देणारा.

16 राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग.

17 राग गौरी – शुध्द ईच्छा, मर्यादाशिलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहिशा करण.

(व्हाट्स अप समुहामधे आलेली सुंदर माहिती) यातलं मर्म त्याला समजलं होतं.